Category: रायगड

raigad news and updates

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्याधिकारी वैभव गारवे यांचे अभिवादन

अशोक गायकवाड कर्जत : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी रविवारी,(दि.१४) नगरपरिषद कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

माथेरान ई-रिक्षापुढे विघ्नांची मालिका

माथेरान : माथेरान मध्ये अनेक विघ्ने पार पडत शासनाने ई रिक्षास परवानगी दिली होती परंतु मागील काही दिवसांपासून या रिक्षांच्या पाठीमाघे साडेसाती सुरू झाली असून सात रिक्षा चालविण्यास परवानगी असताना…

मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामधील जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामध्ये…

सोशल मीडियावर विशेष लक्ष द्या – धिरेंद्रमणी त्रिपाठी

अशोक गायकवाड रायगड : पेडन्यूज बाबत अधिक दक्ष रहावे. उमेदवाराच्या प्रचारावर आणि प्रसिद्धी साहित्यावर होणारा खर्च, खर्च पथकाला विहित नमुन्यात सादर करावा तसेच सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश लोकसभा…

विविध उपक्रमांचा मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी चांगला उपयोग-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. पथनाट्य, प्रभात फेरी आदी द्वारे नागरिकांमध्ये मतदानासाठी प्रेरित केले जात आहे, याचा जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले. ‘वॉक फॉर वोट रॅली’चा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. ‘वॉक फॉर वोट’ रॅलीसाठी जिल्हाधिकारी जावळे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी निर्मला कुचिक, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे,अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील, अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका वैशाली पाटील यांनी लोकशाहीचा उत्सव पोवाडा सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून आज सकाळी आठ वाजता सुरु झालेली रॅली त्यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय येथून. ब्राह्मण आळी, महावीर चौक बालाजी मंदिर नाका, बीच रोड, एसबीआय बँक या मार्गाने शहरातील विविध भागातून नेऊन जिल्हाधिकारी येथे समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीमध्ये मतदानाबाबत प्रचारगीते, चित्ररथ, फलक याद्वारे घोषणा देत व नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आली. आजच्या रॅलीसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका यासह अधिकारी कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी सहभागी महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता परिसरात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर भेट देऊन मोठ्या प्रमाणात सेल्फी घेत होत्या. यातून जिल्ह्यातील ७ मे रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत मतदान करण्याचा संकल्पच दिसून येत होता.

कर्जत मध्ये नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन

कर्जत : भूमापन दिनानिमित्ताने भूमि अभिलेख विभाग, कर्जत उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करणेत आले. कर्जत उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात बुधवार, (दि.१० एप्रिल २०२४) रोजी भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला आहे. मोजणी साहित्य पूजन करणेत आले व यामध्ये प्लेन टेबल, ईटीएस मशीन, आत्याधुनिक रोवर मशीन इ. साहित्य पूजन करणेत आले. लोकांना, व शेतकरी यांना मोजणी साहित्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. भूमापन दिनानिमित्ताने भूमि अभिलेख विभाग, कर्जत उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करणेत आले. याप्रसंगी मुख्यालय सहाय्यक श्रीमती उज्वला अहिरे, शिरस्तेदार शैलेश जाधव, निमतानदार नंदकिशोर कोळी, छाननि लिपिक निलेश हराळ, भूकरमापक दत्तात्रय पाटील, कृष्णा गायकवाड, ऋषिकेश नाईक, यश जाधव, अण्णासाहेब सोमवशी, संजय गायकवाड, श्रीमती स्मिता भोसले , दुरुस्ती लिपिक दत्तात्रय कदम, कनिष्ठ लिपिक अश्विनी पोळ, नगर भूमापन लिपिक अपेक्षा भोईर, दप्तरबंद अविनाश पडवळ व इतर कर्मचारी तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. भूमि अभिलेख विभागाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. १० एप्रिल १८०२ रोजी त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात ब्रिटिश काळात झालेली होती. कारण तेव्हापासून १० एप्रिल भूमापन दिन म्हणून ओळखला जातो. शासनाने कर्जत कार्यालयास पहिल्या ३ व आता ५ रोवर मशीन पुरविले असून आता सर्व मोजणी कामकाज रोवर मशीनद्वारे होणार असून अत्यंत अचूक व गतीमान कामकाज होणार आहे. तसेच लवकरच कर्जत कार्यालयात ई मोजनी व्हर्जन-२ प्रणाली लागू होणार आहे. त्यात जनतेला आपला मोजणी अर्ज आपल्या घरून मोबाईलवरुन सुद्धा मोजणी अर्ज दाखल करता येणार असून ‘क’ प्रत सुद्धा अर्जदार यांना ई-मेलवर मिळणार आहे. याबाबत उपसंचालक भूमि अभिलेख कोकण प्रदेश, मुंबई जयंत निकम यांनी व्हर्जन-२ बाबत सतत आढावा घेवून तात्काळ ते जनतेला वापरासाठी उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सचिन इंगळी यांनी मार्गदर्शन केले आहे. उप अधीक्षक भूमि अभिलेख, कर्जत नितीन आटाळे यांनीही मार्गदर्शन करीत शंकांचे निरसन केले.

आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्नशील-किशन जावळे

अलिबाग : आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या जनजागृती कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे बोलत होते. जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोली भाषेतील पथ नाट्याद्वारे मतदार जन जागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सिद्धेश्वर बु.येथे या मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्याने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हा पथदर्शी उपक्रम राबविला जात आहे. आदिवासी समाजाची युवक आणि प्राथमिक शिक्षक हे पथनाट्य सादर करीत आहेत. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक सिद्धेश्वर बु. येथे आयोजित या कार्यक्रमासाठी निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसीलदार उत्तम कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, आदिवासी वाड्या वस्त्या, गावे येथील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र मतदार दूत नेमण्यात येणार आहे. या दुता मार्फत गावातील प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्वाना भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीड पणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केले. आदिवासी बहुल गावामधील मतदार काम व नोकरीसाठी कुठल्या आस्थापनांमध्ये जात असतील तरी तेथे सुट्टी देण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. सर्व आदिवासी मतदारांना भर पगारी सुट्टी किंवा सवलत देण्याबाबत कळविण्यात येईल असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. या पथनाट्याचे लेखन /दिग्दर्शक राजू लहू बांगारे यांनी केले आहे. तसेच गीतकार दामोदर शिद, वादक सतिश खाणेकर आहेत. या पथनाट्यात राजू बांगारे, दामोदर शिद, ज्ञानेश्वर शिद, गणपत पारधी, साई बांगारे, श्रेयश वारगुडे, वेदांत शिंदे यांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले. जिल्ह्यातील ११ तालुक्यातील वाडया, वस्ती, गावामध्ये पथनाट्य आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. मतदानाच्या जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाबद्दल त्यांनी माहिती दिली.

रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू – किशन जावळे

 अशोक गायकवाड अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया १२ एप्रिल २०२४ रोजी सुरू होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…

आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माथेरान : 11 एप्रिलला शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधत भारतीय बौद्ध महासभा, माथेरान – शाखा क्रमांक 10 व माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तेरणा…

वरंध घाट ३० मे पर्यंत सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील मौजे वरंध ते रायगड जिल्हा हद्दीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दि.8 एप्रिल पासून ते ३० मे २०२४ पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसा महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी किमी ८८/१०० (राजेवाडी) ते किमी ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे. वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहूतांश काम पूर्ण झालेले आहे,. परंतू साखळी क्रमांक ८८/१०० (मौजे वरंघ) ते ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे. सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतूकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. वाहतूक चालू ठेवल्यास ते शक्य होणार नाही सदर कालावधीकरीता वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे. वरंध घाटातील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत तसेच सदरवेळी पर्यायी मार्ग वापराबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगांव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.