डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ
अशोक गायकवाड अलिबाग : रायगड जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते सोमवारी अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. सदर मोहीम १६ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणारं असून, या मोहिमेतंर्गत वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेतंर्गत नियमित सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाच्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या घटकांचे सर्वेक्षण, जनजागृती करुन, नवीन कुष्ठरुग्ण शोधून, मोफत बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करणे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. जिल्हाभरात ३७ हजार ५६८ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेचि शुभारंभ वरसोली येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, डॉ. प्राची नेहूलकर, डॉ. सचिन संकपाळ, डॉ. अश्विनी सकपाळ उपस्थित होते.