Category: रायगड

raigad news and updates

 एकनाथ शिंदेकडून आमदार महेंद्र थोरवे यांचा सत्कार

दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल माथेरान:‘महेंद्र हा आमचा वाघ आहे. निवडणूक काळात अनेक संकटे आली पण  तो मुळीच घाबरला नाही. मी कर्जतकराना धन्यवाद देतो की तुम्ही शिवसेना पक्षाला साथ दिली आणि तुमचा महेंद्र आत्ता दुपटीने विकास करेल हा विश्वास आहे’, असे गौरवोद्गार एकनाथ शिंदे यांनी महेंद्र थोरवे यांच्याबद्दल काढले. नुकताच विधानसभा निवडणूका पार पडल्या असून महायुतीच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदार संघातील उमेदवार महेंद्र थोरवे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आशीर्वाद घेतले.खऱ्या अर्थाने कर्जत खालापूर मतदार संघातील जवळपास २९०० कोटी रुपयांची विकास कामे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे तडीस नेली आहेत. त्यामुळे आगामी काळात सुध्दा या मतदार संघातील जी काही प्रलंबित कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने मार्गी लागणार आहेत. ह्या मतदार संघात अत्यंत चुरस पहावयास मिळाली आहे परंतु केवळ अडीच वर्षाच्या कार्यकाळात आमदार महेंद्र थोरवे यांनी झपाटून कामे केल्यामुळेच ह्या मतदार संघाचा कायापालट होत आहे. महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्र्यांकडुन छोटेखानी सत्कार होताना हा समस्त मतदार संघातील कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले.यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

 महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी

 कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा अलिगड : महाराष्ट्राच्या दोन्ही संघाने ४३ व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची विजयी सलामी दिली. अलिगड (उत्तर प्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस स्टेडियमवर सोमवारी सुरू झालेल्या या  राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कुमार व मुली गटांमध्ये प्रत्येकी ३० संघाने सहभाग घेतला आहे. सलामीच्या सामन्यात महाराष्ट्र मुलांच्या संघाने विदर्भावर ३७-२६ असा ११ गुण आणि ५ मिनिटे राखून दणदणीत विजय मिळविला.  मुलींच्या गटात महाराष्ट्राने मध्यप्रदेशवर ४०-१२ असा १ डाव आणि २८ गुणांनी धुव्वा उडविला. मुलांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून विलास वळवीने २.४० मी. व १.३० मी. संरक्षण आणि आक्रमणामध्ये ४ गुण मिळवले. भरतसिंग वसावेने १.३० मिनिट संरक्षण करताना आक्रमणामध्ये २ गुणांची कमाई केली. कृष्णा बनसोडेने २.५९ मी. संरक्षण केले. आशिष गौतमने नाबाद २.१० आणि १.२० संरक्षण करताना आपल्या धारदार आक्रमणात ८ गुण टिपले. विदर्भ संघाकडून मोहित नेवरेने १.०० मी. संरक्षण केले. शैलेश कोरेटीने १.०० मी. संरक्षण करताना आक्रमणात ६ गुण मिळवले. मुलींच्या सामन्यात प्रतीक्षा बिराजदारने ३.३० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गुण मिळवले. अश्विनी शिंदे हिनेही ३.३० मी. संरक्षण करून ४ गुणांची कमाई केली.  सुषमा चौधरीने ३.२० मी. संरक्षण करून आक्रमणामध्ये ४ गडी बाद केले.  प्रणाली काळेने नाबाद १.१० मी. संरक्षण करून आक्रमणामध्ये १० गुणांची कमाई केली. तन्वी भोसलेने २.४० मी. वेळ नोंदवली.मध्यप्रदेश संघाकडून अक्षरा मालिनी आणि लक्ष्मीने प्रत्येकी एक मिनिटे वेळ नोंदवली. मुलांच्या अन्य सामन्यात तामिळनाडूने चंदीगड वर एक डाव आणि  ३४ गुणांनी विजय संपादन केला. आंध्र प्रदेशने मध्य भारतचा १६ गुणांनी पराभव केला. दिल्ली संघाने हिमाचल प्रदेशवर एक डाव आणि २१ गुणांनी मात केली. मुलींच्या गटात ओडिसाने मध्य भारतचा १ डाव २२ गुण राखून पराभव केला. राजस्थाने आंध्रप्रदेशवर एक डाव आणि १६ गुणांनी विजय संपादन केला.

 थात्तू, पत्रावाला, दानोले, परीट, सोनावने,

 राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा तांबवेकर आणि जमादार यांना सुवर्णपदक     अहिल्यानगर-२४ नोव्हेंबर- सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या सहकार्याने सायकलिंग असोसिएशन ऑफ अहमदनर डिस्ट्रीक्ट आयोजित ५व्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू सुर्या थात्तू (पुणे), मुस्तफा पत्रावाला (ठाणे), पूजा दानोले (कोल्हापूर), श्रावणी परीट (पुणे), मोक्ष सोनावने (नासीक), दानीश जमादार (नासीक), गायत्री तांबवेकर (पुणे) यांनी आपापल्या वयोटात सुवर्णपदक विजेती कामगिरी केली. अहिल्यानगर येथे आज सुरु झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत १९९ सायकलपट्टूंनी सहभाग घेतला. चाँदबीबी महाल बायपास मार्गावर विवध नऊ वयोगटात स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचा उदघाटन समारंभ अहिल्यानगरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि अहमदनर सायकलिंग क्लबचे सर्वेसर्वा गौरव फिरोदीया यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी सायकलिंग फेडरेशन आफ इडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, स्पर्धेचे मुख्य पंच आणि सीएफआयचे निरीक्षक सुदाम रोकडे, मिहीर तिवारी, मुख्य तांत्रिक प्रमुख दिपाली पाटील, शिवछत्रपती  प्रृरितोषीक सन्मानीत मिनाक्षी शिंदे, मिनाक्षी ठाकूर आदी मान्यवर हजर होते. आज झालेल्या सेपर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे- मेन ईलीट – ३८ किमी  टायम ट्रायल सुवर्णपदक  सुर्या थात्तू (पुणे ०.५०.२९.७९) , रौप्यपदक – चिन्मय केवलरमाणी (पुणे ०.५०.३५.७०), कांस्यपदक – सिध्देश पाटील (कोल्हापूर०.५३.००.५५), मेन अंडर २३ – ३८ किमी टाईम ट्रायल –  सुर्णपदक मुस्तफा पत्रावाला (ठाणे ०.५२.५०.२६), विवाण सप्रू (मुबई ०.५३.२४.८९) कांस्यपदक – विरेंद्र सिंह पाटील (पुणे के पी ०.५३.३४.९८) ईलीट वुमेन –  सुर्णपदक पूजा दानोले (कोल्हापूर ०.४७.१३.२०),रौप्यपदक – प्रणीता सोमण (अहिल्यानगर ४७.५६.०९), कांस्यपदक अपूर्वा गोरे (अहिल्यानगर ४९.५१.२३), सब ज्युनिअर बॉईज- १५ किमी टाईम ट्रायल  सुवर्णपदक  – मोक्ष सोनावने, (नासिक ०.२३.०८.१९), रौप्यपदक राज नारामण करमडे (अहिल्यानगर २३.३०.६१) कांस्यपदक – ओंकार गांधले (पुणे केपी -०.२३.४३.३८. सब ज्यनिअर गर्ल्स – १५ किमी टायम ट्रायल – सुवर्ण पदक – श्रावनी परीट  (पुणे २६.०८.७४), रौप्यपदक – निम शुक्ला (मुंबई २६.४६.०२) कांस्यपदक मानसी महाजन (पुणे ०.२६.५२.५४) युथ बॉइज १० किमी टायम ट्रायल – सुवर्ण दानीश जमादार (सांगली ०.१७.११.३२) रौप्यपदक – संस्कार घोरपडे (पुणे ०.१७.१५.६९) कांस्य पदक अनुज गैड (पुणे ०१७.३९.८०) युथ गर्ल्स – १० किमी  टायम ट्रायल सुवर्णपदक गायत्री तांबवेकर (पुणे ०.१९.१४.८६) रौप्यपदक – राजनंदीणी सोमवंशी (पुणे केपी ०.१९.५१.६३) कांस्यपदक अर्नवी सावंत (सातारा ०.२१.०४.६७) 00000

“विधानसभा पराभवावर चिंतन करु – नाना पटोले

नागपुर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. जवळपास सर्वच ठिकाणचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार विजयी घोषित करण्यात आले…

सुंदरराव मोरे महाविद्यालयामध्ये 30 नोव्हेंबररोजी रक्तदान शिबिर

पोलादपूर : शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ,महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे संस्थापक व माजी ग्रामविकास मंत्री कै. प्रभाकर मोरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शनिवार, दि…

विजयी जल्लोषात पोलिसालाच धक्काबुक्की

अकोला : विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. बंडखोरीमुळे झालेल्या मतविभाजनातून भाजपचा बालेकिल्ला ढासळला आहे. निकाल जाहीर होताच जल्लोषात तरुणांनी उन्माद करून चक्क बंदोबस्तातील पोलिसालाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार…

काळभैरव मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

रेवदंडा : येथील हरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या श्री काळभैरव मंदिरात शनिवारी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी जन्मोत्सवाचे कीर्तन व धार्मिक विधी आयोजण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक विद्युत…

कळव्यात विहिरीत तरुणाचा मृतदेह

कळवा : कळवा पूर्वेला असलेल्या शिवशक्तीनगर येथे एका विहिरीत ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. धर्मवीर मार्केटमागील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही…

वणव्यांवरील नियंत्रणाला जनजागृतीची गरज

जव्हार : तालुक्यात अधिकाधिक आदिवासी लोकवस्ती असून, ग्रामीण भागात ती विखुरली आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. या भागात जंगल परिसर अधिक असल्याने हंगामानुसार उपलब्ध होणाऱ्या रानमेव्यापासून येथील नागरिक…

प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार- रामशेठ ठाकूर

पनवेल :आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत,…