मुरबाड शहराचा होतोय ‘उडता पंजाब’
राजीव चंदने मुरबाड : संपूर्ण मुरबाड शहरात व तालुक्यात छुपा पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू याबाबत तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुरबाड पोलिस प्रशासनाला खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत…
Thane news
राजीव चंदने मुरबाड : संपूर्ण मुरबाड शहरात व तालुक्यात छुपा पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू याबाबत तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुरबाड पोलिस प्रशासनाला खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत…
मुंबई : बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्कांऊटरप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभगाला (सीआयडी) चांगलेच झापलं. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने…
शिंदे ठाण्यात, अजित पवार दिल्लीत स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेत एतिहासिक विजय मिळवून १० दिवस उलटल्यानंतरही महायुती अजूनही सत्ता स्थापन करू शकलेले नाही. आधी मुख्यमंत्रीपदावरून आणि आता गृह खात्यावरून महायुतीत कलह…
ठाणे : क्षमा पाटेकर आणि निव्या आंबरेच्या अष्टपैलू खेळामुळे गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखान्याचा १३१ धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या मर्यादित ४० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दणदणीत पराभव केला. राजावाडी क्रिकेट क्लबने ५ बाद २३६ धावांचा बचाव करताना माटुंगा जिमखान्याला ३३ षटकात १०५ धांवावर गुंडाळत दुसऱ्या फेरीतले स्थान निश्चित केले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय माटुंगा जिमखान्यासाठी फायदेशीर ठरला नाही. क्षमा पाटेकर आणि निव्या आंबरेने अर्धशतकी खेळी करत संघाच्या द्विशतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. क्षमाने १२ चौकारासह ६३ धावांची खेळी केली. निव्याने नऊ चौकार मारत ५३ धावा केल्या. दिक्षा पवारने नाबाद ३३ आणि किमया राणेने २४ धावा केल्या. माटुंगा जिमखान्याच्या त्रिशा परमारने दोन, समीक्षा घाडगे, अनन्या शेट्टी आणि रेनी फर्नांडेझने प्रत्येकी एक बळी मिळवले. उत्तरादाखल राजावाडी क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवताना थोड्या थोडया धावांच्या फरकाने फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवून विजय साकारला. पराभूत संघाकडून रेनी फर्नांडेझने सर्वाधिक २७, तिशा कपूरने नाबाद १७ आणि गार्गी बांदेकरने १७ धावा करत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली. विजयी संघाच्या क्षमा पाटेकर, वैष्णवी पोतदार, निव्या आंबरे आणि तनिशा धनावडेने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. निवेदी जैतपालने एक बळी मिळवला. क्षमा पाटेकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. संक्षिप्त धावफलक : राजावाडी क्रिकेट क्लब : ४० षटकात ५ बाद २३६ ( क्षमा पाटेकर ६३, निव्या आंबरे ५३, दिशा पवार नाबाद ३३, किमया राणे २४, त्रिशा परमार ७-१-३२-२, समीक्षा घाडगे ३-१९-१, अनन्या शेट्टी ८-३८-१, रेनी फर्नांडेझ ८-५३-१) विजयी विरुद्ध माटुंगा जिमखाना : ३३ षटकात सर्वबाद १०५ ( रेनी फर्नांडेझ २७, तिशा नायर नाबाद १७, गार्गी बांदेकर १७, निव्या आंबरे ८-१-२१-२, क्षमा पाटेकर ५-२०-२, वैष्णवी पोतदार ५-२२-२, तनिशा धनावडे ५-२१-२, निवेदी जैतपाल ४-९-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – क्षमा पाटेकर.
ठाणे : मुरबाड तालुक्यातील म्हसा येथे नुकतेच ‘ग्रीन ग्रो आगरो अॅग्रो सोल्यूशन’चा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्रालय बँकेचे उपाध्यक्ष श्री.सुनील खाडे उपस्थित होते. त्यांच्या…
शिवसेना नेते विनायक राऊत यांचे वक्तव्य ठाणे : विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांनी यंत्रणेचा वापर करून विजय मिळवला, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता झालेला पराभव विसरुन कामाला लागले पाहिजे. कारण, गुजरातच्या लबाडांचे लक्ष ठाणे, मुंबई महापालिकेवर असल्याने सर्वांनी जागृत रहा आणि कामाला लागा असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी ठाण्यातील पदाधिकारी – कार्यकर्त्यांना केले. ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवासेना कार्यकर्त्याचा मेळावा ठाण्यातील खारकर आळी येथील एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मेळाव्याला संबोधित करत, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमधील पराभव विसरुन आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. ते पुढे म्हणाले, चोरांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडायचा असेल तर, एकजुटीने काम करा. महापालिका निवडणुका कधीही लागू द्या आतापासूनच कामाला लागा आणि ठाणे महापालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच भगवा फडकवा असे आवाहन देखील विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना केले. या निवडणूकीत पैसा आणि यंत्रणेचा वापर कसा झाला हे सर्वांनी पाहिले. विरोधकांनी या निवडणूकीत सरळ मार्गे विजय मिळवलेला नाही. त्यामुळे ही लोक म्हणजे सत्तेला चिकटलेली गोचीड आहे, अशी टीका देखील राऊत यांनी केली. तसेच शिवसेना संपलेली नाही आणि संपवणाऱ्यांची अवलाद देखील जन्माला आली नाही, त्यामुळे घाबरू नका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन विनायक राऊत यांनी उपस्थितांना केले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक विश्वास उटगी, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते अनिश गाढवे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, सहसचिव विश्वास निकम, ठाणे शहर समन्वय संजय तरे, संपर्कप्रमुख महेश नेणे, काँगेसचे जेष्ठ नेते मधु मोहिते, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटिका रेखा खोपकर, उपजिल्हा संघटिका संपदा पांचाळ, महेश्वरी तरे, आकांक्षा राणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ईव्हीएममुळे विरोधकांचा विजय झाला आहे. त्यामूळे खचून जाऊ नका, ठाणे महापालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा भगवा फडकवायला तयार रहा, असे आवाहन यावेळी शिवसेना नेते राजन विचारे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. तर, ही निवडणूक आपल्याला खूप काही शिकवून गेली. जेव्हा प्रचार करताना आम्ही फिरत होतो. तेव्हा ठाणेकर जोरदार स्वागत करत होते. अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव दिसून आला. मात्र, यामधून समजले हे ठाणे शिवसेनेचे होते आणि पुढे देखील शिवसेनेचेच राहील, असे मत शिवसेना (उबाठा) पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या ठाणे : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने जागतिक एड्स दिन-२०२४ जनजागृतीपर प्रभात फेरी व विविध…
ठाणे – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या धोरणानुसार सन 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे योजिले आहे. जिल्हा ठाणे मधील क्षयरुग्ण परिणामकारक बरे होण्याची टक्केवारी सन 2023 – 95 टक्के…
जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये आवाहन ठाणे : ठाणे जिल्ह्यात ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच 8 डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या दोन्ही मोहिमांची तयारी पूर्ण झाली असून आरोग्य यंत्रणांनी दोन्ही मोहिमा प्रभावीपणे राबवावी व एकही बालक यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आज जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत करण्यात आले. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम व उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम तसेच नियमित लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांच्यासह जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमा यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांला जंतनाशकाची गोळी देण्यात यावी. तसेच यासाठी सर्व शासकीय शाळा, खासगी शाळांमध्ये योग्य ती खबदारी घेण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांनाही जंतनाशक गोळ्या तसेच पोलिओ डोस मिळेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या विट भट्टी परिसरातील नागरिकांच्या मुलांनाही जंतनाशक गोळ्या व पोलिओ डोस देण्यात यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ ते १९ वर्षे वयोगटातील चार लाख ५६ हजार ३५२ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला – मुलींमध्ये अॅनेमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे इत्यादी आजारांचा धोका उद्भवतो. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी जंतनाशकाची गोळी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे. महिला व बालविकास विभाग, पाणी पुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग तसेच शिक्षण विभागाच्या एकत्रित सहभागाने व समन्वयाने संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात हा कार्यक्रम शाळा व अंगणवाड्यामध्ये ४ डिसेंबर २०२४ व जंतनाशक मोहिमेच्या दिवशी जी मुले उपस्थित राहणार नाहीत त्यांना १० डिसेंबर २०२४ रोजी (मॉप अप दिवशी) गोळ्या देण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन स्तरावर प्रशिक्षण दिले असून सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नोडल शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
ठाणे :’ भूतलावर तन-मन-धन ओतून रेखाटलेली माझी रांगोळी अल्पायुषी आहे. उद्या ती पुसली जाणार आहे. याची जाण असुनही रंगावळीकार रांगोळ्या काढताहेत दुसऱ्याला नेत्रसुख देताना स्वत: कलाविष्काराचा आनंद या श्री आनंद…