Category: ठाणे

Thane news

ठाण्यातील समारोह बॅक्वेट्स येथे दि.25 जानेवारी रोजी

15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन ठाणे :25 जानेवारी 2025 रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा आहे. या 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Nothing like voting. I Vote for sure” हा विषय  आयोगाकडून देण्यात आला आहे. मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार दि.25 जानेवारी 2025 हा कामकाजाचा दिवस नसल्याने दि.24 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये मतदान शपथ (मराठी, इंग्रजी व हिंदी मधील शपथेचा नमुना सोबत जोडला आहे) घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता समारोह बॅंक्वेट्स, तिसरा मजला, सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या बाजूला, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे हे असतील तर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बित्तंबातमी वृत्तपत्राचे संपादक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ठाणे भूषण तथा सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट, ठाणेच्या अध्यक्ष श्रीमती एम.एस. कोरडे, चित्रपट दिग्दर्शक नितीन कांबळे हे तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणेचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा को.ऑप.हौ.सो. फेडरेशनचे सिताराम राणे, अपंग विकास महासंघ, कल्याणचे अध्यक्ष अशोक भोईर, किन्नर अस्मिता नीता केणे व ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन हे निवडणूक दूत म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वाटप व उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. तरी या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमास दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता समारोह बॅंक्वेट्स, तिसरा मजला, सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या बाजूला, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी उर्मिला पाटील, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी इब्राहिम चौधरी, 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल इनामदार आणि 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्केपाटील यांनी केले आहे.

‘भारतीय ज्ञान परंपरोत्सव’ संकल्पनेवर ठाणे येथे ‘युवातरंग’ स्पर्धेचे जल्लोषपूर्ण आयोजन

ठाणे : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या ‘युवातरंग’ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन दिले. या वर्षीच्या स्पर्धेची संकल्पना होती ‘भारतीय ज्ञान परंपरोत्सव,’ ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, विज्ञान आणि परंपरांचा अभूतपूर्व वेध घेतला. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त सौ. श्रद्धा मोरे, प्राचार्य संतोष गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भारतीय परंपरेतील ज्ञानाचा वारसा आणि त्याचे आधुनिक जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. `युवातरंग’ स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडते, असे मत अध्यक्ष सचिन मोरे यांनी  मांडले. ‘युवातरंग’ अंतर्गत विविध सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात नृत्य, गायन, वक्तृत्व, पोस्टर तयार करणे, प्रश्नमंजूषा यांसारख्या एकूण सोळा स्पर्धांचा समावेश होता. यातील सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत विविध राज्यांच्या पारंपरिक नृत्यप्रकारांद्वारे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याला विद्यार्थ्यांनी वंदन केले. याशिवाय पोस्टर तयार करण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण, विज्ञान, आणि भारतीय परंपरांवर आधारित उत्तम कलाकृती सादर केल्या. सलग तीन दिवस सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा थाटामाटात पार पडला. या वर्षीचा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून डोंबिवलीचे प्रगती महाविद्यालय कर्मवीर चषकाचे मानकरी ठरले. त्यांना कर्मवीर चषक व रोख रक्कम रुपये ११,१११/- देऊन गौरविण्यात आले. स्पर्धांतील इतर विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास पाहुणे म्हणून महादेव जगताप, संस्थेच्या विश्वस्त संगीता बी. मोरे, सौ. अश्विनी सुर्वे, सुधाकर शिंदे, अशोक पालांडे, विकास घांग्रेकर, संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक सौ. शिवांगी भोसले, स्नेहा मेस्त्री, युगंधरा पाटील, व महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रशांत काळुंद्रेकर, समीर दळवी, ओमकार चिक्षे,  सचिन गजमल, सतीश आगाशे, धनश्री राक्षे, प्रा. गुलाबराव काटे, प्रा. जयश्री बालुगडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष गावडे यांनी केले तर प्रा. योगिता कुंभार यांनी सूत्रसंचाल व प्रा. हर्षदा राजपुरे यांनी आभार प्रदर्शन केले. भारतीय ज्ञान परंपरांचा गौरव आणि त्यांची आधुनिक जीवनाशी सांगड घालणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते आणि त्यांना त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करता येते, असे मत प्राचार्य संतोष गावडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केबीपी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या कष्टामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या कोअर टीमने संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख  प्रा. हर्षदा राजपुरे व  प्रा. प्रियांका लाड यांनी संपूर्ण कोअर टीमचे प्रमुख म्हणून काम पहिले. प्रा. मंदार टिल्लू यांनी सांस्कृतिक समितीस मार्गदर्शन केले. प्रा. योगिता कुंभार यांना महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५, प्रा. विजया राणे यांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच प्रा. हर्षदा राजपुरे व प्रा. काजल डाकरे यांना सी.एस. इन्स्टिट्यूटचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. काजल डाकरे यांना तसेच भरीव योगदानाबद्दल क्रीडा संचालक डॉ. एकनाथ पवळे व ग्रंथपाल प्रा. अपर्णा साने यांना सन्मानित करण्यात आले. ‘युवातरंग २०२५’ च्या या यशस्वी अध्यायामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी परंपरा प्रस्थापित झाली आहे. युवातरंग २०२४-२५ विजेते १. मॉडेल मेकिंग – प्रथम क्र. – खुशाल पुरडकर (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय) २. मेहेंदी – प्रथम क्र. – नंदिता गायकवाड (प्रगती महाविद्यालय) द्वितीय क्र. – भक्ती तळेकर (एनकेटीटी कॉलेज), तृतीय क्र. – निशा विश्वकर्मा (केबीपी महाविद्यालय), उत्तेजनार्थ – प्रिया चौहान (प्रगती महाविद्यालय), समिक्षा साळवी (VSM कॉलेज) ३. डिजिटल पोस्टर बनवणे – प्रथम क्र. – नम्रता पवार (प्रगती महाविद्यालय), द्वितीय क्र. – प्रिया सिंग (के.व्ही. पेंढारकर महाविद्यालय), तृतीय क्र. – शिवम तिवारी (के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय), उत्तेजनार्थ – रेश्मा राठोड (ओ.डी.एम. कॉलेज) ४. श्लोक पठण – प्रथम क्र. – वैभवी पालव (जय हिंद कॉलेज), द्वितीय क्र. – नाझिया शेख (केबीपी महाविद्यालय), तृतीय क्र. – तेजस्विनी गवळी (प्रगती महाविद्यालय) ५. PPT सादरीकरण – प्रथम क्र. – नम्रता पवार (प्रगती महाविद्यालय), द्वितीय क्र. – शिवम तिवारी (के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय), तृतीय क्र. – प्रवेश कुमार (ज्ञानसाधना महाविद्यालय), उत्तेजनार्थ – निशांत यादव (KBP महाविद्यालय), वैभवी पालव (जय हिंद कॉलेज)…

वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याचा पुर्नवापर करण्यावर भर द्यावा लागणार –  सौरभ राव

ठाणे : शाश्वत नागरी विकासासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन करून जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्ध रीतीने करण्यात येणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे…

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका ४.४अ, १० व ११ संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

ठाणे : जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकऱ्यांसोबत चर्चा संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी…

पातलीपाड्यातील रहिवाशांचा`जंगल बचाओ’चा नारा!

जंगलातील कृत्रिम पक्षी उद्यानाला स्थानिक नागरिकांचा विरोध ठाणे : पातलीपाडा येथील डोंगरावरील १५ एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान (आयव्हरी पार्क) तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध…

परभणी-मुंबई लाँग मार्चला सर्वतोपरी मदत करा – डॉ. उदय नारकर

अनिल ठाणेकर ठाणे : परभणी ते मुंबई या लाँग मार्चला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पाठिंबा देत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी या लॉंग मार्चमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी सर्व…

नवी मुंबईत हार्मनी आणि कॅम्पस डेमोक्रसी या विषयावर राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन संपन्न

शाहीर संभाजी भगत, प्रा. आर. रामकुमार, आईशी घोष यांचा सहभाग अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने मुंबईत हार्मनी आणि कॅम्पस डेमोक्रसी या विषयावरील राष्ट्रीय विद्यार्थी संमेलन यशस्वीपणे संपन्न…

पातलीपाड्यातील रहिवाशांचा `जंगल बचाओ’चा नारा!

जंगलातील कृत्रिम पक्षी उद्यानाला स्थानिक नागरिकांचा विरोध ठाणे : पातलीपाडा येथील डोंगरावरील १५ एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान (आयव्हरी पार्क) तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या ७० एकरापैकी ५५ एकरावर अतिक्रमणे झाल्यानंतर, रहिवाशांनी वृक्षारोपण व संवर्धन करून जोपासलेल्या जंगलाला वाचविण्याचा निर्धार केला आहे. भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कृत्रिम पक्षी उद्यानाऐवजी `नैसर्गिक जंगल बचाओ’चा नारा दिला. ठाणे नगर विकास आराखड्यानुसार, पातलीपाड्यातील सर्वेक्षण क्रमांक २८५/२, २७१, आणि १३९ (सुमारे ७० एकर) राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु, या भागात २००८ पासून अतिक्रमणे सुरू झाली. या संदर्भात हिरानंदानी इस्टेटसह अन्य वसाहतीतील रहिवाशांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु, ठोस कारवाई न झाल्यामुळे, २०११ मध्ये या जमिनीचे राखीव जंगल म्हणून संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या भागातील अतिक्रमणे थांबविण्याबरोबरच क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी रहिवाशांनी झाडे लावण्याची सातत्यपूर्ण मोहीम हाती घेतली. या प्रयत्नांमुळे गेल्या १३ वर्षात १५ एकर मोकळ्या जमिनीत ५ हजारांहून अधिक स्थानिक झाडांचे संपन्न जंगल तयार झाले आहे. त्याचबरोबर ते पोपट, घार यांच्यासह स्थानिक व परदेशी पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान बनले आहे. या १५ एकर जंगलाच्या क्षेत्राला संपूर्ण जाळीने (नेट) संरक्षित करून पक्षी उद्यान (आयव्हरी पार्क) साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या पक्षी उद्यानात बाहेरुन आणलेले पक्षी सोडले जाणार आहेत. नेटचे आच्छादन असल्यामुळे ते बाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे स्थानिक पक्ष्यांचा अधिवास संपुष्टात येईल. यापूर्वी राज्य सरकार व ठाणे महापालिकेने साकारलेल्या अनेक प्रकल्पांची दुरवस्था आहे. कळवा खाडी किनाऱ्यावरील डॉ. सलीम अली उद्यानाची दुरवस्था झाली. महापालिकेने उभारलेले `नवे ठाणे, जुने ठाणे’ प्रकल्पही भ्रष्टाचाराच्या गर्तेत गेला. तुर्फेपाडा येथे उभारलेल्या अर्बन फॉरेस्टला आग लागल्याचा प्रकार घडला. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे मध्यरात्री मद्यपींच्या पार्ट्या रंगतात. या पार्श्वभूमीवर पक्षी उद्यानाची दुरवस्था झाल्यास, संवर्धन केलेल्या १५ एकरावरील जंगलाचे नुकसान होईल, अशी भीती माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्यासह रहिवाशांनी व्यक्त केली. तर संरक्षित जंगल बचाओचा नारा दिला. दरम्यान, या परिसराला महापालिकेचे सहायक संचालक (नगर रचना) संग्राम कानडे, कार्यकारी अभियंता पाडगावकर, सर्व्हेअर शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भागातील रहिवाशांकडून सोमवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात येणार आहे.

…तर रिपाइं (आठवले) ठामपाची निवडणूक स्वबळावर लढणार – सुरेश बारशिंगे

ठाणे : विधानसभा निवडणुकीत रिपाईने महायुतीला प्रचंड मदत केली आहे. त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र रिपाईवर अन्यायच केला जात आहे. त्यामुळेच आगामी ठामपा निवडणुकीत मानाचे स्थान न दिल्यास एकूण…

साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

कल्याण : कल्याण पूर्व, साकेत विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार  सुलभा गायकवाड या  उपस्थित होत्या.  या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…