Category: रायगड

raigad news and updates

 काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचे धान्य संतप्त ग्रामस्थांनी पकडले

 जरंडी गावातील घटना..   सोयगाव : चार चाकी वाहनाद्वारे  काळ्या बाजारात रेशन चा गहू,तांदूळ विक्रीसाठी घेऊन जाणारे अकरा क्विंटल धान्य संतप्त ग्रामस्थांनी  शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चार चाकी वाहन अडवून जरंडी गावाजवळ पकडले दरम्यान वाहनांच्या मागे पुन्हा तीन मोटारसायकल वरही धान्य आढळून आल्या मुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.. सिल्लोड तालुक्यात काळ्या बाजारात रेशन चे गहू तांदूळ धान्याच्या गोण्या विक्रीसाठी घेऊन जरंडी गावाजवळ संतप्त ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले दरम्यान ग्रामपंचायतने स्थानिक पंचनामा करून उपसरपंच संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील यांनी सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी वाहनांसह तीन गोण्या गहू,सात गोण्या तांदूळ, अंगणवाडी पोषक आहार-दोन गोण्या,एक गोणी ज्वारी असे एकूण अकरा क्विंटल रेशनचे धान्य जरंडी गावातून जप्त केले आहे या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे जरंडी गावाकडून सिल्लोड कडे ओमीनी गाडी क्र-एम एच-४३,व्ही-६२८८ मध्ये व मोटारसायकल क्र-एम एच-२० बी व्ही-००८२,एम एच-२० ए व्ही-९४८२ आणि एम एच-२०,ए यु-९६७९  काही गोण्या दुचाकी वर रंगेहाथ पकडून  अफरोज हमीद शेख,समीर शेख हमीद, मिरज शेख खलील, जुबेर शेख(चारही रा शिवना ता सिल्लोड,)इकबाल तडवी(रा निंबायती ता सोयगाव),शेख नाजीम शेख चांद(रा सोयगाव)व इतर चार अश्या दहा जणांच्या ताब्यातून रंगेहाथ पकडले  दरम्यान सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती देताच घटनास्थळी धाव घेत सदर रेशन चे गहू तांदूळ असे अकरा क्विंटल धान्य  सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तगत केले अद्याप सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

सलग दहाव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट

४३वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खोखो स्पर्धा धाराशिवच्या जितेंद्र वसावेला वीर अभिमन्यू तर सुहानी धोत्रेला जानकी पुरस्कार   अलिगड, – कुमार व मुलींच्या ४३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व  मुलींच्या संघाने सलग दहाव्यांदा विजेतेपद पटकावित  दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस्‌‍ स्टेडियमवर दुहेरी विजेतेपद मिळवताच खेळाडू व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.  कुमार गटाचे हे  १९ वे तर मुलींचे १० वे सलग विजेतेपद आहे. या विजयासह महाराष्ट्राच्या कुमारांचे हे एकूण ३५ वे तर मुलींचे २६ वे राष्ट्रीय अजिंक्यपद आहे. शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दोन्ही गटात ओडिसा संघाला नामवित ही कामगिरी केली. मुलींच्या गटात अश्विनी शिंदेच्या (३.३०, २.३० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने ओडिसावर २४-२० असा ४ गुण व ५.१० मिनिटे राखून ओडिसाचा धुव्वा उडवत विजय मिळवला. मध्यंतरालाच त्यांनी १४-१० अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. यात अश्विनीला तन्वी भोसले (२.१० मि. संरक्षण), स्नेहा लामकाने (१.३० मि. संरक्षण), प्रणाली काळे (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी साथ दिली. त्यानंतरच्या डावात ओडिसाच्या संरक्षकांनी शानदार खेळी करीत लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्राच्या संरक्षक सुहानी ढोरे (१.२० मि. संरक्षण व ६ गुण) व प्राजक्ता बिराजदार यांनी (२ मि. संरक्षण) दुसऱ्या डावात बहारदार खेळी करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सानिका चाफे हिने आपल्या धारदार आक्रमणात पहिल्या डावात व दुसऱ्या डावात प्रत्येकी चार खेळाडू  टिपले. ओडिसाच्या अर्चना प्रधान (२.०० मि. ४ गुण ), लीसा राणी (१.०० मि. ६ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले. मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडीसावर ३३-२९ अशी १.३० मिनिटे राखून मात केली व सलग विजेतेपदाचे दावेदार महाराष्ट्रच असल्याचे दाखवून दिले. मध्यंतराची १८-१४ ही चार गुणांची आघाडीच महाराष्ट्राला विजय मिळवून देऊन गेली. महाराष्ट्राच्या विजयात जितेंद्र वसावे (२.३०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), कृष्णा बनसोडे (१.४०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांच्या अष्टपैलू खेळाचा समावेश आहे. पार्थ देवकते व प्रेम दळवी यांनी प्रत्येकी सहा गडी बाद करीत विजयात जोरदार साथ दिली. ओडीसाकडून बापी मुरमु (२.००, १.२० मि. संरक्षण व २ गुण ), सुनील पात्रा (१.३०, १.०० मि. संरक्षण व ६ गुण ) यांची लढत अपुरी पडली. मुलांचे प्रशिक्षक युवराज जाधव व मुलींचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी विजयानंतर खेळाडूंनी संघभावनेने खेळ केल्याचे सांगितले व यासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी पूर्णपणे पाठीशी असल्याने सर्व सुविधा मिळाल्या व विजय सुकर झाल्याचे स्पष्ट केले. —— सुहानी धोत्रे ‘जानकी’, जितेंद्र वसावे ‘वीर ‘अभिमन्यू’चे मानकरी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू  खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्काराचा जितेंद्र वसावे हा तर सुहानी धोत्रे ही जानकी पुरस्काराची मानकरी ठरली. हे दोघेही धाराशिवचे आहेत. अन्य पुरस्काराचे मानकरी : आक्रमक : प्रेम दळवी (सांगली, महाराष्ट्र), लीसा राणी (ओडीसा), संरक्षक : बापी मुरमु (ओडीसा), तन्वी भोसले (धाराशिव, महाराष्ट्र). —– महाराष्ट्राचे ड्रीम गुणही वसूल यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेपासून ड्रीम गुण देण्यास सुरुवात झाली. एका तुकडीत तीन खेळाडू असतात. या तिघांनी मिळून चार मिनिटे  संरक्षण केल्यास एक ड्रीम गुण मिळतो.  त्यानंतर प्रत्येक मिनिटाला ती तुकडी बाद होईपर्यंत एक ड्रीम गुण मिळतो. महाराष्ट्राच्या मुलांनी १ व मुलींनी ४ गुण वसूल केले. ओडीसाच्या मुलांनीही एक गुण कमावला. ——–…

हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री

झारखंड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रांचीमधील मोरहाबादी मैदानात झालेल्या या शपथविधीला इंडिया आघाडीचे बडे नेतेही उपस्थित होते. यावेळी राज्यपाल संतोष गंगवार…

मणिपूरमधल्या ६ जणांच्या हत्येने देश हादरला

मणिपूर : मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा निष्पाप जणांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. त्यातील तिघांच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती इतकी भयावह आहे की ती ऐकून अनेकाचा थरकाप उडाला…

महाराष्ट्राची घोडदौड; दोन्ही संघांचा बाद फेरीत प्रवेश

 कुमार व मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा अलिगड : महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघाने 43व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश केला आहे. बाद फेरीत महाराष्ट्राच्या मुली छत्तीसगडबरोबर तर मुले कोल्हापूरबरोबर लढतील. अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात भरतसिंग वसावेने (2.10 मि. 4 गुण) व आशिश गौतम (2.40, 1.40 मिनिटे व 4 गुण) यांच्या अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राच्या मुलांनी पुद्देचरीवर 39-24 असा एक डाव राखून 15 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. जितेंद्र वसावे व सोत्या वळवी यांनी आपल्या धारदार आक्रमणात प्रत्येकी 8 गडी बाद करीत त्यांना साथ दिली. पुद्देचरीकडून स्टेफनन 6 गडी बाद केले. महाराष्ट्राच्या मुलींच्या शेवटच्या साखळी सामन्यात यजमान उत्तरप्रदेशचा 28-5 असा एक डाव 23 गुणांनी धुव्वा उडविला. स्नेहा लामकाने (3.40 मिनिटे नाबाद संरक्षण), प्रतीक्षा बिराजदार (3.10 मि. व 6 गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उत्तरप्रदेशच्या मानसीने (1.30 मिनिटे व 2 गुण) अष्टपैलू खेळी करीत लढत दिली. बाद फेरीचे सामने: मुलींचे: महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड मुलांचे: महाराष्ट्र विरुद्ध कोल्हापूर कोल्हापूर व विदर्भ संघांचा सुध्दा बाद फेरीत प्रवेश कोल्हापूरच्या मुले व मुली आणि विदर्भच्या मुले व मुलींच्या संघानेही बाद फेरी गाठली आहे. मुलीमध्ये कोल्हापूर विरुद्ध विदर्भ आणि मुलांमध्ये कोल्हापूर विरुद्ध महाराष्ट्र आणि विदर्भ विरुद्ध ओडीसा असे बाद फेरीचे सामने होतील.

मुंबईवर २६ नोव्हंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या पोलीस आणि सैन्यातील वीरांना पोलीस आयुक्तालय येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या शौर्याला अभिवादन करताना भाजपा नेते…

ठाणे जिल्हा गारेगार!

 बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद   बदलापूरः गेल्या काही दिवसांपासून निरभ्र आकाश आणि रात्री तापमानात होत असलेली घट यामुळे ठाणे जिल्हा गारेगार झाला आहे. दिवसा येणारी कोरडी हवा आणि आर्द्रता…

 कोल्हापूरच्या मुले व मुली संघाची विजयी सलामी

 कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा   अलिगड, दि.२६ नोव्हेंबर – अलिगड (उत्तर प्रदेश) येथील महाराणी अहिल्यादेवी होळकर क्रीडांगणावर सुरू असलेल्या ४३व्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेत मंगळवारी…

खरेदी विक्री संघात धान्य देण्यासाठी, शेतकऱ्यांचा उघड्या मैदानात मुक्काम.

 व्यापाऱ्यांचे धान्याला प्राधान्य दिल्याने गदारोळ   राजीव चंदने मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांचे धान्य खरेदी विक्री संघा मार्फत हमी भावाने खरेदी होत असल्याने त्याचा टोकन घेण्यासाठी आपला नंबर लागेल की नाही…

तेलंगणा सरकारने अदानींची १०० कोटींची देणगी नाकारली

तेलंगणा : उद्योगपती गौतम अदानी यांनी देऊ केलेली १०० कोटी रुपयांची देणगी तेलंगणा सरकारने नाकारली आहे. गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात…