Category: ठाणे

Thane news

मंजुनाथ महाविद्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन विषयांवर मार्गदर्शन

कल्याण : १ ते ७ फेब्रुवारी वनवणवा सप्ताह साजरा करून सर्वत्र जनजागृती केली जाते. जंगलातील मानवी हस्तक्षेप व नैसर्गिक कारणांमुळे आग लागण्याचे घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. जंगलाला आग लागून झाडं नाहीसे होत आहेत त्यावर अवलंबून असलेली पक्षांची घरटी, ढोली व त्यांची अंडी थोडक्यात वन्यजीवन आणि वनसंपदा नष्ट होऊन वन्यजीवांचा नाहक बळी जात आहे. ठाकुर्ली येथील मंजुनाथ महाविद्यालय येथे आपत्कालीन व्यवस्थापन विषयांवर वनवणवा, आगीची कारणे, साहित्यांचे आधारे आग विझविणे इ. यासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच प्रथोमचार पेटी मधील त्रिकोणी पट्टी, बॅडेजचा वापर करणे, कृत्रिम पद्धतीने स्ट्रेचर बनविणे याविषयावर वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी प्राध्यापिका निशा देवधर, माधुरी महाराव तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक,  विद्यार्थी  वर्ग, शिक्षकवृंद व महाविद्यालयीन अन्य कर्मचारी उपस्थीत असल्याची माहिती प्रशिक्षण मार्गदर्शक  सुहास पवार यांनी दिली.

आज युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवक- युवतींचा पुन्हा एकदा एल्गार

ठाणे : महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या अस्थापानेत कार्यरत आहेत, तिथेच त्यांना नियमित करण्यात येईल असे आश्वासन दिले…

सुप्रसिद्ध गायक देवदत्त नागपुरे यांच्या मातोश्री सुलोचना नागपुरे यांना ९० वर्ष पूर्ण

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ९ मधील मिलेनियम टॉवर बी टाईप सोसायटीतील सुप्रसिद्ध गायक देवदत्त नागपुरे यांच्या मातोश्री सुलोचना नागपुरे यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी ९० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने…

नॅशनल गेम्ससाठी संदीप ओंबासे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार

कल्याण :- तायक्वांदो असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि रेल्वे सुरक्षा बलाचे क्राईम इन्स्पेक्टर श्री संदीप ओंबासे हे उत्तराखंड येथे होणाऱ्या 38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (नॅशनल गेमस्) या साठी 4 फेब्रुवारी…

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाला भिवंडी-वाडा महामार्गावरून थेट जोडणी द्या

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना खासदार सवरा यांचे साकडे योगेश चांदेकर पालघरः खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. पालघर…

गणेश विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लंगडी संघात निवड

कल्याण : शिर्डी व कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या. शिर्डी येथे १८ वर्षे वयोगटा खालील तर कोपरगाव येथे १४ वर्षाखालील मुलांची स्पर्धा पार पडली. या स्पर्धांमध्ये कल्याण…

असंघटित कामगारांना शिधापत्रिका देण्याची कल्याण शहरात मोहीम

कल्याण : कल्याण शहर परिसरातील ई श्रम पोर्टल वरील नोंदणीकृत स्थलांतरित असंघटित कामगारांना शिधापत्रिका देण्यासाठी शासनाने आदेशित केल्याची माहिती कल्याण शिधावाटप नियंत्रण अधिकारी दत्तात्रय नागरे यांनी दिली आहे. कामगारांकडे शिधापत्रिका…

समाजसेवक कृष्णा पाटील कल्याण डोंबिवली आयकॉन पुरस्काराने सन्मानित

कल्याण : कल्याणपूर्वेतील समाजसेवक कृष्णा पाटील यांना आपल्या सामाजिक कार्याबद्दल पुढारी वृत्तपत्राच्या वतीने कल्याण डोंबिवली आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे कृष्णा पाटील हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर…

ठाण्यात 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान खाद्यजत्रा महोत्सव

ठाणे : विविध प्रकारचे महोत्सव भरविणारे महाराष्ट्र भूमी प्रतिष्ठान या संघातर्फे ठाण्यात महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती दर्शवणारा महोत्सव गावदेवी मैदान, ठाणे (प.) येथे ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान भरवण्यात येणार…

केडीएमसीच्या बोधचिन्हाचा गैर वापर करणा-या वाहनांवर कारवाई करा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आरटीओला पत्र कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बोध चिन्हाचा गैर वापर होत असल्याची तक्रार एका जागरूक नागरिकातर्फे करण्यात आली होती. त्या तक्रारीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष…