Category: ठाणे

Thane news

पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा, चिनी दोरा वापरण्यास ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध – सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे :महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, चिनी मांजा तथा सिंथेटिक-नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबविण्यात येत आहे. त्यासाठी,  प्रत्येक प्रभाग समितीत सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरिक्षक, स्वच्छता निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण २५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या मांजांच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण २५५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. मात्र, या तपासणीत एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, ८९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. पतंग उडवण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसेच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे. चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारिक चूरा केलेली काच, धातू किंवा अन्य तिक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. अशा धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातलेले आहेत. या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नसल्याने मल प्रणाली, जलनि:सारण बाधित होते. तसेच असे पदार्थ खाल्ल्याने जनावरांनाही इजा होते. तसेच, हा धागा विद्युत वाहक असल्याने वीज साहित्य आणि वीज उपकेंद्र यांच्यावरही भार येऊन वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे..या तपासणी दरम्यान, एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, ८९ हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यानी दिली.प्रतिबंधित सिंथेटिक, नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण, पुरवठा किंवा वापर याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर, pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदवता येईल. 0000

 पारोळामधील जिल्हापरिषद शाळेमधल्या गुणवंत विदयार्थ्यांना बक्षिसे भेट

 राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांचा स्तुत्य उपक्रम   कल्याण : नुकतीच पारोळा केंद्र समुहातील शाळांची डिसेंबर महिन्याची शिक्षण परिषद जि प उच्च प्राथमिक शाळा क्र २ पारोळा येथे गुणवत्तापुर्ण व उत्साहवर्धक वातावरणात केंद्र प्रमुख प्रदिप राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शाळेतील शिक्षिकांनी शिक्षणाचे महत्व सांगणारी भव्य सुंदर व आकर्षक रांगोळी शाळेच्या प्रांगणात साकारून सर्वांचेच लक्ष आकर्षित केले. शाळेच्या विदयार्थीनींनी अगळया वेगळ्या पद्धतीने व विविध वेशभुषा परिधान करीत ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून उपस्थित सर्वांची दाद मिळविली. आपण सदैव ज्या पर्यावरणात जीवन जगतो ते स्वच्छ, सुंदर, निर्मल असले पाहिजे. तसेच विद्यार्थी दशेपासुनच बालकांच्या मनावर पर्यावरण जतन, रक्षण व संवर्धन हे ध्येय बिंबविण्याचा शाळा शिक्षकांचा प्रयत्न दिसुन आला. झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा ही नाटिका अतिशय प्रबोधन करणारी विदयार्थ्यांनी सादर करून याबाबत जागृती केली. या सर्व २५ गुणवंत विद्यार्थ्यांना जि प शाळा क्र ३ पारोळा शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी आपल्या साने गुरुजी धडपडणारा आदर्श विद्यार्थी उपक्रम अंतर्गत रायटिंग पॅड देवुन प्रोत्साहित केले. शिक्षण परिषदेत अपेक्षित विषयांवर चर्चेत सर्वच शिक्षक यांनी सहभागी होवुन आपले त्या त्या विषयानुसार अनुभव कथन करून मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्याक रविंद्र पाटील, मंगला शिवदे, किशोर पाटील, मोहन बागुल, स्वाती देवरे, शितल पाटील, मयुरी पाटील, मंगला पाटील, स्नेहल वराडे, विठोबा महाजन या शिक्षकांनी विदयार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम बसवुन शिक्षण परिषदेचे उत्कृष्टपणे आयोजन केले. 000000

येऊरच्या डोंगरात ट्रेकिंगला गेलेल्या मुलांना मधमाशांचा चावा

 दहा मुलांची सुखरूप सुटका, तिघे गंभीर जखमी   ठाणे : येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या डाेंगरामध्ये अडकलेल्या ऋषी घोसाळकर (१८) याच्यासह दहा मुलांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सोमवारी दिली. ही मुले ट्रेकिंगसाठी डोंगरात गेली होती, त्यांना मधमाशा चावल्या. त्यामुळे  भीतीमुळे तिथेच अडकल्याची माहिती या मुलांनी सुटका झाल्यानंतर पोलिसांना दिली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास येऊरच्या जंगलात गेलेली १८ वर्षे वयोगटातील मुले अडकल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, अग्निशमन दलासह  टीडीआरएफ जवानांच्या मदतीने या मुलांची सुटका करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास  ऋषी याच्यासह समर्थ मयेकर (रा.  घणसोली, नवी मुंबई),  प्रणव परब (रा. विक्रोळी, मुंबई), वरद बासा (रा. विक्रोळी, मुंबई), सोहम देशमुख (रा. वैशाली नगर, श्रीनगर, ठाणे),  कुणाल पानमंद (रा. घाटकोपर, मुंबई), तन्मय नाईक (रा.  मुलुंड, मुंबई),  रोहन गरुड ( रा. मुलुंड, मुंबई), अलोक यादव (रा. कळवा, ठाणे) आणि  आर्य यादव (रा. कांजूरमार्ग, मुंबई) या दहा मुलांची डोंगरामधून सुखरूप सुटका केली. या  मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले, तसेच मधमाशा चावून गंभीर दुखापत झालेल्या समर्थ, वरद आणि सोहम या तिघांना  एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 00000

नववर्षाचे औचित्य साधून आजोबा गडावर राबवली स्वच्छता मोहिम

कल्याण : शंभुदुर्ग संघटनेच्या वतीने दरवर्षी नवीन वर्षाचे निमित्त साधून दोन दिवसीय गडकिल्ले स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येते.  दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा संघटनेच्या वतीने शहापूर तालुक्यातील आजोबा गडावर स्वछता मोहिमेचे…

 ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ११ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू

ठाणे : जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.  ठाणे गिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या मात्र नोव्हेंबर २००५ पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या शिक्षकांना यापूर्वी परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालयाने एका याचिकेत या शिक्षकांच्या सेवेबाबत पडताळणी करून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होते किंवा कसे याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने संबंधित शिक्षकांची सुनावणी घेऊन कागदपत्रे पडताळणी अंती या ११ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया नोव्हेंबर, २००५ पूर्वी सुरू झाल्यामुळे ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत विशेष पाठपुरावा प्रत्येक सोमवारी आढावा बैठक घेऊन शिक्षकांचा बराच काळ प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न जिल्हा परिषदे मार्फत करण्यात येत आहेत. कामकाजाचा वेळोवेळी पाठपुरावा होत असल्याने ११ शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.  याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथ) बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत. 000000

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर

ठाणे : राज्यात २०१४ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला असून जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील ४२६ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी…

वंचितांचा रंगमंच शहरी व ग्रामीण भागात अभिव्यक्ती प्रेरणेसाठी महत्त्वाचा – ॲड. इंदवी तुळपुळे

ठाणे : ठाण्यासारख्या मोठ्या शहरातील वस्ती मध्ये विचारांना चालना देणारा वंचितांचा रंगमंच उपक्रम ११ वर्ष सातत्याने चालू राहणे हे त्या समाजातील मुलांच्या वैचारिक प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे आहे. छोटी शहरे आणि…

मुरबाड रस्त्यावरील लांबलचक खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त

कल्याण – कल्याण शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड-शहाड रस्त्यावर प्रेम ऑटो चौक येथे काही यंत्रणांनी भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खोदून ठेवले आहे. खोदाई केलेला भाग पेव्हर ब्लॉक किंवा काँक्रीटने…

अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा दिमाखात सुरू

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तर्फे आयोजित केलेल्या काॅक्वेस्ट २०२४ या अंध खेळाडूंच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस आज सेंट्रल मैदानावर दिमाखात सुरूवात झाली. ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा…

२५वी रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा

अथर्व सोनीला विजेतेपद ठाणे : आपल्यापेक्षा सरस गुणांकन असलेल्या वरिष्ठ बुद्धिबळपटूंना मागे टाकत १५ वर्षीय अथर्व सोनीने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आयोजित २५ व्या रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. स्पर्धेत अव्वल स्थान पटकावताना अथर्वने सात फेऱ्यांमध्ये साडे सहा गुणांची कमाई करत पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस आपल्या खिशात टाकले. अनिरुद्ध पोतवाड आणि ऋषी कदम अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. सहाव्या फेरीअखेर विजेतेपदासाठी चुरस निर्माण झाली होती. साडे पाच गुण असलेल्या अथर्वने सातव्या फेरीत फिडे मास्टर  अनिरुद्ध पोतवाडला मात देत विजयासह आपले वर्चस्व राखले. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी चौघांमध्ये चढाओढ होती. सहा गुणांसह बरोबरीत असलेल्या अनिरुद्ध आणि ऋषीने  जास्त गुणाकणांची नोंद करत इतरांना मागे टाकले. वडील सत्यभान सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व वयाच्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळाचे धडे गिरवत आहे. अथर्व बदलापूर येथील एअरसन इंग्लिश स्कुलमध्ये नवव्या इयत्तेत शिकत आहे. स्पर्धेत दीडशेहून अधिक बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. त्यात ७७ आंतरराष्ट्रीय गुणांकन असलेल्या बुद्धीबळपटूंचा समावेश होता. स्पर्धेतील इतर निकाल : ८ वर्षे वयोगट मुले : शिवांश करीआ, निवेश पांचाळ, सात्विक प्रधान. मुली : मिराई सरदाना, डेलिया खैरनार, मनवा पारकर. ११ वर्षे वयोगट मुले : आराध्य पार्टे, नीद्वयुष आनंद, आर्यन पांडे. मुली : मेहूली मुखर्जी, त्रिशा पांचाळ आराध्या धेंडे. १५ वर्षे वयोगट : सोनी अथर्व, विवान सरदाना, हिंदोळ घोष. मुली : गिरिशा पै, जीअना धरमसी, महती रामकुमार. सर्वोत्तम वयस्कर बुद्धिबळपटू : अनिल सनदांशी. सर्वोत्तम महिला खेळाडू : वनश्री कुन्नेकर. बिगर गुणांकित : ऋषी मोटवानी.