Category: मुंबई

Mumbai news

मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत ४३२० कोटी जमा

कर भरण्यासाठी केवळ तीन दिवस मुंबई : मुंबई महानगरपालिकेला यंदा ४३२० कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात अखेर यश आले आहे. यंदा मालमत्ता कर भरण्यासाठी २५ मेची मुदत देण्यात आली असून…

नाईट लाईफमुळे तरुणाई उद्‌ध्वस्‍त!

नवी मुंबई ः रात्रभर सुरू असलेल्या पब, बार आणि रेस्‍टॉरंटमुळे नवी मुंबईतील तरुणाई धोक्यात आली आहे. सीमाशुल्क उत्पादन विभागाने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत बार खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. याचा गैरफायदा…

१२ वर्षाखालील मुलांची ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धा :

गणेश पालकर क्रिकेट क्लबला विजेतेपद मुंबई :  दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने ओव्हल मैदान, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाने विजेतेपद पटकावले.…

अनधिकृत होर्डींगविरोधी कारवाईत 34 मोठ्या होर्डींगवर निष्कासनाची धडक कारवाई   

नवी मुंबई : 13 मे रोजी सायं. 4 नंतर सुरू झालेले वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत मुंबईत घाटकोपर येथे होर्डींग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी…

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

अशोक गायकवाड मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांनी दिलेली मैत्री, करुणा, मुदीता आणि उपेक्षा (समता) हि शिकवण व्यक्तींना, समाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच…

नाल्यातून गाळ काढण्याला येणार वेग

मुंबई : नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत. रेल्‍वे, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांसह विविध विभागांशी योग्‍य समन्‍वय साधून ५ जूनपर्यंत नाल्‍यातील गाळ काढण्‍याची कामे पूर्ण करा, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे स्‍पष्‍ट निर्देश पालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी दिले. तसेच उपायुक्‍त, सहायक आयुक्‍तांनी आपल्या विभागात दररोज सकाळ, सायंकाळी विभागात नाल्यातील गाळ काढण्याची पाहणी करावी. पाणी साचण्‍याच्‍या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून पाण्‍याचा जलद गतीने निचरा होण्‍याकामी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. यंदाच्‍या पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर नाल्‍यांतून गाळ काढण्‍याच्‍या कामांची आढावा बैठक पालिका आयुक्‍त गगराणी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली महापालिका मुख्‍यालयात झाली. अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, अभिजीत बांगर, डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्‍त चंद्रशेखर चोरे आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ उपशाची कामे जलद गतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम ५ जून अखेरपर्यंत पूर्ण करावे. या मुदतीत ही कामे पूर्ण होतील, त्या दृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा, अशा सूचना आयुक्त गगराणी यांनी दिल्या. नाल्यातील गाळ काढण्याची कामे योग्यरीत्या सुरू आहेत, हे पाहण्यासाठी पालिकेच्‍या उपायुक्‍त, सहायक आयुक्‍तांनी नाल्यांच्या ठिकाणी भेट द्यावी, असे स्‍पष्‍ट करतानाच आयुक्‍त म्‍हणाले की, नाल्‍यालगतच्‍या रहिवाशांकडून नाल्‍यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्‍याच्‍या तक्रारी असल्‍या तरीदेखील तरंगत्‍या कचऱ्याची योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावावी. नाले तुंबता कामा नयेत, याची दक्षता घ्यावी, रुंद नाल्‍याच्‍या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’चा वापर करावा. स्‍थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्‍यांचा सहयोग घ्‍यावा, असेही गगराणी यांनी नमूद केले. रेल्वे हद्दीतील नाले साफ करा रेल्वे प्रशासनासमवेत समन्‍वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, मुंबई शहरात पाणी साचू नये, त्‍याचा जलद गतीने निचरा व्‍हावा, यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात, असे निर्देश आयुक्‍त गगराणी यांनी दिले आहेत.

गुरुवारी एका तासाचा वाहतूक ब्लॉक

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी एका तासाचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर किमी ६.००० येथे पुणे – मुंबई (मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर) गॅन्ट्री बसविण्याचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी १२ ते १ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी ५५.००० वरून वळवून मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना मुंबई – पुणे मार्गावरून जाता येईल. यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झीट किमी ३९.००० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे – मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील. यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी व जड-अवजड वाहने खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झीट किमी ३२.००० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे – मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील. यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी व जड-अवजड वाहने पनवेल क्र. ४८ या मार्गावरून पनवेल मार्ग मुंबई दिशेने मार्गस्थ करण्यात येतील. मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुणे येथून मुंबईला जाणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.

मे अखेरीस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

मुंबई : तापमानाचा पारा वाढणार असून पुढील काही दिवस मुंबईकरांसाठी उष्ण, दमट आणि अस्वस्थ करणारे आहेत. मेअखेरीस पावसाचे पुनरागमन होत असून त्याचाच हा परिणाम असल्याचे हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले. यामुळे मुंबईमध्ये प्री-मान्सून सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सांताक्रूझ येथे ३४.९; तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली; तर आर्द्रता सुमारे ६५ ते ७० टक्क्यांच्या आसपास नोंदवली गेली. यामुळे मुंबईत सध्या दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. पुढील आठवड्यात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्या सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार व संध्याकाळपर्यंत आकाश निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ अंश सेल्सिअस आणि २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

सर्व आमदारांच्या आग्रहाखातर वरीष्ठांना अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे लागले – उमेश पाटील

अजितदादांनी कुणाला न विचारता शपथविधी करण्याचा निर्णय घेतला असता, तर पुन्हा त्यांना वरीष्ठांनी उपमुख्यमंत्री केले असते का? मुंबई : अजितदादांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता असे सांगितले गेले परंतु वस्तुस्थिती तशी अजिबात नव्हती अजितदादांनी कुणाला न विचारता असा निर्णय घेतला असता तर पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केले असते का? असा सवाल करतानाच यामध्ये अजितदादांची काहीही चूक नाही हे ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर अजितदादांना उपमुख्यमंत्री करा असे ठरले त्यामुळेच वरीष्ठांना अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे लागले असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत अजितदादांवर जे मुद्दे मांडले त्यावर मंगळवारी संध्याकाळी उमेश पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व मुद्दे खोडून काढले शिवाय अनेक गौप्यस्फोट करत तुतारी गटाची हवाच काढली. अजितदादांना पक्षात माफी मागायला लावून परत घेतले हे जे सांगितले जाते ती वस्तुस्थिती नव्हती तर सर्व आमदारांचे समर्थन अजितदादांना होते त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे असेही उमेश पाटील म्हणाले. २००४ पासून २०१९ पर्यंत सातत्याने वरीष्ठांनी पक्षात यु टर्न घेतल्यामुळेच अंतर्गत कलह वाढला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. कधी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तर कधी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तयार केला गेला. या पुत्र आणि पुत्री प्रेमातून दोन्ही पक्षात फूट पडलेली दिसत आहे हीच कारणे त्यामागे दडलेली आहेत असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

कोकण रेल्वेत दर दिवशी विनातिकीट प्रवाशांकडून नऊ लाख रुपये दंड वसूल

मुंबई : कोकण रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे प्रशासन सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. या मोहिमेदरम्यान एप्रिल २०२४ मध्ये प्रतिदिन सरासरी ५०४ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सरासरी सुमारे ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी मोहीम राबवून एकूण १५ हजार १२९ प्रवासी तिकीटाविनाच प्रवास करीत असल्याचे आढळले होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून एकूण दोन कोटी ६९ लाख ८५ हजार २५६ रुपये दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वेवरील अनियमित/अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे, असे कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यात कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर प्रभावीपणे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.