Category: ठाणे

Thane news

कथीत सामाजिक कार्यकर्ता योगेश मुंढराचा सेक्स आणि ब्लॅकमेलिंगचा धंदा मुंब्रा पोलिसांकडून उद्ध्वस्त!

अनिल ठाणेकर ठाणे-सामाजिक कार्यकर्ता योगेश मुंढराचा सेक्स आणि ब्लॅकमेलिंगचा धंदा मुंब्रा पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून अश्लील व्हिडिओच्या जोरावर तरुणीचा छळ करणारा नराधम फरार झाला आहे.मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस २०२३…

 ओम् वर्तकनगर, अश्वमेघ स्पोर्टस् ,श्रीराम,जय बजरंग चौथ्या फेरीत

 श्री मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे :- श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” ओम् वर्तकनगरने महिला विभागात  चौथी फेरी गाठली.तर  पुरुष गटात  शिवमुद्रा प्रतिष्ठान, श्रीराम विश्वस्त, जय बजरंग-वाशिंद, मिड…

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत आमदार निरंजन डावखरे यांचा वाढदिवस साजरा

अनिल ठाणेकर ठाणे-विर्थ्यांसोबतचा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो आणि समाजाला काहीतरी परत देण्याची हीच खरी संधी असते. अशा भावना व्यक्त करत आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी कर्णबधीर विशेष विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल…

आनंद नगर मधील बुद्धविहाराचा कायापालट होणार

ठाणे :  गेलीं अनेक वर्षें मोडकळीस आलेल्या आनंद नगर मधील बुद्धविहार आता नव्या रूपात साकारले जाणार आहे. १९ एप्रिलपासून या बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीच्या कामास सुरवात होणार आहे. पूर्व ठाण्यातील आनंद नगर विभागात असलेल्या बुद्धविहाराची अवस्था खराब झाली होती. त्यातच गेली अनेक वर्षे पुनर्बांधणीचे काम या ना त्या कारणाने रखडले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनीच पुढाकार घेऊन निधी गोळा करून बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १९ एप्रिलपासून बांधकामाला सुरुवात होत आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, निरंजन डावखरे,माजी आमदार रवींद्र फाटक, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीसाठी  आनंदनगर बौद्ध सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बनकर, उपाध्यक्ष आनंद कांबळे, राहुल लोंढे, वृक्षाली जाधव – दळवी, सचिव प्रविण गायकवाड, खजिनदार संजय बुकाणे, सहसचिव हिरा वानखेडे, सहखजीनदार राजू साबळे, अमोल जोशी, दिलीप जाधव, नितीन दुधसागर, सुनील सौंदाणे, भरत उबाळे, सुनील कदम प्रवीण झेंडे आणि इतर  मेहनत घेत आहेत.

‘पळसाची पाने’ मुंबईत विक्रीसाठी

 शहापूरच्या गरीब आदिवासींना मिळतेय रोजी रोटी अविनाश उबाळे ठाणे : जंगलात रानावनात डोंगर कपारीत राहणार्‍या आदिवासी समाजाने आपल्या दोन वेळच्या घासासाठी जंगलात भटकंती करताना रोजगाराच्या वाटा या स्वतः शोधल्या आहेत.कशासाठी तर वितभर पोटासाठी सरकारी मदतीची वाट न पाहता जगण्यासाठीचा हा संघर्ष आदिवासींचा कायम दिसतो आहे. कशासाठी तर वितभर पोटासाठी प्रत्येक मोसमात त्याने वेगवेगळे व्यवसाय करून काबाडकष्ट करून दोन पैसे मिळवून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित आहेत.शहापूर तालुक्यातील वाशिंद, किन्हवली, डोळखांब, खर्डी, कसारा ,तानशेत, उंबरमाळी, आघई ,तानसा, दहागाव पिवळी, माहुली, या ग्रामीण भागातील आदिवासी बहुल वस्त्यावरील आदिवासी हे दरवर्षी पळसाची पाने विक्रीचा व्यवसाय करतात.जवळपास या व्यवसायातून आदिवासी समाजाची बहुतांश कुटुंब आपली रोजीरोटी चालवितात. दाट जंगलात, डोंगर कपारीत भटकंती करून आदिवासी पुरुष,महिला ही पळसाची पाने मोठ्या मेहनतीने खुडून आणतात.नंतर या पानांचे गठ्ठे बांधून ते जंगलातून पायपीट करत डोक्यावर वाहून मध्य रेल्वेच्या कसारा खर्डी, आटगाव, आसनगाव, वासिंद,या रेल्वे स्थानकात आणून रेल्वेने पुढे मुंबई, दादर, ठाणे, डोंबिवली,कल्याण या शहरातील फुलमंडईत विक्रीसाठी नेतात. फुले बांधण्यासाठी पळसाच्या पानांना फुल मंडईत मोठी मागणी असते.पळसाच्या पानाच्या विक्रीतून त्यांना रोज ४०० ते ५०० रुपयांची कमाई होते.असे या व्यवसायातील सुकरी निरगुुडा या आदिवासी महिलेने माहिती देताना सांगितले.काही आदिवासी हे पळसाची पानं ही उत्तर भारतीय लोकांना रेल्वे स्थानकातच अगदी अल्प दरात विक्री करतात.यातून स्थानिक आदिवासींना दोन पैसे मिळतात.पळसाच्या पानांच्या विक्रीचा हा शहापूरातील आदिवासींचा पिढीजात व्यवसाय आहे.या व्यवस्यातून आदिवासी कुटुंबे आपली रोजीरोटी भागवतात पळसाच्या पानांच्या व्यवसायासोबत आदिवासी मोठ्या कौशल्याने बांबूपासून टोपल्या,सूप, इरणा,चाप,कनगा आदी वस्तू बनवितात.या सर्व वस्तू साधारण पावसाळा मोसमाच्या नंतर हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या मोसमात शहरांतील आठवडी बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात.यातून त्यांना दररोज ३००ते ४०० रुपयांची कमाई होते. त्यांच्या बांबू हस्तकलेच्या व्यवसायाने देखील देखील आदिवासींना रोजगार प्राप्त करून दिला आहे.

न्यू इंदिरानगर येथील सॅटिस पूल प्रकल्पातील बाधित नागरिकांना मिळाला दिलासा

ठाणे : ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिसपूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अखेर दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देवून खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या…

ठाण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जोरदार आंदोलन

ठाणे : प्रशासनाच्या कथित असंवेदनशील कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने ठाण्यात जोरदार आंदोलन छेडले. प्रांताध्यक्ष तथा आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशानुसार, शिक्षक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांच्या नेतृत्वाखाली…

 होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ, स्नेहविकास, ओम् वर्तकनगर, नवशक्ती संघांची आगेकुच

 श्री मावळी मंडळ कबड्डी स्पर्धा ठाणे :- होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ यांनी पुरुषांत, तर स्नेहविकास, ओम् वर्तकनगर, नवशक्ती यांनी महिलात श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत”…

काळू व शाई धरणासाठी मंत्रालयात संयुक्त बैठक होणार

 वन मंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर  काळू व शाई धरण उभारण्यातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे वन मंत्री व ठाण्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी आज येथे दिले. गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व भाजपचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी काळू व शाई धरणासाठी पुढाकार घेण्यासाठी निवेदन दिले. तसेच त्यांचे ठाणे शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधले. ठाणे महापालिकेला स्वतंत्र धरण असावे, यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या बैठकीला स्थानिक आमदार व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. ठाणे महापालिकेसाठी स्वतंत्र धरणाची चर्चा सुमारे २००२ पासून सुरू आहे. मात्र, काळू व शाई ही दोन्ही विविध मुद्द्यांवरून रखडली. दोन्ही धरणांचे भूसंपादन पूर्ण झाले नसून, ग्रामस्थांकडून विरोधही केला जात आहे. यापूर्वी बारवी धरणाची उंची वाढविण्याच्या प्रश्नावेळी संबंधित प्रकल्पग्रस्तांना महानगरपालिका, नगरपालिका व तत्सम प्राधिकरणात नोकरी किंवा एकरकमी मोबदला असे पॅकेज देण्यात आले. त्याला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प मार्गी लागला. त्याच धर्तीवर काळू व शाई प्रकल्पग्रस्तांना ठाण्यात ४०० ते ५०० चौरस फूटांची सदनिका किंवा एकरकमी पॅकेज असा पर्याय ठेवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 000000

अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा पसरवणारे विधान करणारे संजय शिरसाट यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निषेध !

अनिल ठाणेकर ठाणे : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर बांधलेली असल्याने तिथे ‘आत्मे’ दिसतात आणि त्यामुळे पालिका कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण असून काम करणे कठीण जात आहे, असा अत्यंत अविवेकी, अवैज्ञानिक, धक्कादायक दावा  महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्या सामाजिक न्याय विभागाने भारतात पहिला असा जादूटोणा विरोधी कायदा पारित करून घेतला, त्याच विभागाचे मंत्री त्याच कायद्याची मूल्ये पायदळी तुडवणारी, लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढवणारी, भय निर्माण करणारी विधाने करतात हे देशातील प्रगत मानल्या गेलेल्या महाराष्ट्र राज्याचा आणि संत-समाज सुधारकांचा अवमान करणारे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संजय शिरसाट यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले. जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे खीळ बसू शकते. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. म्हणून महा. अंनिस त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे. आम्ही आवाहन करीत आहोत की महापालिकेची ही कथित आत्म्यांचे वास्तव्य असलेली इमारत या मंत्र्यांना काम करण्यायोग्य वाटत नसेल तर ती पाडण्याऐवजी आमच्या समितीकडे हस्तांतरित करावी. आम्ही त्या जागेत व्यवस्थित  सामाजिक कामे करून, विविध उपक्रम करून  दाखवू.छत्रपती संभाजीनगर महापालिकेबाबत  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेले विधान हे पूर्णपणे अविवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळ फासणारे आहे. मानवी मेंदू भीती, अज्ञान आणि अफवांच्या प्रभावाखाली अनेक गोष्टींची कल्पना करतो. अंधार, एकटेपणा, मानसिक ताण किंवा पूर्वग्रह यांच्या परिणामामुळे लोकांना “काहीतरी आहे” असे वाटू शकते. पण त्या अनुभवांचा अर्थ अलौकिक शक्ती असा होत नाही.महापालिकेसारख्या सार्वजनिक संस्थांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे जबाबदार लोकप्रतिनिधींना शोभणारे नाही. यामुळे समाजात भीती, गैरसमज आणि अंधश्रद्धा वाढीस लागते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्पष्ट मतप्रवाह असा आहे की—कोणतीही घटना तर्क, विज्ञान आणि पुराव्यांच्या आधारे समजून घेतली पाहिजे,भूत-प्रेत, आत्मा यांसारख्या संकल्पना या मानवनिर्मित आहेत, वास्तव नाहीत,समाजाने अंधश्रद्धेऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे, महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा हा सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने २०१३ ला मंजूर झाला असून त्या कायद्याअंतर्गत हजारो भोंदू बुवाबाबा ,मांत्रिक यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे, काहींना या गुन्ह्यात शिक्षा झाल्या आहेत.त्याचा मंत्रालयाचा मंत्री असे अवैज्ञानिक दावे करतात,याचा आम्ही निषेध करतो,मंत्री संजय शिरसाट यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा द्यावा.अशा अवैज्ञानिक,अतार्किक विधाने करणाऱ्यांनी पुरोगामी महाराष्ट्र मागे खेचत आहेत. संविधानिक पदावर असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने विधाने करावीत. अशा भीती पसरवणाऱ्या कल्पनांपासून दूर राहूया, आणि विवेक, विज्ञान व सत्याच्या बाजूने ठाम उभे राहूया.विवेकी समाज बनण्याच्या प्रक्रियेमध्ये अशी विधाने समाजाला घातक ठरतात, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.