Category: ठाणे

Thane news

सुधागड तालुका आमदार सन्मान चषक

श्री स्वयंभु हनुमान क्रीडा मंडळ चिवे संघ विजेता ठाणे ः भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व सन्मान फाउंडेशन आयोजित सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आमदार चषक रविवारी कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान, चंदनवाडी येथे संपन्न झाली. दिवसभरात 32 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना चिवे विरुद्ध झाप असा रंगला. अतितटीच्या लढतीत चिवे – झाप अंतिम गुणफलक नोंदवून चिवे – श्री स्वयंभु हनुमान क्रीडा मंडळ या संघाने 12-11 असा विजय मिळवला. विजेता संघाला प्रथम पारितोषिक सन्मान चिन्ह व रोख 21000/- रुपये देण्यात आले. द्वितिय पारितोषिक झाप – श्री नाथभैरव क्रीडा मंडळाने पटकावत 15 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह जिंकले. तृतीय क्रमांक पारितोषिक ओम काळभैरव आपटवणे संघ ठरला. त्यांना रोख पारितोषिक 10 हजार रुपये व सन्माचिन्ह देण्यात आले. श्री भैरवनाथ नागशेत क्रीडा मंडळ चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरला. त्यांनाही रोख पारितोषिक 10 हजार रुपये व सन्माचिन्ह देण्यात आले. विजेत्यांना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश मापारा, पेण सुधागड राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील, शिवसेना नेते प्रकाश देसाई, परिवहन सदस्य विकास पाटील, अनिल भोईर, गणपत डिगे, प्रकाश शिलकर, आयोजक रमेश सागळे, भाजपा ठाणे शहर महिला चिटणीस रेवती सागळे, ज्ञानेश्वर यादव, यांच्यासाह सुधागड वासी मोठया संख्येने उपस्थित होते. वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट पकड झाप संघाचा कल्पेश देशमुख, उत्कृष्ट चढाई ओम काळभैरव आपटवणे संघाचा समाधान मोरे, पबिलक हिरो श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत संघाचा राज बेलोसे, सर्वोत्कृष्ट खेळाडू चिवे संघाचा अमर ठाकूर ठरला. शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक श्री. भैरवनाथ जोगेश्वरी आतोणे सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय केळकर, आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले व ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उद्योजक अच्युत दामले, पालीचे नगरसेवक पराग मेहता, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर, माजी अध्यक्ष गणपत सितापराव, संचालक प्रा. बळीराम निंबाळकर सर, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे सल्लागार चंद्रकांत बेलोसे, उद्योजक गणेश दंत, उद्योजक चारुदत्त सावंत, ज्येष्ठ पत्रकार संतोष उतेकर, ज्येष्ठ नगरसेवक संदीप लेले, ज्येष्ठ संपादक कैलाश म्हापदी, भाजपा ठाणे शहर सरचिटणीस सचिन पाटील, उद्योेजक ओमकार साजेकर,  कल्याण-डोंबिवली सुधागड तालुका अध्यक्ष यशवंत कदम, चिवे गावचे सरपंच रोहिदास साजेकर, उद्योजक प्रवीण खाडे, उद्योजक स्वप्नील पायगुडे, टेंभीनाका शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उद्योजक संतोष तोडकर, धीरज साजेकर, सखाराम आंबेकर, सुर्यकांत साळुंखे, भाजपा ठाणे शहर सचिव संतोष साळुंखे, भाजपा ठाणे शहर चिटणीस माधुरीताई मेटांगे, रंजना खाडे, कोकण पदवीधर संयोजक सचिन मोरे, शिवाजी दळवी, शिवसेना उपविभागप्रमुख सिद्धु यादव, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष विक्रम भोईर, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, भार्जे गावचे सुभाष मुंडे, सुजित बारस्कर, भाजपा ओबीसी सेलचे कृष्णा भुजबळ, राजेश कवे, पी. आय. संतोष धाडवे, शिवाजी दळवी, निलेश महाडीक, महेश सितापराव, उद्योजक संजय सागळे, नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली अध्यक्ष जयेश ठाकूर यांच्यासह ठाणे, रायगड, मुंबई, पुणे जिल्ह्यातून सुधागडवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजक रमेश सागळे, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, सुनिल तिडके, राकेश थोरवे, अविकांत साळुंके, जयगणेश दळवी, धनंजय खाडे, प्रविण बामणे, ज्ञानेश्वर यादव, अजित सागळे, सुधीर नेमाणे, सखाराम चव्हाण, रविंद्र चव्हाण, सुहास यादव, दत्ता यादव, गजानन केदारी, विजय जाधव, अजय जाधव, चंद्रकांत बेलोसे, दत्ता सागळे, श्याम बगडे, जनार्दन घोंगे, सुरेश शिंदे, अनिल सागळे, दिनेश बुरुमकर, गजानन जंगम, हरिश्चंद्र मालुसरे, मोहन भोईर, राम भोईर भगवान तेलेगे यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. केतन म्हस्के व अलंकार मनवी यांच्या उत्कृष्ट सुत्रसंचलनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. दिवसभरात उपस्थितांच्या मनोरंजनासाठी बल्लाळेश्वर म्युझिकल ग्रुप आणि रिदम म्युझिक अ‍ॅकेडमीच्यावतीेने मराठी वाद्यवृंदाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायक नथुराम शिंदे, किशोर शिलकर, समीर दंत, नुतन सावंत, प्रतिक्षा भणगे (शिलकर), ढोलकीपटु तेजस मोरे व बालशाहीर – गायक सौजस मोरे यांनी सुमधूर गायनाने रसिकांची मने जिंकली. गायक किशोर शिलकर यांनी आयोजक रमेश सागळे यांच्या जीवनावर वैयक्तिक तयार केलेले गीत सादर केले व सौजश मोरे यांनी कबड्डडीसाठी तयार केलेले गाणे सादर केले. शेवटी आयोजक रमेश साबळे यांनी उपस्थितीत मान्यवर, सुधागड तालुका रहिवासी, ठाणेकर, खेळाडु, पंच आणि पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

पूर्णपात्रे व  सुखटणकर दुहेरीचे राज्य विजेते

महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप ठाणे : नुकत्याच ठाणे येथे झालेल्या Yonex Sunrise महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024-25 स्पर्धेत मुंबईच्या  मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर यांनी 65 वर्षे वर्षावरील दुहेरीचे राज्य विजेतेपद पटकाविले.  त्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांनी मुंबईच्या कुमार हिंदुजा व रमण Venkatkrshanan यांचा 19-21, 21-19 व 21-17  अशा अटीतटीच्या लढतीत पराभव केला़.  या स्पर्धा ठाणे शहर व ठाणे जिल्हा यांनी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली  घेण्यात आल्या.   या प्रसंगी  मिलिंद पूर्णपात्रे     यांनी गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने उत्तम कामगिरी केल्या बद्दल तसेच प्रशिक्षक व संघटक म्हणुन जी कामगिरी करून बॅडमिंटन चा प्रसार करण्यास हातभर लावला  त्याबद्दल श्री  श्रीकांत वाड,  महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन चे सेक्रेटरी यांच्या हस्ते  मिलिंद पूर्णपात्रे यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

‘आरटीई’ प्रवेशासाठी २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

ठाणे :‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ३१ हजार ७०४ अर्ज आले आहेत.‌ १४ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तरी बालकांच्या पालकांनी २ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार(आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal या वेबसाईटवर दि. २ फेब्रुवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे.

भांडुप परिमंडलात २२१२ रोहित्र झाले स्वच्छ

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपक्रम; १३३ उपकेंद्र, २६५ कार्यालयांचीही साफसफाई ठाणे : भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त परिमंडलातील रोहित्र (डीपी), उपकेंद्र आणि कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत १८९८ कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांनी परिमंडलातील २२१२ रोहित्र, १३३ उपकेंद्र आणि २६५ कार्यालयांची साफसफाई केली. महावितरणच्या या उपक्रमाचे वीज ग्राहकांनी स्वागत व कौतुक केले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आखण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्यासह कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण रहांगदळे, नमिता गझदर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र बागुल यांच्यसासह ३५ जणांनी सक्रिय सहभाग नोंदवत भांडुप परिमंडल कार्यालयाची साफसफाई केली. तर ठाणे मंडल कार्यालयांतर्गत भांडुप, मुलूंड, ठाणे शहर एक आणि दोन, वागळे इस्टेट विभागात ४५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १३८७ रोहित्र, ४७ उपकेंद्र आणि ६१ कार्यालयांची स्वच्छता केली. वाशी मंडल कार्यालयातील नेरुळ, वाशी आणि पनवेल शहर विभागात ५५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०८ रोहित्र, ४८ उपकेंद्र आणि ५५ कार्यालयांमध्ये साफसफाई केली. पेण मंडल कार्यालयांतर्गत अलिबाग, गोरेगाव, रोहा व पनवेल ग्रामीण विभागातील ८६१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ७१५ रोहित्र, ३७ उपकेंद्र आणि १४८ कार्यालयांमध्ये स्वच्छता केली. यात रोहित्रांच्या भोवती वाढलेल्या वेली, झाडांच्या फांद्या आदी हटविण्यात आल्या. याशिवाय वाढलेले गवत रोहित्राच्या सभोवतीचा कचरा साफ करण्यात आला. शहरी भागात विविध सोसायट्यांमधील रोहित्रांच्या स्वच्छतेसोबतच काही ठिकाणी रोहित्र व वितरण पेट्यांना रंगरंगोटीही करण्यात आली. यातून रोहित्र परिसरातील अपघात टाळण्यास व परिसरातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत मिळेल. मुख्य अभियंता श्री. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंते राजाराम माने, संजय पाटील व युवराज मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली.

शिवसेना उबाठा शिव आरोग्य सेनेच्यावतीने डायलेसीस रुग्णांना औषधे व श्रवणयंत्र वाटप

ठाणे – धर्मवीर आनंद दिघे जयंतीदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत…

ठामपाचे रेबीजमुक्त ठाणे अभियान

१० हजार भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य अनिल ठाणेकर ठाणे : महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘रेबीजमुक्त ठाणे’ अभियान राबविण्यात येत आहे. रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे तसेच रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे, यासाठी हे अभियान राबिवण्यात येणार आहे. या अभियानात २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या काळात दहा हजार भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. गेल्यावर्षी सात हजाराहून अधिक श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले होते. या उपक्रमात, ठाणे सीपीसीए, इंडियन सोसायटी फॉर व्हेटनरी ॲनिमल प्रोटेक्शन, सिटीझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, व्हीटीईएएमएस आणि पीएडब्ल्यू आशिया या संस्थाचे सहकार्य मिळणार आहे. भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा मृत्यूचे प्रमाण २०३०पर्यंत शुन्यावर आण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विशेष अभियान राबवून त्यात भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येते. गेल्यावर्षी ठाणे महानगरपालिकेने ७ हजार ४०९ भटक्या श्वानांना रेबीजची लस दिली होती. यंदाच्या वर्षातही पालिकेकडून हे अभियान राबविण्यात येईल. ठाणे महापालिका क्षेत्रात या वर्षी दहा हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लसीकरणासाठी एकूण २५ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डाॅक्टर आणि तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भटक्या श्वानांकडून चावा घेण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भागांची माहिती शहरातील नागरिक तसेच प्राणी मित्रांकडून जमा करण्यात आली असून त्याआधारे विभागवार लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे, अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी दिली.

माती नसल्याने ठाण्यातील मुख्य स्मशानभूमीत अर्भकांचा दफनविधी बंद !

ठाणे शहरातील मध्यवर्ती  स्मशानभूमीमध्ये मातीचा पुरवठा करण्यात येत नसल्याने येथे अर्भकांचा दफनविधी करण्यात येत नसल्याचे उघडकीस आले आहे. येत्या दोन दिवसात येथे दफनविधी सुरू न केल्यास ठामपा मुख्यालयात आंदोलन छेडण्याचा…

कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत ५ बांगलादेशी नागरीकांवर कारवाई

कल्याण मधील मानपाडा व महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन पोलीसांची कारवाई कल्याण : पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरीकांवर कारवाईची मोहिम परिमंडळ ३ कल्याण हद्दीत सुरु असुन पोलीस…

कोळसेवाडी पोलिसांचे व्यापाऱ्यांना मार्गदर्शन

कल्याण : कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील ज्वेलर्स असोसिएशन व व्यापारी यांची  बैठककल्याण पूर्वेतील प्रसाद हॅाटेल येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम…

डॉ. संदीप माने, मनोज सानप डॉ.अविनाश भागवत यांची ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ म्हणून राज्यस्तरीय निवड

अशोक गायकवाड ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने *उल्लेखनीय कार्याबद्दल आपल्या ठाणे जिल्हा समन्वय समितीस तसेच आपल्या कार्यकारिणीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, सरचिटणीस तथा जिल्हा…