Category: मुंबई

Mumbai news

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा १७ वर

मुंबई : घाटकोपरच्या होर्ल्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे आहे. होर्डिंग दुर्घटनास्थळी अद्यापही मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा आहे. या ढिगाऱ्याखाली पेट्रोलपंप असल्यामुळे ढिगारा हटवण्यास अडचणी येत आहेत. या अपघातातील मृतांच्या संख्येत अजुन वाढ होण्याची शक्यता…

कोरोनाच्या धक्यातून मतदारांना सावरण्यावर भर – राहुल शेवाळे

रमेश औताडे  मुंबई : कोरोना वैद्यकीय दृष्ट्या संपला असला तरी जनतेच्या मनातून अजून कोरोना गेला नाही. कोरोना नंतरची प्रथमच निवडणूक आहे. त्यांना राजकीय आरोप प्रत्यारोप करणाऱ्या पुढाऱ्यांचा राग आला आहे. मतदारांची  मानसिक, आर्थिक, सामाजिक…

मुंबई उपनगरात २२९० मतदारांचे गृह मतदान

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग अशा २,७३५ मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी २,२९० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असते मतदान पथक मुंबई उपनगर जिल्ह्यात अशा मतदारांची संख्या २,७३५ एवढी आहे. या मतदारांच्या घरी मतदान पथके पाठवून टपाली मतपत्रिकेद्वारे त्यांच्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतदान पथकांमध्ये एक मतदान अधिकारी, त्याचा सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक, एक पोलिस, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाच्या वेळापत्रकाची माहिती संबंधित उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवार अशा मतदान पथकांसमवेत त्यांचे प्रतिनिधी मतदानाच्या वेळी त्यांचा प्रतिनिधी उपस्थित ठेवू शकतात. गृहमतदानाच्या वेळी मतदाराच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेऊन या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणदेखील करण्यात येत आहे

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सामाजिक संघटना सरसावल्या

मुंबई : भारतीय संविधानिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी मतदारांनी सजग आणि निर्भय मतदान करावे, यासाठी मुंबईत ‘निर्भय बनो’ जाहीर सभा घेण्यात आली. ही सभा दुभाषी मैदान, गुजरात सोसायटी रोड, विलेपार्ले पूर्व…

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

काजल – घुफ्रानला अग्र  मानांकन मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ मे  रोजी लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात इंडियन ऑईलचा महम्मद घुफ्रानला तर महिला एकेरीत इंडियन ऑईलच्याच काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन शनिवार १८ मे ला सकाळी ९ वाजता होणार असून पुरुष एकेरी व महिला एकेरी या दोनही गटांच्या सामन्यांनी स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेतील पहिल्या ८ विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे पुरुष एकेरी : १) महम्मद घुफ्रान ( इंडियन ऑइल ), २) संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. ), ३) फहिम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ), ४) ओमकार टिळक ( ए. के. एफ.), ५) ओमकार नेटके ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग ), ६) अमोल सावर्डेकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग ) ७) प्रशांत मोरे ( रिझर्व बँक ), ८) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ), महिला एकेरी : १) काजल कुमारी ( इंडियन ऑइल ), २) अंबिका हरिथ ( रिझर्व बँक ), ३) उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ), ४) रिंकी कुमारी ( पोस्ट ऑफिस ), ५) निलम घोडके ( पोस्ट ऑफिस ), ६) वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी. ), ७) सेजल लोखंडे ( डी. के. सी. सी. ), ८) रुची माचिवाले ( ए. के. एफ. )

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोई-सुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर सोई-सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेऊन जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी दिव्यांग मतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राणीबागेत दुर्मिळ झाडांचा बीएनएचएसकडून शोध

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात अनेक दुर्मिळ झाडांच्या प्रजाती आहेत. या प्रजातींची ओळख बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) नुकतीच केली आहे. बीएनएचएस ही संस्था नैसर्गिक वारशाचा अभ्यास, संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या ‘ट्री वॉक’ या उपक्रमामधून अनेक दुर्मिळ प्रजातींची ओळख पटल्याचा आनंद झाल्याचे बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांना सांगितले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या भारतातील प्रमुख वन्यजीव संशोधन संवर्धन संस्थेच्या माध्यमातून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात नुकताच ट्री वॉक हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बीएनएचएस सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने बागेतील समृद्ध फुलांची विविधता पाहण्याची अनोखी संधी सदस्यांना उपलब्ध झाली. बीएनएचएसच्या सदस्यांनी बागेचे निरीक्षण केले असता, तेथे त्यांना विविध प्रकारच्या देशी आणि विदेशी झाडांच्या प्रजाती नजरेस पडल्या. प्रत्येक झाडाची स्वतःची अनोखी कथा आणि महत्त्व आहे. ट्री वॉकचे नेतृत्व सेंट झेवियर कॉलेजमधील सहायक प्राध्यापक डॉ. राजदेव सिंग आणि निवृत्त प्राध्यापक मानेक मिस्त्री यांनी केले. प्रो. सेंट झेवियर कॉलेज, स्वीडल सेरेजो, बीएनएचएस प्रोग्राम्स विभागातील वनस्पतीशास्त्रज्ञ आणि शिक्षक आसिफ खान यांनी सांगितले की, आमच्या राणीबाग येथील ट्री वॉकला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद झाला, बीएनएचएस ट्री वॉक मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात आणि आजूबाजूला अशा निसर्गभ्रमणाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे. उपक्रमात १७ सदस्यांचा सहभाग राणी बागेच्या प्रवेशद्वारावरील जुन्या बाओबाब ट्री येथून झाडांचे निरीक्षण करत बीएनएचएसच्या १७ सदस्यांनी ‘ट्री वॉक’ला सुरुवात केली. सदस्यांना मॅजेस्टिक हेवन लोटस ट्री, कॅन्डल ट्री, प्राईड ऑफ इंडिया ट्री, वीपिंग पेपरबर्क, एलिफंट ॲपल आणि अगदी चॉकलेट किंवा कोकाओ ट्रीसारखी अनेक दुर्मिळ झाडे दिसली.

नवमतदारांचा कल नोटाकडे

मुंबई : राज्यात पक्षामधील फाटाफूट, बदलत्या वैचारिक, राजकीय भूमिका यामुळे झालेला वैचारिक गोंधळ हा १८ ते २३ या वयोगटातील नवमतदारांच्या पचनी पडलेला दिसत नाही. केवळ राजकीय स्वार्थासाठी होत असलेले पक्षांतर, काही क्षणात बदलेल्या वैचारिक भूमिका हे राज्यासाठी काही नवीन नाही. मात्र हा राजकीय गोंधळ तरुणाईच्या समजण्याच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे यावेळी मतदान करायचे, पण ते ‘नोटा’ला करू, अशा भावना या नवमतदारांकडून व्यक्त होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यात ३० हजार आणि उपनगर जिल्ह्यात सुमारे ८० हजार नवमतदारांच्या नावांची नोंदणी झाली आहे. पहिल्यांदा मतदान करणारा हा तरुण वर्ग मतदानासाठी उत्साही आहे. तसेच निवडणूक आयोगही नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे म्हणून शाळा-कॉलेज, सोशल मीडियातून आवाहन करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या नवख्या मतदारांना राज्यात गेल्या दोन वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फाटाफूट फारशी भावली नाही. नवमतदारांच्या बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवत आहे. मुंबईत तर एकाच पक्षातील सहकारी असलेले एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांऐवजी ‘नोटा’ ला मतदान करत आपली नाराजी दाखवण्याची मानसिकता या तरुणांची असल्याचे दिसत आहे. नाराजीचे प्रतिबिंब आपल्या पसंतीचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्यास कोणाला मतदान करायचा, असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहायचा. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने ‘नन ऑफ द अबाव्ह’ (नोटा) म्हणजेच वरीलपैकी कोणीही नाही, हा पर्याय दिला होता. त्यामुळे अनेक मतदार हा पर्याय निवडताना दिसतात. दरम्यान, नोटाला मिळालेली मते कुठेही ग्राह्य धरली जात नसली तरी मतदारांना नाराजी व्यक्त करण्याचा एक ठोस पर्याय आहे. यंदा २०१९ च्या तुलनेत नोटाला जास्त मते मिळतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

‘मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी !’

कलर्स मराठीच्या लोगोमध्ये बदल .. कलाकारांनी व्हिडिओंद्वारे मतदारांना केले आवाहन मुंबई : कलर्स मराठी वाहिनीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब लोगोमध्ये बदल केलेला दिसत आहे. बदललेल्या नव्या लोगोमध्ये एका बोटावर शाई लागलेली दिसतेय, ज्यामुळे मत दिल्याचे सूचित होत आहे. मागील काही वर्षात मतदानाचा टक्का फार कमी झाला आहे. या नव्या लोगोच्या बदलामुळे लोकांमध्ये मतदानाचे महत्त्व आणि एक स्थिर देशासाठी त्याची आवश्यकता याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा कलर्स मराठीचा उद्देश आहे. कलर्स मराठीने नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात आपले योगदान दिले आहे. नुकतेच कलर्स मराठीच्या कलाकारांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरून विविध व्हिडिओंद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान करण्यासाठी बाहेर या , वोटिंग करणे हा तुमचा हक्क आणि जबाबदारी आहे. देशासाठी एक पाऊल उचलून मतदान करा. आपल्या एका मताने देशाचे कल्याण होईल. मतदार हे टीव्ही आणि सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात करतात, हीच गोष्ट लक्षात घेऊन कलर्स मराठीने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे. कलर्स मराठीने केलेला हा बदल प्रेक्षकांना मतदान करण्याची प्रेरणा देईल आणि त्यांना मतदान करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करेल. कारण मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी!

मुंबईतील सामान्य माणसाचे घर तोडणारे अधिकारी अनधिकृत होर्डींग का तोडत नाहीत

रमेश औताडे मुंबई : भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्यांना श्रीमंतांची अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत. मुंबईतील सामान्य माणसाचे घर तोडणारे अधिकारी अनधिकृत होर्डींग का तोडत नाहीत ? असा सवाल मुंबईतील सामान्य नागरिक करत आहे. मुंबईतील घाटकोपर मध्ये एक विशाल बेकायदा होर्डिंग कोसळून 14 जणांना आपल्या जीव गमवावा लागला. तर या घटनेत 88 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.या पार्श्वभूमीवर या घटनेसाठी भावेश भिंडे नावाची व्यक्ती जबाबदार असल्याची माहिती समोर आली आहे. भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या होर्डिंग कंपनी आणि जाहिरात एजन्सीचा मालक आहे. मुंबई महापालिकेने या कंपनीला नोटीस बजावली आहे. 10 दिवसांच्या आत परिसरातील चार बेकायदेशीर होर्डिंग हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मुंबईतील 24 नागरी प्रभागांमधील कोणत्याही होर्डिंगसाठी परवाना रद्द केला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. जे होर्डिंग कोसळलं ते गृह विभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाच्या मालकीच्या जमिनीवर मुंबई महानगर पालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आले होते. सोमवारी मुंबईसह उपनगरात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने घाटकोपरच्या छेडा नगर जिमखाना, रिक्रिएशन सेंटर ३, येथील अंदाजे १२० x १२० फुट होर्डिंग्स जमिनीतून उन्मळून जवळच असणा-या पेट्रोल पंपच्या छतावर  कोसळलं . त्यावेळी जवळपास १५० वाहनं पेट्रोल पंपावर उपस्थित होती, काही पावसापासून आश्रय घेण्यासाठी ते पेट्रोल पंपावर थांबले होते. काही क्षणात हे होर्डिंग्स कोसळले. जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 88 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या ८८ झाली आहे. मृतांमध्ये पूर्णिश जाधव (वय 50),दिलीप पासवान (वय 34),बशीर अहमद (वय 52), फहिम खलील खान (वय 22),हंसनाथ गुप्ता (वय 71),सतीश सिंह (वय 52),चंद्रमनी प्रजापती (वय 45),महंमद अक्रम (वय 48),भारत राठोड (वय 24),दिनेशकुमार जैस्वार( वय 44),सचिन महेशकुमार यादव (वय 23) अशी या बारा जणांची नावे असून अन्य दोघांची अद्यापही ओळख पटलेली नाही. दुर्घटनास्थळी चार होर्डिंग्स होते. यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी बीएमसीची कोणतीही परवानगी रेल्वेकडून घेण्यात आली नव्हती.अशी माहिती समोर आली आहे. बीएमसी जास्तीत जास्त ४० x ४० चौरस फूट होर्डिंग उभारण्याची परवानगी देते मात्र, कोसळलेले होर्डिंग १२० x १२० चौरस फूट आकाराचे होते. सध्या बीएमसी एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी एजन्सीला बीएमसीची वैध परवानगी नसल्याबद्दल त्यांचे सर्व होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. तसंच पोलिसांकडून भावेश भिंडेंचा शोध घेतला जात आहे असे परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.