एसएनडीटी विद्यापीठ समाज कार्य विभागाच्या ग्रामीण अध्ययन शिबिराची सांगता
मुंबई : येथील एसएनडीटी. महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि समाज कार्य विभागाने समाजकार्य विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेले पाच दिवसीय ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव…
सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर
डिसेंबरमध्ये दररोज सरासरी ८४४ शेतकऱ्यांना लाभ मुंबई : शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेच्या अंमलबजावणीला गती आली असून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ पंप राज्यात बसविण्यात आले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दीर्घ काळाचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. राज्यामध्ये महावितरणच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात २६ पर्यंत २१,९५१ सौर कृषी पंप बसविण्यात आले, अर्थात दररोज सरासरी ८४४ पंप बसविण्यात आले. ही आतापर्यंतची कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक सरासरी आहे. राज्यात २०१५ पासून २०२३ पर्यंत विविध योजनेत १,८०,००० सौर पंप बसविण्यात आले होते. तथापि, या वर्षी मार्च २०२४ पासून आतापर्यंत फक्त आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात १,५८,००० सौर पंप बसविण्यात आले आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा उच्चांक गाठला आहे. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषी पंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरण, एजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते, त्यानंतर कार्यादेश दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे. सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होते. 00000
पार्ले महोत्सवात सहभागी स्पर्धकांनी गाठला उच्चांक
कला-क्रीडा-सांस्कृतिक क्षेत्राचा महोत्सव झाला अवघा पार्लेमय मुंबई : रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या आमदार पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखालील पार्ले महोत्सव २०२४ ने स्पर्धकांचा उच्चांक गाठला असून मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास ६० हजार स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला असून प्रत्येकजण विजेतेपदासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहे. या महोत्सवामुळे अवघी इथली डॉ. स्नेहलता देशमुख क्रिडानगरी पार्लेमय झालेली दिसून येत आहे. सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती हा महोत्सव यशस्वी करत आहे. त्याचबरोबर त्याची व्याप्ती देखील वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याच्यापेक्षा अधिक भव्य आणि व्यापक नियोजन करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत तसेच स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धक हा आपल्या क्षेत्रात इतका निपुण आहे की, नक्कीच तो भविष्यात राज्य आणि देशाचा नावलौकिक वाढवेल, असा विश्वास असल्याचे पराग अळवणी यांनी सांगितले. महोत्सवाच्या सलग सातव्या दिवशी वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या असून अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आहे. मल्लखांब स्पर्धकांनी हा दिवस गाजवला असून समर्थ राणे याने पुरुष गटात तर श्रृती उतेकर हिने महिला गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांची अनुक्रमे नावे – वैयक्तिक गट – पुरुष – समर्थ राणे, आदित्य पाटील, मृगंक पाठारे, निरंजन अमृते, अवधूत पिंगळे. महिला – श्रृती उतेकर, पूर्वा आंबोडकर, काव्यशी मसुरकर, खुशी पुजारी, तनश्री जाधव, पलक चुरी. सांघिक गट – पुरुष – पार्लेश्वर व्यायामशाळा, टीसुकाहार स्पोर्ट्स अकॅडमी, दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन. महिला – समता क्रिडा भवन, पार्लेश्वर व्यायामशाळा, गोरेगाव जिमखाना. कॅरम स्पर्धेतील विजेत्यांची यादी अशी – खुला गट – मंगेश पंडित विजेता तर असिफ शेख उपविजेता. शालेय गट, मुले – पुष्कर गोळे विजेता तर प्रसन्ना गोळे उपविजेता, महिला गट – समृद्धी घाडीगावकर विजेती तर प्राजक्ता नारायणकर उपविजेती. कराओके संगीत स्पर्धा – पहिले तीन विजेते – पुरुष गट – मानस भागवत, सुहास कुलकर्णी, प्रियदर्शन गोंधळेकर, महिला गट – अष्टा हळदणकर, गौरी मिश्रा, सरिता पांचाळ, जोडी – प्रथम – अनिल कुलकर्णी व कृपा पै, द्वितीय – मानस भागवत व स्नेहा बेडेकर. सोजी मॅथ्यू यांना उत्तम गायकाचे पारितोषिक मिळाले. ०००००
शिवशक्ती-अ, महर्षी दयानंद स्पोर्टस्, अंकुर स्पोर्टस् यांची उपांत्य फेरीत धडक
जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मुंबई:- शिवशक्ती-अ, महर्षी दयानंद स्पोर्टस्, अंकुर स्पोर्टस् यांनी मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या १४वर्षाखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरी गाठली. शिवशक्ती-अ विरुध्द चंद्रोदय क्रीडा मंडळ, महर्षी दयानंद विरुध्द अंकुर स्पोर्टस् अशा उपांत्य लढती होतील. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व मुलींच्या सामन्यात शिवशक्तीने गणेश स्पोर्टस् चा दुबळा प्रतिकार ४९-३० असा मोडून काढला. विश्रांतीला २५-११ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने नंतर सावध खेळ करीत आपला विजय साकारला. वैष्णवी सुतार, जान्हवी पोतदार यांच्या चढाई पकडीच्या खेळाला याचे श्रेय जाते. गणेशच्या कावेरी बाईत, कृतिका बांदकर यांना विश्रांतीनंतर सुर सापडला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात महर्षी दयानंदने रोहिणी कदम, धनश्री पालवे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर शिवशक्ती-ब चा ५४-३३ असा पाडाव केला. पूर्वार्धात २८-१२ अशी आघाडी घेणाऱ्या महर्षी दयानंदने उत्तरार्धात त्याच गतीने खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. उत्तरार्धात शिवशक्तीच्या अस्मी कोकाटे, प्राची वर्मा यांनी आपला खेळ उंचावत पराभवातील अंतर कमी केले. अंकुर स्पोर्टस् ने जिजामाता महिला संघाला ४५-१४ असे सहज नमवित उपांत्य फेरी गाठली. विश्रांतीला ३१-०६ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला. विश्रांतीनंतर आणखी १५गुण घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. गायत्री गुप्ता, मुक्ता चौहान यांच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जिजामाताची सेजल मालप चमकली. पुरुषांच्या द्वितीय श्रेणी गटात शिवनेरी स्पोर्टस् ने ५-५ चढायांच्या डावात गोकुळ मित्र मंडळाला ४३-३७ अशी मात करीत दुसरी फेरी गाठली. मध्यांतराला २६-१८ अशी आघाडी घेणाऱ्या शिवनेरीला गोकुळ मित्र मंडळाला पूर्ण डावात ३४-३४ असे बरोबरीत रोखले. साहिल आवळे, अमन नवले यांच्या संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. गोकुळ मित्रच्या संतोष घडसी, संतोष भाटकर यांनी कडवी लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते थोडे कमी पडले. द्वितीय श्रेणीच्या इतर सामन्यात गावदेवीने गणेशला २८-१३, वीर संताजीने न्यू वर्ड्सला ३१-१८ असे, हिंद केसरीने न्यु पर्शुराम बॉईजला ४०-१९ असे, तर अमरदिप ने नवनाथला ३४-२२ असे पराभूत करीत दुसरी फेरी गाठली.
प्रल्हाद नलावडे स्मृती चषक जिंकण्यासाठी शालेय ५२ कॅरमपटूंमध्ये चुरस
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय १५ वर्षाखालील कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ५२ खेळाडूंमध्ये २९ डिसेंबरला चुरशीच्या लढती होतील. आयएनजी स्कूल-वसईचाशान पालवणकर विरुद्ध पार्ले…
जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवी मुंबई : महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राव्दारे दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून…
फेस्कॉमच्या ज्येष्ठ नागरिकांनसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
मुंबई : महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ – फेस्कॅाम मुंबई व नवी मुंबई प्रादेशिक विभागातर्फे वर्ष २०२५ च्या कॅरम, बुद्धिबळ तसेच गायन, उत्स्फूर्त वत्कृत्व, कथाकथन, सांघिक नृत्य, एकपात्री व द्विपात्री नाट्याभिवाचन इत्यादी…
ड्रीम ११ संघाला जेतेपद
मुंबई : ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी, चर्चगेट संघाने दिलीप वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने माहुल येथे आयोजित केलेल्या ड्रीम ११ कप या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी एम.सी.सी.…
खडेगोळवलीतील तळीरामांना उठाबश्यांचे धडे
गांजा व्यसनी, मद्यधुंदांविरुध्द पोलीस उपायुक्तांची मोहीम कल्याण : कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी आता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे स्वता रात्रीच्या वेळेत रस्त्यावर उतरले आहेत. गांजा, अंमली पदार्थ…
