Category: मुंबई

Mumbai news

राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!

मुंबई : राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्व सुनावण्या येत्या सोमवारपासून ऑनलाईन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता दिल्लीत न जाता तक्रारदार तसेच प्रतिवाद्यांना सुनावणीला हजर राहता येणार आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने गेल्या दीड वर्षांपासून केलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाची दिल्लीतील उपभोगक्ता भवनात सात खंडपीठे आहेत. या सर्व खंडपीठापुढे दररोज सुनावण्या होतात. या सुनावणीसाठी तक्रारदार वा प्रतिवाद्यांना प्रत्यक्ष वा ऑनलाईन हजर राहता येणार आहे. करोना काळात राष्ट्रीय ग्राहक आयोगाने ऑनलाईन सुनावणी सुरु केली होती. त्यावेळीही तक्रारदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरीही नंतर ऑनलाईन सुनावणी बंद करण्यात आली. ऑनलाईन सुनावणी पुन्हा सुरु करण्यात यावी, यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने आयोगाला पत्र लिहिले होते. याशिवाय आयोगाच्या अध्यक्षांकडे पाठपुरावाही केला होता. दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाली तेव्हाही अशी मागणी पुन्हा नव्याने करण्यात आली. परंतु याबाबत निर्णय घेतला जात नव्हता. आयोगाच्या अध्यक्षपदी नव्याने आलेले अध्यक्ष अमरेश्वर प्रताप साही यांच्याकडेही ग्राहक पंचायतीने नव्याने पाठपुरावा सुरु केला. अखेर त्यांनी ही मागणी मान्य केली आहे. सुरुवातीला एका खंडपीठात अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यास यश मिळाल्यानंतर आता सर्व खंडपीठात ही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ई-न्यायालयांचा आग्रह धरला आहे. याबाबत न्यायालयाने नियमावलीही जारी केली होती. सर्वोच्च व उच्च न्यायालयात काही प्रमाणात तसा वापर सुरु झाला आहे. महारेरातीलही काही सुनावण्या ऑनलाईन घेतल्या जातात. आता राष्ट्रीय ग्राहक आयोगाने पुढाकार घेतला असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था सुरु करण्यात आलेली आहे, असे पत्रक आयोगाने जारी केले आहे.

तरुण वर्ग संघटनेच्या वतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन

रमेश औताडे मुंबई :  भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निम्मिताने सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी सिद्धार्थ कॉलनी तरुण वर्ग संघटनेच्या वतीने दिनांक 14/4/2024 ते 30/4/2024 दरम्यान 16 दिवसांचे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापुरुषांच्या विचाराचे सामर्थ तरुणामध्ये येण्यासाठी तसेंच बुध्द आणी त्यांचा धम्म,शाहू, फुले ,यांचे विचार छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या उन्हाळी शिबीरातून आत्ताच्या तरुणापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील विद्यार्थी तरुण तरुणी यांच्यासाठी शैक्षणिक,क्रिडा,मनोरंजन,करिअर मार्गदर्शन,योगा,ध्यान,याबरोबर कोणत्याही प्रकाराचे शुल्क न आकारता क्रिकेट,फुटबॉल,कब्बड्डी,बुध्दिबळ् अश्या प्रकारे खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. या बरोबर महिला मुलीसाठी स्व सुरक्षेच्या दृष्टीने कराटे ,किक बॉक्सिंग,सहीत अनेक मैदांनी खेळाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती युवा पँथर प्रणित विनायक पगारे यांनी दिली.अधिक माहितीसाठी 98332 29995 या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले.

ईदनिमित्त सलमान खानच्या घरासमोर चाहत्यांची तोबा गर्दी

पोलिसांचा लाठीचार्ज मुंबई : अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली आहे. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची बातमी समोर आली आहे. रमजानच्या दिवशी सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी…

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समतेचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात…

मराठी शाळांचा विषय वचननाम्यात घ्या!

मुंबई : मराठी भाषिक राज्य असतानाही राज्यात मराठी भाषा ही पोरकी होण्याच्या मार्गावर आली असून यासाठी विविध पक्षांची राजकीय मानसिकतादेखील कारणीभूत आहे. विविध सरकार आणि अधिकाऱ्यांच्या युतींमुळे मराठी शाळा उद्‌ध्वस्त…

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार !

मुंबई : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी राज्यात प्रशासन सज्ज’ याविषयी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.…

नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने दादरच्या  श्री समर्थ व्यायाम मंदिराची राष्ट्रीय ज्युडोपटू  संपदा फाळके हिला लालबाग-परळ हा गिरणगाव भूषण पुरस्कार गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे देण्यात आला.  

मराठी माणसाच्या कलेचा झेंडा श्रीलंकेत

रमेश औताडे मुंबई : सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि वन्यजीव पर्यटन तज्ञ अमोल हेंद्रे यांच्या थरारक छायाचित्रांचे प्रदर्शन श्रीलंका दूतावासाने कोलंबो, श्रीलंका आणि मुंबई येथे आयोजित केले असल्याने मराठी माणसाचा झेंडा श्रीलंकेत…

घणसोली स्टेशनसमोर ट्रक पलटी

ठाणे-बेलापूर वाहतूक कोंडी, नवी मुंबई : पनवेल कडून ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकावर धडकला आणि एका बघून पलटी झाला. सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला…

खेळात टिकायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे-हॉकीपटू धनंजय महाडिक

मुंबई:- खेळात टिकायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे उदगार शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू धनंजय महाडिक यांनी ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या २१व्या वर्धापन दिनी प्रमुख अतिथी म्हणून…