Category: मुंबई

Mumbai news

क्षयरोगविषयक जागरूकता प्रसार

क्षयरोग दिनानिमित्त विविध उपक्रमांतून नवी मुंबई : भारतामधून सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आलेले आहे. हे ध्येय साध्य करण्याकरिता सन 2015 च्या तुलनेत क्षयरोगाच्या प्रमाणात 80% घट, क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 90% घट तसेच क्षयरोगाचा नि:शुल्क उपचार असे आहे. त्या अनुषंगाने नमुंमपामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. नमुंमपा कार्यक्षेत्रात केंद्र शासन व राज्य शासनाच्या मागदर्शक सुचनांनुसार 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 3 सार्वजनिक रुग्णालये व माताबाल रुग्णालयामार्फत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत रुग्णास मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात येतो. दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटना, क्षयरोगसंदर्भात लक्ष वेधून घेण्यासाठी क्षयरोग निर्मुलनासंदर्भातल्या महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी दरवर्षी 24 मार्च रोजी घोषवाक्य प्रसारित करते. यावर्षीचे घोषवाक्य “Yes!, We Can End TB”  – “होय, आपण टीबीचा अंत करू शकतो” हे असून यावर्षी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोगविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच नमुंमपा रुग्णालयांमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वस्ती पातळीवर विशेषत: झोपडपट्टी व अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात पथनाटय घेण्यात आले. या व्यतिरिक्त जनसमुदाय सभा, रुग्ण सभा कर्मचारी प्र‍शिक्षण, इ. जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. जागतिक क्षयरोग दिनाच्या अनुषंगाने तेरणा वैदयकिय महाविदयालय व डी.वाय.पाटील वैदयकिय महाविदयालय अंतर्गत पोस्टर्स स्पर्धा, कॉन्फरन्स, पथनाटय, रुग्णांचे आरोग्य शिक्षण इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘निक्षय पोषण योजना’ अंतर्गत दरमहा रु. 500 उपचार पूर्ण होईपर्यंत क्षयरुग्णांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. नागरिकांनी शासकीय रुग्णालयास संशयित क्षयरुग्ण संदर्भित केल्यानंतर रुग्णाचे क्षयरोगाचे निदान झाल्यास माहिती देणाऱ्या नागरिकांस रु. 500 चा लाभ देण्यात येतो. जे नागरिक क्षयरुग्णांचा यशस्वी उपचार पूर्ण करण्यास मदत करतात त्यांना रु.1000 चा लाभ देण्यात येतो. क्षयरोगाचे निर्मूलन करणेकरीता शासकिय व खाजगी आरोग्य सेवा यांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, लॅब्स इ. नी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती नमुंमपास कळविणे आवश्यक आहे. नमुंमपा, खाजगी संस्था व नागरिक एकत्रित आल्यास नवी मुंबईतून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे शक्य आहे. तरी नवी मुंबई क्षयरोगमुक्त करणेकरिता खाजगी संस्था व नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

मालमत्ता कर भरा, अन्यथा जप्तीच्या कारवाईला सामोरे जा!

मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटिसा मुंबई : आर्थिक क्षमता असूनही दिलेल्या मुदतीत करभरणाकरण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. विहित मुदतीत त्यांनी कर भरणा न केल्यास मुंबई पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाईल, असे या नोटिसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. पालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन खात्यातर्फे मुंबई शहर आणि उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये यासाठी साप्ताहिक सुट्टी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व विभागांमध्ये कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर वसुलीसाठी प्रयत्न १)  एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत साडेचार हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. २) पालिकेने २०२३-२४ मालमत्ता कर देयके ऑनलाइन उपलब्ध करून दिली असून, ती ई-मेलद्वारेही पाठवली जात आहेत. एकूण ९ लाख २२ हजार देयके पाठवण्यात आली आहेत. कशी होते पालिकेची कारवाई? मालमत्ता कर हा मुंबई पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ता कर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने कारवाई होते. मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. मालमत्ताधारकास २१ दिवसांची नोटीस मालमत्ताधारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते; मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत मालमत्ता कर न भरणाऱ्यांची यादी वाढतच आहे. या कालावधीत दोन ते अडीच हजार थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. ही रक्कम दोन हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. यादीतील पहिल्या १०० थकबाकीदारांची रक्कमच १ हजार ३०० कोटी रुपये आहे. आणखी ७५० कोटी रुपयांची भर थकबाकीपोटी पालिकेच्या तिजोरीत आधीच ७०२ कोटी रुपये जमा झाले होते. २६ फेब्रुवारीपासून नवीन देयके पाठवल्यापासून ते आत्तापर्यंत त्यात आणखी ७५० कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेची धडपड सुरू आहे.

 ज्युनियर गटात ठाण्याचे वर्चस्व

 श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटी ट्रस्ट आयोजित डेरवण युथ गेम्स २०२४ डेरवण (चिपळूण) : येथे सुरु असलेल्या डेरवण युथ गेम्स २०२४  स्पर्धेत चौथ्या  दिवशी  खो खो मध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या गटात राजेंद्र विद्यालय, खंडाळा…

उद्धव ठाकरेंकडून आज उमेदवारांची घोषणा

मुंबई : महाविकास आघाडीचे जागा वाटप आता अंतिम टप्प्यात असून ज्या जागांवर एकमत झाल्या आहेत त्या शिवसेना उध्दव ठाकरे गटांच्या जागांची घोषणा आज उद्धव ठाकरे करणार आहेत. तशी माहिती उद्धव…

ठाण्याच्या ‘राहुल इंटरनॅशनल’ची सीबीएसईकडून संलग्नता रद्द

गैरप्रकार केल्याचा शाळेवर आरोप   ठाणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) राज्यातील दोन शाळांसह देशभरातील वीस शाळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गैरप्रकारांसंदर्भात केलेल्या पडताळणीनंतर सीबीएसईने कारवाईचा निर्णय घेतला आहे. यात पुण्यातील पायोनियर पब्लिक…

शिवसेनेचे माजी खासदार आढळराव आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार

पुणे : शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरुरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात ते…

‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ !

हेमंत गोडसेंचे ठाण्यात शक्तीप्रदर्शन नाशिक : ‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ ! या घोषणांनी ठाण्याचा अवघा आसमंत शिवसैनिकांनी दुमदुमून सोडला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह ठाण्यात शक्तीप्रदर्शन केले. नाशिकच्या जागेसाठी भाजप आणि…

महाराष्ट्रातील सर्व जागांवर ‘मराठा’ उमेदवार उभे करणार- जरांगे

मुंबई : राज्यातील सर्व मतदारसंघात एक अपक्ष मराठा उमेदवार उभा करून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न मराठा समाज करणार असल्याचे मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी आज जाहिर केले.…

एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो

शर्मिला पवारांची अजितपवारांवर टिका बारातमी: आपले आज जे काही अस्तित्त्व आहे, ते शरद पवार साहेबांमुळेच आहे असे खडेबोल अजित पवार यांना सुनावतानाच एक तिळ हा सात जणांनी खायचा असतो एकट्यानेच…