Category: रायगड

raigad news and updates

98 हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन

रायगड जिल्ह्यात खरिप हंगामात अलिबागः रायगड जिल्ह्यात येत्या खरिप हंगामात 98 हजार 487 हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.  3 हजार 23 हेक्टरवर नाचणीची लागवड होणार आहे.  यंदाच्या खरिप हंगामात एकूण 1 लाख 1 हजार 510 हेक्टर क्षेत्रावर  पिकांची लागवड करण्यात येणार आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 400 हेक्टर जास्त भात  लागवडीचे  नियोजन  नयोजन जिल्ह्याच्या कृषी विभागाने केले आहे. रायगड जिल्हा   भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे शेतीक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे देखील शेतजमीन नापिक  होत  आहे. शेती परवडत नाही म्हणून शेतकरी शेती करत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस भाप लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतकरण्यासाठी प्रात्साहन देण्या करिता कृषिविभाग प्रयत्न करत असतो. यंदा देखील कृषिविभागाने भात लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 400 हेक्टर जास्त क्षेत्रावर भात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी 89 हजार 463 हेक्टरवर भातपिकाची लागवड झाली होती. यावर्षी सुमारे 400 हेक्टरने भाताचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यात 13 हजार हेक्टर, मुरुड 3 हजार 234 हेक्टर, पेण तालुक्यात 11 हजार 553 हेक्टर, खालापूर तालुक्यात 2 हजार 852 हेक्टर, पनवेल 8 हजार 705 हेक्टर, कर्जत तालुक्यात 9 हजार 110 हेक्टर, उरण तालुक्यात 2 हजार 436 हेक्टर, माणगाव तालुक्यात 11 हजार 526 हेक्टर, तळा तालुक्यात  2 हजार 120 हेक्टर, रोहा तालुक्यात 10 हजार 645 हेक्टर, सुधागड-पाली तालुक्यात 5 हजार 420 हेक्टर, महाड तालुक्यात 10 हजार 588 हेक्टर, पोलादपूर 3 हजार 235 हेक्टर, म्हसळा तालुक्यात 2 हजार 460 हेक्टर, श्रीवर्धन तालुक्यात 1 हजार 603 हेक्टर असे 98 हजार 487 हेक्टवर भात पिकाचे नियोजन आहे. रायगड जिल्ह्यातील यंदा खरिप हंगामात 3 हजार 23 हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यचे नियोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी 2 हजार 761 हेक्टरवर नाचणी पिकाची लागवड झाली होती. यंदा  अलिबाग तालुक्यात 85 हेक्टर, पेण तालुक्यात 175 हेक्टर, खालापूर तालुक्यात 45 हेक्टर, पनवेल 40 हेक्टर, कर्जत तालुक्यात 125 हेक्टर, माणगाव तालुक्यात 868 हेक्टर, रोहा तालुक्यात 315 हेक्टर, तळा तालुक्यात 200 हेक्टर, सुधागड-पाली तालुक्यात 250 हेक्टर, महाड तालुक्यात 210 हेक्टर, पोलादपूर 270 हेक्टर, म्हसळा तालुक्यात 348 हेक्टर, श्रीवर्धन तालुक्यात 92 हेक्टर असे 3 हजार 23 हेक्टरवर नाचणी पिकाचे नियोजन आहे.

माथेरानच्या जान्हवी शिंदेला सीबीएसई दहावीच्या परीक्षेत घवघवीत

माथेरान : माथेरानच्या जान्हवी सुरेश शिंदे हिने सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. जान्हवीने 94.96 टक्के गुण प्राप्त केले असून तिने ( मुंबई )परेल येथील सोशल सर्व्हिस लीग या शाळेतुन मार्च मध्ये दिल्लीच्या सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला.  शिक्षिका मिस पद्मा, मिस भूमी लालन, मिस मीना मकवाना , मिस ताहीरा, मिस जरीन या  शिक्षकांनी उत्तम रित्या अभ्यास करून घेतल्याने इतके गुण प्राप्त करू शकले अशी भावना जान्हवी हिने व्यक्त केली व डॉक्टर बनण्यासाठी भरपूर मेहनत घेणार असल्याचे तिने सांगितले  जान्हवीचे पालक  सुरेश व अंकिता शिंदे यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की आम्ही तिच्यावर अभ्यासाचे कोणतेही दडपण येऊ दिले नाही मोठ्या अपेक्षा लादल्या नाहीत तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. प्रा गवाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेंट झेव्हिएर्स शाळेचे शिक्षक योगेश जाधव, मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला अध्यक्षा प्रतिभा घावरे  , कुलदीप जाधव, वर्ष्या शिंदे , सुहासिनी दाभेकर यांनी जान्हवीचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

कर्जतमध्ये मतदानावर पावसाचे विघ्न अजित नैराळे, डॉ. शीतल रसाळ, आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया संपन्न अशोक गायकवाड कर्जत : देशाच्या १८व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू आहे. मावळ मतदारसंघात ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवार,( दि. १३ मे )रोजी पार पडले. यामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३.३० मिनिटांच्या दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सायंकाळी बाहेर पडणारा मतदार पाऊसामुळे अडकून पडला. दरम्यान, पावसाच्या विघ्नामुळे मतदानाच्या टक्क्यांवर देखील परिणाम झाला आहे.ही निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या उत्तम अशा सहकार्याने पार पडली. मावळ मतदारसंघात गेले काही दिवस प्रचाराच्या तोफा धडधडत होत्या. अशात दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने असल्याने लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अखेर सोमवार,(दि. १३ मे) रोजी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तर शहरी भागात साधारण ११ नंतर तुरळक मतदार दिसत होते. ११ नंतर उन्हाचा तडाखा बसत असला तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. तालुक्यातील किरवली, हलिवली,कर्जत दहीवली, कशेळे, धामोते, नेरळ दहीवली, कोठिंबे आदी भागात दुपारी देखील मतदार गर्दी करून होते. तर धामोते, कर्जत दहीवली येथील मतदानकेंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकार वगळता बाकी ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले. तसेच नेरळ येथील ८१ क्रमांक आनंदवाडी केंद्रावर दिव्यांगासाठी विशेष केंद्र तयार करण्यात आले होते. दरम्यान, १८९ कर्जत मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.१५ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत १४.२७ %, दुपारी १ वाजेपर्यंत २९.४७ %, दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.०३% तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान पार पडले. अशात दुपारी ३.३० वाजता अवकाळी पावसाने कर्जत तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे ऊन कमी झाल्यावर बाहेर पडण्यासाठी थांबलेला मतदार अडकून पडला. साहजिकच याचा फटका हा उमेदवारांना बसणार आहे. मावळ मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य सोमवार, दि.१३ मे) रोजी मतपेटीत बंद झाले आहे. येत्या ४ जून रोजी निकाल असणार आहे. तेव्हा या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात आले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे दीड हजार मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांना पथक निहाय एकूण १ हजार १७ बॅलेट युनिट, ३४९ कंट्रोल युनिट आणि ३४९ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप केले होते. ही प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी  विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्तम अशा सहकार्याने पार पडली.

पावसाळ्यापूर्वी दूषित पाणी स्त्रोतांचे शुध्दीकरण करणार-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य तसेच पाणी व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची जैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत दूषित आढळणाऱ्या पाणी स्त्रोतांचे शुध्दीकरण करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली. दूषित पाणी प्यायल्यामुळे अतिसार, कॉलरा, कावीळ, विषमज्वर तसेच अन्य साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य तसेच पाणी व स्वच्छता विभागा मार्फत नियमित पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात येते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५ हजार ६९१ नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची जैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. नळ पाणी पुरवठा योजनांचे पाणी नमुने जमा करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, हे पाणी नमुने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अलिबाग, पेण, माणगाव, रोहा, कर्जत, महाड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. येथे पाणी नमुन्यांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येईल. या तपासणीत दूषित आढल्लेल्या पाणी नमुन्यांचे शुध्दीकरण करून, पुन्हा संबंधित पाणी नमुने तपासण्यात येणार आहेत. नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यासोबत इतर पाणी स्त्रोतांची गुणवत्ता टिकविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून राहिल्याने विहिरी, विंधन विहिरी तसेच इतर पाणी स्त्रोत दूषित होण्याची शक्यता आहे. यामुळे या स्त्रोत परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. विहिरीं मधील गाळ काढण्यात येणार आहे. तसेच स्त्रोतांचे मजबुतीकरण करण्यात येईल. विहिरीच्या पाण्यात कचरा पडू नये यासाठी विहिरीवर झाकण किंवा जाळी टाकण्यात येणार आहे.

शहापूरला तालुक्याला अवकाळीचा फटका

किन्हवली : शहापूर तालुक्यात सोमवारी (ता. १३) दुपारी वादळी वारा व मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लग्नाचे मंडप कोसळून पडले. गेल्या अनेक दिवसांपासून शहापूर तालुक्यातील तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांपर्यंत चढलेला होता. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही झाली होती. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्यामुळे दिलासा मिळाला असला तरी थंडोळखांब, कसारा, शेणवा, किन्हवली, टाकीपठार, सोगाव, वाशिंद आदी परिसरातील ग्रामीण भागात विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. दुपारी वादळी वारा व मेघगर्जनेसह अचानक आलेल्या पावसामुळे तालुक्यातील नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी लग्न व हळदी समारंभासाठी सजावट केलेल्या नक्षीदार व आकर्षक मंडपाच्या कापडातून पाण्याच्या धारा ओघळत होत्या. मंडपात चिखल-माती झाली होती. पाहुण्यांसाठी केलेला स्वयंपाक व सोयी-सुविधा वाया गेल्याने यजमानांचे नुकसान झाले. सजावटीचे महागडे कापड, विद्युत व्यवस्था पावसात भिजून मंडप डेकोरेशनवाल्यांचेही अतोनात नुकसान झाले. तसेच पाऊस लांबलाच तर गुरांच्या वैरणीची व्यवस्था करून ठेवलेला पेंढा भिजून गेला. मंडप डेकोरेटर्सना दरवर्षी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे अतोनात नुकसान तर होतेच; परंतु प्रशासनही आमच्या नुकसानीची कधीच दखल घेत नाही. त्यामुळे व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. – चंद्रकांत देसले, मंडप डेकोरेटर्स, डोळखांब

रेवदंड्यात हवामन बदलाचा फटका

रेवदंडा : मागील काही दिवसांपासून परिसरात हवामान बदलाचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. दुपारनंतर ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होत आहे. यंदा तालुक्‍यात हवामानात वेगाने बदल होत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सातत्याने बदलत्या हवामानामुळे शरीराची लाही लाही होत असून नागरिक हैराण झाले आहेत. ढगाळ हवामानामुळे हवेत मळभ दाटून आल्‍याने उष्म्याची तीव्रता वाढली आहे. सकाळी दहानंतर ते सायंकाळी सहापर्यंत नागरिक घराबाहेर पडण्याऐवजी घरातच थांबणे पसंत करताना दिसून येत असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. येथील अनेक समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी बहरून गेले आहेत. मात्र, वाढत्‍या उष्म्यामुळे पर्यटक लगेच परतत आहेत.

बाबासाहेबांच्या शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! या संदेशानुसार शैक्षणिक प्रगती करा – डॉ. जयपाल पाटील

अशोक गायकवाड अलिबाग : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! असा दिलेला संदेश आपल्या समाजातील मुला मुलींनी शैक्षणिक प्रगती करून आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उंच करावे असे मार्गदर्शन पंचशील बौद्ध मंडळ खंडाळे अलिबाग यांनी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात समाज भूषण, आपत्तीव्यवस्थापन तज्ञ, रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष. मंगेश मोरे. उपाध्यक्ष. वैष्णवी कदम. प्रा. डॉ.जयपाल पाटील. उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन. त्रिशरण,पंचशील, घेण्यात आले. यानंतर पुरस्कार प्राप्त जयपाल पाटील यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रस्ताविकात प्रा.जयपाल पाटील यांच्या समाजसेवेबाबत उपस्थित त्यांना माहिती व आपल्या समाज बांधवांना कायम आरोग्याबाबत मदत करणारे असून त्यांना अलिबाग तालुक्यात प्रथमच हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना आपल्या मंडळामार्फत बोलावले आहे. यावेळी प्रा.जयपाल पाटील यांनी रायगड जिल्ह्यात शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मोफत चालविले जाणारे अलिबाग, पनवेल, पाली व महाड येथील मुलींचे वसतिगृह व मुलांसाठी अलिबाग, तळा, महाड येथील व जावळी माणगाव येथील १०वी पर्यंतचे माध्यमिक विद्यामंदिर याचा आपल्या समाजातील गोरगरीब, गरजवंतांनी शिक्षणासाठी लाभ घ्यावा असे सांगितले. यावेळी कधी केव्हाही अपघात प्रसंगी १०८ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा. आपली मुलगी बाळंतपणासाठी बाहेर आल्यावर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी १०२ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा. पावसाळा आता जवळ आल्याने काही वेळा विजा कोसळतात त्यासाठी केंद्र सरकारने “दामिनी” ॲप काढला असून विजय बाबत सुरक्षेची माहिती मोबाईलवर कशी मिळते. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा ११२ क्रमांकाचा वापर कसा करावा. या माहिती सोबतच महिलांनी आपल्या घरातील गॅसची काळजी कशी घ्यावी सांगितले.त्याचबरोबर विहाराच्या ग्रंथालयास संविधानाची प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तक आपत्ती सुरक्षेची पुस्तके भेट दिली. यापुढे असा कार्यक्रम तालुक्यात जिल्ह्यात आपल्या समाजातील महिला पुरुषांसाठी बुद्ध विहारात करणार असल्याचे सांगितले. यावेळी अँड. अनुष्का गायकवाड, प्रीती रघुनाथ मोरे, प्रतिभा मोरे, पांडुरंग मोरे व समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. शेवटी आभार प्रदर्शन मंडळाच्या सचिव सिमरन ओहाळ यांनी मानले.

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात तात्काळ संपर्क करून…

उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत ३१ मे पर्यंत – नितीन मोहिते

अशोक गायकवाड रायगड : उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत दि.३१ मे पर्यंत आहे याची उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांनी नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त, अन्न व औषध…

आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी रायगडमध्ये आलेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे किशन जावळे यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी…