Category: रायगड

raigad news and updates

अलिबाग येथे टास्कफोर्सचे दुसरे प्रांतीय अधिवेशन यशस्वीपणे संपन्न

अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व टास्कफोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ डिसेंबरला क्षात्रैक्य समाज हॉल, कुरूळ, अलिबाग येथे टास्कफोर्सचे दुसरे प्रांतीय अधिवेशन उत्साहात व यशस्वीपणे…

पर्यटन हंगामात सतर्क राहून कारवाई करा

Heading – पर्यटन हंगामात सतर्क राहून कारवाई करा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश अशोक गायकवाड रत्नागिरी : ३१ डिसेंबर तसेच सध्याचा पर्यटनाचा हंगाम पाहता सर्वच यत्रंनेने सतर्क राहून अंमली पदार्थांच्या…

तृतीयपंथीयांच्या घरकुल मागणीसाठी शासनाकडून मार्गदर्शन घ्यावे – एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : शहर ज्येष्ठ नागरिक संघाकडून आलेल्या मागण्यांची पूर्तता संबंधित विभागाने करावी. त्याचबरोबर तृतीयपंथीयांच्या घरकुल मागणीबाबत नगरपरिषदेने शासनस्तरावरुन मार्गदर्शन मागवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. समाजकल्याण…

सुधागडातील शाळांमध्ये वैयक्तिक क्रीडा स्पर्धा

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल लिमिटेड यांच्या सौजन्याने पाली ः सुधागड तालुकास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धा ,सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल लिमिटेड यांच्या…

माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा

माथेरान : माथेरान मध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. १ फेब्रुवायेथील विविध ठिकाणी जवळपास पंचवीस गणेशमूर्तींची यानिमित्ताने प्रतिष्ठापना करण्यात आली होती.माथेरान हे एक छोटेसे गाव असल्याने ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घेतला.दि.२ रोजी बाप्पांना ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून मुले ,मुली महिलांनी बेभान होऊन नाचत निरोप देण्यासाठी मिरवणुकीत भाविकांनी गर्दी केली होती.येथील शारलोट तलावात विसर्जन करण्यात आले.परंतु नेहमीप्रमाणेच बत्ती गुल असल्याने याभागातून बाप्पाना अंधारात मार्गक्रमण करावे लागले.

डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र – आदिती तटकरे

अशोक गायकवाड रायगड : डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र आहे. अशा प्रकारे जिल्हयात ३२ केंद्र मंजुर करण्यात आले आहेत.संपुर्ण राज्यात शासनाने ४०० डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली आसून त्यामधे रोज ३००० रुग्णांना सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक रायगड अलिबाग आणि एच.एल.एल.लाईफ केअर लि.यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रूग्णालय म्हसळा येथे सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची घोषणा तटकरे यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर, उप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण शिंदे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, स.पो.निरिक्षक संदीप कहाळे, सा.बांधकाम अभियंता महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना तटकरे म्हणाल्या, म्हसळा या ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ५ डायलिसिस मशीन व बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दरदिवसाला १५ डायलिसिस रूग्णांना सेवा दिली जाणार आहे. डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र आहे. अशा प्रकारे जिल्हयात ३२ केंद्र मंजुर करण्यात आले आहेत. संपुर्ण राज्यात शासनाने ४०० डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली आसून त्यामधे रोज ३००० रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. श्रीवर्धन मतदार संघात श्रीवर्धन येथे २,माणगाव २, आणि रोहा येथे ३ मशीन ऊपलब्ध आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कु. तटकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर यांनी केले.यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

नावीन्यपूर्ण कृषिकडे वळताना कृषी परिसंस्था बदलू नका-डॉ. संजय भावे

अशोक गायकवाड कर्जत : नावीन्यपूर्ण कृषिकडे वळताना कृषी परिसंस्था बदलू नका, त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात.सोयाबीन, बी. टी.कापसाचे उत्पादन ज्या भागात होते त्याठिकाणी शेतकरी आत्महत्यासारख्या समस्या उद्भवल्या मात्र कोकणातील भात…

जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान सुरु – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : कुष्ठरुग्ण शोध मोहिमेतंर्गत आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षन करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेणिर आहेत. नागरिकांनी कृष्ठरोग आजारबाबत गैरसमज व भीती न बाळगता घरी…

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ‘स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी’ अभियान उपयुक्त – आदिती तटकरे

अशोक गायकवाड रायगड : ‘शालेय विद्यार्थ्यांना जागरूक, आदर्श आणि सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टीने माझी शाळा  सुरक्षित शाळा अंतर्गत राबविण्यात आलेला स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त…

जिल्ह्यात १४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश- चंद्रकांत सूर्यवशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ३१ जानेवारीला रात्री १ वाजल्यापासून ते १४ फेब्रुवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. १ फेब्रुवारी पासून माघी गणेशोत्सव सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे. शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितिनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.