Category: रायगड

raigad news and updates

हिंदू नववर्ष स्वागतची शोभयात्रा

तिकीट चेकिंग परिवार मुंबईतर्फे माथेरान : नेहमीच कामाच्या तणावातून सुद्धा आपली धार्मिक परंपरा कायमस्वरूप अबाधित ठेवून सण हा एखादा उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी मध्य रेल्वेत मुंबई येतील तिकीट चेकिंग परिवारतर्फे गुडीपाडव्याच्या…

निवडणुकीतील आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडा-किशन जावळे

अशोक गायकवाड अलिबाग : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत ३२-रायगड…

माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा ; शुभम रांजाणे टॅटू स्पर्धेत द्वितीय !

पुणे येथे टॅटू स्पर्धा संपन्न माथेरान : पुणे येथील खर्डी याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या टॅटू स्पर्धेत माथेरानच्या शुभम गणपत रांजाणे याने द्वितीय क्रमांक पटकावला असून माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला…

कर्जत मतदार संघाच्या विकासपुरुषास मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

माथेरान : कर्जत खालापूर मतदार संघातील असंख्य विकास कामे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आपल्या मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांची उकल करणारा आमचा आवडता मित्र, आमदार महेंद्र थोरवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खरोखरच आनंद वाटत आहे असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुंबईत एका छोटेखानी कार्यक्रमात आज दि.६ रोजी कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत या निष्ठावंत आमदारावर स्तुतीसुमने उधळली. एक धीरोदात्त असा हा लढवय्या आमदार आमचा सहकारी असल्याचा आम्हाला आनंद होत असून जवळपास एक हजार कोटी रुपयांची विकास कामे थोरवे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहेत असेही शिंदेंनी स्पष्ट केले.यावेळी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले,मंगेश चिवटे आणि इत्तर आमदार  उपस्थित होते.

निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे-जिल्हाधिकारी किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचनाजिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप भरत वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, तहसिलदार उमाकांत कडनोर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. तसेच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी समाजाचे मतदान वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. आदिवासी पाडे, वाड्या,वस्ती येथे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. जे रोजंदारी जाणारे मतदार आहेत त्यांच्या आस्थापनाशी संपर्क साधून भर पगारी सुट्टी देणे शक्य आहे का हे तपासावे. तसेच जेथे सुट्टी देणे शक्य नसेल त्या ठिकाणी दोन तासाची सवलत देण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच या मतदारांचे पहिल्या सत्रात मतदान घेण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच निवडणूक यंत्रणा यांनी दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्ह्यातील अनेक मतदार नोकरीं धंद्या निमित्त बाहेरच्या जिल्ह्यात गेले आहेत. परंतु त्यांचे नाव मतदार यादीत आहे. त्या सर्व मतदारांना मतदार चिट्ठीचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी सर्व यंत्रणेला दिल्या आहेत.

ज्येष्ठ निरुपणकार परमपूज्य तीर्थस्वरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे शुभाशिर्वाद घेतले.

मतदान यंत्रांची ७ विधानसभा संघनिहाय पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ३२ रायगड आणि ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील ७ विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार ई व्ही एम हीव्हीपॅट यंत्राची प्रथम सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. ही प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पध्दतीन ही सरमिसळ करण्यात आली.जिल्ह्यातील मतदार संख्येच्या प्रमाणानुसार २ हजार ७१९ मतदान केंद्र आहेत. सध्या रायगड जिल्ह्यासाठी ६ हजार ७८० बॅलेट युनिट, ३ हजार ७७४ कंट्रोल युनिट तर ३ हजार ९५२ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राच्या १३८ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट वाटप करण्यात येणार आहे. तर १४५ टक्के व्हीव्हीपॅट वाटप करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदार संघनिहाय मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन देण्यात येणार आहे. सध्या ही यंत्र जिल्हास्तरावर स्ट्रॉँगरूम मध्ये आहेत.

राकेश कोकळे यांच्या पाठपुराव्यामुळे खड्डे भरण्यास सुरुवात

माथेरान : एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते परंतु त्यातील काही निकृष्ट दर्जाच्या ब्लॉक्समुळे रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक पर्यटक पडून जखमी झाले होते तर याच रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या साधनांना देखील त्रासदायक बनले होते याकामी येथील जागरूक नागरिक सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता अखेरीस त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या रस्त्यावर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत माती आणि खडी मध्ये हे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. माथेरान मध्ये विकास कामे होत असताना ती कशा पद्धतीने पूर्ण केली जात आहेत ठेकेदार कामाला दर्जा देत आहे की नाही याबाबत नागरिकांनी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे अनेकदा ठेकेदार कामांमध्ये चालढकल करत असतात कामे लवकरच आटोपून बिले काढण्याची घाई असल्यामुळे कामे तकलादू होत असतात यासाठी नागरिकांनी होत असलेल्या कामांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे राकेश कोकळे यांचे म्हणणे आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रायगड जिल्ह्यातील पेझारी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पाटील कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

माथेरानमध्ये कार्यान्वित होणाऱ्या प्रकल्पात राजकीय म्होरक्यांची विरोधकांसह चंगळ

माथेरान : माथेरानसारख्या या दुर्गम भागात कधी नव्हे ती विकास कामे मागील सहा ते सात वर्षांपासून प्रत्यक्षात मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु विकास तेथे विरोध हे गणितच असल्याने…