Category: ठाणे

Thane news

महा DBT पोर्टलवरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे महाविद्यालयांना निर्देश ठाणे: महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टलद्वारे विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, सद्यस्थितीत हे पोर्टल MahaDBT १.० वरून MahaDBT २.० मध्ये परावर्तित (Migration) होत आहे. या पार्श्वभूमीवर सन २०१८-१९ ते २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील महाविद्यालय स्तरावरील सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत, असे निर्देश समाज कल्याण विभाग, ठाणेचे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिले आहेत. सध्या महाविद्यालय स्तरावर एकूण ३१६२ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयांनी अर्जांची वेळेत पडताळणी व मंजुरी न केल्यास पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाDBT पोर्टल सन २०१८-१९ पासून कार्यरत असून शासनाच्या योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि कोणताही विद्यार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी असल्याचे इंगळे यांनी नमूद केले. तरी सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्जांची तात्काळ तपासणी करून मंजुरी व आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. या प्रकरणी दिरंगाई झाल्यास संबंधित प्राचार्य आणि महाविद्यालय प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिला आहे. ०००००००० ००००००

शेतकऱ्यांच्या वेदना आणि श्रद्धेचा संवेदनशील प्रवास; ‘देऊळ बंद २’ ठरतो प्रभावी अनुभव

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक वास्तव आणि अध्यात्म यांचा संगम घडवणारे चित्रपट क्वचितच पाहायला मिळतात. लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’मधून श्रद्धा, अंधश्रद्धा आणि मानवी संघर्ष यांचा वेगळा…

टिटवाळा इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

  संघर्ष रहिवासी संघटनेचे केडीएमसी, पोलिसांना पत्र कल्याण : टिटवाळा पूर्वेतील इंदिरानगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटना, तसेच इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी इंदिरानगर परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी संघर्ष…

२५ दिवसीय योग महोत्सवाचा जीवनदीप महाविद्यालयात शुभारंभ

    कल्याण : जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दिनांक २८ मे रोजी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, आरोग्य योगा अँड…

२८०० कोटींच्या `टीडीआर’बाबत आयुक्तांनी ठाणेकरांना खुलासा करावा

भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची मागणी ठाणे : चितळसर-मानपाडा येथील १९३ एकर वन जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात ठाणे महापालिकेने समझोता केल्यानंतर देण्यात येणाऱ्या २८०० कोटींच्या `टीडीआर’बाबत महापालिका आयुक्तांनी…

महा DBT पोर्टलवरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा

  सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे महाविद्यालयांना निर्देश ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टलद्वारे विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून, सद्यस्थितीत हे पोर्टल MahaDBT १.० वरून…

कल्याणमध्ये बकऱ्यांची अवैध कत्तलप्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर कारवाई

कल्याण: कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बकऱ्यांची अवैध कत्तल केल्याप्रकरणी तिघांसह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमेश्वर गोपाळ महाले (वय ४५) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली…

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण : जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि सत्यमेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य व मासिक पाळी जनजागृती विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व मुलींनी…

ठाणे महानगरपालिका व शेल्टर असोसिएट्सच्या वतीने   राजे श‍िवाजी विद्यालयात ‘मासिका महोत्सव’

ठाणे : जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएट्स संस्था आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य नगर येथील राजे शिवाजी शाळेत “मासिका महोत्सव” आयोजित करण्यात आला. मासिक पाळी…

घोड्यावर बसून कल्याणमध्ये कॉंग्रेसचे मेलोडी चॉकलेट वाटप

इंधनदरवाढ आणि वाढत्या महागाईचा केला निषेध कल्याण : इंधन दरवाढीच्या विरोधात कल्याणात काँग्रेसचे अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले. स्टेशन परिसरात काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी घोड्यावर बसून मेलोडी चॉकलेटचे वाटप केले. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधनदरवाढ आणि त्यामुळे होत असलेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी  कल्याण स्टेशन परिसरात  निषेध आंदोलन करत भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान याच घोड्यावर बसून कॉंग्रेसने तहसीलदार कार्यालय गाठत, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.