Category: मुंबई

Mumbai news

दक्षिण मध्य मुंबईत सेनेच्या प्रचारातून काँग्रेस गायब

मुंबई : सांगली, भिवंडीप्रमाणे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने या ठिकाणावरून परस्पर अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली. या जागेसाठी काँग्रेसचा आग्रह कायम…

मुुंबईतील पहिला चैत्र नवरात्री उत्सव* राजराजेश्वरी प्रतिष्ठानच्यावतीने यंदाही चैत्र नवरात्री उत्सव ९ एप्रिल २०२४ ते १७ एप्रिल २०२४ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. आंबे मातेच्या मूर्तीचा आगमन सोहळा.

म्यूज़िक मंत्र चा चौथा वर्धापन  दिन ‘सुहाना सफर’

अनेक मान्यवरांच्या उपस्थितित संगीतमय वातावरणात पार पड़ला मुबंई:-  डॉक्टर स्मिता डोंगरे आणि रमेश पूजारी हे दोघे Spreading happiness through music है ब्रीद वाक्य घेऊंन गेली चार वर्ष म्यूज़िक मंत्र हे…

निमिष मुळे, झारा बक्षी सर्वोत्तम जलतरणपटू

खार जिमखाना खुली जलतरण स्पर्धा : मुंबई :  खार जिमखानाच्या वतीने आयोजित खुल्या जलतरण स्पर्धेत खार जिमखान्याच्याच निमिष मुळे आणि झारा बक्षी या दोघांनी सर्वोत्तम जलतरणपटूंचा मान मिळविला  झारा बक्षी…

व्हिव्हिपॅटची मोजणी झाल्यास भाजपा ४० मध्येचे आटपेल

बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांचा दावा मुंबई : आज देशात महगाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व गरीबांवर होणारे अन्याय मोठ्या प्रमाणात वाढले असून अशा स्थितीत भाजपने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे.आज देशात कोणत्याही एका पक्षाला ४०० सीट निवडून आणणे शक्य नाही evm मध्ये सेटींग केल्यास ते सहज शक्य आहे. evm मध्ये सेटींग करून निर्णय परिणाम बदलले जातात असे अनेक वर्षापासून आरोप होत आहे.त्यामुळे evm बाबतीत देशातील जनतेच्या मनात संभ्रम आहे. evm व vvpat याबाबत आम्ही आपल्या निदर्शनास आणून देवू इच्छितो की, बहुजन महापार्टीची स्थपना सन २०१७ मध्ये झाल्यानंतर आम्ही प्रथम निवडणूक उत्तर प्रदेश मध्ये होणाऱ्या विधानसभेची लढविली होती त्या निवडणुकीत फक्त evm या मशीन द्वारे निवडणूक घेण्यात आली.व निकाल जाहीर झाल्यानंतर आमच्या पक्षाच्या उमेदवाराने आम्हाला सांगितले की, आमच्या कुटुंबातील लोकांनी आम्हाला मतदान केले होते परंतु निकालात ते दिसत नाही त्यामुळे आमच्या उमेदवाराने तक्रार दाखल करण्यास सांगितले असल्याने आम्ही याबाबत बहुजन महापार्टी तर्फे मा.राष्ट्रपती व मा.केंद्रीय निवडणूक आयोग यांना पत्र देवून evm निकालावर  हरकत घेतली होती.त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आम्ही कोर्टात लढा देण्याचे ठरविले.व सर्व निवडणुका  evm व vvpat च्या माध्यमातून घेणेकामी मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक ८१८७/२०१७ दाखल केले होते व पारदर्शक निवडणूक घेण्याची विनंती मे न्यायालयात केली होती.त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने vvpat चा वापर करून मतदान घेण्यात येईल व पारदर्शक मतदान होईल याबाबतचे फलक शासकीय कार्यालयाबाहेर लावले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने vvpat मशीन खरेदी करणेकामी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च करुन देशातील सर्व बुथवर आवश्यक असलेले evm व vvpat मशीन खरेदी केलेली आहे.आज आवश्यकतेपेक्षा जास्त vvpat व evm मशीन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहे. vvpat मशीन खरेदी करण्यामागे एकच उद्देश होता तो म्हणजे पारदर्शक निवडणूक व पारदर्शक निकाल.परंतु निवडणूक आयोग vvpat slip ची मोजणी का करत नाही याबाबतचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा ? निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली आहे  का ? पारदर्शक निवडणूक घेवून पारदर्शक निर्णय पारीत झाल्यास लोकशाही आणखीन भक्कम होईल व देशातील जनतेचा विश्वास निवडणूक आयोगावर वाढेल.त्यामुळे माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की, त्यांनी निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी यांना याबाबत विचारणा करावी.व vvpat slip ची मोजणी झाल्यास हरकत काय ? आज देशातील जनतेच्या मनात evm बाबत शंका आहे.निवडणूक आयोगाने  evm मशीन बनविण्याचे ठेका ज्या इसमास दिला गेला आहे तो भाजप या पक्षाचा पदाधिकारी आहे असे आरोप बहुतेक लोक करीत आहेत.त्यामुळे evm या मशीन मध्ये गडबड करुन निकाल बदलला जाऊ शकते असे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाने अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च करून vvpat मशीन लावलेले आहे त्याचा उपयोग मतमोजणीसाठी का केला जात नाही ? फक्त evm मशीनची मोजणी करून निर्णय पारीत केले जात असल्याने ५०० कोटी रुपये का खर्च करुन vvpat मशीन का खरेदी करण्यात आली आहे ?  evm मशीनद्वारे जाहीर होणाऱ्या निर्णयास सर्व पक्षातील लोकांनी विरोध केलेला आहे. देशात पारदर्शक निवडणुक व्हावे असे समस्त देशवासीयांची भावना आहे त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग vvpat slip ची मोजणी करून निर्णय जाहीर केल्यास निवडणुका पारदर्शक झाले आहे हे स्पष्ट होईल. vvpat slip ची मोजणी करून निर्णय जाहीर करण्यास अंदाजे  ५  ते ६ दिवस लागतील व या निकालावर कुणीही आक्षेप घेवू शकत नाही. vvpat slip ची मोजणी करण्यास शासनाचा वाढीव एक रुपयाही खर्च होणार नसल्याने पारदर्शक निवडणूकीचा निकाल लागावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित सर्व जिल्हाधिकारी म्हणजेच निवडणूक निर्णय अधिकारी यांना याबाबत योग्य ते आदेश द्यावे अशी आमची मागणी आहे व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील vvpat slip ची मोजणी करण्याबाबत त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट करावे असे बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी बोलताना सांगितले आहे.

केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

मुंबई : केईएम रुग्णालयाच्या सेवा निवासस्थानात राहणाऱ्या व सेवानिवृत्त झालेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे देय दावे उपप्रमुख लेखापालांकडून मागील वर्षभरापासून देण्यास टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीबरोबरच मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हेकेखोर आणि मनमानी कारभाराविरोधात म्युनिसिपल मजदुर युनियनतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांना निवासस्थान देताना त्यांना भाडेमुक्त निवास या आदेशाअंतर्गत दिला जातो. तसेच त्यांच्या वेतनातून घरभाडे भत्ता कापून घेण्यात येत असताना आता लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने व नियमबाह्यरित्या कोणाचीही परवानगी न घेता पूर्वलक्षी प्रभावाने १० टक्के भाडे वसूल करणारच असा निर्णय घेतला आहे. तसेच जोपर्यंत १० टक्के भाडे वेतनातून कापत नाही, तोपर्यंत सेवानिवृत्ती पश्चात देण्यात येणारे दावे निकाली काढणार नाही अशी भूमिका घेत अनेक वर्षे रुग्णसेवा केलेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या देय हक्कापासून वंचित ठेवत आहे. जाणीवपूर्वक दावे प्रलंबित ठेवल्यामुळे सर्व संवर्गातील कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनीही कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के भाडे कापण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या असतानाही वर्षभरापासून वारंवार विनंती करूनही लेखापाल देय दावे निकाली काढण्यास तयार नाहीत. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजल्यापासून रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची दाखल घेत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी म्युनिसिपल मजदुर युनियनचे पदाधिकारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याशी चर्चा सुरू केली आहे.

‘चितपण माझी आणि पटपण माझीच’ म्हणणाऱ्यांना जनता धडा शिकवणार – करुणा धनंजय मुंडे

मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेसमोर  विरोधीपक्ष राहीलेला नाही. राज ठाकरे सारखे नेतासुद्धा दिल्लीवारी करून आले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)  या दोन पक्षांनी आपलेच ” मोहरे”…

धारावीच्या गोरगरीब जनतेसाठी तीव्र आंदोलन करणार- राजू दळवी

रमेश औताडे मुंबई : धारावीतील गोरगरीब जनतेला बेघर करून त्या ठिकाणी विकास होत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू. असा इशारा इंसानियत पार्टी चे सचिव राजू दळवी यांनी मुंबई मराठी…

राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी!

मुंबई : रखडलेल्या गृहप्रकल्पांमुळे बेघर झालेल्या खरेदीदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या परवडणारी व मध्य उत्पन्न गटाच्या गृहनिर्माणासाठी गुंतवणूक निधीमुळे (स्वामीह निधी) आतापर्यंत राज्यातील आठ गृहप्रकल्प पूर्ण झाले असून रहिवाशांना घरांचा…

 संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन

 दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मुंबई : संगीत नाटकांची परंपरा जपण्यासाठी आणि त्या वैभवशाली रंगभूमीला पुन्हा एकदा रसिकांसमोर साकारण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे विमल ट्रस्ट आणि दिलीप काटदरे यांच्या…