Category: रायगड

raigad news and updates

वन्यप्राण्यांसाठी माथेरानमध्ये पाणी नियोजन करणे गरजेचे

माथेरान : गर्मीचा कहर सुरू झाल्यानंतर पिण्याचा पाण्याचा तुटवडा ही सुरू झाला आहे मनुष्य प्राणी काहींना काही करून स्वतःच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत असतो परंतु जंगलामध्ये राहणारे वन्य प्राण्यांना मात्र…

उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांच्या उपस्थितीत मतदान हाच ‘हातभर तक्रारींचा बोटभर उपाय’ आहे, असा संदेश

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे विभागीय कार्यालयामार्फत स्थानिक जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र तसेच प्रिझम सामाजिक विकास…

माथेरान मध्ये लवकरच आकर्षक श्री विठ्ठल रखुमाई मंदिर साकारणार

माथेरान : माथेरान मधील पंचवटी नगर भागातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या नूतनिकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या येथील राकेश कोकळे यांच्या प्रयत्नामुळे आकर्षक असे श्री. विठ्ठल रखुमाई मंदीराचे काम मार्गी लागणार आहे. मावळ मतदार संघाचे संसदरत्न खासदार तथा लोकसभा निवडणुकीत हट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी दि.३ रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माथेरानला धावती भेट दिली होती त्यावेळी त्यांनी आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांसह दुसऱ्या दिवशी राकेश कोकळे यांच्या विनंतीला मान देऊन  पंचवटी नगरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरास आवर्जून भेट दिली. याचवेळी या दोन्ही मान्यवरांनी स्व. संतोष पवार यांच्या मातोश्री सुशीला धोंडू पवार यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन पवार कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, पंचवटी मित्र मंडळ अध्यक्ष गणेश बिरामणे,संजय घरत,किरण पेमारे आदी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी केली  पूर्वतयारी पाहणी

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  २०२४ अंतर्गत मावळ मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) बुदिती राजशेखर यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत ३३ मावळ…

उन्हाचा मतदारांना त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे – डॉ.भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : मे महिन्यात तापमान अधिक असण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रावर आरोग्य विभागाकडून आरोग्य पथकाची…

हुतात्मा भाई कोतवाल यांचे घर स्मारक घोषित करण्यास शासन असमर्थ

माथेरान : भारतमातेला पारतंत्र्याच्या श्रुंखलेतुन मुक्ती मिळविण्यासाठी जवळपास एकशेतीस शुरवीरानी आपल्या प्राणांची आहुती दिल्यामुळेच आज सर्वच भारतवासीय मुक्तपणे वावरताना दिसत आहेत्.परंतु ज्या ज्या वीरांनी या भुमीला दास्यमुक्त करण्यासाठी आपल्या संसारावर…

दीड लाख विद्यार्थांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

डॉ. भरत बास्टेवाड व पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दीड लाख विद्यार्थांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके अशोक गायकवाड अलिबाग : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानातंर्गत रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे. मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर, ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकार्‍यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. चौकट मोफत पाठ्यपुस्तक देण्यात येणारे जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत सर्वात जास्त ४९ हजार ९३३ विद्यार्थी पनवेल तालुक्यात असून, अलिबाग १३ हजार २२, पेण १५ हजार ३२५, उरण ९ हजार ५९८, कर्जत २० हजार ३५७, खालापूर १५ हजार ३३८, सुधागड ७ हजार ३०३, रोहा १० हजार ६१३, माणगाव ११ हजार ७६५, महाड ११ हजार २२९, पोलादपूर २ हजार ६४०, म्हसळा ४ हजार २६, श्रीवर्धन ५ हजार ७४९, मुरुड ४ हजार ७२८, तळा २ हजार ५३६ विद्यार्थी आहेत.

३ हजार मतदार करणार गृह मतदान

८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व विशिष्ट दिव्यांगत्व असलेले रायगड :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, विशिष्ट दिव्यांगत्व असलेले दिव्यांग मतदार तसेच कोविड आजाराने…

माथेरानमध्ये विद्यार्थ्यांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश

माथेरान : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त आज माथेरानमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माथेरान मधील इंग्रजी माध्यमांची सेंट झेवियर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती वर पथ नाट्य…

उन्हाचा मतदारांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे – डॉ.भरत बास्टेवाड

अलिबाग : मे महिन्यात तापमान अधिक असण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. मतदान केंद्रावर आरोग्य विभागाकडून आरोग्य पथकाची नेमणूक करण्यात…