Category: मुंबई

Mumbai news

महायुतीमध्ये आम्ही नाराज,  रामदास आठवलेंचा इशारा

पुणे : महायुतीमध्ये असूनही आम्हाला राज्यात मंत्रिपद देण्यात आलेले नाही. लोकसभेच्या दोन जागा आम्ही मागितल्या आहेत, मात्र साधे चर्चेलाही बोलाविले जात नाही. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही नाराज आहोत. पुढील दोन-तीन दिवसांत…

शिंदेंच्या शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर 

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज आठ उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली. शिंदे यांना साथ दिलेल्या तेरापैकी 12 खासदारांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. आज…

काँग्रेस देशासाठी लढतेय! खुर्चीची भीती आम्हाला कोणीही दाखवू नये; संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाना पटोले स्पष्टच बोलले!

मुंबई : काँग्रेस देशासाठी लढतेय, आम्ही काही खुर्चीसाठी लढत नाही. काँग्रेसच्या स्वातंत्र लढ्यातला सहभाग आणि योगदान सर्वांना माहिती आहे. काँग्रेस इतके वर्ष जनतेच्या आशीर्वादाने देशांमध्ये सत्तेत राहिलीय. काँग्रेसने या देशांमध्ये…

गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत 

मुंबई : अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. …

माजी आयपीएस  संजीव भट्ट यांना  20 वर्षांचा तुरुंगवास;

बनासकांठा (गुजरात) : माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वकिलाला अडकवण्यासाठी ड्रग्ज पेरल्याप्रकरणी गुजरात कोर्टाने ही शिक्षा जाहीर केली. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातील…

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला  लक्षद्वीपमध्ये घड्याळ  नाही

  नवी दिल्ली : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह मिळणार नाही. अजित पवार गटाने उशिरा अर्ज सादर केल्याने पहिल्या टप्प्यात घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने सांगितले…

महाराष्ट्राच्या महिला संघाची विजयी सलामी

५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मुंबई : भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचा थरारा गुरूवारपासून सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ अव्वल कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हि स्पर्धा करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज येथे १ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाने आसामचा एक डाव २६ गुणांनी (३६-१०) धुवा उडवत विजयी सलामी दिली. महाराष्ट्राकडून अश्विनी शिंदे (३.२० मि. संरक्षण व ८ गुण), अपेक्षा सुतार (२.५० मि. संरक्षण व २ गुण), रेश्मा राठोड (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), संपदा मोरे (नाबाद २ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगला खेळ केला. आसामकडून प्रिया (१.४०, १.२० मि. संरक्षण), निहारिका (२ गुण) यांनी चांगला खेळ केला. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापूढे आसामचा संघ टिकाव धरू शकला नाही. दरम्यान, पुरूष गटात त्रिपूरा संघ उपस्थित नसल्यामुळे महाराष्ट्र संघाला पुढे चाल देण्यात आली आहे. या स्पर्धेची गटवारी पुढील प्रमाणे पुरूष अ गट:  रेल्वे, पाॅडेचेरी, पंजाब, इंडो-तिबेटीअन बाॅर्डर पोलीस, एसएसबी. ब गट:  महाराष्ट्रासह तामिळनाडू, त्रिपूरा, मणिपूर, आसाम. क गट:  कोल्हापूर, दिल्ली, हरयाणा, दादरा-नगर हवेली, सिक्कीम. ड गट: कर्नाटक, मध्यभारत, झारखंड, उत्तराखंड, महा पोलीस. इ गट: ओडीसा, विदर्भ, हिमाचलप्रदेश, लडाख. फ गट: आंध्रप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, जम्मु-काश्मिर. ग गट: वेस्टबंगाल, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार. ह गट: केरळ, तेलंगणा, गोवा, चंदिगड यांचा समावेश आहे. महिलांमध्ये अ गट: महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, इंडो-तिबेटीअन बाॅर्डर पोलीस आणि आसाम यांचा समावेश आहे. ब गट : एअरपोर्ट, राजस्थान, तेलंगणा, एसएसबी, सिक्कीम. क गट:  दिल्ली, आंध्रप्रदेश, झारखंड, दादरा-नगर हवेली, त्रिपूरा. ड गट: ओडिसा, पंजाब, पाँडेचेरी, जम्मू-काश्मिर, महा पोलीस. इ गट: गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गोवा, लडाख. फ गट: केरळ, विदर्भ, हिमाचल प्रदेश, मणिपूर. ग गट: कर्नाटक, कोल्हापूर, उत्तराखंड, बिहार. ह गट: हरयाणा, वेस्टबंगाल, छत्तीसगड, चंदिगड. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अनूभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या महाराष्ट्रचे दोन्ही संघ अव्वल कामगिरीसाठी सज्ज आहेत, असा विश्वास भारतीय महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

सब ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

मुंबई : ४६ वी सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २८ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान जीवन दीप शिक्षण संस्था, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे १५ खेळाडू आणि २ व्यवस्थापक असा एकंदर १७ जणांचा चमू वाराणसी येथे रवाना झाला असून संघातील खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे वातानुकूलित रेल्वे प्रवास व्यवस्था, २ सेट गणवेश व प्रत्येकी रुपये १,०००/= प्रवास भत्ता अशी सुविधा देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे १४ वर्षा खालील ( सब ज्युनिअर गट ) मुले : आयुष गरुड, रुद्र गवारे, वेदांत राणे, द्रोण हजारे, ध्रुव भालेराव, प्रसाद माने १२ वर्षां खालील ( कॅडेट गट ) मुले : नील म्हात्रे, अनंत जैन ( नंदू सोनावणे, संघ व्यवस्थापक ) १४ वर्षा खालील ( सब जुनिअर गट ) मुली : तनया पाटील, स्वरा मोहिरे, पूर्वा केतकर, स्वरा कदम, जिशा आसलडेकर १२ वर्षा खालील ( कॅडेट गट ) मुली : दुर्गेश्वरी धोंगडे, निधी सप्रे ( माधवी आसलडेकर, संघ व्यवस्थापक ) अरुण केदार मानद सचिव महाराष्ट्र कॅरम असोसिएशन

छञपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले मुंबई यांच्या तर्फे जुहू समुद्र किनारी  असणाऱ्या  मुंबईचे माजी महापौर/माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू  यांच्या पुढाकाराने बांधलेल्या  छञपती शिवाजी महाराज यांच्या शिल्प समूहाला  पुष्पहार अर्पण करताना  समितीचे सचिव डॉ. मोहन अनंत राणे, विश्वस्त राजू रावळ, मकरंद येडुरकर,   डॉ. चैतन्य बढे, अविनाश गुजर,  राजेश घाग चंद्रकांत  तांबे  पवन तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा व निरोप समारंभ

केंद्रशाळा पोयरे गांगोरामेश्वर  येथे कै.रामचंद्र हरी राणे स्मरणार्थ ठाणे : जिल्हा परिषद केंद्र शाळा पोयरे गांगोरामेश्वर येथे नुकतेच  मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा व ७ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. श्री जयवंत राणे यांच्यामार्फत  श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या तर  शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने ७वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीम.भाग्यश्री सांबारी मॅडम व केंद्रप्रमुख श्री नामदेव सावळे सर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमधील लहान गट पहिली ते चौथी यामधून तीन क्रमांक यात प्रथम क्रमांक कु. मैत्री रणजित घाडी द्वितीय क्रमांक ऋतुराज जयदेव करंदीकर तर तृतीय क्रमांक वेदांत दिपक मेस्त्री याचा आला. मोठा गट यात  पाचवी ते सातवी इयत्ताचा सहभाग होता.प्रथम क्रमांक यश सुनील घाडी द्वितीय क्रमांक राधिका संतोष साळसकर तर तृतिय क्रमांक हर्षदा दिपक मेस्त्री हिचा आला.या सर्व गुणी विद्यार्थ्यांना   मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनंदन करून  कंपास पेटी भेट दिली. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आले. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य दिले.. इयत्ता ७ वीचा विदयार्थी मोतीराम साळसकर याने शाळेसाठी समई भेट दिली.कु. तेजल घाडी व कु.हर्षदा मेस्त्री या  विद्यार्थ्यांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. भाग्यश्री सांबारी मॅडम यांनीही मुलांना छान मार्गदर्शन केले.केंद्रप्रमुख श्री सावळे सर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.वाचनाचे महत्व सांगितले.  वाचाल तर वाचाल,सुसंस्कार याविषयी मार्गदर्शन केले. अशाच स्पर्धा पुढच्याही वर्षी राणे परिवाराच्या वतीने आपण घेऊया असे श्री जयवंत राणे यांनी आवर्जून सांगितले.याचा सर्व विद्यार्थ्यांना मनस्वी आनंद झाला.तसेच मुलांना खाऊ ही राणे परिवाराच्या वतीने देण्यात आला. उपशिक्षक श्री उदगीरे सर यांनी शाळेच्या प्रत्येक उपक्रमात पालकांचा सहभाग आवश्यक आहे असे सांगितले. शाळेच्या भविष्यातील उपक्रमासाठी पालकांनी मदत करावी अशीही विनंती केली.शाळेच्या नावाची एक गोलाकार कमान व संपूर्ण शाळा रंगरंगोटी करून बोलक्या भिंती करावयाच्या आहेत यासाठी दात्यानी सढळ हस्ते मदत करावी अशी विनंती केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गोसावी मॅडम यांनी आभार व्यक्त केले.सूत्रसंचलन श्री उदगीरे सर यांनी केले.स्वयंसेविका श्रीम मोरजे मॅडम यांनीही कार्यक्रमाला  मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी उपस्थित केंद्रप्रमुख श्री सावळे सर, सौ.भाग्यश्री सांबारी मॅडम,श्री धोंडू हरी राणे,श्री दाजी हरी राणे,सौ.गोसावी मॅडम, श्रीम.मोरजे मॅडम,शाळा व्य. समिती अध्यक्ष श्री रणजित घाडी,उपाध्यक्ष श्रीम.दिव्या मेस्त्री,श्री जयवंत राणे, श्री.सचिन राणे,श्री. दिपक राणे,अंगणवाडी सेविका मालपेकर मॅडम,श्री धोंडू घाडी,सौ.आर्या जयदेव करंदीकर, सौ.मानसी लक्ष्मण घाडी, सौ.जयश्री लक्ष्मण साळसकर, सौ.शारदा संतोष साळसकर, श्रीम.प्रतिक्षा गुणाजी घाडी, सौ.साक्षी सुनिल घाडी आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.