Category: मुंबई

Mumbai news

निरुपम ‘काँग्रेसमुक्त’; निवडणूक लढविणार

मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांन सहावर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेआहे. एन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे एन निवडणूकीच्या धामधुमीत त्यांना काँग्रेसमुक्त…

सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटचा पर्याय

दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी मुंबई : एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट काढताना प्रवाशांचा अनेक वेळा वाहकसोबत वाद होतो. सुट्टया पैशांवरून वाद होवू नयेत, यासाठी एसटी महामंडळाने डिसेंबर २०२३ मध्ये डिजिटल पेमेंटला सुरुवात केली. या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून दिवसाला ५ ते ६ हजार प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढत आहेत. यामुळे दरमहा ४ ते ५ कोटी रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होत आहे. तसेच वाहकाचे सुट्टे पैसे सांभाळण्याचे कामही हलके होत आहे. सर्वत्र डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रवासी रोख व्यवहार करण्याऐवजी ऑनलाइन व्यवहार करणे पसंत करतात. एसटी महामंडळानेही डिजिटल व्यवहाराचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध केला आहे. प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोन पे, गूगल पे यांसारखी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाहकाकडील ॲड्राईड तिकीट यंत्रावरील क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य होत आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा सुट्या पैशांवरून वाहकासोबत होणारा वाद संपुष्टात येऊ लागला आहे, असे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. या तुलनेत यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. सध्या एसटी महामंडळातील सुमारे ३४ हजार वाहकांकडे ॲड्रॉईड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र आहे. बहुतेक वाहकांना हे मशीन जलदगतीने व्यवस्थित हाताळता येत नाही. त्यामुळे वाहक प्रवाशांकडे रोख रकमेने तिकीट काढण्याचा आग्रह धरतात. तसेच यूपीआय पेमेंटबाबत प्रवाशांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. तसेच वाहकांना ॲड्रॉईड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र चालवण्याबाबत प्रशिक्षित करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांकडून केली आहे.

ईडी माझ्याकडे द्या,  मग दाखवतो- राऊत

मुंबई :  ” आठ दिवसासाठी ईडी आणि सीबीआय ही खाती मला द्या फक्त आठ दिवसासाठी, मी भाजपाला दाखवून देतो, ही खाती कशी चालवतात ते, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले…

संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई- नाना पटोले

मुंबई  : महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या मुंबईतील सर्व जागा पडतील अशी भविष्यवाणी करणाऱ्या काँग्रेसच्या माजी खासदार संजय निरुपम यांच्यावर आज शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी त्यांचे स्टार प्रचारकाच्या यादीत नाव होते…

सावधान ! सुर्यदेव कोपणार

मुंबई : हवामान बदलामुळे जगभरात तापमानाची वाढ नोंदविली जात असतानाच आता महाराष्ट्रातही येत्या तीन महिन्यातील तब्बल २० दिवस उन्हाचा जबरदस्त तडाका बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.सुर्यदेव कोपणार असून नागरिकांना…

मोनोरेल, मेट्रो प्रकल्पात आता अदानीची वीज

टाटाच्या वीजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचा निर्णय मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रीसिटीकडून वीजपुरवठा केला जाणार आहे. सध्या मोनोरेल, मेट्रोसाठी टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जात आहे. पण टाटा पॉवरने वीजदरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे, एमएमआरडीएने वीजपुरवठादार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिका आणि मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) सह मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेसाठी सध्या टाटा पॉवर वीजपुरवठादार आहे. टाटा पॉवरकडून मोनोरेल आणि मेट्रोसाठी सध्या, २०२३-२४ साठी ४.९२ रुपये प्रति युनिट असे दर आकारले जातात. परंतु, टाटाच्या वीज दरात सोमवारपासून वाढ झाल्यामुळे २०२४-२५ साठी मोनोरेल आणि मेट्रोसाठी ७.३७ रुपये प्रति युनिट असे दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे, एमएमआरडीएने टाटा पॉवरऐवजी अदानीची वीज घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रियाही सुरू केल्याचे समजते. अदानीकडून वीज घेतल्यास एमएमआरडीएला ६.१५ रुपये प्रति युनिट दर द्यावा लागेल. एकूणच, अदानीची वीज काहीशी स्वस्तात उपलब्ध होणार असल्याने एमएमआरडीएने वीज पुरवठादार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो २ अ आणि ८ मार्गिकेसाठी दररोज १२ ते १५ मेगावॉट वीज लागते. तर मोनोरेलसाठी प्रतिदिन २ ते ३ मेगावॉट इतक्या विजेचा वापर केला जातो. दरम्यान, मोनोरेल प्रकल्प तोट्यात असून मेट्रोतुनही एमएमआरडीएला अपेक्षित महसूल मिळत नाही. अशावेळी वीज दराचा भार वाढल्यास तोटा आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे, टाटाऐवजी अदानीकडून वीज घेण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे, राहुल गांधींना मतदारच तडीपार करतील

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात मुंबई : भ्रष्ट नेत्यांच्या अटकेविरोधात एकत्र येत दुखवटा साजरा करण्यासाठी रामलीला मैदानावर जमणा-या सर्व भ्रष्ट नेत्यांना त्यांच्या पराभवाची गॅरंटी असल्यानेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. अशा लायकी नसलेल्यांना मतदारच निवडणुकीत तडीपार करतील अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, संजय राऊत यांच्यावर मंगळवारी घणाघात केला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. राजकीय उंची आणि बौद्धीक कुवत नसलेल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करणे थांबवावे अन्यथा भाजपा कार्यकर्त्यांना त्यांची लीला दाखवावी लागेल असा इशारा ही श्री.राणे यांनी विरोधकांना दिला. श्री.राणे म्हणाले की अब की बार भाजपा तडीपार म्हणणा-यांनी स्वत:ची लायकी तपासून पहावी. कोरोना काळात गरीबांच्या टाळूवरचे लोणी खाणा-यांना सूज्ञ मतदारच यावेळी घरी बसवतील. मोदी सरकारवर मॅच फिक्सिंग चा आरोप करणारे उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व विरोधक, भ्रष्ट नेत्यांच्या समर्थनासाठी एकत्र येतात ही संतापजनक बाब आहे. तपास यंत्रणांच्या धाडी दरम्यान अव्वाच्या सव्वा रोकड मिळत असताना, अनेक घोटाळे समोर येत असताना भ्रष्ट मंत्र्यांवर होणा-या कायदेशीर कारवाई विरोधात ही मंडळी गळे काढत आहेत. लोकशाही तत्वांनुसार कायद्याचे पालन करत सर्व भ्रष्ट नेत्यांवर कारवाई होत असून गरीब सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचा पैसा पंतप्रधान मोदी मिळवून देतील असा विश्वास श्री.राणे यांनी व्यक्त केला. मोदींच्या कार्यकाळातील देशाची होणारी प्रगती विरोधकांना सहन होत नसल्यानेच जळफळाटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर  बिनबुडाची टीका होत आहे असेही ते म्हणाले. श्री.राणे यांनी देशाच्या प्रगतीचे द्योतक असलेली अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारीच पत्रकार परिषदेत सादर केली. पंतप्रधान मोदीजींच्या समर्थ नेतृत्वाखाली देशाच्या विकासाची तुफान वेगाने घोडदौड सुरू असून यंदा ‘अब की बार ,400 पार’ चे  उद्दीष्ट एनडीए नक्की साध्य करेल असा विश्वास श्री.राणे यांनी बोलून दाखवला.

कामगार,शेतकरी विरोधी मोदी सरकारला पराभूत करा! 

संघटना संयुक्त कृती समितीच्या परिषदेत एकमुखी ठराव! मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, किसान,जनता विरोधी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करा,असा एकमुखी ठराव, सर्व कामगार संघटना एकत्र आलेल्या, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सम्मत करण्यात आला.  राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या,परेल येथील महात्मा गांधी सभागृहात शनिवारी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे‌ राज्य स्तरीय राजकीय सम्मेलन पार पडले.त्या संमेलनात उपस्थित कामगार प्रतिनिधींनी हात उंचावून या ठरावाला पाठिंबा दिला.इंटक,आयटक, एसएमएस,सिटू,एआयसीसीटीयू,बीकेएस एम,राज्य सरकारी कर्मचारी संघटना महासंघ, शिक्षक संघटना,बॅंक आणि विमा संघटना महासंघ, श्रमिक एकता मंच आणि तळागाळातील कामगारांचे‌ नेतृत्व करणाऱ्या संघटना या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सहभागी झाल्या होत्या.व्यासपीठावर कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. उदय भट, गोविंदराव मोहिते,डॉ.कैलास कदम ,डॉ. डी. एल. कराड, कॉ. उदय चौधरी,  निवृत्ती धुमाळ आदी कामगार नेते उपस्थित होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आमदार सचिनभाऊ अहिर यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या आहेत. ठरावात पुढे म्हटले आहे,सध्या सत्तेवर असणारे केंद्र व राज्य सरकार हे सातत्याने कामगारांवर अन्याय करीत असून मालक व भांडवलदारा चे हित जोपासत आहे.भांडवलदारांच्या दबावापोटी कामगार संघटनां नी १३० वर्षांपासून लढून मिळवीलेले ४४ कामगार कायदे रद्द करून, त्या जागी चार श्रम संहिता आणल्या आहेत. हे सरकार परत सत्तेवर आल्यास या देशातील कामगार चळवळ संपुष्टात येऊन कामगारांना वेठबिगारीचे जीवन वाट्याला येणार! अशी ठरावात काळजी व्यक्त करण्यात आली आहे. कृती समितीचे प्रमुख सिटुचे डॉ.डि. एन.कराड ठरावावर म्हणा ले,आपल्या सर्व संघटनांचे सदस्य राज्यात सुमारे ३५ लाख असून, त्याचे कुटुंबीय मिळून कोटी-सव्वा कोटीचे मताधिक्य मोठाच या निवडणुकीत चांगलाच प्रभाव पाडू शकतो.कामगार विरोधी मोदी सरकारला सत्तेवरुन खाली खेचू शकेल, असेही कराड आपल्या भाषणात म्हणाले.महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना म्हणाले,येणारा एक मे कामगार दिन मोदी सरकार विरोधी कामगार निषेधदिन पाळतील! सरचिटणीस गोविंदराव मोहिते ठरावाला पाठिंबा देतांना म्हणाले,अंगणवाडी,आशा कामगार पासून  गिरणी कामगारां पर्यंत कामगार वर्गाला नामोहरम करणा-या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच खरी वेळ आहे. या प्रसंगी भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके,एनटीआयचे मिलिंद रानडे, कॉ.उदय भट,कॉ. विवेक मोंटेरो, कॉ.उदय चौधरी, निवृत्ती धुमाळ आदींनी आपल्या भाषणात मोदीं सरकारचा खरपूस समाचार घेताना, महाराष्ट्रात मोदी सरकारला  महाविकास आघाडीच खरा पर्याय ठरू शकेल, असा इंटकने विश्वास व्यक्त केला आहे. बजरंग चव्हाण, दादासाहेब डोगरे आदींनी ठरावाला पाठिंबा कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला. ०००००

जीवनातील अनमोल नर्मदा प्रदक्षिणा !

मुंबई : नर्मदा परिक्रमा ही देवस्थान तीर्थक्षेत्र पेक्षाही श्रेष्ठ आहे. अनमोल अशी नर्मदा परिक्रमा जीवनात एकदा नाही तर पुन्हा पुन्हा करावी असे आवाहन ‘रामकृष्ण विनामूल्य वाचनालयाच्या ग्रंथपाल व साहित्य संपादिका,तसेच अखिल सक्षम महिला मंच समुपदेशक नंदिनी मनोहर सोनवणे यांनी केले. जीवनातील अनमोल नर्मदा प्रदक्षिणा इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदोबा गावातील श्री व सौ.नंदिनी मनोहर सोनवणे यांनी स्व: वाहनाने 16 दिवसांची नर्मदा परिक्रमा केली. त्या निमित्ताने बोलताना त्यांनी परिक्रमाविषयी आपले काही अनुभव सांगितले. ९ जानेवारी रोजी नर्मदा परिक्रमाला आरंभ केला. प्रथम ओंकारेश्वर दक्षिण तटावर संकल्प पूर्ती करून रेवा संगम ते अमरकंटक हा दक्षिण तटाचा प्रवास पूर्ण झाला. उत्तर तटाचा प्रवास अमरकंट ते ओंकारेश्वर हा प्रवास पूर्ण झाला. हे संपूर्ण अंतर ४२०० किलोमीटर प्रवास आहे. दक्षिण तटावरील प्रवास करताना जागोजागी अन्नकुठाची व्यवस्था व ऋषीमुनी व सेवाभावी का या परिक्रमावासहित भेटत होत्या. परिक्रमा करताना दुसरे सहचारी क्रमा करणारे चांदवड देवीच्या येथे राहणारे सौ मंदा अशोक महाले यांची योगायोगाने भेट झाली. हा योगायोग परतीच्या प्रवासात चांदवड देवीचे दर्शन घेतले. मार्कंड ऋषी यांनी प्रथम नर्मदा परिक्रमा केल्याचे शास्त्र पुराण सांगते. परिक्रमा करताना मार्कंड ऋषींच्या आश्रमात गेलं असता गुरु मिळाल्याचा आनंद झाला. 22 जानेवारीला रोजी आयोध्या मध्ये राम लल्ला यांच्या स्थापनेचा दिवस व त्याच दिवशी आम्ही अमरकंटक पोहोचलो. अमरकंटक मध्ये नर्मदा मातेचे उगम स्थान आहे. राम लल्लनच्या स्थापने च्या रथयात्रेत कलश घेऊन त्या रथयात्रेत सामील झाले. धारवड असं क्षेत्र आहे की महा नर्मदेच्या पात्रातून स्वयंभू बाणलिंग मिळतात. आम्हाला असंख्य लहान ते महान शिवलिंग बघण्यास मिळाले. नंदिनी सोनवणे बोलताना म्हणाल्या की, प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाणी शिव मंदिर व त्यातील स्वयंभू साक्षात्कार मिळत गेला हा महिमा शिवकृपेचा रूपाने साकारत गेला. प्रत्येक क्षणी नर्मदा तीरावरून जात असताना जशी महा नर्मदा हातात वीणा घेऊन झंकारित केल्याचा आवाज येत होता 16 दिवसांत मा नर्मदा स्तोत्र आरती व हर हर नर्मदे घोष अजूनही मनात कोरले गेले आहे हर हर नर्मदे.. नंदिनीताई यांनी आपले काही काही अनुभव आम्हास सांगितले. ओंकारेश्वर मध्ये प्रथम गजानन महाराजांच्या आश्रम मुक्काम व तोच परतीच्या प्रवासामध्ये मुक्काम तेथेच घडला.

बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा

अखेर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा मुंबई :बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या माध्यमातून या अगोदरच रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांची अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती. आणि आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी तर त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहितीसुद्धा सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रीय समाज पक्षाला जागा देताना महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असून त्यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाची एक चळवळ, आरक्षणाचा लढा उभा केला आहे. त्यांचे योगदान समाजासाठी मोठया प्रमाणात असल्यानेच परभणीची उमेदवारी घोषित करत असून अतिशय चांगल्या फरकाने ते विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. हा निर्णय घेताना परभणी जिल्हयातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राजेश विटेकर, बाबाजानी दुर्रानी, प्रतापराव देशमुख यांच्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची प्रदीर्घ चर्चा केली आहे. त्या चर्चेनंतर आज महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणाही सुनिल तटकरे यांनी केली. राजेश विटेकर हे अतिशय चांगले पदाधिकारी आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा थोडाशा फरकाने पराभव झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत एका तरुण कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड नक्की घेणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. या पत्रकार परिषदेला रासपचे नेते महादेव जानकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.