Category: मुंबई

Mumbai news

अजित पवारांचे नाराज आमदार शरद पवारांच्या संपर्कात ?

मुंबई : जिंकून येण्याची हमी हा मंत्र असणाऱ्या भाजपाप्रणीत महायुतीत अजित पवरांच्या आमदारांचा दारूण पराभव झाला. एक तटकरेंचा अपवाद वगळलला तर अजित पवारांना स्वत:च्या पत्नीलाही निवडून आणता आले नाही. यामुळे अजित पवारांच्या…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप !

उपमुख्यमंत्री फडणवीसांची राजीनाम्याची तयारी   “मी कमी पडलो, महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, पक्षाला विनंती आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळे करावे जेणेकरून विधानसभेसाठी पक्षात पुर्णवेळ काम करता येईल ”: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा…

हिवताप, डेंग्यूमुक्त मुंबईसाठी कृती आराखडा तयार करणार

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे निर्देश मुंबई : मुंबई डेंग्यू व हिवतापमुक्त करण्यासाठी सूक्ष्म उपाययोजना करण्यावर भर देण्याबरोबर कृती आराखडा तया करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर जनजागृतीवर अधिक भर द्यायला हवा, असे मत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले. पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात जून हा ‘हिवताप विरोधी महिना’ म्हणून पाळण्यात येतो. राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी एकत्रितरित्या मुंबईमध्ये दोन दिवसीय विशेष कार्यशाळा आणि परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या चर्चासत्रात डॉ. सुधाकर शिंदे बोलत होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामुदायिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक, सर्व २४ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून हिवताप निर्मूलनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सूचित केले. राज्य सरकारच्या हिवताप आणि कीटकजन्य आजार विभागाच्या तांत्रिक अधिकारी डॉ. रुप कुमारी यांनी रुग्णांवरील उपचाराबद्दलच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच हिवताप नियंत्रणासाठी १ – ३ – ७ धोरणचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन केले. जागतिक आरोग्य संघटनेचे पथकप्रमुख डॉ. बद्री थापा यांनी हिवताप उद्रेकांचा तपास कसा करता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याच आवाहन केले. डॉ. एन. आर. तुली यांनी दिल्लीत विविध उपाययोजना कशा प्रकारे राबविल्या जातात, तसेच समुदाय जागरुकता कशी केली जाते यावर लक्ष केंद्रीत केले. मुंबई महानगरपालिकेच्या आराेग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सर्वांना सूक्ष्म योजना आखून काम करण्याचे आवाहन केले. हिवताप, डेंग्यू नियंत्रणात आणणे, त्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, कीटकनियंत्रण प्रभावीपणे राबविणे इत्यादी विषयांवर या परिसंवादात चर्चा झाली. यावेळी मुबई महानगरपालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या सामुदायिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक, सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व ७ परिमंडळातील उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कीटकनाशक अधिकारी आदींचा सहभाग होता.

मुंबईतून हरवलेली चार भावंड ग्वाल्हेरला सापडली

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी मुंबई: मुंबईतून हरवलेली चारही भावंडे ग्वाल्हेरला सापडल्याने त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या चौघांनी तेथील एका आश्रमात आश्रय घेतला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना मुंबईत आणले. लवकरच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. चारही भावंडे सुखरूप असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. यातील तक्रारदाराचे अनुक्रमे अठरा, पंधरा, आठ आणि अकरा वर्षांचे चार भाचे त्यांच्या सावत्र आईसोबत २६ मेला घर सोडून निघून गेले होते. कौटुंबिक वादातून या सर्वांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. २८ मे रोजी मुलांची आई एकटी घरी परत आली होती. मात्र चारही भावंडे घरी न आल्याने त्यांच्या मामांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या मुलांचा शोध सुरू केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी गंभीर दखल घेत पथकाला मुलांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. सावत्र आईच्या चौकशीतून ते सर्वजण अंधेरीहून दादर, कल्याण असे रेल्वेने पंजाब मेल पकडून दिल्लीच्या दिशेने गेले होते. मात्र मध्य प्रदेशातील खांडवा रेल्वे स्थानकात तिने पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. तिने चौघांनाही घरी येण्याचा सल्ला दिला, मात्र ते चौघेही घरी येण्यास तयार नव्हते. त्यामुळे ते पुढे निघून गेले; तर त्यांची आई पुन्हा मुंबईत निघून आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना ते चौघेही ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात उतरल्याचे दिसून आले होते. तिथे त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला होता. त्यामुळे या पथकाने ग्वाल्हेर शहरातील ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या व्यक्तीने त्यांना माधव बाल निकेतन या आश्रमात जमा केल्याची माहिती प्राप्त झाली. तिथे या चौघांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

गॅस वाहिनीच्या सुरक्षेसाठी ‘डायल बिफोर डिग’ उपक्रम

मुंबई : महानगर गॅसच्या वायूवाहिनीला होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘डायल बिफोर डिग’ म्हणजेच खोदण्यापूर्वी सूचना द्या, हा उपक्रम महानगर गॅसने सुरू केला आहे. महानगर गॅसतर्फे महामुंबई परिसरात स्वयंपाकघरात लागणारे पीएनजी तसेच वाहनांचे इंधन असलेला सीएनजी वायू पुरवला जातो. हा पुरवठा अखंड राहावा, यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात आढळलेल्या कोणत्याही नियोजित खोदकामाची माहिती-तक्रार महानगर गॅसकडे करावी. ज्यामुळे वायू वाहिनीचे अपघाती नुकसान टळेल, त्यामुळे वायू गळती होणार नाही किंवा घरांना नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित होणार नाही. तसेच संभाव्य सुरक्षा धोके टाळणार असल्याचे म्हटले आहे. खोदकामाची माहिती महानगर गॅसला खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वीरशैव कक्कया-ढोर समाजाचे आंदोलन

धारावी  : वीरशैव कक्कया कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने संत कक्कया आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता आझाद मैदानात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्‍यातील समाजबांधवांनी आंदोलनासाठी…

नवी मुंबई सानपाडा येथे महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण दिन साजरा

नवी मुंबई : ठाणे, नवी मुंबई सानपाडा येथे कै.  सिताराम मास्तर उद्यानात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  ५ जून हा  पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेचे डी वॉर्डचे विभाग अधिकारी(उपायुक्त) भरत धांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून  ५ जुन हा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.    याप्रसंगी वसुंधरेची शपथ घेण्यात आली. ५ जुन हा  पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या वृक्षारोपण प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे व हरियाली संस्थेचे अध्यक्ष मारुती नाना कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,  पर्यावरण दिनाचे महत्त्व फार मोठे आहे. आज भारतात  ५३ टक्के तापमान वाढीचे प्रमाण पोहोचले आहे. ही बॉर्डर लाईन असून धोक्याची घंटा आहे.   तापमान ५६ टक्के  गेल्यावर मनुष्य हानी होऊ शकते. कोरोनानंतर आपण काही शिकलो नाही.  त्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करणे फार गरजेचे आहे. विदर्भ व मराठवाड्यात वृक्षारोपण न  झाल्यामुळे तापमानवाढीने अनेक लोक मृत्युमुखी पडले आहे. राजस्थानमध्ये  बीएसएफचे जवानानी २५  सेकंदात पापड भाजून  काढले. हा व्हिडीओ आज जगभर व्हाट्सअप वर फिरत आहे.  आफ्रिकेची राजधानी केपटाऊन ही  २०१३  पासून वॉटरलेस झाली असून मिलेटरी व पोलीस संरक्षणामध्ये प्रत्येकाला २५  लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. याचा अर्थ तपमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आज भारताला ५००  कोटी झाडे लावण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पाच झाडे जरी  लावली तरी पर्यावरणाचे संरक्षण होईल व भारतातील नागरिकांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळेल. आज झालेल्या पर्यावरण दिन प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, सावंत,  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख अजय पवार, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक व मराठा विकास प्रतिष्ठानचे सहसचिव मारुती विश्वासराव,  सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अजय पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

शिक्षक व पदवीधर निवडणूक मतदानाच्या वेळेत वाढ – म.स.पास्कर

अशोक गायकवाड नवी मुंबई,:महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार, २६ जून  रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी ०७.०० ते सायं ६.०० ही नवीन वेळ निश्चित करण्यात…

नेरुळ येथे विधी महाविद्यलयाकडून वृक्षरोपण

नेरुळ ; महात्मा गांधी मिशिन विधी महाविद्यालय नेरुळ नवी मुंबई येथे विधी महाविद्याल यांच्या वतीने ५ जून रोजी  ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे  वृक्ष रोपणाचा उपक्रम यशवीरित्या राबवण्यात आला विधी महाविद्यालय  च्या मुख्याध्यापीक शीला होसमानी  व महाविद्यलयातील विद्यार्थी , कर्मचारी, नवी मुंबई महानगपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी ,व   ईतर विद्यार्थी आणि नागरिक यांनी सहभाग घेतला होता. या उन्हाळ्यात साधारणतः तापमान हे ४५ अंश सेल्सियस च्या जवळ पास गेले होते पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे त्यामुळे वृक्षरोपण हि काळाची गरज झालेली आहे प्रत्येक माणसांनी किमान एक तरी झाड लावून संगोपन करून जगवले पाहिजे असा संदेश मुख्याध्यापिका शीला होसमानी यांनी  पर्यावरणदिनानिमित्त तेथे जमलेल्या विद्यार्थी ,महानगपालिकीचे कर्मचारी व नागरिकांना दिला.

कांबळे, गोळे, सोनार, राऊत ठरले सर्वोत्तम लिफ्टर

राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुंबई : नुकत्याच परळ येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनियर मुलांमध्ये कोल्हापूरच्या शामसुंदर कांबळे व मुलींमध्ये मुंबई उपनगरची हर्षदा गोळे व सब ज्युनिअरमध्ये मुंबई उपनगरचा क्रिश सोनार व पुण्याची कादंबरी राऊत यांनी स्ट्रॉंग वुमन व स्ट्रॉंग मॅन हा किताब पटकाविला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उदय देशपांडे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, अरुण केदार, छत्रपती पुरस्कार प्राप्त, सचिव महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या हस्ते संपन्न झाला. बक्षीस समारंभ ॲड. प्रवीण शिंदे, सेक्रेटरी,जीएसटी असोसिएशन, ॲड. दत्तात्रेय उतेकर व संजय नारकर, सरचिटणीस ऑल इंडिया ज्युनिअर जीएसटी ऑफिसर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ही स्पर्धा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. स्पर्धेचा निकाल (विजेते खेळाडू) ज्युनिअर पुरुष ५३ किलो – विराज पावसकर, (मुंबई उपनगर), ५९ किलो – वैभव जाधव, (मुंबई उपनगर), ६६ किलो – पार्थ तारे, (पालघर), ७४ किलो – श्यामसुंदर कांबळे, (कोल्हापूर), ८३ किलो – ओमकार भगत, (ठाणे),  ९३ किलो – नवाज खान (मुंबई उपनगर), १०५ किलो – रोशन गावकर, (मुंबई), १२० किलो – हर्षल पाटील, (कोल्हापूर), १२० + – सुमित जाधव,(कोल्हापूर) ज्युनियर महिला ४३ किलो – मानसी हांडे, (मुंबई उपनगर), ४७ किलो – हर्षदा घोले, (मुंबई उपनगर) ५७ किलो – शुभांगी पाटील, (कोल्हापूर), ६३ किलो – सेजल मकवाना, (मुंबई उपनगर), ६९ किलो – प्रेरणा साळवी, (ठाणे), ७६ किलो – सेजल मोईकर, (पुणे), ८४ किलो – प्रतिभा लोणे, (ठाणे), ८४+ किलो – अनुष्का खोपीकर, (पुणे) सब ज्युनिअर महिला ४३ किलो – गायत्री बडेकर,…