Category: रायगड

raigad news and updates

रस्त्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेले सा. बां. चे अधिकारी रिकाम्या हाताने परत

अतिक्रमण करणाऱ्यांनी घेतला मुस्लिम असल्याचा गैरफायदा; अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रार करणारा देखील मुस्लिमच राज भंडारी रायगड : नागोठणे – पोयनाड रस्ता क्र – 87 हा रस्ता HAM अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रहदारीच्या दृष्टीने सहा पदरी असे रुंदीकरण करण्यासाठी शासनाच्यावतीने भुसंपादित करण्यात आला असतानाही याठिकाणी येथील काही तरुणांनी शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला. मात्र येथील अतिक्रमण हे आजही ऐटीत उभे राहिल्यामुळे रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात होऊ शकली नसल्याचा आरोप स्थानिक तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी केला आहे. तसेच अतिक्रमण धारकांकडून मुस्लिम असल्यामुळे नोटीसा पाठवून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा बनाव करण्याचा प्रकार हा पूर्ण खोटे असल्याचा निर्वाळा देखील देत मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम अतिक्रमण धारकांनी केले असल्याचे तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी यावेळी सांगितले. येथील स्थानिक मुळ जागामालक नसीम अधिकारी आणि त्यांचा मुलगा दानिश अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण हटविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु केला. सदरील चौक रस्त्यालगत दोन शाळा आणि महाविद्यालये आहेत तसेच याच रस्त्यावर रिलायन्स कंपनी देखील आहे. या कंपनीमुळे याठिकाणी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये – जा करीत असतात, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याठिकानी ये – जा करणाऱ्या शाळकरी मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी रस्त्याचे रुंदीकरण महत्वाचे आहे. मात्र सदर चौक परिसरात तब्बल 7 जणांनी अतिक्रमणे करून आपली दुकाने थाटली आहेत. याचा फटका येथील शालेय विद्यार्थ्यांना बसत असल्यामुळे स्थानिक तक्रारदार नसीम खान यांनी याठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. पेण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी डी. एम. पाटील यांनी सदरील अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा 07 ऑगस्ट 2024 पासून अतिक्रमण धारकांना पाठविल्या. यामध्ये मंजर महम्मद अली जुईकर, इकबाल पेणकर, बशीर शिदी, म्हात्रे ट्रेडर्स, मीरा गॅरेज, आयझल चिकन सेंटर आणि पटेल हॉटेल यांच्या नावाने नोटीसा काढण्यात आल्यानंतर सदरील अतिक्रमण हे 7 दिवसात हटविण्याचे या अतिक्रमण धारकांनी मान्य केले होते. मात्र साडे पाच महिने उलटून गेल्यानंतरही सदर अतिक्रमण हे अतिक्रमण धारकांनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हटविण्यात आले नाही. नसीम अधिकारी आणि त्यांचा मुलगा दानिश अधिकारी यांनी वारंवार अतिक्रमण हटविण्याबाबतचा तगादा लावल्यामुळे पेण येथील सार्वजनिक बांधकाम बिभागाच्यावतीने दिनांक 21 जानेवारी रोजी सदरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र सदरील अतिक्रमण हटविण्याची ही मोहीम म्हणजे दिखावेगिरी असल्याचा आरोप तक्रारदार नसीम अधिकारी यांनी केला. यामध्ये रस्त्यासाठी दोन्ही बाजूने 30 – 30 मिटर असे एकूण 60 मिटर भुसंपादित क्षेत्र असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अर्धवट अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी तक्रारदार यांनी पूर्ण अतिक्रमण हटवून रस्त्याच्या रुंदीकरण कामाची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक रिकाम्या हाती माघारी झाल्याने या प्रकारात आर्थिक दबाव आहे का? असा संशय देखील नसीम खान अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. सदरील प्रकाराबाबत अधिकारी कुटुंबाने 7 – 10 – 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना याठिकाणी सदरील अतिक्रमण धारक मंजर मोहम्मद अली जुईकर आणि मोहब्बत अजीम हे याठिकाणी दाखल झाले. यावेळी तक्रार यांच्यासोबत वाद घालत त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याबाबत तक्रारदार यांच्या कुटुंबियांच्या वतीने या दोघांवर अलिबाग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मुळातच गुन्हेगारी वृत्तीने अतिक्रमण केले असल्याचा हा सढळ पुरावा शासनाकडे असतानाही शासनाचे अधिकारी या अतिक्रमण धारकांना वारंवार पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील नसीम खान अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. 21 ऑक्टोबर  रोजी पेणचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिक्रमण हटविणारे पथक या ठिकाणी आले असताना मात्र अतिक्रमण धारक मंजर मोहम्मद अली जुईकर यांनी आपण मुस्लिम असल्यामुळे आपल्याला नोटीसा पाठवून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा कांगावा केला. तसेच अतिक्रमण पथक हे माघारी फिरल्यानंतर आपण विजयी झाल्यासारखे फोटो सोशल मीडियावर व्हायरलं केले. मात्र हे अतिक्रमण धारक पूर्ण खोटे बोलून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम करीत असल्याचे तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत योग्य ती कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असेही बोलताना त्यांनी सांगितले.

कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करा – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :  कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या. मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमांतर्गत १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने खालापूर विभागातील औद्योगिक गुंतवणूक वाढीसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली रसायनी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे, उपविभागीय अधिकारी (प्रांत) कर्जत प्रकाश संकपाळ, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम, पोलीस निरीक्षक रसायनी संजय बाबर, पोलीस निरीक्षक खोपोली शीतल राऊत, पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर, तसेच एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे यांनी औद्योगिक क्षेत्रातील व्यवसाय सुलभतेसाठी उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, औद्योगिक क्षेत्रासाठी मूलभूत सुविधा, अग्निशमन दलाची गरज, अखंडित वीजपुरवठा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले.

 ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेतंर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम संपन्न

अशोक गायकवाड अलिबाग : बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. योजनेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त रविवारी  महिला व बालविकास मंत्री आदिती…

रायगड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२३ जाहीर

अशोक गायकवाड रायगड : अभिजित शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या असामान्य व सर्वोत्कृष्ट गुन्हे तपासाच्या कामगिरीबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२३ जाहीर होऊन त्यांना पोलीस मुख्यालय अलिबाग-रायगड, येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ना. अदिती तटकरे वरदा सुनील तटकरे, मंत्री, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अभिजित शिवथरे, हे पोलीस उप-अधीक्षक म्हणून पालघर जिल्ह्यात कार्यरत असताना, दिनांक ५ डिसेंबर २०१४ रोजी कासा पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं.१५९/२०१४ हा दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यामध्ये अभिजित शिवथरे तत्कालीन पोलीस उप-अधीक्षक यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने व अथक परिश्रमाद्वारे गुन्ह्याचा तपास व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करून आरोपीविरुद्ध निर्धारित वेळेत दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले व आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविले. त्यामुळे महामार्गावरील दरोडा, जबरीचोरी सारखे गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण*

अशोक गायकवाड रायगड : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवार, दि.२६ जानेवारी २०२५ रोजी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय…

संकटसमयी तत्पर जीवनदूतांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्प – मंत्री भरत गोगावले

अशोक गायकवाड रायगड : मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामादरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वोतोपरी मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना फलोत्पादन व खार…

विदयार्थ्यांनी टॅबचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी करावा – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : सध्या स्पर्धेच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाल्यामुळे इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था…

माथेरानला अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ मतदारांचीच गरज !

विकासाचा आलेख उंचावुन पर्यटन क्रांतीसाठी माथेरान : माथेरान हे जरी राज्यातील नावाजलेले रमणीय पर्यटनस्थळ असले तरी सुद्धा याठिकाणी अद्यापही अन्य स्थळांच्या तुलनेत विकासात्मक दृष्टीने आमूलाग्र बदल घडवून आणले गेले नाहीत.याला…

खोती पद्धतीविरुद्ध चरी येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे स्मारक करणार – रामदास आठवले

अशोक गायकवाड अलिबाग: शेतीमधील खोती पद्धती विरुद्ध अलिबाग तालुक्यातील चरी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते. त्या आंदोलनाला बाबासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा देवून चरी येथे भेट दिली होती. या आंदोलनाचे स्मारक चरी गावाजवळ अलिबाग वडखळ रस्त्यानाजिक करण्याचे विचार असून त्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवार, (दि. २१ जानेवारी २०२५ ) रोजी अलिबाग येथे पत्रकारांना सांगितले. त्यांनी चरी येथील शेतकरी आंदोलनस्थळी भेट देवून जागेची पाहणी केली. शेतकऱ्यांचे खोती प्रथेविरुद्ध आंदोलन रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील चरी या गावात १९३३ ते १९३९ असे ६ वर्षे झाले. या आंदोलना अंतर्गत शेतकऱ्यांनी संप केला.शेतकऱ्यांच्या संपाचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा म्हणून चरी गावाजवळ सुमारे दीड एकर जमिनीची आवश्यकता असून पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र मुख्य रस्त्याजवळील जागा एमएमआरडी यांच्या ताब्यात असल्याने राज्य सरकारबरोबर चर्चा करून जागा मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंत्री आठवले यांनी सांगून राज्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या पाच वर्षात करतील तसेच देशाची अर्थव्यवस्था येत्या पाच वर्षात पहिल्या तीन क्रमांकावर येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोकणातील विकास करायचा असेल तसेच रोजगारासाठी मुंबई पुण्याकडे जाणारा कोकणवासी थांबवायचा असेल तर कोकणात उद्योग आले पाहिजेत. त्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे असेही मंत्री आठवले यांनी सांगितले. यावेळी मंत्री आठवले यांच्या समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), मोहनिष गायकवाड प्रभारी पनवेल महानगरनगर पालिका, हिरामण गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष, राहुल सोनावणे सुधागड तालुका अध्यक्ष, सुनील सप्रे अलिबाग तालुका अध्यक्ष, संजय गायकवाड उरण तालुका अध्यक्ष, जयप्रकाश पवार कोकण प्रदेश सहसचिव, जिवक गायकवाड कोकण प्रदेश युवासचिव, तानाजी गायकवाड रायगड जिल्हा उपअध्यक्ष, संजय जाधव अलिबाग तालुका सचिव ,शंकर दिनकर माने अलिबाग शहर अध्यक्ष , विजय गायकवाड तालुका प्रसिद्धी प्रमूख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनंजय मुंडेंचा आता ५० कोटींचा कृषी घोटाळा ?

नागपूर : राज्यात गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आता कृषी विभागात पन्नास कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला गेला आहे. डीबीटी योजना…