Category: मुंबई

Mumbai news

म्हाडा व पोलीस गृहनिर्माण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस वसाहतींचा पुनर्विकास

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली माहिती मुंबई :मुंबई शहर व उपनगरातील पोलीस वसाहतींची दुरावस्था झाली असून त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी सुचना खासदार रविंद्र वायकर यांनी करताच, पोलीस गृहनिर्माण मंडळ व म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी बैठकीत उपस्थिताना दिली. २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील गृह खात्याशी निगडीत प्रश्नान बाबत बैठक लावण्यात यावी असे पत्र खासदार रविंद्र वायकर यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना दिले होते. त्यानुसार आज एम.आय.डी.सी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त परमजीत दहिया, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मितेश गट्टे, सह्यायक पोलीस आयुक्त विविध पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मनीषा वायकर, माजी नगरसेवक सदानंद परब, एकनाथ हुंडारे, आत्माराम चाचे, कमलेश राय, सुभाष सावंत, अभिजित सावंत, प्रतिभा खोपडे, चंद्रावती मौर्या, वृंदा मोघे, ज्ञानेश्वर सावंत, वैभव भराडकर, दीपिका तावडे, मनीष नायर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी नितीन पगारे, संदेश लोणारे, म्हाडाचे अधिकारी अनिकेत मोझे आदी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. गृह निर्माण राज्यमंत्री असताना पोलिसांच्या वसाहतीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी याप्रश्नी सविस्तर चर्चा झाली असून या प्रश्नी धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे खासदार रविंद्र यांची बैठकीत स्पष्ट करताच, पोलिसांच्या जेवढ्या वसाहती आहेत त्या एकत्र करून त्यांचा विकास करण्यात येणार आहे. पोलीस गृहनिर्माण मंडळ व म्हाडा यांच्या मार्फत पोलीस वसाहतींचा पुर्नार्विकास करण्याचे निश्चित झाले असून याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली. त्याचप्रमाणे जुनी पोलीस ठाणे जे मोडकळीस आले आहे (जसे आरे, मेघवाडी, जोगेश्वरी) तसेच अन्य पोलीस स्थानकाच्या दुरुस्तीचा अथवा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात यावा. गृह विभागाकडे निधी प्राप्त झाला असल्याने ही कामे करण्यात येतील. अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. काल बाह्य गाड्या रस्त्याच्या कुठेही ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ही समस्या दूर करण्यासाठी मुंबईत परिवहन विभागातर्फे स्क्रॅपिंग सुविधा तयार करण्यात येत असून, वर्षभरात याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन कदम यांनी दिले. रस्त्यावरील अनधिकृत पार्किग, गॅरेजेस, फेरीवले, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावे, अशा सुचना ही कदम यांनी संबंधित अधिकारी याना यावेळी दिल्या. मुंबईच्या तसेच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील तक्षशीला, आरे, दुर्गानगर, जोगेश्वरी व अंधेरी गुंफा,  सात बंगला, कुरार आदी ज्या ज्या भागात ड्रग विक्री करण्यात येथे त्या सर्व ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळि दिल्या. वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी आवश्यक तेथे सीसी कॅमेरा बसवण्यात यावा. विविध ठिकाणावरील सिंग्नलवरील भिकारी व तृतीयपंथी यांच्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, श्यामनगर येथे आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या पोलीस बीट चौकीचा म्हणावा तसा वापर करण्यात येत नसल्याने, या बीट चौकीवरील खोली महिला सक्षमी कारणासाठी वापरण्यात यावी अश्या मागण्याही वायकर यांनी या बैठकीत केल्या. या बीट चौकीवरील त्यांचा आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या या चौकीवरील त्यांचा नावाचा बोर्ड काढण्यात आल्याने वायकर यांनी नाराजी व्यक्त केली. जोगेश्वरी व आरे भुयारी मार्गाच्या कामासाठी आवश्यक परवानगी देण्यात यावी, गोरेगाव-(पूर्व) नेस्को सेंटर येथे प्रदर्शनावेळी येथे येणाऱ्या गाड्या रस्त्यावर उभ्या ठेवण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनधिकृत बार यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वायकर यांनी यावेळी केली.

काजल – घुफ्रानला प्रथम मानांकन 

मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या सहयोगाने ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई येथे…

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या संवर्धनाकरीता दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि.चे प्रायोजकत्व

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सुपूर्द केला ५ वर्षांसाठी ९५ लाखांचा धनादेश* अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कबड्डी या खेळाला महाराष्ट्र स्टेट को…

आ.नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

माथाडी कामगार मेळावा संपन्न राजेंद्र साळसकर मुंबई-महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस, माजी आमदार व महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा)…

छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमान टिकविला;

शिवभक्त राजू देसाई यांनी वाहिली आदरांजली मुंबई : शहाजीराजांनी भगवाध्वज  छत्रपती शिवाजी महाराज यांना दिला याच ध्वजाला घेऊन छत्रपतींनी स्वराज्य उभे केले आणि हाच भगवा समर्थपणे पेलणाऱ्या दोनच महान व्यक्ती…

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या…

मुंबई मनपा कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही- अशोक जाधव

राजेंद्र साळसकर मुंबई : मला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल परंतु काही झाले तरी मी मुंबई मनपा कामगारांचा गिरणी कामगार होऊ देणार नाही, असे उदगार म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी नुकतेच येथे काढले.ते म्युन्सिपल मजदूर युनियनने संपूर्ण महाराष्ट्रातील मनपा व नपा च्या कामगाराच्या वारसा हक्क लढ्याला मिळालेल्या यशाबद्दल  परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यासमोर बोलत होते. याप्रसंगी अॅड.हरिष बाली, अॅड.बळीराम शिंदे,संजय वढावकर,अॅड.सुरेश ठाकूर,म्युन्सिपल मजदूर युनिययनचे सरचिटणीस वामन कविस्कर,कार्याध्यक्ष यशवंत देसाई, कोषाध्यक्ष शरद राघव तसेच अनिल पाटील,गौतम खरात व संतोष पवार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अशोक जाधव आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,मुंबई मनपा कामगारांच्या बोनसबाबत बोलणी करण्यासाठी आयुक्त चहल यांच्याकडे गेलो होतो तेव्हा  चहल साहेब आम्हाला म्हणाले की,तुम्हाला आता बोनस देऊ परंतु एक वर्षानंतर पगार,बोनस व पेन्शन द्यायला मिळणार नाही.तेव्हा आम्ही त्यांना बोललो की,साहेब असं का बोलता.त्यावर ते म्हणाले की, सरकारने आम्हाला अडीच लाख हजार कोटींची भांडवली कामे सांगितली होती पण ख-या अर्थाने आता दोन लाख ऐंशी हजार कोटींची कामे आता काढायला सा़गितली आहेत. परिणाम काय झाला, त्यांनी हवा तसा पैसा ओतण्याचं काम केलं.कोस्टल रोडला पंधरा हजार कोटी रूपये टाकले,एमएमआरडीए ला दहा हजार, पंचवीस हजार टाकले, बँकेतून ९२हजार कोटी काढून घेतले.आज महापालिका अस्तित्वात आल्यापासून एक रूपयाही कर्ज घेतलं नव्हतं त्या महापालिकेनं आता दीडलाख हजार कोटी रूपयांचं कर्ज काढलं आहे.मग मला सांगा त्या बँकेचं कर्ज पहिलं भरणार की तुमचा पगार देणार ? असं जर घडलंं तर तुम्हाला एक तारखेला जो पगार मिळतो तो तुम्ही एकमेकांना विचाराल आठ तारीख,दहा तारीख आली,तुझ्या खात्यात पगार आला काय? या सरकारने गिरणी कामगारांचं वाटोळं केलं पण तुमचा मी गिरणी कामगार व्हायला देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.भले मला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण मी तुमचा  गिरणी कामगार व्हायला देणार नाही.त्यासाठी आता आम्ही संघटनेचे पदाधिकारी एकत्र बसून एक तारीख ठरवून मनपा आयुक्तांना नोटीस देणार आहोत,भांडवली काम हटाव आणि महापालिका कामगार बचाव,असे आवेशपूर्ण उदगार  त्यांनी यावेळी काढले.

एसटी महामंडळाचा भाड्याच्या बसेसला आता रामराम

स्वमालकीच्या ५ हजार बसेस खरेदी करणार ० परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा   मुंबई  : वाढत्या अपघाताच्या आणि दर्जाबाबत आलेल्या तक्रारीनंतर आता एसटी महामंडळ भाड्याच्या बसेसना रामराम ठोकणार असून यापुढे आता स्वमालकीच्या…

ध्वज विजयाचा उंच धरा रे…

भारताचा झेंडा जगात फडकावणाऱ्या जगज्जेत्या खेळाडूंन देशातील सर्वोच्च अशा अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचा ऑलिम्पक कास्यपदक विजेता खेळाडू स्वप्निल कुसेळेला अर्जुन तर त्याची प्रशिक्षक दिपाली देशपांडेला द्रोणाचार्य…

अतिक्रमण विभागामार्फत बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व…