Category: रायगड

raigad news and updates

भारताने टी२० मालिका जिंकली

गुवाहाटी : सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन इनिंगच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी२० क्रिकेट स्पर्धेत न्युझीलंडचा १० ओव्हर आणि ८ विकेट राखून धुव्वा उडविला आणि टी२० मालिकाही जिंकली.  न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद १५३ धावा केल्या होत्या.कॅप्टन सूर्यकुमार…

वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग

वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग कसोटी, जिद्द आणि विश्वासाच्या जोरावर उभा राहिला एक ब्रँड पर्यावरणाशी नाते जोडून गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झाला उद्योग योगेश चांदेकर पालघरः  वय, शिक्षण अनुभव याचा उद्योग उभारणीत कोणताही अडथळा येत नाही. नवे काही करण्याची तयारी आणि ग्राहकाला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणाशी नाते जोडणारे देण्याची तयारी या त्रिसूत्रीवर उद्योगाचे यश अवलंबून असते. डहाणू तालुक्यातील घोलवड येथील साठ वर्षीय विश्वास नेरुरकर यांनी  नवीन उद्योग सुरू करून एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवड हे महाराष्ट्र शासनाने,घोषित केलेले महाराष्ट्रातील तिसरे मधाचे गाव असुन, याचा वसा घेऊन उद्योगात यशस्वी झेप घेऊन  संकल्प हनी चा मुख्य उद्देश घेऊन स्थानिकांना,  थोड्याफार रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा नेरूरकर यांचा प्रयत्न आहे. निसर्गातूनच घेऊन माणसाला नैसर्गिक देण्याची जिद्द यातून ‘संकल्प हनी’चा उद्योगाचा जन्म झाला. आज या उद्योगांना शंभर नव्हे, तर १०१ टक्के गुणवत्तेची हमी दिली आहे. गुणवत्ता, दर्जा आणि नैसर्गिक हेच त्यांच्या यशाचे गणित आहे. नोकरीऐवजी उद्योगात रमले मन विश्वास नेरूरकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. नोकरीत त्यांना रस नव्हता. विद्युत संबंधी व्यवसाय काही काळ केला; परंतु लोकांच्या आरोग्याची काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. भेसळ त्यांना पाहवत नव्हती. त्यामुळे स्वतःच शंभर टक्के पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी कोणतीही तडजोड न करता त्यांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण डहाणू तालुक्यातील कोसबाड येथे घेऊन मधाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. केवळ स्वतः पुरती मध निर्मिती न करता इतरांना सहभागी करून घेतले व संकल्प घेऊन संकल्प हनीची निर्मिती केली. संकल्पातून ‘संकल्प हनी’…

अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

अशोक गायकवाड रायगड- कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांनी शुक्रवार, २३ जानेवारीला कर्जत येथील प्रशासकीय भवनातील उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) कार्यालय व तहसील कार्यालयास भेट देऊन निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विभागप्रमुख, क्षेत्र अधिकारी व टीम लीडर्स यांच्यासोबत बैठक घेतली. तसेच कर्जत तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या बरोबर थेट संवाद साधून निवडणूक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. क्षेत्रीय यंत्रणेला कामकाजादरम्यान भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यास प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या पाहणी व बैठकीदरम्यान कर्जत निवडणूक निरीक्षक तथा अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड, कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, कर्जत पंचायत समिती गट विकास अधिकारी सुशांत पाटील, निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, अधीक्षक माथेरान सुरेंद्रसिंग ठाकूर, कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटूंबे, कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सह दुय्यम निबंधक कर्जत-१, श्रीमती शरयु सावंत, पुरवठा निरिक्षण अधिकारी रविंद्र दळवी, महसूल सहायक संदीप गाढवे, महसूल सहायक जगन्नाथ उबाळे, महसूल सहायक जयंत दबडे, रायगड जिल्हा ग्राम महसूल संघाचे माजी अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी कळंब, संतोष जांभळे, महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल संघाचे महिला प्रतिनिधी तथा मंडळ अधिकारी पाथरज, श्रीमती किरण बेलोसकर, तालुका अध्यक्ष प्रवीण गवई, ग्राम महसूल अधिकारी, सजा नांदगाव निलेश पवार, मंडळ अधिकारी चिंचवली श्रीमती वैशाली पाटील, मंडळ अधिकारी कर्जत, श्रीमती शितल मोरे, मंडळ अधिकारी नेरळ, विश्वास गडदे, मंडळ अधिकारी कडाव, अशोक बनसोडे तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी संबंधित कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार असून सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुस्थितीत खोल्या, शौचालये, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मतदारांच्या सोयीसाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध असून, त्याद्वारे मतदारांना आपले नाव व मतदान केंद्राची माहिती सहज मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी गट संख्या ६ व पंचायत समितीसाठी गण संख्या १२ असून एकूण २२० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तालुक्यातील एकूण मतदारसंख्या १ लाख ७० हजार ७०२ इतकी असून त्यामध्ये ८४ हजार ७७७ पुरुष व ८५ हजार ९२५ महिला मतदारांचा समावेश आहे. एकूणच अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांच्या भेटीमुळे व मार्गदर्शनामुळे निवडणूक यंत्रणेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले असून ही भेट सर्वांसाठी प्रेरणादायी व उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

बदलापूरमध्ये पुन्हा शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार

बदलापूर : बदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. बदलापूर पश्चिमेला असणाऱ्या नामांकित खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी…

कर्जत मुरबाड राज्य मार्गावरील खड्ड्यांविषयी ग्रामस्थांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

कर्जत मुरबाड राज्य मार्गावरील खड्ड्यांविषयी ग्रामस्थांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट कार्यकारी अभियंता अरुण देवकाते यांनी दिले आश्वासन अशोक गायकवाड कर्जत: कर्जत मुरबाड राज्य मार्गावरील कर्जत तालुक्यातील कशेळे येथील मुख्य रस्त्यावर मागील…

वाहनांच्या ताफ्यावर मर्यादा, दहापेक्षा अधिक वाहनांना बंदी

जि. प. व पं. स. निवडणूक वाहनांच्या ताफ्यावर मर्यादा, दहापेक्षा अधिक वाहनांना बंदी जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी वापरणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्ष किंवा उमेदवाराच्या वाहनांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक मोटारगाड्या किंवा वाहने वापरण्यास बंदी घालणारे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. मा. भारत निवडणूक आयोगाने १३ जानेवारीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार, ५ फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या वाहनांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यात आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटारगाड्या किंवा वाहनांचा ताफा वापरण्यास मनाई केली आहे. हे आदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वतंत्रपणे पोहोचविणे शक्य नसल्याने पोलीस विभागामार्फत ध्वनीक्षेपकाद्वारे या आदेशांची जाहीर घोषणा व प्रसिध्दी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

 महाडमध्ये समतादुत यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

महाडमध्ये समतादुत यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे- डॉ. हर्षदीप कांबळे अशोक गायकवाड महाड: बार्टीचे समतादूत हे संपूर्ण राज्यात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनाचा प्रसार व प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शासनाच्या योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी समतादुतांना समतादूत ॲपचा मोठा फायदा होईल. समतादूत हे शासनाचे मजबूत पाईक आहेत, त्यांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे, असे आवाहान सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे संस्थेच्या वतीने १९ व २० जानेवारी रोजी समतादूत व प्रकल्प अधिकारी यांची दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा क्रांतीभूमी महाड, जिल्हा रायगड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे दुरुस्तथ प्रणालीद्वारे उद्घाटन डॉ. कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विस्तार व सेवा विभागाचे विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड, लेखाधिकारी नितीन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी उल्हास शिंदे, आदी उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास महासंचालक सुनील वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ. कांबळे म्हणाले, सामाजिक न्याय विभाग शासनाच्या १७ विभागांना योजनांसाठी निधी देत असतो. या सर्व योजनांचा प्रचार -प्रसार समदुतांनी करावा. शासनाच्या विकास योजनेच्या प्रक्रियेत समतादुतांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या प्रक्रियेत हिरीरीने सहभाग घेऊन आपल्या कामाचा ठसा उंचवावा असे,आवाहनही त्यांनी केले. कार्यशाळेला संबोधित करताना महासंचालक सुनील वारे म्हणाले की, महाड ही क्रांतिकारी भूमी असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच क्रांतीभूमीत चवदार तळ्याचा सत्याग्रह करून समता प्रस्थापित केली. तो लढा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समतादूत हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या व सामाजिक न्याय विभागाच्या तसेच बार्टीच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करतात. समतादूतांना अवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ. समतादुतांनी बदलत्या काळानुसार आपल्यात बदल केला पाहिजे. नवे ज्ञान, नवे कौशल्य विकसित केले पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना विस्तार व सेवा विभागाचे विभाग प्रमुख डॉ बबन जोगदंड यांनी सर्व राज्यातील प्रत्येक तालुक्यात आपले समतादूत चांगले काम करत असून समतादूतांच्या कामात गतिशीलता येण्यासाठी महाड येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या समतादूत आणि प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करणार असल्याचे सांगितले. समतादूत प्रकल्पाचे गतीने काम करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा समतादुतांनी वापर करवा, असे आवाहनही त्यानी केले. कार्यालयीन कामात शिस्त याविषयी निबंधक विशाल लोंढे यांनी सर्व समतादुतांना मौलिक मार्गदर्शन करून संवाद साधला. या कार्यशाळेला संपूर्ण राज्यातून ३०० समतादूत व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते . कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समतादूत विभागाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्वी सोनवणे, राजश्री कांबळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाडचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, माहिती जनसंपर्क अधिकारी लिना कांबळे, यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी केले. आभार रामदास लोखंडे यांनी मानले.

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान प्रचार वाहनांवरील झेंडे व फलकांवर निर्बंध

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान प्रचार वाहनांवरील झेंडे व फलकांवर निर्बंध जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आदेश अशोक गायकवाड रायगड-अलिबाग :जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवरील पक्ष प्रचाराचे झेंडे व कापडी फलक याबाबत जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत. भारत निवडणूक आयोगाने १३ जानेवारीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार, ५ फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता लागू असून तिची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा आदेश देण्यात आला आहे. आदेशानुसार, प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूस विंडस्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो वाहनाच्या छतापासून २ फुटांपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक हे वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावयचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलकसंबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश आचारसंहितेच्या कालावधीत, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहेत. हा आदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे शक्य नसल्याने पोलीस विभागामार्फत ध्वनीक्षेपकावर जाहीर करून त्याची व्यापक प्रसिद्धी देण्याचेही आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर शाळेचा रेखाकला परीक्षेत सलग चौथ्या वर्षीही १०० टक्के निकाल

प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर शाळेचा रेखाकला परीक्षेत सलग चौथ्या वर्षीही १०० टक्के निकाल मुकुंद रांजणे माथेरान : महाराष्ट्र शासन कला संचालनालय, मुंबई, यांच्या अंतर्गत सप्टेंबर २०२५ मध्ये घेतल्या गेलेल्या शासकीय रेखाकला…

 जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ

जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ डॉ.निशिकांत पाटील आणि डॉ. शीतल जोशी यांचे मार्गदर्शन अशोक गायकवाड अलिबाग: वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक…