Category: रायगड

raigad news and updates

सिंधुदुर्गात गेल्या सात महिन्यात आढळले कुष्ट रोगाचे २९ रुंग्ण…!

जिल्हा ‘कुष्टरोग मुक्ती’ची पुन्हा नव्याने घोषणा….!   सिंधुदुर्गनगरी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेम्बर ,२४,या ७ महिन्यात तब्बल २९ कुष्टरोगाचे रुंग्ण आढळले आहेत. यामध्ये २१ पुरुष,७ महिला व एक लहान मूल…

हिंदी व गणित विषयांकरिता सहाय्यक शिक्षक पदासाठी उमेदवारांनी अर्ज करावे- समाधान इंगळे

अशोक गायकवाड रायगड : सामाजिक न्याय विभागांतर्गत रायगड जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासीशाळा, जावळी, ता.माणगांव येथे शासकीय निवासी शाळा कार्यान्वीत आहे. येथे इयत्ता ६ वी ते १० वी साठी तात्पुरत्या स्वरुपात मासिका तत्वावर ६ महिने किंवा नियमित शिक्षक हजर होईपर्यंत हिंदी व गणित विषयांकरिता मासिक तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी (बायोडाटा, रिजूम) आवश्यक शैक्षणिक अर्हताचे कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण समाधान इंगळे यांनी केले आहे.* याकरिता सहाय्यक शिक्षक (मासिक तत्वावर) शैक्षणिक पात्रता-BA.B.Ed, विषय-हिंदी, आवश्यक पद संख्या ०१. सहाय्यक शिक्षक (मासिका तत्वावर), शैक्षणिक पात्रता-B.Sc. B.Ed, विषय-गणित, आवश्यक पद संख्या ०१.यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे : सदर पदावर घडयाळी तासाप्रमाणे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या मंजूर दरानुसार मानधन देय राहील. एकत्रित मानधना व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. उमेदवारांची निवड करताना अनुभव तसेच TET परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्रधान्य देण्यात येईल. शैक्षणिक पात्रता,अनुभव इ.अहर्ता किमान असून,किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही. सेवा प्रवेश नियम आणि शासनाकडून तदनंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. सदर पदे मानधन/तासिका तत्वावर असून,भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार,पदे कमी जास्ती करणे,भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे ,सदरील पदे कधीही कोणताही कारण न देता समाप्त करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड,अलिबागयांनी राखून ठेवलेले आहेत. पात्र व इछुक उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासी शाळा, जावळी, ता.माणगांव येथे लवकरात लवकर सादर करावेत.

अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात जगत्पुरिया मुख्य अतिथी

संभाजीनगर : विख्यात कवी, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार डी. बी. जगत्पुरिया हे नागपूर येथे 28 व 29 डिसेंबरला होणार्‍या अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात मुख्य अतिथी म्हणून सन्मानित होणार आहेत. कथाकार सुरेश…

माथेरानच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार पद्मश्री डॉक्टर अझीम काझी यांचे आश्वासन

माथेरान : माथेरान मध्ये काल अंजुमन इस्लाम या संस्थेचे चेअरमन तसेच पद्मश्री डॉक्टर जहीर काझी भेट दिली होती यावेळी माथेरान मध्ये असलेल्या संस्थेच्या इमारतीमध्ये लवकरच येतील स्थानिकांसाठी अद्यावत शाळा व…

बॅलेट पेपरवर मतदानासाठी जनआंदोलन उभारणार- पटोले

मारकडवाडी : भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात…

ध्वजदिनी सैनिकांसाठी भरघोस निधी जमा करावा-संदेश शिर्के

अशोक गायकवाड रायगड :देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वज दिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचून सैनिकांसाठी…

बोरीवली पूर्व येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपविभागसंघटक सौ. रेखा शांताराम बोऱ्हाडे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कृष्णराव अर्जुन केळुसकर लिखित छत्रपती शिवाजी महाराज हा ग्रंथ त्यांना सस्नेह भेट देतांना ज्येष्ठ…

अलिबाग- ठाणे मार्गावर ई- शिवाई सेवा सुरु

अलिबाग : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. विजेवर चालणाऱ्या या बसची पहिली सेवा अलिबाग-ठाणे या मार्गावर रविवारी सुरू झाली आहे. अलिबागमध्ये चार्जिंग युनिट नसल्याने या बस…

अलिबाग येथे रविवारी पत्रकारांसाठी कार्यशाळा

अलिबाग : अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलाईझर यांच्या सहकार्याने रविवारी अलिबाग येथे रायगड जिल्ह्यातील पत्रकारांसठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे – अलिबाग येथे…

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्वाचा – रामशेठ ठाकूर

पनवेल : ज्या ज्या वेळी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन त्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्याजवळ सुरु…