Category: रायगड

raigad news and updates

मंगळवारी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे निदर्शने

पनवेल : बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जागतिक मानवाधिकार दिनादिवशी अर्थात मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सकल हिंदू समाज रायगडच्यावतीने पनवेलमध्ये मानवी साखळी द्वारे निदर्शने करण्यात येणार आहे. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत…

डॉ.तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्यान महोत्सव संपन्न

– तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने ध्यान महोत्सवाचे आयोजन पनवेल : राज भंडारी ‘हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पनवेल येथे…

 शाबाज व राझमीमध्ये फायनल

 महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर 2024 मुंबई : शाबाज खानने सर्वोत्तम खेळाच्या जोरावर सुमेर मगोचे आव्हान 4-3 (85-32, 64-32, 25-68, 42-74, 70-62, 57-60, 78-41) असे मोडून काढताना महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. फायनलमध्ये त्याच्यासमोर रायन राझमीचे आव्हान आहे. मलबार हिल क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसऱ्यात सामन्यात, राझमीने अनुभवी क्यूईस्ट आदित्य मेहताचा 4-2 (15-68, 76-28, 66-13, 70-53, 48-73, 71-33) असा पराभव केला. निकाल: स्नूकर 15-रेड – उपांत्य फेरी: शाबाज खान विजयी वि. सुमेर मगो 4-3(85(83)-32, 64-32, 25-68, 42-74, 70-62, 57-60, 78-41); रायन राझमी विजयी वि. आदित्य मेहता ४-२(१५-६८, ७६-२८, ६६-१३, ७०-५३, ४८-७३(७३), ७१-३३). 0000

जरंडी गाव राज्यात रोल मोडेल करणार – डॉ. विकास मीना

सोयगाव : जरंडीचा उत्कृष्ट विकास आहे त्यामुळे जरंडी गाव आता सोलार वीज जोडणी करण्यासाठी प्रस्ताव पाठवून जरंडी गावात आता जिल्हा परिषदेच्या वतीने सोलार वीज पुरविण्यात येईल व गाव राज्यात रोल…

ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा सन्मान 

 बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, तसेच राज्यातील विविध भागात शास्त्रीय संगीत आणि भजन संगीतचा प्रचार व प्रसार करत सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आपले आयुष्य वेचणारे ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने सहस्रचंद्र सोहळा समारंभपूर्वक संपन्न झाला. विशेषत्वाने बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हृद्य सोहळा पार पडला. धार्मिक आणि सामाजिक समारंभ असलेल्या या सोहळ्यात  ह .भ.प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे पूजन करण्यात आले. त्यांनतर जवळपास ५० किलो पैशाची नाणी, मिठाई आणि सुकामेवा या साहित्यातून तुला करण्यात आली. विशेष म्हणजे  बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मातोश्री पार्वती यांचा सहा वर्षांपूर्वी सहस्रचंद्र सोहळा झाला होता. त्यानंतर हा सन्मान निवृत्तीबुवा चौधरी यांना मिळाला. त्यामुळे निवृत्तीबुवा चौधरी यांच्या रूपाने भजन परंपरेचा अलौकिक सत्कार या निमिताने झाला. ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे झालेल्या या सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.  मूळचे पनवेल तालुक्यातील रांजणपाडा येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांनी आपल्या अध्यात्मिक वाणीतून हजारो शिष्य घडविले. संगीत क्षेत्राच्या उत्थानासाठी त्यांनी ६० वर्षापेक्षा जास्त काळ अविरतपणे काम केले आहे. आजही त्यांचे हे कार्य पुढे सुरूच आहे. त्यांच्या शिकवणीतून तयार झालेले शिष्यांचीही या क्षेत्रात नाव उज्वल केले आहे.  ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे कार्य समाजाला नेहमी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले आहे. त्या अनुषंगाने त्यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या देखरेखीत हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंददायी भावनेतून संपन्न झाला. दरम्यान या सोहळ्यात निवृत्तीबुवा चौधरी यांचे सुश्राव्य भजनही झाले. त्यानंतर रायगड भूषण पं. उमेश चौधरी, शिवमाला पाटील, श्रुती पाटील यांचे अभंग गायन झाले. त्यांना नादब्रम्ह साधना परिवाराने साथ दिली.

राजकीय नेत्यांकडून नीतिमूल्ये आणि नैतिकतेचा कडेलोट

माथेरान : दिवसेंदिवस सर्वच ठिकाणी राजकारणाने वेगळी दिशा घेतली असून राजकारणाची परिभाषाच पूर्णपणे बदलून निव्वळ आर्थिक  लोभापोटी दुसऱ्या पक्षाची तळी उचलण्याची कामगिरी नेत्यांसह कार्यकर्ते सुध्दा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने करत असल्यामुळे…

माथेरान मध्ये दिव्यांग दिन उत्साहात साजरा

माथेरान : माथेरान मध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दिव्यांग दिनानिमित्त माथेरान नगर परिषदेतर्फे  दिनांक बांधवांना आर्थिक सहाय्य वाटप बुधवारी कम्युनिटी सेंटर येथे सायंकाळी ०४-०० वाजता कार्यक्षम मुख्याधिकारी…

माथेरान मध्ये महाअभिषेक व भंडाऱ्याचे आयोजन

माथेरान : समस्त माथेरान करांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीपिसरनाथ महाराज मंदिरात दि.३ रोजी महाअभिषेक व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी भाविकांनी गर्दी करून ग्रामदैवत श्री पिसारनाथ महाराजांचे दर्शन घेतले आणि भंडार्याचा…

आचरे गावची ‘ गावपळण ‘१५ डिसेंबरला…!

सिंधुदुर्ग :बहुचर्चित आणि ग्रामस्थ ज्याची आतुरतेनं वाट पाहतात अशी संस्थान आचरे गावची ‘ गावपळण ‘ आता १५ डिसेंबरला होणार आहे. काल देवदिवाळीच्या दिवशी रामेश्वराच्या कौल प्रसादाने ही तारीख ठरली.दर चार-पाच…

सिंधुदुर्ग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तोरसकर यांची बिनविरोध निवड..!

सिंधुदूर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या प्रतिनिधीपदी गणेश जेठे यांचीही बिनविरोध निवड झाली. संघाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे:…