Category: देश

National-News

आज पासून ऐतिहासिक खो-खो विश्वचषकाला सुरवात 

 दिल्लीत खो-खोचा जल्लोष, जगभरातील संघ दाखल नवी दिल्ली, : भारताच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून खो-खो विश्वचषक २०२५ ला भव्य सुरुवात होणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगासाठी २३ देशांतील ३९ संघांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत २० पुरुष आणि १९ महिला संघ आपले कौशल्य दाखवणार आहेत. दिल्लीतील वातावरण क्रीडारसिकांच्या उत्साहाने भरले असून, खो-खोचा जल्लोष आजपासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. दिल्लीत जणू जागतिक क्रीडा महोत्सवाला आज पासून सुरवात झाली असून आज भारताच्या राजधानीत खो-खो चा आवाज घुमणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या स्पर्धेसाठी जगभरातील संघांचे दिल्लीत आगमन झाले आहे. पारंपरिक भारतीय क्रीडाप्रकार असलेल्या खो-खोचा आधुनिक ग्लोबल स्वरूप आज या स्पर्धेत पहायला मिळणार आहे. दिल्लीत खो-खोचा कुंभमेळा राजकीत वाटचालीत अनेक दिग्गज नेते एकमेकांना खो देत आपले राजकारण साधत असतात पण त्याच राजकीय राजधानीत खो-खो पहायला व तो आवाज ऐकायला क्रीडा रसिकांना मात्र स्वर्गीय आनंद मिळणार आहे. पहिल्या वहिल्या खो-खो विश्वचषकासाठी जगभरातून संघ दाखल झाले असले तरी खरा आनंद खो-खो क्रीडा कार्यकर्त्यांच्या तोंडावर भरभरून वाहताना दिसतोय. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम या ऐतिहासिक स्पर्धेचे साक्षीदार होणार आहे, जिथे भारतीय परंपरेतून उगम पावलेल्या या खेळाचा जागतिक व्यासपीठावर एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी खो-खो साठी आख्खी हयात घालवली आज त्यांना कोण आनंद होत असेल हा विचारच खूप काही सांगून जातो. एक काळ असा होता कि खो-खोचे कीट (बनियन व हाफ पँट) हे मिळवणे व ते अंगावर घालणे यात खूप कष्ट तर होतेच पण त्याचा अभिमान सुध्दा खूप असायचा. काही खेळाडू तर फक्त या कीट साठी खेळायचे. आज खो-खो च रूपड पालटलं आहे. खेळाडूंना भरभरून सुविधा उपलब्ध होत आहेत. आज खेळाडू खेळाडूंवर भरभरून बक्षिसे मिळत आहेत. खेळाडू विमानाने प्रवास करू लागले आहेत. हजारो, लाखो नव्हे तर आता करोडो रुपयांचे बक्षीस मिळवताना खो-खो खेळाडू दिसणार आहेत. एकेकाळी अत्यंत साध्या स्वरूपात खेळला जाणारा हा खेळ आता आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण झाला आहे. यामुळे खो-खो खेळाच्या प्रगतीचा प्रवास हा अनेकांना प्रेरणादायी वाटत आहे. संघांचे आगमन : पहिल्यांदा श्रीलंका आणि पेरू हे संघ दिल्लीमध्ये दाखल झाले. ११ जानेवारीला जवळजवळ १४ देशांचे संघ दाखल झाले. तर काल पर्यंत २३ पैकी एखाद दुसरा देश वगळता सर्वच संघ दिल्लीत पोहचल्याचे भारतीय महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी सांगितले. आशियाई संघांची जबरदस्त उपस्थिती आशियाई संघांनी या स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. इराण, मलेशिया, बांगलादेश, इंडोनेशिया, नेपाळ आणि दक्षिण कोरिया हे संघ आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या देशांमध्ये मध्यंतरीच्या काळात आपल्या देशातून प्रशिक्षक दिले होते व त्या-त्या देशात खो-खो सुरु झाला व आता ते संघ पुरुष आणि महिला गटांमध्ये जोरदार लढत देतील, अशी अपेक्षा आहे. पाश्चात्त्य देशांची नवी वाटचाल,  खो-खो ची मुसंडी पाश्चात्त्य देशांमध्ये अमेरिका, पोलंड, नेदरलँड्स आणि जर्मनी या देशांचा सहभाग विशेष ठरणार आहे. या देशांमध्ये खो-खो हा खेळ नव्याने सुरु झाला असला तरी त्यांचा सहभाग त्या-त्या देशांमध्ये खो-खो खेळाला सरावाने आपला करू लागले आहेत.  याशिवाय, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दक्षिण गोलार्धातील देशही उत्साहात सहभागी झाले आहेत. अर्जेंटिनाचा सहभाग दक्षिण अमेरिकेतील खो-खोला मिळालेली देणगी ठरणार आहे. यापूर्वी भारत व इंग्लंड या देशांनी एकमेकांच्या देशात जाऊन खो-खो स्पर्धा खेळली होती. त्यामुळेच इंग्लंडचा सहभाग या स्पर्धेची प्रतिष्ठा वाढवताना दिसतो. संघांचे आगमन आणि सराव सत्र: दिल्लीमध्ये आगमन झालेल्या सर्व संघांचे सराव सत्र सुरू झाले आहेत. त्या-त्या संघांचे प्रशिक्षक या विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंच्या रणनीतींवर काम करत आहेत. या सरावाच्या निमित्ताने स्टेडियमच्या परिसरात उत्साह निर्माण झाला आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी जय्यत तयारी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम पारंपरिक भारतीय सजावटीसह विविध देशांच्या रंगांनी नटले आहे. या सोहळ्यात खेळाडूंच्या सांस्कृतिक आदान-प्रदानाची झलक पाहायला मिळणार आहे.

मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिला उपेक्षितच

श्रमिक मुक्ती संघटनेकडून महिलांच्या नावाची दखल घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अंबरनाथ : नावात आईचे नाव समाविष्ट करणे, मालमत्तांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करून त्यांचा योग्य तो सन्मान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र गावठाण हद्दीतील मालमत्ता नोंद मोहिमेत महिला वर्ग वंचित राहिल्याची बाब समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात गावठाण भागांचे सर्वेक्षण सुरु असून त्याद्वारे नागरिकांना मालमत्ता नोंदी देण्यात येत आहे. मात्र या नोंदींमध्ये घरातील फक्त पुरुषांची नावे असून महिलांचे यात नाव टाकण्यात आली नाही. याबाबत श्रमिक मुक्ती संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करत या नोंदींमध्ये कुटुंबातील पतीसह पत्नीचेही नाव नोंदविण्याची मागणी संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. ग्रामीण भागातील सर्व गावठाणांमधील घरांचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे काम सुरु आहे. त्या सर्व्हेच्या आधारे प्रत्येक घराचा तपशील आणि नकाशासह सनद तयार करून तिचे वाटप करण्यात येणार आहे. त्या सनदींचे काही नमुने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाहिले. त्या सर्व सनदींवर कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषांचेच नाव असून त्यावर महिलांच्या नावाचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांवर शासनाने केलेला हा मोठा अन्याय आहे असे मत श्रमिक मुक्ती संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे. शासनाने शिधापत्रिकेवर महिलेचे नाव कुटुंबप्रमुख म्हणून नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. २००६ सालच्या वनहक्क मान्यता कायद्यामध्ये वनहक्काची सनद पती आणि पत्नी दोघांच्या नावे करण्याची तरतूद आहे. तर २० नोव्हेंबर २००३ च्या निर्णयानुसार घर पती आणि पत्नी दोघांच्या नावे केले जात आहे. असे असताना ग्रामीण भागातील मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिलांना का वगळले, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. तसेच प्रगतशील आणि पुरोगामी असा लौकिक असणाऱ्या महाराष्ट्राचे हे धोरण प्रतिगामी असल्याची टीका श्रमिक मुक्ती संघटनेने केली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून मुरबाडमधील महिलांच्या सामूहिक स्वाक्षऱ्या असलेले निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून या नोंदींमध्ये कुटुंबातील महिलांचे नाव घ्यावे अशी मागणीही यावेळी केली आहे.

खर्चिक प्री-वेडींगला आगरी समाजाचा विरोध

बदलापूर : दिमाखदार लग्न सोहळ्यासोबतच गेल्या काही वर्षात प्री-वेडींग अर्थात लग्नपूर्व चित्रण करण्याची पद्धत वाढली. यात मोठा पैसा खर्च होतो. तसेच हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यामुळे आगरी विवाहांमध्ये असे…

जलद बुद्धिबळात हम्पी जगज्जेती

न्युयॉर्क : बुद्धिबळातील भारताची जागतिक वर्चस्व आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. क्लासिक बुद्धिबळात भारताच्या गुकेशने पुरुष विभागात नुकतेच जगज्जेतेपद पटकावले होते. त्यापाठोपाठ आज वर्षाचा शेवट गोड करताना भाराताची महीला ग्रँडमास्टर…

“कायदे पतीकडून खंडणीसाठी नाही”; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली :  लग्न हा व्यावसायिक करार नाही आणि कायद्यातील तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि त्यांच्या पतीला शिक्षा करण्यासाठी नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटले. कायद्यातील कठोर तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि…

मुंबई, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, भाईंदर शहरांना जोडणाऱ्या प्रवासी जल वाहतुकीसाठी ९६.१२ कोटींचा अंदाजे खर्च

केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हे प्रकल्पाला गती देणार – खासदार नरेश म्हस्के अनिल ठाणेकर नवी दिल्ली, मुंबई, डोंबिवली, ठाणे, भाईंदर शहरांना जोडणाऱ्या प्रवासी जल वाहतुकीसाठी ९६.१२ कोटींचा अंदाजे खर्च…

महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला?

अरविंद केजरीवालांचा मोठा दावा नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकीत षडयंत्र रचून भाजपाने विजय मिळविला असा दावा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.  केजरीवाल एक्स वरील…

राहुल गांधीना संभलला जाण्यापासून रोखले

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वधेरा यांच्यासह काँग्रेस नेत्यांना दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवरील गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोखले. त्यांना संभलला…

सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार अमृतसर : माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. सुवर्ण मंदिराबाहेर हाणामारी झाली, त्याचवेळी सुखबीर सिंह बादल…

डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे होणार पुर्नसर्व्हेक्षण

डहाणू : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक या रेल्वे मार्गाची, अनेक दशकांची मागणी आहे. सदरची मागणी काही वर्षासाठी कालबाह्य झाली होती. मात्र, खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी ही मागणी पुन्हा पुर्नजीवीत केली आहे. या रेल्वे मार्गाचे पुर्नसर्व्हेक्षण होणार आहे. त्यासाठी  2  कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी खासदार डॉ.हेमंत सवरांनी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वेमार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  डहाणू- नाशिक रेल्वे सुरू करण्याची मागणी, या भागाचे पहिले तत्कालीन खासदार, जव्हार संस्थान चे राजे यशवंतराव मुकणे यांनी  1950  मध्ये केली होती. त्यानंतर या मागणीचा पाठपुरावा दिवंगत खासदार अॅड चिंतामण वनगा यांनी दोन तीन दशके केला आहे. दरम्यानच्या काळात तत्कालीन रेल्वे मंत्री राम नाईक यांच्या कार्यकाळात डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वे सुरू होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, नंतरच्या काळात या रेल्वे मार्गाची मागणी कालबाह्य झाली होती. आता पुन्हा पालघर चे खासदार डॉ.हेमंत सवरांनी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणी ला पुर्नजीवीत केले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या रेल्वे मार्गाच्या पुर्नसर्व्हेक्षणाला परवानगी दिली आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मार्गाची गरज…… आदिवासी भागात खरीप पीकाव्यतिरीक्त अन्य ऊत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे येथील आदिवासी, रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरीत होतात. या भागात कारखानदारी अथवा औद्योगिक वसाहत नाही. स्थानिक ठिकाणी महिला बचत गटांकडून उत्पादित अथवा तयार केलेल्या मालाला बाजारपेठ ऊपलब्ध होत नाही. शिक्षीत तरूणांना रोजगार नाही. त्यामुळे या भागात रेल्वे मार्ग झाल्यास, सर्व सुविधा तसेच रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाची गरज आहे. पुर्नसर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड या तीन आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्यात यावा. या तालुक्यातील मुख्य बाजारपेठांलगत सदरचा रेल्वे मार्ग व्हावा, तसे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर. ००००