Category: ठाणे

Thane news

मुंबई महापालिकेच्या पेन्शनर्स असोसिएशनचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ संपन्न

 गुणवंतांनाही केले सन्मानित   ठाणे :   बृहन्मुंबई  महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने नुकताच  स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा ठाणे शाखेच्या वतीने ज्ञानराज सभागृह ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास  असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर, कार्यवाह डॉ. मारुती नलावडे, ठाणे जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिरीष नागले, संमेलनाध्यक्षा ज्योत्स्ना फडके, तुषार पारखी, भास्कर देशपांडे व्यासपीठावर  उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवानिवृत्त गुणवंत स्मिता पाटील, चंद्रकांत खामकर, माया सावंत, प्रिया खरबंदा, सुनीती सिन्नरकर यांना  याप्रसंगी गौरविण्यात आले. तसेच सुषमा भागवत दिग्दर्शित “वाह ! गुरू” नाटकातील एक प्रवेश सादर करण्यात आला. दिपाली केळकर यांच्या “गप्पांच्या गावा जावे” या रंगतदार कार्यक्रमाने उपस्थितांची  मने जिंकली. रवी मोरे, मिलिंद भागवत, विकास कुंटे  शिरीष सराफ, प्रताप जाधव, प्रकाश मोरये यांच्या बहारदार गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना शिर्के, अलका जोशी, घनश्याम दीक्षित यांनी केले. 00000

आजपासून रंगणार पाचवी अर्जुन मढवी स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा

ठाणे :  डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी महिलांच्या क्रिकेट स्पर्धेला आजपासून (सोमवार) सुरुवात होत आहे. यंदा प्रथमच स्पर्धेतील सामने मर्यादित ४० षटकांचे खेळवले…

ठाण्याच्या सुभेदारीसाठी शतप्रतीशतचा नारा

भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटाची मोर्चेबांधणी   ठाणे : राज्यात महायुतीला रेकॉर्डब्रेक यश मिळाले असले तरी सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकांमध्ये उमटण्याचे स्पष्ट संकेत आतापासूनच मिळत आहेत. एकीकडे भाजपची ताकद वाढवण्यासाठी सदस्य मोहीम सुरू झाली आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही ‘युवासेना एकसाथ, महापालिकेतही एकनाथ’ असा नारा देत आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीची शक्यता धूसर आहे. ठाण्याची शतप्रतिशत सुभेदारी मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाला आहे. ठाणे जिल्ह्यात महायुतीने १८ पैकी १६ जागांवर आपला झेंडा फडकवला आहे. जिल्ह्यात भाजपचे नऊ, तर शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार निवडून आले आहेत. महायुतीसाठी हे मोठे यश असले तरी निवडणुकांदरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मोठा बेबनावही पाहायला मिळाला होता. जागावाटपावरून ते प्रचारापर्यंत हा तणाव होता, पण विधानसभेच्या ऐन निवडणुकीत या दोन्ही पक्षाने सर्व हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने काम केले. त्या यशाचे फलीत त्यांना मिळाले आहे, पण सध्या राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून जे सुरू आहे, त्यामुळे ठाण्यातील शिवसेना शिंदे गटात कमालीची नाराजी पसरली आहे. याचा वचपा आगामी महापालिका निवडणुकीत काढण्याचा एकप्रकारे संकल्प केल्याचे समजते. ठाणे महापालिकेची अखेरची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर २०२२ मध्ये कार्यकाळ संपल्यामुळे ती विसर्जित झाली. कोव्हिडमुळे आधी निवडणूक लांबणीवर पडली, तर नंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने गेल्या तीन वर्षांपासून पालिकेची निवडणूक खोळंबली आहे. आता सत्तास्थापनेनंतर पालिका निवडणुका होतील, या आशेने लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झोकून दिल्याने सर्व माजी नगरसेवकांसमोर आशेचा किरण दिसू लागला आहे, पण त्याचवेळी जर पॅनलपद्धतीने निवडणुका झाल्या आणि त्यातही महायुती-आघाडी अशी शक्यता निर्माण झाल्यास आपल्या वाट्याला काय येणार, याची चिंताही सतावू लागली आहे. वास्तविक ठाणे महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने सत्तेचे पहिले यश ठाण्यातून मिळवले होते. त्यामुळे ठाण्यावर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. राज्यात भाजपसोबत युती असली तरी ठाण्यात शिवसेनेचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे सत्तेत शिंदे गटाला भाजपची भागीदारी नको असल्याचीही चर्चा सुरू आहे. 0000

ठाणे सिव्हीलमध्ये एकच दिवशी १०० बालकांवर हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेल्या बोटांवर शस्त्रक्रीया!

ठाणे: महागड्या रूग्णालयत लाखो रूपये खर्च करून लहान शस्त्रक्रिया करायची ऐपत सर्वांची नसते. पण त्यावर मात करण्यासाठी लहान मुलांवर जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास गरजू सध्या ठाणे सिव्हील रुग्णालय गोठत आहेत.…

 एनआरएमयुचा ‘एक उद्योग, एक युनियन’ संकल्पना

भारतीय रेल्वे युनियन मान्यता निवडणुकीसाठी  जाहीरनामा   अनिल ठाणेकर एनआरएमयुने ‘एक उद्योग, एक युनियन’ या संकल्पनेसह भारतीय रेल्वेमध्ये २०२४ च्या युनियन मान्यता निवडणुकांसाठी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. जनरल सेक्रेटरी वेणू पी. नायर यांनी मुंबई, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागातील मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना एनआरएमयु (मध्य रेल्वे/कोंकण रेल्वे) सोबत एकत्र येण्याचे आवाहन केले. वेणू पी. नायर, सरचिटणीस, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन आर एम यु मध्य रेल्वे कोंकण रेल्वे ), यांनी नुकतेच दादर रेल्वे इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात एन आर एम यु च्या ‘निवडणूक जाहीरनामा’ किंवा ‘संकल्प पत्र’ चे अनावरण केले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि विशेषतः मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे कागदोपत्री वचन आहे.  हे मागण्या पूर्ण करण्यासाठी एक व्यापक रोडमॅप देखील तयार करते आणि ते “एक उद्योग, एक संघ” दर्जा प्राप्त करून सर्व कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे समर्थन करते. दस्तऐवजात ६२-पॉइंट मागण्यांचा एक चार्टर सादर केला आहे, ज्यात मुख्य चिंता, आकांक्षा आणि सुधारणांचा उद्देश आहे ज्याचा उद्देश रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थितीचे रक्षण करणे आणि त्यात सुधारणा करणे, ज्यामुळे सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे नेटवर्क सुनिश्चित करणे. जुनी पेन्शन योजना (ओ पी एस) पुनर्संचयित करणे: ८ व्या वेतन आयोगाची निर्मिती:उत्पादकता लिंक्ड बोनस (पी एल बी) साठी कमाल मर्यादा काढून टाकणे:एम ए सी पी एस साठी सेवा पात्रता कालावधी १० वर्षांवरून ७ वर्षांपर्यंत कमी करणे.पाच वर्षांच्या पुनरावलोकनासह सेवानिवृत्तांसाठी वैद्यकीय भत्त्यात वाढ.अंदाधुंद आउटसोर्सिंगला विरोध करणे आणि सर्व सुरक्षा आणि गैर-सुरक्षा श्रेणीतील रिक्त पदे भरणे सुनिश्चित करणे. नवीन मालमत्ता, विद्युतीकरण प्रकल्प आणि गाड्यांचे विस्तारित ऑपरेशन यासाठी भरती.महिला कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण: कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, मासिक पाळीची रजा आणि चांगल्या बाल संगोपन सुविधांसाठी वचनबद्धता. बाल संगोपन रजा दरम्यान वेतन पूर्ण पुनर्संचयित.रनिंग स्टाफसाठी उत्तम वैशिष्ट्ये: जसे की ८ तास ड्युटी रोस्टरची अंमलबजावणी आणि विश्रांतीचा कालावधी वाढवला. क्रू लॉबी आणि रनिंग रूममध्ये राहण्याची उत्तम परिस्थिती व सुविधा देणे. करिअर विकासावर लक्ष केंद्रित करणे.वेळेवर पदोन्नतीसाठी नियमित जी डी सी इ आणि एल डी सी इ परीक्षा आयोजित करणे.विविध श्रेणींमध्ये वेतन संरचना सुधारण्यासाठी तरतुदी.रेल्वे वसाहती, क्वार्टर आणि वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी पुरेसा निधी.कारखान्यांमधील यार्ड आणि कर्मचारी सुविधांमध्ये सुरक्षा-अपग्रेड करणे. सर्व सुरक्षा श्रेणीतील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी जोखीम आणि त्रास भत्ते. पर्यवेक्षक, ट्रॅक मेंटेनर आणि फॅक्टरी कामगारांसाठी करिअरच्या प्रगतीसाठी आणि कामाच्या चांगल्या परिस्थितीसाठी तरतूद. चौकट लॉन्च इव्हेंटमध्ये बोलताना वेणू पी. नायर यांनी खाजगीकरण आणि आउटसोर्सिंगच्या वाढत्या आव्हानांवर प्रकाश टाकला आणि एकतेच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “आमचे कर्मचारी, आमचे रेल्वे उद्योग आणि आमचे हक्क सुरक्षित ठेवण्याची वेळ आली आहे.”  “एक उद्योग, एक युनियन” च्या माध्यमातून सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना एकसंध आवाज देणे, सन्मान, सुरक्षितता आणि समृद्धी सुनिश्चित करणे, ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे भारताच्या वाढीची जीवनरेखा असल्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

 ठाणे शहरात काँग्रेसला खिंडार!

कळवा येथील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश   ठाणे : शहरातील काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला असतानाच, त्यापाठोपाठ आता, कळव्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाणे शहरात काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. कळवा पूर्व घोलई नगर येथील काँग्रेसचे सामाजिक न्याय ठाणे शहर अध्यक्ष जगदीश गौरी हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रविवारी वर्तक नगर येथील भाजप कार्यालयात दाखल झाले. भाजपचे कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत तळवडेकर यांच्या पुढाकाराने आणि भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत जगदीश गौरी यांचा आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला. काँग्रेस मध्ये असताना आमची कुठलीही कामे होत नव्हती, काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जगदीश गौरी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंघटित कामगार ठाणे शहर सचिव दिनेश शिळकर, सामाजिक न्याय विभाग ठाणे शहर सचिव संदीप सूर्यवंशी, सुशांत धुळप, वार्ड अध्यक्ष संतोष झिमल तसेच काँग्रेसच्या इतर काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी, कार्यकारणी सदस्य अरविंद कलवार, प्रभाग सदस्य गजानन परब, भाजप कामगार मोर्चा सचिव प्रशांत तळवडेकर, उत्तर भारती मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत यादव, दिव्यांग सेल सचिव आमिन मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य हर्षला बुबेरा, कळवा मंडळ अध्यक्ष भूषण म्हात्रे, कळवा मंडळ अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा नरेश गायकवाड उपस्थित होते. 00000

मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा राजिनामा

ठाणे : मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांनी राजिनामा दिल्याचे म्हटले आहे. अविनाश…

 कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दीपोत्सव साजरा

 शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त दुसऱ्या वर्षीही आयोजन   राज भंडारी पनवेल : पनवेल शहरातील कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या परिसरात दिव्यांची रांगोळी साकारून त्यावर त्या त्या आकाराचे मातीचे दिवे ठेवत तब्बल ४१ हजारांहून अधिक दिव्यांच्या रोषणाईमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांसमवेत दीपोत्सव साजरा केला. सर्वप्रथम शाळेतील विद्येची देवता सरस्वती देवी आणि शिक्षण महर्षी तथा संस्थेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमेसमोर शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्याहस्ते पूजन करून शाळेच्या मैदानात साकारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षीही दीपोत्सव साजरा करण्यात आला. गतवर्षी ११ हजार दिव्यांच्या रोषणाइमध्ये हा दीपोत्सव पार पडला होता. यावर्षी देखील अशाच पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आल्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी प्रत्येक मुलांना केवळ ५ मातीच्या पणत्यांच्या दिव्यांचे योगदान देण्याचे आवाहन केले, आणि मुलांनी या दीपोत्सवासाठी उत्साह दाखवीत तब्बल ४१ हजार दिवे शाळेत जमा केले. यामध्ये संस्थेच्या वतीने ५०० लिटर तेल दीपोत्सवासाठी उपलब्ध करून देत एक आगळा वेगळा असा दीपोत्सव साजरा केला. सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कळंबोली येथील शाळेत तब्बल ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अत्यंत कमी शुल्क आकारून शिक्षण विद्या देणाऱ्या या शाळेत ४ भाषांच्या शाळा सुरू आहेत. ज्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची संख्या देखील जवळपास ३५० इतकी आहे. गोरगरिबांच्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याची प्रतिभा डोळ्यासमोर ठेवून दादासाहेब लिमये यांनी या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. ती आजही शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे जपत आहेत. यावेळी उपमुख्याध्यापक सुरेश शिंदे, पर्यवेक्षक श्रीम. पूनम कांबळे, श्रीम. अनिता पाटील, बाबुराव शिंदे, धर्मेंद्र दीक्षित, प्राथमिक विभाग प्रमुख श्री. पाटील, ज्यू. कॉलेज उपमुख्याध्यापक, संजय पाटील, अण्णासाहेब झिटे, कार्यालय प्रमुख बिना कडू, प्रसाद सहस्त्रबुद्धे, माजी विद्यार्थी अजय सूर्यवंशी, इंग्रजी विभाग प्रमुख सौ. कुलकर्णी, मराठी प्राथमिक विभागाचे मोकल आदींसह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

 युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन

युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला.   अनिल ठाणेकर ठाणे : युवासेना कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक ठाणे येथील आनंद आश्रमात पार पडली. शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आले. या बैठकीत युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. युवासेनेसाठी महत्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले. संघटनात्मक पुनर्रचना, युवकांचा सहभाग, महिलांचे सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला. महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये युवासेनाचा विस्तार, राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, समुदायीक संपर्क मोहिम राबविणे तसेच सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते.विशेषत: दुर्बल घटकांतील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेना शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला.हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. महाराष्ट्राला प्रगतीशील व सर्वसमावेशक राज्य बनवणे हा त्या मागील उद्देश आहे. या दृष्टीने सर्व युवा सैनिकांनी जोमाने कामाला लागावे व प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. ००००

लोकसभा निवडणुकीत विजयोत्सव,तर विधानसभेत जनमत विरुद्ध गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा रडीचा डाव – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीच्यावेळी १०. पैकी ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि तो विजयोत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.पण विधानसभेत तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचे काम डॉ.जितेंद्र आव्हाड करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. डॉ.जितेंद्र आव्हाड यांची शॉर्टटर्म  मेमरी लॉस झालेला आहे, या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे. याचक  कार्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी सांगितले होते की, १४९ म्रंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील  २४ हजार दुबार मतदार आहेत हा सर्वप्रथम आक्षेप मी स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविला होता. १२ हजार दुबार नावे ही १४४ कल्याण ग्रामीण मधील, १४९ म्रंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील  मध्ये आहेत. हा सर्वप्रथम आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही नोंदविला होता. याच्याविरुद्ध आर ओ कडे तीन नावे वगळता येणार नाहीत यासाठी थयथयाट करायला कोण गेले होते ? याची शोधपत्रकारिता करावी, सीसी फूटेच तपासावे, याचे सत्य आपल्या डोळ्यासमोर येईल. जितेंद्र आव्हाड यांना स्वतःच्या विजयावर विश्वास नाहीय का ? की आपण एवढ्या मताधिक्याने कसा जिंकलो? याची शंका मनामध्ये आहे का ? आम्ही तर अत्यंत विनम्रपणे मुंब्रा कळव्यातील जनतेने जो जनादेश दिला तो स्विकारलेला आहे. जितेंद्र आव्हाड हे ईव्हीएम हॅक करुन त्यांच्या मतदारसंघांमध्ये विजयी झालेत का ? अशाप्रकारची शंका आता त्यांच्या वर्तवणुकीवरुन येत आहे.लोकसभा निवडणुकीच्यावेळी १०. पैकी ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि तो विजयोत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.पण विधानसभेत तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचे काम डॉ.जितेंद्र आव्हाड करत आहेत. ईव्हीएबाबत शंका असेल तर जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम राजीनामा द्यावा पोटनिवडणूक आपोआप लागेल.  मग ही निवडणूक ईव्हीएम घ्यायची की बॅलेट वर घ्यायची हे निवडणूक आयोग ठरवेल. जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम कसे हॅक होते हे प्रत्यक्ष निवडणूक आयोगाला दाखवावे, पण त्यातुन हे देखील समोर येईल की त्यांचा विजय देखील ईव्हीएम हॅक करुन केला आहे, हे सत्य देखील जगासमोर येऊ शकते.२८८ विधानसभा जागांपैकी २४ ठिकाणी पराभूत उमेदवारांनी दुबार वीवीपॅट मोजणीचा आग्रह केला आहे. याचा अर्थ ९० लोकांना ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. हेच यावरुन सिद्ध होते.आणि २४ ठिकाणी देखील रिकाउंटींग होईल तेव्हा त्यांना देखील विश्वास होईल की महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारले आहे.ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२४ -२५ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली त्या दिवसापासून महाविकास आघाडी ही योजना कशी फेल होमार ? या योजनेला पैसे मिळणार नाहीत? तसेच या योजनेच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये देखिल गेले. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली ५ महिन्यांचे इन्स्टॉलमेंट महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिबीटी ने गेले आणि ज्या महाविकास आघाडीने ह्या योजनेला विरोध केला, जे या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले त्यांच्याच जाहीरनाम्यामध्ये सत्तेत आल्यानंतर ३ हजार पैसे देऊ अशा प्रकारे खोटं देखिल बोलले गेले. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीने दीड हजार रुपयांना विरोध केला, हि योजना पुढे चालणार नाही असे वक्तव्य केले, त्याच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात गेले. पण त्याच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये ३००० रुपये माता भगीनींच्या खात्यामध्ये आम्ही देऊ अशा प्रकारे ते खोटं बोलले. म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी महाविकास आघाडीचा पराभव केला.  लाडकी बहीण योजना फेल करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टा मध्ये गेली, असे आनंद परांजपे म्हणाले. ०००