Category: ठाणे

Thane news

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

ठाणे, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या यशासाठी पंचायत समिती शहापूरचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी शिवानी पवार यांची प्रेरणा व केंद्रप्रमुख डॉ. विलास वेखंडे यांचे केंद्रातील दरमहा परीक्षा नियोजन व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सी. बी. एस. सी. ई पॅटर्न च्या धर्तीवर बारावी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. या परीक्षेत शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टे, केंद्र ठुणे या शाळेने घवघवीत यश संपादन करत यशाचा चौकार लगावला आहे. शाळेचे तब्बल चार विद्यार्थी कु. हरिचंद्र रवि वाख, कु. प्राची लक्ष्मण विशे, कु. साई वाळकू झुगरे आणि कु.वैभव गुरूनाथ विशे या गुणी विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत निवड झाली आहे. शैक्षणिक वर्षे २०२३ – २०२४ या वर्षाची नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षा २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली होती. या परीक्षेचा निकाल दि.३१ मार्च रोजी जाहीर झाला आहे. दुर्गम भागातील एक छोटी शाळा असूनही नवोदय परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थी व आष्टे शाळा तसेच शिक्षकवृंद आष्टे यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यामध्ये मार्गदर्शक शिक्षक भगवान वरकुटे व राजाराम वेखंडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली आहे. शाळेच्या या घवघवीत यशात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ मंडळ आष्टे यांचे तसेच आदिवासी उन्नती मंडळ मुंबई, नॉलेज अकॅडमी शहापूर, जाणीव प्रतिष्ठान शहापूर, शिक्षक नेते स्व. काशिनाथ भोईरसर प्रतिष्ठान, दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

कल्याण लोकसभेत राष्ट्रवादीला भविष्यात ताकद देण्याची श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

डोंबिवली : मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप शिवसेनेसोबत नव्हती. परंतु आता आपली महायुती आहे. त्यामुळे यावेळी मताधिक्याचा आकडा देखील तेवढाच राहिला पाहिजे. लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत ही महायुती अशीच…

बदलापूरमधील सोसायट्यांमध्ये कपिल पाटील यांचा रहिवाशांशी संवाद

शिवसेनेच्या नेत्यांसह नगरसेवकांचीही उपस्थिती बदलापूर : केंद्रीय राज्यमंत्री व भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी कुळगाव-बदलापूर शहरातील विविध रहिवाशी सोसायट्यांमधील सदस्यांबरोबर आज रविवारी संवाद साधला. या दौऱ्यात शिवसेनेचे…

मोदी सरकारने व राज्यातील महायुती सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा – आनंद परांजपे

२० मेला आपल्याकडे मतदान आहे ४० ते ४२ दिवसच आता आपल्या हातात उरलेले आहेत. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेबांनी देशातील महिलांसाठी महिला धोरण आणले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…

या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला ५ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य  – प्रताप सरनाईक

ओवळा माजीवडा मतदारसंघातील लोकांनी २००९, २०१४ व २०१९ असे तीनदा मला प्रचंड मताधिक्याने निवडून विधानसभेत निवडून पाठविले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी २२ महिन्यापूर्वी एक फार मोठा निर्णय घेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र…

नरेंद्र मोदी यांनी १ कोटी महिलांना ड्रोन प्रशिक्षण दिले तर महाराष्ट्रात तीन लाख कोटींची गुंतवणूक आणली – दीपक केसरकर

अनिल ठाणेकर ठाणे : नरेंद्र मोदी यांनी १ कोटी महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण दिल्याने ते हवेत ड्रोन उडवतात, शेतीमध्ये फवारणी करतात. महिलांना शक्ती देणारे मोदी सरकार आहे तर महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात…

 कपिल पाटील यांच्या उपस्थितीत मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपात

 भिवंडीत भाजपाला वाढता प्रतिसाद भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाला वाढता प्रतिसाद मिळत असून, केंद्रीय राज्यमंत्री व भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा उबाठा गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करीत कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५१ टक्के मते मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीतील उबाठा गटातील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र दिपचंद्र घरत, कोमल राकेश पाटील, भाग्यश्री भारत पाटील, माजी उपसरपंच भालचंद्र शांताराम घरत, संगीता दिपचंद्र घरत, भारत गुरुनाथ पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत करून आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा निर्धार केला. या वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील आदींची उपस्थिती होती. मनसेच्या भिवंडी तालुक्यातील खारबाव गाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. खारबावच्या उपसरपंच जयमाला पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दर्पण पाटील, घनश्याम कारभारी, अजय जाधव, मिलिंद खंडागळे यांच्यासह शेकडी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशासाठी तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे यांच्यासह भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते योगेश पाटील, विजय मुकादम, देवा पाटील, प्रफुल्ल तांगडे यांनी पुढाकार घेतला. या वेळी भाजपाचे पदाधिकारी श्रीकांत गायकर यांचीही उपस्थिती होती.

गणपत गायकवाड- श्रीकांत शिंदे वादाची पुन्हा ठिणगी

गायकवाड समर्थकांचा शिंदेंचे काम न करण्याचा निर्धार कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल किंवा कमळ चिन्हावर लढणारा कोणीही उमेदवार असेल त्याचेच काम करण्याचा निर्धार कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी शुक्रवारी रात्री घेतला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा इशारा भाजप कल्याण पूर्वच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. आमदार गायकवाड यांचे समर्थक हे भाजपा कार्यकर्ते आहे असे आम्ही मानत नाही. त्यामुळे भाजपाचा आम्हाला विरोध आहे असे मानण्याचे कारण नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. कल्याण पूर्वचे शहरप्रमुख खासदार शिंदे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यापासून आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. शहरप्रमुख गायकवाड यांच्या कृत्यामुळे आमदार गायकवाड यांना गोळीबार आणि तुरुंगात जावे लागल्याची भाजप कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार किंंवा कमळ चिन्हावर लढणारा उमेदवार असेल तर त्याचे काम आम्ही करू अशाप्रकारचे सह्यांचे एक निवेदन आमदार गायकवाड समर्थकांकडून भाजप प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात येणार आहे, असे एका आमदार गायकवाड समर्थकाने सांगितले. कोणत्याही परिस्थितीत कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी कार्यकर्ता हा श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही, अशी चर्चा आम्ही केली असल्याचे या कार्यकर्त्याने सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड झिंदाबाद अशी जोरदार घोषणाबाजी केली. कल्याण पूर्व भागात आमदार गायकवाड यांची सुमारे एक लाखाहून अधिकची मते आहेत. त्यामुळे या मतांच्या बेगमीचा विचार करून भाजपने कल्याण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. कल्याण पूर्व भागात भाजप कार्यकर्त्यांनी काय, कुठे बैठक घेतली याची आपणास माहिती नाही. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील घरी झालेल्या बैठकीत महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे ठरले आहे. त्यामुळे कल्याण पूर्वत कोणी काय निर्णय घेतला आहे. हे पहावे लागेल. आमदार गायकवाड यांना कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे १०० टक्के समर्थन आहे. त्यांच्या समर्थनार्थ कोणी काही मागणी केली तर त्यात गैर काही नाही. ती प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. – नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, भाजप, कल्याण जिल्हा. आमदार गणपत गायकवाड हे आमचे मार्गदर्शक आहेत. आमदार गायकवाड यांना जामीन होत असताना तो होउ  नये म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांनी विशेष वकील उभा केला. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्या जामिनीचे काम होउ  शकले नाही. खासदार शिंदे हे आमच्या नेत्याच्या विरोधात काम करत असतील तर आम्ही पण त्यांना का सहकार्य करावे. – संजय मोरे, अध्यक्ष, भाजप कल्याण पूर्व मंडल.

मुख्य रस्त्यांसह नियमितपणे अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता होईल यादृष्टीने सफाई करावी : आयुक्त सौरभ राव

तलावपाळी परिसरातील नागरिकांशी साधला संवाद ठाणे : नौपाडा परिसरात आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६.३० वाजल्यापासून सर्वंकष स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली. श्रीकौपिनेश्वर मंदिर, भाजी मंडई परिसर, जांभळीनाका परिसर, स्टेशन रोड तसेच तलावपाळी परिसरातील साफसफाई करुन परिसर पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आला. भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, नौपाडा परिमंडळचे उपायुक्त् शंकर पाटोळे, उपायुक्त अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केस्वावानी, सहायक आयुक्त सोपान भाईक, वैदकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत त्यांनी स्वत: हातात झाडू घेवून अंतर्गत रस्त्यांची, गल्ल्यांची साफसफाई केली. यावेळी कौपिनेश्वर मंदिर ते मराठी ग्रंथ संग्रहालय परिसराची पाहणी केली. या परिसरातील दुकानांच्या पाठी असलेल्या छोटया गल्ल्यांची सफाई केली. तसेच मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत गल्ल्यांही नियमित स्वच्छ करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच तलावपाळी येथील सॅटिस पुलाच्या खाली असलेले राडारोडा त्वरीत उचलण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. नागरिकांशी साधला संवाद तलावपाळी परिसरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नियमितपणे फूटपाथची सफाई होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, तलावपाळी परिसरात काही नागरिक हे कबुतरांना दाणे खायला घालतात, त्यामुळे परिसर अस्वच्छ होतोच, परंतु कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो. त्याचप्रमाणे रस्त्यांवर पाळीव प्राणी घेवून येणारे नागरिक हे प्राण्यांची विष्ठा उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या. यावर आयुक्तांनी याबाबत निश्चितच उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी कबुतरांना दाणे घातले जातात त्या परिसरात फलक लावण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ॲम्फीथिएटरची केली पाहणी तलावपाळी परिसरात सेंट जॉन शाळेच्यासमोरील भागात महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ॲम्फीथिएटरची पाहणी केली. यावेळी येथील नागरिकांशी नियमित स्वच्छता होते का याबाबत विचारणा करीत आयुक्त सौरभ राव यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेबाबत नागरिकांनी महापालिकेचे कौतुक केले. परंतु रस्त्यावर फेरीवाले व त्यांचे कुटुंबीय झोपत असून सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे सांगत यावर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. या बाबीची दखल घेवून रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांना निवारा शेडमध्ये पाठविता येईल का याबाबतची चाचपणी करुन फूटपाथ नागरिकांसाठी मोकळे राहतील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबधितांना दिल्या.

कल्याणमधून उभे राहण्याची वल्गना करणारे गेले कुठे? : डॉ. श्रीकांत शिंदे

अंबरनाथ : कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी उभे राहण्याची वल्गना करणारे नेते गेले कुठे? असा सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना विचारलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉ. शिंदे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी शनिवारी अंबरनाथच्या खेर विभागातील हेरंब मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिराचे अध्यक्ष अभय सोमण यांनी त्यांचे स्वागत केले. कल्याण मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे निवडणुकीला उभे राहण्याची कुणाची हिम्मत झाली नाही, मतदारसंघातील नागरिक विकासकामे आणि महायुतीच्या पाठीशी उभे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वजण काम करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सोबतच कल्याण मतदारसंघात महायुतीमध्ये चांगले वातावरण आहे. वातावरण बिघडविण्याचे काम कुणी करत नाही आणि करत असल्यास वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांसारख्यांची नावे कल्याणमधून चर्चेत होती, मग ही नावे गेली कुठे, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, परशुराम उगले, निखिल चौधरी, विजय पाटील, मंदिराचे पदाधिकारी रत्नाकर चांदस्कर, नीलेश पाताडे उपस्थित होते.