Category: रायगड

raigad news and updates

रायगड लोकसभा मतदारसंघात पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी  पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांना अभिप्रेत लोकशाहीसाठी उत्तरदायी-धिरेंद्रमनी त्रिवेदी

 अशोक गायकवाड अलिबाग : संविधानकर्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांना अभिप्रेत लोकशाही साठी निवडणूक यंत्रणेतील आपण त्यांच्याप्रती उत्तरदायी आहोत, असे मत भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमनी त्रिवेदी…

माथेरानमध्ये पाणी पुरवठा समाधानकारक

जल प्राधिकरणाच्या पाणी नियोजनामुळे माथेरान : माथेरान मध्ये मागील काही दिवसांपासून गर्मीने डोके वर काढले असताना माथेरानला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत या तलावात असणारे पाणी माथेरान पर्यटन नगरीला पिण्याकरता पुरवठा केला जातो व हे पाणी कमी पडत असल्याने नेरळ येथून पंपिंग द्वारे माथेरानला जादाचा पाणीपुरवठा करण्यात येतो त्यामुळेच या पर्यटन हंगामामध्ये माथेरान कराना पाणी टंचाईस सामोरे तर जावे लागणार नाही ना याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे परंतु जल प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सूनियोजित नियोजनामुळे पाणीटंचाई सध्या तरी जाणवत नसल्याने सर्वत्र समाधान होत आहे. काही वर्षांपूर्वी माथेरान मध्ये या तलावातून पूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे व एन पर्यटन हंगामामध्ये येथे भीषण पाणीटंचाई सामोरे जावे लागत असेल परंतु नेरळ येथून माथेरान करतात जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर माथेरानकरांनी पाणीटंचाईपासून मुक्तता झाली होती परंतु मे महिन्याच्या शेवट शेवटला मात्र पाणीटंचाई सामोरे जावे लागते परंतु यावर्षी नेरळ येथून होणार पाणीपुरवठा समाधानकारक असल्याने  व शालेय मध्ये मुबलक पाणीसाठा सध्या  उपलब्ध असल्याने  माथेरानकरांना अजून तरी पाणी टंचाईस सामोरे जावे लागलेले नाही परंतु जल प्राधिकरणाने नेरळ येथून होणाऱ्या पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या  पंपांची दुरुस्ती योग्य प्रकारे करून ठेवल्यास मे महिन्यामध्ये होणाऱ्या पाणीटंचाई पासून माथेरान करांना दिलासा निश्चित मिळणार आहे. माथेरान मध्ये मे महिन्यामध्ये पूर्वी होणारी पर्यटकांची गर्दी मागील काही वर्षांमध्ये कमी झाल्याने पाण्याचा वापर  ही कमी झाला आहे  त्यामुळे या दिवसांमध्ये माथेरान करांना पाणीटंचाई जाणवत नाही परंतु काही भागांमध्ये मात्र पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत असतात जल प्राधिकरणाने दोन महिने आधीपासूनच प्रत्येक सोमवार व मंगळवार या दोन दिवशी विविध भागात पाणी पुरवठा बंद केला असल्याने सध्या माथेरान मधील तलावात पाणी उपलब्ध आहे त्यामुळेच येणाऱ्या पर्यटन हंगामात माथेरानकरांना पर्यटन हंगाम असाच राहिला तर पाणी टंचाई सामोरे जावे लागणार नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्याधिकारी वैभव गारवे यांचे अभिवादन

अशोक गायकवाड कर्जत : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी रविवारी,(दि.१४) नगरपरिषद कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

माथेरान ई-रिक्षापुढे विघ्नांची मालिका

माथेरान : माथेरान मध्ये अनेक विघ्ने पार पडत शासनाने ई रिक्षास परवानगी दिली होती परंतु मागील काही दिवसांपासून या रिक्षांच्या पाठीमाघे साडेसाती सुरू झाली असून सात रिक्षा चालविण्यास परवानगी असताना…

मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामधील जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामध्ये…

सोशल मीडियावर विशेष लक्ष द्या – धिरेंद्रमणी त्रिपाठी

अशोक गायकवाड रायगड : पेडन्यूज बाबत अधिक दक्ष रहावे. उमेदवाराच्या प्रचारावर आणि प्रसिद्धी साहित्यावर होणारा खर्च, खर्च पथकाला विहित नमुन्यात सादर करावा तसेच सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश लोकसभा…

विविध उपक्रमांचा मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी चांगला उपयोग-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. पथनाट्य, प्रभात फेरी आदी द्वारे नागरिकांमध्ये मतदानासाठी प्रेरित केले जात आहे, याचा जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले. ‘वॉक फॉर वोट रॅली’चा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. ‘वॉक फॉर वोट’ रॅलीसाठी जिल्हाधिकारी जावळे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी निर्मला कुचिक, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे,अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील, अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका वैशाली पाटील यांनी लोकशाहीचा उत्सव पोवाडा सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून आज सकाळी आठ वाजता सुरु झालेली रॅली त्यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय येथून. ब्राह्मण आळी, महावीर चौक बालाजी मंदिर नाका, बीच रोड, एसबीआय बँक या मार्गाने शहरातील विविध भागातून नेऊन जिल्हाधिकारी येथे समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीमध्ये मतदानाबाबत प्रचारगीते, चित्ररथ, फलक याद्वारे घोषणा देत व नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आली. आजच्या रॅलीसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका यासह अधिकारी कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी सहभागी महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता परिसरात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर भेट देऊन मोठ्या प्रमाणात सेल्फी घेत होत्या. यातून जिल्ह्यातील ७ मे रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत मतदान करण्याचा संकल्पच दिसून येत होता.

कर्जत मध्ये नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन

कर्जत : भूमापन दिनानिमित्ताने भूमि अभिलेख विभाग, कर्जत उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करणेत आले. कर्जत उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात बुधवार, (दि.१० एप्रिल २०२४) रोजी भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला आहे. मोजणी साहित्य पूजन करणेत आले व यामध्ये प्लेन टेबल, ईटीएस मशीन, आत्याधुनिक रोवर मशीन इ. साहित्य पूजन करणेत आले. लोकांना, व शेतकरी यांना मोजणी साहित्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. भूमापन दिनानिमित्ताने भूमि अभिलेख विभाग, कर्जत उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करणेत आले. याप्रसंगी मुख्यालय सहाय्यक श्रीमती उज्वला अहिरे, शिरस्तेदार शैलेश जाधव, निमतानदार नंदकिशोर कोळी, छाननि लिपिक निलेश हराळ, भूकरमापक दत्तात्रय पाटील, कृष्णा गायकवाड, ऋषिकेश नाईक, यश जाधव, अण्णासाहेब सोमवशी, संजय गायकवाड, श्रीमती स्मिता भोसले , दुरुस्ती लिपिक दत्तात्रय कदम, कनिष्ठ लिपिक अश्विनी पोळ, नगर भूमापन लिपिक अपेक्षा भोईर, दप्तरबंद अविनाश पडवळ व इतर कर्मचारी तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. भूमि अभिलेख विभागाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. १० एप्रिल १८०२ रोजी त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात ब्रिटिश काळात झालेली होती. कारण तेव्हापासून १० एप्रिल भूमापन दिन म्हणून ओळखला जातो. शासनाने कर्जत कार्यालयास पहिल्या ३ व आता ५ रोवर मशीन पुरविले असून आता सर्व मोजणी कामकाज रोवर मशीनद्वारे होणार असून अत्यंत अचूक व गतीमान कामकाज होणार आहे. तसेच लवकरच कर्जत कार्यालयात ई मोजनी व्हर्जन-२ प्रणाली लागू होणार आहे. त्यात जनतेला आपला मोजणी अर्ज आपल्या घरून मोबाईलवरुन सुद्धा मोजणी अर्ज दाखल करता येणार असून ‘क’ प्रत सुद्धा अर्जदार यांना ई-मेलवर मिळणार आहे. याबाबत उपसंचालक भूमि अभिलेख कोकण प्रदेश, मुंबई जयंत निकम यांनी व्हर्जन-२ बाबत सतत आढावा घेवून तात्काळ ते जनतेला वापरासाठी उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सचिन इंगळी यांनी मार्गदर्शन केले आहे. उप अधीक्षक भूमि अभिलेख, कर्जत नितीन आटाळे यांनीही मार्गदर्शन करीत शंकांचे निरसन केले.

आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्नशील-किशन जावळे

अलिबाग : आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या जनजागृती कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे बोलत होते. जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोली भाषेतील पथ नाट्याद्वारे मतदार जन जागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सिद्धेश्वर बु.येथे या मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्याने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हा पथदर्शी उपक्रम राबविला जात आहे. आदिवासी समाजाची युवक आणि प्राथमिक शिक्षक हे पथनाट्य सादर करीत आहेत. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक सिद्धेश्वर बु. येथे आयोजित या कार्यक्रमासाठी निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसीलदार उत्तम कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, आदिवासी वाड्या वस्त्या, गावे येथील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र मतदार दूत नेमण्यात येणार आहे. या दुता मार्फत गावातील प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्वाना भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीड पणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केले. आदिवासी बहुल गावामधील मतदार काम व नोकरीसाठी कुठल्या आस्थापनांमध्ये जात असतील तरी तेथे सुट्टी देण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. सर्व आदिवासी मतदारांना भर पगारी सुट्टी किंवा सवलत देण्याबाबत कळविण्यात येईल असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. या पथनाट्याचे लेखन /दिग्दर्शक राजू लहू बांगारे यांनी केले आहे. तसेच गीतकार दामोदर शिद, वादक सतिश खाणेकर आहेत. या पथनाट्यात राजू बांगारे, दामोदर शिद, ज्ञानेश्वर शिद, गणपत पारधी, साई बांगारे, श्रेयश वारगुडे, वेदांत शिंदे यांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले. जिल्ह्यातील ११ तालुक्यातील वाडया, वस्ती, गावामध्ये पथनाट्य आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. मतदानाच्या जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाबद्दल त्यांनी माहिती दिली.