खातेवाटप जाहीर
अमित शाह पुन्हा गृहमंत्री, गडकरींकडे रस्ते विकास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अमित शाहयांच्याकडे पुन्हा एकदागृहमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. नितीन गडकरींकडे रस्ते विकास कायम ठेवण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचीजबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनीरविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीहोती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथघेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडेसर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यातआलं. त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणिपरिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एसजयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणिअश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे. बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वेमंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हेखातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणारअसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय? अमित शाह- गृहमंत्रालय राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय एस जयशंकर – परराष्ट्र नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय…
