Category: ठाणे

Thane news

हिवताप टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे

ठाणे: २५ एप्रिल हा दिवस ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जागतिक हिवताप (मलेरिया) दिन म्हणून राबविला जातो. या दिनी महापालिकेच्या फायलेरिया विभागाच्यावतीने महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी हिवताप टाळण्यासाठी प्रत्येक…

 ठामपा आस्थापनेवर भरती प्रक्रियेमध्ये कोविड कालावधीत काम करणाऱ्यांना प्राधान्य द्या

  उपमहापौर कृष्णा पाटील यांचा प्रस्ताव अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेच्या भरती प्रक्रियेमध्ये  कोव्हिड  -१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी व इतर विभागात ठोक पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणीरुपी प्रस्तावाची सूचना उपमहापौर कृष्णा पाटील यांनी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत  मांडणार असून भाजपा गटनेते मुकेश मोकाशी यांनी त्याला अनुमोदन दिले आहे. ठाणे महापालिकेमध्ये सध्या विविध संवर्गाची सरळसेवेने भरती करण्याची प्रक्रीया चालू असून, त्या अनुषंगाने प्रशासनाकडून कार्यवाही सुरु आहे. परंतू सदर सरळसेवा भरती करतांना, ठाणे महानगरपालिकेत कोव्हीड-१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी व इतर विभागामध्ये ठोक पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करणे जरुरीचे आहे.ठाणे महानगरपालिकेत कोव्हीड-१९ कालावधीत जाहिरातीन्वये विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती केली होती. तसेच काही विभागामध्ये अत्यावश्यक बाब म्हणून ठोक पगारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. परंतू सद्या ठाणे महापालिकेत चालू असलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना प्राधान्यक्रम न दिल्यामुळे त्यांचेवर अन्याय करण्यासारखे होईल अशी भावना उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे. सन २०२२ मध्ये कोव्हीड-१९ च्या कालावधीत ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती, त्यांना महापालिकेच्या आस्थापनेवर घेण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात यावा अशा प्रकारची चर्चा होऊन, त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी प्रशासनास सूचना केल्याचे कृष्णा पाटील यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात नमूद केले असून ठाणे महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती प्रक्रीयेमध्ये कोव्हीड-१९ कालावधीत काम करणारे कर्मचारी वर्ग व इतर विभागात ठोक पगारावर काम करणारे कर्मचारी या सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन, त्यांचा प्राधान्याने विचार करण्याची मागणी उपमहापौर कृष्ण पाटील यांनी केली आहे. सदर प्रस्तावाची सूचना आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेऊन, चर्चा करुन, त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची विनंतीही कृष्णा पाटील यांनी केली आहे.

 ठाण्यात महिला आरक्षण विधेयकावरून भाजपवर काँग्रेसचा हल्लाबोल

भाजपच्या विरोधात काँग्रेस “पोलखोल मोहीम” राबवणार ठाणे (सिद्धेश शिगवण):- सध्या देशभरात महिला आरक्षणाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात गाजत असल्याचं पाहायला मिळतंय. महिला आरक्षण मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस सातत्याने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहे. याच अनुषंगाने आज ठाण्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य आरिफ नसीम खान यांनी  पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टी सरकारवर जोरदार टीका केली. आरिफ नसीम खान यांनी आरोप केला की, महिलांसंदर्भातील विधेयक नामंजूर करण्यात भाजपचाच हात असून “खोटं बोला, रेटून बोला” अशी भूमिका केंद्रातील सरकारची असल्याचे ते म्हणाले. महिलांना आरक्षण देण्याच्या नावाखाली डिलिमिटेशनचा अडसर निर्माण करून भाजपने महिलांचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, महिलांसाठी विशेष अधिवेशन आयोजित करूनही प्रत्यक्षात महिलांचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला. “हे महिला आरक्षण विधेयक नसून कायदा संशोधन विधेयक आहे,” असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, 2023 मध्ये 33 टक्के महिला आरक्षणाला काँग्रेस सहमत होती; मात्र या प्रक्रियेमुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनी याला विरोध केला. “2023 च्या 33 टक्के आरक्षणाला मोदी सरकारने थेट सहमती द्यावी. मात्र आरक्षणाच्या नावाखाली संविधानाची गळचेपी आम्ही सहन करणार नाही,” असेही खान यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे आरोप केला की, कायदा संशोधनाच्या माध्यमातून “चोर दरवाज्याने” संविधानात बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे देशातील समतोल आणि प्रगतिशील विचारसरणी धोक्यात येईल. यावेळी त्यांनी नमूद केले की, 2023 मध्ये सोनिया गांधी यांच्या मागणीमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आला होता, तर राहुल गांधी यांनीही जातीनिहाय जनगणनेसाठी सातत्याने भूमिका मांडली आहे. “महिला आणि मागासवर्गीय समाजांना काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. मात्र या निर्णयाच्या नावाखाली संविधानाची हत्या आम्ही होऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी भाजपवर दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप केला. भाजपवर टीका करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “भाजपमध्ये महिला राज्याध्यक्ष का होत नाहीत?” तसेच, महिला सक्षमीकरणाचा दावा करणाऱ्या पक्षाच्या काही नेत्यांवर महिलांवरील अत्याचाराचे आरोप असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काँग्रेस पक्ष लवकरच भाजपच्या धोरणांविरोधात “पोलखोल मोहीम” राबवणार असल्याची माहितीही आरिफ नसीम खान यांनी दिली. 000000000

 नारी शक्ती वंदन विधेयकावरील सभा तहकूबी महापौरांनी नाकारली

 ठाण्यात भाजपच्या नगरसेवकांचा संताप, भरत चव्हाण यांची तहकूबीची मागणी ठाणे: संसद व राज्याच्या विधानसभांमध्ये `नारी शक्ती वंदन अधिनियम’ विधेयक मंजूर न करणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्थ ठाणे महापालिकेची महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांची मागणी महापौर व प्रशासनाने नाकारल्यानंतर, उपमहापौर कृष्णा पाटील व गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह भाजपाच्या नगरसेवक-नगरसेविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यापुढील महासभेत पुन्हा हा विषय मांडण्याचा भाजपने निर्धार केला असल्याचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले. `नारी शक्ती वंदन अधिनियमा’ला विरोध करीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या केली. महिला आरक्षणाला विरोध करण्यातून विरोधी पक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे, याकडे लक्ष वेधत नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापौर व महापालिका सचिव यांना आजची महासभा काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्ह दिवसभरासाठी तहकूब करावी, अशी मागणी केली. मात्र, या मागणीचे पत्र महापौर व महापालिका सचिवांकडून स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर घोषणा देत निषेध केला. या आंदोलनात उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, काजोल गुणिजन, उषा वाघ, वेदिका पाटील, माधुरी मेटांगे, अनिता भोईर यांच्यासह नगरसेविका सहभागी झाल्या होत्या. नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून संसद व विधानसभेत महिलांना जादा प्रतिनिधीत्व मिळाले असते. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षांकडून विधेयक नामंजूर केले. देशातील ७० कोटींहून अधिक महिलांचा हा अपमान होता, असे भरत चव्हाण यांनी सांगितले. या विषयावर सभा तहकूबीची मागणी भरत चव्हाण यांनी केली होती. तर नगरसेविका नंदा पाटील यांनी अनुमोदन दिले होते.

 नौपाड्यात नालेसफाईला सुरूवात

 ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते शुभारंभ ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा नौपाड्यात प्रथम नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते नालेसफाईला आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात नौपाडा परिसरात कोठेही पाणी साचू नये, याची काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी पाणी साचण्याची काही ठिकाणे आहेत. त्यात नौपाड्यातील काही ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी काळजी घेण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यानुसार नाले सफाईसाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे यंदा शहरात पहिल्यांदा नौपाड्यात नालेसफाई सुरू झाली आहे. प्रभाग क्र. २१ मधील लोकमान्य सोसायटी नाला, सोपान सोसायटी ते एम. एच. हायस्कूल नाला, नाईकवाडी नाला, सर्व्हिस रोडवरील भोईर हॉटेल ते कोपरी ब्रिज चिखलपाडी, रेल्वेमार्गावरील आनंद ब्रिज ते ठाणे प्लॅटफॉर्म क्र. १ आणि एमटीएनएल ते चिखलवाडी येथील नाल्यांच्या सफाईला आज शुभारंभ करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

 भाजपा गटनेते मुकेश मोकाशी यांच्या महापालिकेतील दालनाचे उद्घाटन

आमदार संजय केळकर, निरंजन डावखरेंची प्रमुख उपस्थिती ठाणे,   २० (प्रतिनिधी) : भाजपाचे महापालिकेतील गटनेते मुकेश मोकाशी यांच्या महापालिकेतील दालनाचे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. ठाणे महापालिकेतील भाजपच्या दालनातून ठाणेकरांच्या हिताची पूर्तता होईल, असा विश्वास व्यक्त करीत दोन्ही आमदारांनी मुकेश मोकाशी यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी उपमहापौर कृष्णा पाटील यांचीही उपस्थिती होती. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले असून, पक्षाच्या सदस्यसंख्येनुसार महापालिकेकडून प्रशस्त दालन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या तळमजल्यावर गटनेत्यांसाठी दालन देण्यात आले. या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. ठाणे शहरातील नागरिकांनी भाजपला कौल दिला. यापुढील काळात गटनेता दालनाच्या माध्यमातून ठाणे शहरातील जनहितांच्या कामांना न्याय मिळेल. ठाणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली. ठाण्यातील २५ लाखांहून अधिक नागरिकांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षाची पूर्ती करण्यासाठी भाजप कार्यरत आहे. महापालिकेकडून जनतेला नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही दक्ष राहणार आहोत. महापालिकेसंदर्भातील विविध नागरी सुविधांसाठी नागरिकांनी गटनेते कार्यालयाबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन गटनेते मुकेश मोकाशी यांनी केले. या वेळी भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुकेश मोकाशी यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक व माजी गटनेते संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे, नगरसेवक सुनेश जोशी, दीपक जाधव, सिताराम राणे, वैभव कदम, सुरेश कांबळे, विकास पाटील, नगरसेविका नम्रता कोळी, अर्चना मणेरा, नंदा पाटील, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, स्नेहा आंब्रे, उषा वाघ, वेदिका पाटील, अनिता ठाकूर यांच्यासह भाजपाचे ठाण्यातील सरचिटणीस विक्रम भोईर, सचिन पाटील, समिरा भारती, पदाधिकारी जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, अश्विन शेट्टी, स्वप्नाली साळवी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 ठाण्यातील नगरसेवकांना महापालिकेचा `बॅच’!

 भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून प्रशासनाचे आभार ठाणे, दि. २० (प्रतिनिधी) : राज्यातील आमदारांना व मुंबईतील नगरसेवकांना देण्यात येत असलेल्या `बॅच’प्रमाणे ठाण्यातील नगरसेवकांना महापालिकेचा लोगो असलेला `बॅच’चे आज वाटप करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी सर्व नगरसेवकांना बॅच देण्याची महासभेत प्रस्तावाद्वारे मागणी केली होती. ठाणे महापालिकेत अनेक नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यांना प्रशासकीय कामकाजात सुविधा व्हावी, त्यांच्याबाबत प्रशासनाला माहिती व्हावी, यासाठी बॅच देण्याबाबत मागणीचा प्रस्ताव भरत चव्हाण यांनी सादर केला होता. तर ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी अनुमोदन दिले होते. विधीमंडळ व मंत्रालयात प्रवेशाबरोबरच प्रशासकीय कामकाजात सुविधा व्हावी, यासाठी आमदारांना विधीमंडळाचा लोगो असलेले बॅच सादर केले जातात. मुंबई महापालिकेकडून नगरसेवकांना बॅच उपलब्ध केला जातो. त्यानुसार ठाणे महापालिकेतील सर्व नगरसेवकांना बॅच उपलब्ध करावे, असा प्रस्ताव भरत चव्हाण यांनी सादर केला. त्याला महापौरांनी मंजूरी दिली. त्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज उपस्थित नगरसेवकांना बॅचचे वाटप करण्यात आले. या निर्णयाबद्दल नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापौर व प्रशासनाचे आभार मानले आहेत.

टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धेतून चांगले खेळाडू घडतील – अजिंक्य नाईक

ठाणे – टेनिस क्रिकेटमधून करिअर सुरु करणारे अनेक खेळाडू आज मुंबई संघासाठी आणि आयपीएलमध्ये खेळत आहेत. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आयोजित टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धा हे एक मोठे व्यासपिठ असून…

जान्हवी मोरे स्मृती चषक मुला-मुलींची कॅरम स्पर्धा २९ एप्रिलला

ठाणे : डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू स्व. जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षाखालील‌ मुला -मुलींच्या राज्य स्तरीय   कॅरम स्पर्धेचे २९ एप्रिल रोजी  आयोजन करण्यात…

 स्वराज्य स्पोर्टस्, श्रीराम क्रीडा विश्वस्त संघ अजिंक्य

 श्री मावळी मंडळ कबड्डी स्पर्धा   याशिका पुजारी, तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. ठाणे :-महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या…