ठाणे : डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू स्व. जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षाखालील मुला -मुलींच्या राज्य स्तरीय कॅरम स्पर्धेचे २९ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शास्त्री हॉल,दत्तनगर,डोंबिवली,पूर्व येथे होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये १०० असुन २० एप्रिल पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.प्रवेशासाठी दिलीप कर्वे, मो.९१६७७४४०४९. संजय ठाकुरदेसाई मो. ९८६७५८५२७१. अथवा पर्णाद जोशी मो. ८४५०९५४५८४ यांच्याशी संपर्क साधावा.
