राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहलींनी केली यादी जाहीर… मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कृषी मंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. के. शर्मा, सय्यद जलालूद्दीन, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार आणि प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी, आमदार सुनिल टिंगरे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार सुनिल शेळके, आमदार विक्रम काळे, आमदार चेतन तुपे, आमदार नितीन पवार, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री आमदार दत्तामामा भारणे, आमदार सतीश चव्हाण, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी आदींचा समावेश आहे.
निजामकालीन नोंदी पाहून कुणबी समाजाला आरक्षण द्यावे – कुणबी सेनेची मागणी
रमेश औताडे मुंबई : निजामकालीन दप्तरात सन १८८४ व सन १९७७ च्या गॅझेट मध्ये कुणबी नोंदी आहेत. त्या अनुषंगाने कुणबी समाजाला कुणबीचे आरक्षण मराठवाड्यात देण्यात यावे अशी मागणी कुणबी सेनेने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी केली. मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या वीस वर्षापासून आम्ही सतत संघर्ष करीत आहोत असे सांगत कुणबी सेनेचे नामदेव काडे म्हणाले, निजामकालीन पुराव्याच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाने नऊ सदस्य समिती गठित केली होती. मराठवाड्यातील निजामकालीन कुणबी नोंदीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील गरजवंत मराठा समाजाला व कुणबी मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाच्या व्यासपीठावरून शासनाकडे मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण द्यावे हिच मागणी लावून धरल्यामुळे या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. कारण देशमुख मराठा, पाटील मराठा, आणि कुणबी मराठा थोडक्यात मराठवाड्यातील प्रस्थापित व विस्थापित सर्व मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिल्याने हे आंदोलन मराठवाडा, महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचू शकले. मात्र कालांतराने जरांगेपाटील यांनी मराठवाड्याचा विषय का सोडून दिला? हे मात्र कळाले नाही. मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाला मिळणारे कुणबीचे आरक्षण का नाकारले हे कळू शकले नाही? असे सवाल यावेळी कुणबी सेनेचे विष्णू कदम यांनी केले. निजामकालीन कुणबी नोंदी व इतर कुणबी नोंदीचे पुरावे या सगळ्या बाबी तपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासाठी कुणबीचे आरक्षण देण्यासाठी पूर्ण तयारी केली असताना जरांगे पाटील यांनी हे आरक्षण नाकारले आहे. आणि त्यानंतर हळूहळू मराठवाड्याचा विषय त्यांनी सोडून दिला आहे .त्यांच्या मागण्या सुद्धा बदलत गेल्या. हा थोडासा संशोधनाचा विषय बनला आहे. वाईदेशी कुणबी या जातसमूहाचा कुणबी मध्ये समावेश करून या जात समुहाला कुणबी चे आरक्षण द्यावी, अशी मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत आणि त्या मागणीला यश सुद्धा प्राप्त झाले होते मात्र मराठा आंदोलनामुळे हा विषय पाठीमागे राहून गेला आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने ४ जून २०२३ ते ७ जून २०२३ या दरम्यान चार जिल्ह्याचा दौरा करून या समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षत्रिय पाहाणी केली आहे या दौऱ्यामध्ये चार जिल्ह्याचा समावेश होता. आयोगाच्या सदस्य समितीमध्ये मी स्वतः आयोगाच्या सोबत चारही जिल्ह्यांमध्ये फिरलो आहे. या दरम्यान आयोगाच्या सदस्य समितीला आमच्या मागणीची सत्यता पटल्याने त्यांनी परत १० सप्टेंबर २०२३ व १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोगाने दौरा करून सत्यता तपासली आहे असे कुणबी सेनेचे गणपत जाधव यांनी यावेळी सांगितले.
राज्यात उष्णतेचा पारा चाळीशीपार
मुंबई : राज्याच्या विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसच्या आकडा गाठला आहे. तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान 41.5 अंश सेल्सिअस हे अकोल जिल्ह्याचे नोंदविण्यात आले आहे. हे तापमान विदर्भासह राज्यातील सर्वाधिक असल्याचे नोंदविण्यात…
ठाकरेंचे अबतक सतरा; मविआला खतरा
स्वाती घोसाळकर मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीविरोधात महाविकास आघाडीच्या नावाखाली एकवटलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या आघाडीलाच आता हादरे बसू लागेल आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने…
नवनीतजींना भाजपाचे तिकीट
हनुमान चाळीसा फळली शैलेश तिवटे अमरावती : अमरावतीतील स्वकीयांचा विरोध डावलून भाजपा श्रेष्टींनी विद्यमान अखेर खासदार नवनीत राणांना तिकीट दिले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात हनुमान चाळीसा पठण करण्यासाठी मातोश्रीवर धडक देण्याच्या…
महाराष्ट्र शासनाच्या समाज भुषण पुरस्काराने अरुण शिरसाट सन्मानित
मुंबई : सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात जनजागृती तसेच कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ॲडव्होकेट अरुण नथुजी शिरसाट यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
जरांगेशी युती केली तरी आंबडेकरांना पाठींबा- शेंडगे
रमेश औताडे मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व मनोज जरांगे पाटील यांची लोकसभेसाठी युती झाली तरीही मी त्यांना यक्तीगत अकोल्यात मदत करणार , कारण ते मला सांगलीत व्यक्तिगत…
कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मुंबई : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे…
विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात संगीतमय धूलिवंदन
रंगाच्या उधळणीबरोबरच संगीतात रमली तरुणाई ठाणे : विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील भगवती मैदानावर अपूर्व उत्साहात संगीतमय धूलिवंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पारपंरिक व नैसर्गिक पद्धतीने धूलीवंदनाबरोबरच बहारदार गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला. या उत्सवाला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदू संस्कृतीतील प्रमुख सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरे करण्यावर विश्वास सामाजिक संस्थेकडून प्राधान्य दिले जाते. त्यानुसार यंदा नौपाड्यातील भगवती मैदानावर धूलीवंदनाच्या दिवशी सकाळी ११ पासून रंगोत्सव २०२४ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने धूलीवंदनाबरोबरच बहारदार संगीताची मैफल सादर करण्यात आली. धूलीवंदनानिमित्ताने प्रसिद्ध गायक-गायिका सारिका सिंग, अनुजा वर्तक, विद्या शिवलिंग, सई जोशी, प्रशांत मापेरी, निलेश निरगुडकर, सतीश भानुशाली यांच्या वतीने सादर केल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गीतांवर तरुणाईने ठेका धरला. रंगाची मुक्त उधळण करीत नागरिकांनी धूलीवंदन साजरे केले. विश्वास सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष संजय वाघुले यांच्याबरोबरच भाजपाचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, नौपाडा प्रभाग अध्यक्ष रोहित गोसावी, भाजपा जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य गौरव अंकोला, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले, विश्वास सामाजिक संस्थेचे सदस्य अमित वाघचौरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी मेहनत घेतली.
२८ मार्चला मुंबईत महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद
आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार – अजित पवार पुणे : २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा अजितदादा पवार यांनी आज पुणे येथे केली. आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आदींसह पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या ४८ जागा असून त्यामध्ये जवळपास कुणी कोणत्या जागा लढवायच्या याबाबत मागेच ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ९९ टक्के काम झाले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणे क्रमप्राप्त होते. पहिल्या टप्प्यात विदर्भातील निवडणूक होणार आहे. आंबेगाव येथे शिवाजीराव आढळराव पाटील हे २० वर्षापूर्वी पक्षातून गेले होते ते आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. दुसरी जागा तिथेच जाहीर करेन असे सांगतानाच बाकीच्या जागा २८ मार्चला जाहीर करणार आहोत असे अजितदादा पवार म्हणाले. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी ४८ जागा होत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपच्या २३ जागा निवडून आल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या एक नवनीत राणा यांना पुरस्कृत केले होते. तर एमआयएमची एक जागा अशा निवडून आल्या होत्या. मात्र माध्यमांमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी फक्त तीन जागा लढवणार अशा पध्दतीने गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले. आमच्या महायुतीत कुणाचेही गैरसमज नाहीत. मित्रपक्षांनी २३ जागा निवडून आणल्या आहेत तेवढ्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. त्यात एकत्र बसून अतिशय व्यवस्थित मार्ग काढलेला आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर एक – एक लोकसभा आणि आमदारांवर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. बाकीची टिम आमची काम करणारच आहे. शिवाय जिथे महायुतीचे उमेदवार असतील तिथे मंत्री व आमदारांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे असेही ठरल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले. जाहीरनाम्यावर काम सुरू आहे तो लवकरच दिला जाईल. स्थानिक प्रश्न आहेत तेही त्या जाहीरनाम्यात यावेत अशी भूमिका आहे. स्टार प्रचारक यादीवर एकत्र बसून चर्चा झाली आहे त्यामुळे ती यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे हे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. अशा पध्दतीने आम्ही लोकांसमोर जाणार असून लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करु असा निर्धार करण्यात आल्याचेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत कुणालाही भेटण्याचे आणि बोलण्याचा अधिकार आहे. माझ्यावर टिका होते आहे आणि तुम्हीही करु शकता माझी भूमिका ही फक्त विकासाला, देश प्रगतीपथावर पुढे चालला आहे. आज जगात देशाचे नाव वाढत आहे. प्रतिष्ठा मिळाली आहे असेही अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितले.
