Category: देश

National-News

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

वुशूच्या ताईचीक्वॉन प्रकारात श्रावणी कटके हिला कांस्यपदक डेहराडून :  पुण्याच्या श्रावणी कटके हिने येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील वुशूच्या ताईचीक्वॉन प्रकारात कांस्यपदक जिंकले. ताईचीक्वॉन हा वुशूचा एक महत्त्वपूर्ण प्रकार असून, त्यात शारीरिक संतुलन, लवचिकता आणि मानसिक एकाग्रतेची आवश्यकता असते. श्रावणीने यापूर्वीही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि वुशू खेळात अधिक सहभाग वाढेल, अशी आशा श्रावणीने व्यक्त केली आहे. श्रावणी कटके हिच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. तिच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि सातत्यपूर्ण सरावामुळे तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर व पथक प्रमुख  संजय शेटे, खजिनदार धनंजय भोसले, ऑल महाराष्ट्र वुशू संघटनेचे अध्यक्ष एस एस झेंडे, सचिव सोपान कटके आणि प्रशिक्षक स्वयम् कटके, प्रतीक्षा शिंदे, गणेश यादव, दीपक माळी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र दोन सुवर्ण पदकांपासून एक पाऊल दूर उपांत्य फेरीत दिल्ली व प. बंगालवर दणदणीत विजय हल्दवानी : उत्तराखंडच्या हल्दवानी येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला…

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

महाराष्ट्राला रग्बीमध्ये 1 रौप्य, 1 कांस्य पुरूष संघाला रौप्य, महिलांना कांस्य डेहराडून ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रूग्बी सेव्हनमध्येही महाराष्ट्राने खाते उघडून 1 रौप्य व 1 कांस्य पदकांची कमाई केली. अंतिम…

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

कबड्डीत महिलांच्या गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत हरिव्दार ः कबड्डीमध्ये अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला गटात उपांत्य फेरीकडे वाटचाल करीत पदकाच्या आशा कायम राखल्या. अटीतटीने झालेल्या लढतीत महाराष्ट्राने पश्चिम बंगाल या तुल्यबळ संघावर 30-22 अशी मात केली. हरिव्दारमधील योगस्थळी क्रीडा परिसरात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने  विजयी घोडदौड कायम राखली आहे. उपांत्यपूर्व फेरीत  पश्चिम बंगाल विरूध्द खेळताना महाराष्ट्राकडून सोनाली शिंगटे व मंदिरा कोमकर यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. रेखा सावंत हिने जोरदार पकडी करीत त्यांना चांगली साथ दिली. या सामन्यांमध्ये महाराष्ट्रात पुढे बंगालच्या बलाढ्य खेळाडूंचे मोठे आव्हान होते तरीही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवले आणि विजय खेचून आणली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची हरियाणा संघाशी गाठ पडणार आहे. पुरुषांच्या गटात मात्र महाराष्ट्राला आज साखळी गटातील रंगतदार लढतीत पराभव स्वीकारावा लागला. उत्तर प्रदेशने त्यांना 44-43 असे एका गुणाने पराभूत केले. या पराभवामुळे महाराष्ट्राच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा दुरावल्या आहेत.

सायकलिंगमध्ये पूजा दानोलेला सुवर्ण

मुलींच्या महाराष्ट्राला गटात सर्वसाधारण विजेतेपद रुद्रपूर : उत्तराखंड मध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलिंग खेळाच्या स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या पूजा दानोलेला ६० किमी अंतराच्या रोड मास स्टार्ट प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत महाराष्ट्राने ८ गुण घेत मुलींच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उप पथक प्रमुख उदय डोंगरे यांनी सायंकलिंग स्पर्धे दरम्यान भेट देऊन खेळाडूंचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या पूजा दानोले हिने ६० किमी रोड रेस प्रकारात १ ता. ४५ मी १०.५९० से.वेळ देत रौप्य पदक मिळवले तर गुजरातच्या मुस्कान गुप्ता हिने १ ता. ४५ मी १०.५१२ से. वेळ देत सुवर्णपदक पटावले. आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू स्वास्ती सिंग हिने १ ता. ४५ मी १०.७६९से. कांस्यपदक मिळवले. या सर्धेचे समुलींच्या गटाचे सर्वसाधारण विजेतेपद ८ गुणांसह महाराष्ट्राने पटकावले तर ५ गुणांसह गुजरात दुस-या तर राजस्थान ३ गुणांसह तिसरा स्थानी राहीले.

खो-खोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोडदौड!

पुरूषांचा केरळवर तर महिलांचा पश्चिम बंगालवर विजय हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला या दोन्ही खो-खो संघांनी ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड अपेक्षेप्रमाणे सुरूच ठेवली. महाराष्ट्राच्या पुरूष संघाने केरळाचा तर महिला संघाने पश्चिम बंगालचा पराभव करीत गटात अव्वल कामगिरी केली. पुरूषांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळवर ११ गुणांनी (४७-३६) मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राकडे १० गुणांची (२४-१४) आघाडी होती. महाराष्ट्राकडून कर्णधार गजानन शेंगाळ (१.३० मि., २ मि. संरक्षण आणि २ गुण), राहूल मंडल (१.३० मि. संरक्षण व १० गुण), रामजी कश्यप (१.१० मि., १.४० मि. संरक्षण व ८ गुण), शुभम थोरात (१.४० मि., १.२५ मि. आणि २ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत झालेल्या केरळकडून निखिल बी (१.१० मि. संरक्षण व १० गुण), देवनारायण (१ मि. संरक्षण व  गुण) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. महिलांची दमदार कामगिरी महिला गटातील सामन्यात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचा एक डाव व ४ गुणांनी (२४-२०) धुव्वा उडविला. या एकतर्फी विजयात प्रियांका इंगळे (२.१५ मि., नाबाद १.५० मि. आणि ६ गुण), संपदा मोरे (१.३० मि. संरक्षण आणि ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. याचबरोबर पायल पवार (१.४० मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (२.५५ मि. व १.२५ मि. संरक्षण आणि २ गुण) यांनीही दमदार कामगिरी केली. पश्चिम बंगालकडून इशिता विश्वास (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), दिपिका चौधरी (१.१० मि. संरक्षण आणि ४ गुण) यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला.

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

नेमबाजीत आर्या बोरसेला पदकाची संधी, वॉटर पोलो-रग्बीत दणदणीत विजय डेहराडून  ः  उत्तराखंड येथे होणार्‍या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत  महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत गाठून पदकाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. दुसरीकडे वॉटर पोलोमध्ये पुरूषांनी, तर रग्बीमध्ये महिला संघाने जोरदार विजयी सलामी देत स्पर्धेत बुधवारचा दिवस गाजविला. डेहराडूनमधीलइ त्रिशूल शुटींग रेजवरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठून पदकाच्या आशा कायम ठेवल्या. आज झालेल्या प्राथमिक फेरीत तिने 634.5 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. हरियाणाची रमिता हिने 634.9 गुणांसह अव्वल स्थानी राहिली. आर्या ही नाशिकची खेळाडू असून, सध्या ती नवी दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. तिने आजपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत. उद्या देखील ती सर्वोत्तम कामगिरी करील असा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या पथकाचे प्रशिक्षक ओंकार गोसावी यांनी व्यक्त केला. रग्बीत महिलांची धडाकेबाज सुरुवात डेहराडून येथे बुधवारी रग्बी स्पर्धांना प्रारंभ झाला. महिलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूची 68-0 गोल फरकाने दाणादाण उडविली. एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पूर्वार्धात 35-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती. वॉटर पोलोमध्ये दणदणीत विजय हल्दवानी येथे सुरू असलेल्या वॉटर पोलो स्पर्धेत पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने हरियाणाला 20-0 गोल फरकाने निष्प्रभ केले. एकतर्फी झालेल्या या लढतीत महाराष्ट्राच्या भूषण पाटीलने पाच गोल केले, तर सारंग वैद्यने चार गोल केले. महाराष्ट्राने वाटर पोलो मध्ये कायमच वर्चस्व गाजविले आहे. आजही त्याचीच प्रचिती आली. सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट संगीत खेळाबरोबरच गोल नोंदविण्याबाबतही अचूकता दाखवित दणदणीत विजय मिळविला.

महाराष्ट्राचा पदकांचा चौकार, मिहीर आम्बेची रूपेरी कामगिरी

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25 आदिती, ओमला कांस्य, रिले शर्यतीतही रूपेरी कामगिरी हल्दवानी  ः  उत्तराखंडात सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आज पदकाची चौकर झळकविला.  2 रौप्य व 2 कास्य पदके जिंकून महाराष्ट्राने…

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघाची विजयी सलामी

38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हल्दवणी, उत्तराखंड : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघाने यजमान उत्तराखंडवर दणदणीत डावाने विजय मिळवित 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची विजयी सलामी दिली.  गौलापूर येथील इंदिरा गांधी स्पोर्टस्‌‍ संकुलात मंगळवारी सुरू असलेल्या या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात प्रियांका इंगळे हिच्या अष्टपैलू खेळामुळे  (2.20 मिनिटे नाबाद व 2.10 मिनिट संरक्षण व 8 गुण) महिला संघाने  उत्तराखंडवर 37-14 असा 23 गुण व 1 डाव राखून विजय मिळविला. आश्विनी शिंदे (2.30मि.) व सानिका चाफे (2.20 मिनिटे) यांनी तिला संरक्षणात साथ दिली. उत्तराखंडची कर्णधार भारती गिरी हिने एक मिनिटे संरक्षण करीत एकाकी लढत दिली. पुरुष गटातही महाराष्ट्राने उत्तराखंडला 37-22 असे 15 गुण व एक डावाने नमविले. यात रामजी कश्यपने अष्टपैलू खेळ करताना आपल्या धारदार आक्रमणात 8 गडी बाद करीत संरक्षणात 1.46 मिनिटे पळतीचा खेळ केला. अनिकेत चेंदवणकरने 2.10 मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. उत्तराखंडकडून प्रींस कश्यप व राहूल शर्मा यांनी प्रत्येकी 6 गडी बाद करीत लढत दिली. अन्य निकाल ः पुरुषः  ओडीसा  विजयी विरुद्ध छत्तीसगड 43-34, 9 गुण व 6.25 मिनिटे राखून. महिला ः ओडीसा वि.वि. तामिळनाडू 36-18, 18 गुण व एक डावाने.

मराठमोळे नेमबाज सज्ज, दहा मीटर एअर रायफलमध्ये पदकाची आशा

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड २०२४-२५ डेहराडून : गतवेळी केवळ एका पदकावर समाधान मानावे लागलेल्या महाराष्ट्राच्या नेमबाजी चमूकडून यावेळी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किमान १५ पदकांची अपेक्षा आहे. डेहराडून येथील त्रिशूल शूटींग रेंजवर २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) नेतृत्वाखाली उत्तराखंडच्या स्वारीवर गेल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ‘टीम महाराष्ट्र, जय महाराष्ट्र’ असा नारा दिलाय. जागतिक पदकविजेती कोल्हापूरची सोनम म्हसकर, तिचीच शहर सहकारी आणि राज्यस्तरीय स्पर्धेत विक्रमी कामगिरी करणारी शांभवी क्षीरसागर व राष्ट्रीय पदकविजेती नाशिकची आर्या बोरसे हे त्रिकूट नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अचूक वेध साधण्यासाठी एकाग्रचित्त होतील. या प्रतिभावान नेमबाजांकडून महाराष्ट्राला उद्या पदकांची अपेक्षा असेल. मागील गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा पाटील हिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राला नेमबाजीतील एकमेव पदक जिंकून दिले होते. त्यामुळे यावेळी महाराष्ट्राचे नेमबाज किती पदके जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा असतील. कोल्हापूरच्या नेमबाजांवर मदा ऑलिम्पिक कांस्यपदकविजेता स्वप्नील कुसाळे व अर्जून पुरस्कारार्थी अनुभवी नेमबाज राही सरनोबत या कोल्हापूरच्या स्टार नेमबाजांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या पदकांची अपेक्षा वाढली आहे. शिवाय मुंबईची हिना सिद्धू व राष्ट्रीय पदकविजेती छत्रपती संभाजीनगरची रिया थत्ते हे नेमबाजही पदकाच्या शर्यतीत असतील. महाराष्ट्राचे नेमबाज यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत किमान १५ पदके जिंकतील, असा विश्वास संघाच्या व्यवस्थापिका श्रद्धा नालमवार यांनी व्यक्त केला.