लोक अदालतीची नोटीस येताच चालकांनी भरली ६६ लाखांचा थकित दंड
ठाणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक दंडाची रक्कम भरत नसतात. ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या नोटीसानंतर ६६ लाख ७ हजार ९ रुपयांचा थकित दंड वाहतुक विभागाकडे…
Thane news
ठाणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालक दंडाची रक्कम भरत नसतात. ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या नोटीसानंतर ६६ लाख ७ हजार ९ रुपयांचा थकित दंड वाहतुक विभागाकडे…
संबंधित अधिकाऱ्यांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करा-डॉ. उदय नारकर अनिल ठाणेकर ठाणे : परभणी येथे बंदच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अतिरेकी रानटी कारवाईत अनेक निरपराध नागरिकांवर जाणूनबुजून अत्याचार करण्यात आले.…
ठाणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत कृषी दिन व शेतकरी सन्मान समारंभाचे आयोजन १७ डिसेंबर २०२४ रोजी, बी.जे. हायस्कूल, कोर्ट नाका, ठाणे येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे…
ठाणे, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी केंद्रशासनाने Good Goverence Week 2024 हा सप्ताह महापालिका स्तरावर राबविण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात दिनांक 19 ते 24 डिसेंबर 2024…
ठाणे : व्यंगत्वावर मात करीत कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहिल संवेदनशील अशी ही विशेष मुले असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीनेही महापालिका प्रयत्न करेल असे नमूद करीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विशेष मुलांना, त्यांच्या पालकांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक दिव्यांग दिन हा सर्वत्र 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला, या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आज (17 डिसेंबर) डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, अनघा कदम, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, जिद्द शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेटये, दिव्यांग कला केंद्राचे किरण नाक्ती यांच्यासह दिव्यांग मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरेरे ते अरेव्वा..” या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहावयास मिळाला. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. दिव्यांग मुलांनी सादर केलेले नृत्य, गाणी यावर रसिकांनीही एकच ठेका धरला. ‘गणेश वंदना, सत्यम शिवम् सुंदरम, डिपाडी डिपांग.., वाजले की बारा.. अभंग, कोळीगीते’ यासह विविध गाणी दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांनी सादर केले. या कार्यक्रमास वेळी दृष्टिहीन वादकांनी गाण्यांना साथ संगत केली. मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली. तसेच दृष्टिहीन गायक गायिकांनी अवीट गोडीची गाणी सुरेल आवाजात गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विशेष मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणणे हा या मागील हेतू असून यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले.
ठाणे : सुरक्षेच्या दृष्टिने उड्डाणपूलाखाली वाहनतळ किंवा वाहने उभी करण्यास बंदी असतानाही ठाणे शहरातील कापूरबावडी, माजिवडा, मीनाताई ठाकरे चौक येथील उड्डाणपूलाखाली वाहनतळ, बेकायदा टपऱ्या, रिक्षा थांबा थाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस…
ठाणे : भिवंडी येथील रेडलाईट एरिया म्हणून प्रचलित असलेल्या हनुमान टेकडी परिसरातून ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि भिवंडी पोलिसांनी कारवाई करून सहा घुसखोर बांगलादेशी महिलांना नुकतीच…
तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय प्रवासात मागील काही वर्षांपासून अपंगांच्या डब्यात प्रवास करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील तीन वर्षांत ठाणे रेल्वे स्थानकातून नऊ हजार ३६२ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई या वर्षी म्हणजेच १ जानेवारी ते १३ डिसेंबर या कालावधीत झाली असून या प्रवाशांची संख्या तीन हजार ८७० इतकी आहे. असे असले तरी कारवाई होत असतानाही अपंगांच्या डब्यातील प्रवास कमी होत नसल्याचे चित्र आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये अपंगांना डबा आरक्षित केलेला असतो. परंतु या डब्यांमध्ये धडधाकड प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. रात्री आणि सकाळच्या वेळेत प्रवास करताना नोकरदारांची लोकलमध्ये गर्दी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठी अपंग नसलेले प्रवासी थेट अपंग डब्यांमध्ये प्रवेश करून प्रवास करतात. अनेकदा हे प्रवासी त्यांच्या आसनाचाही ताबा घेत असतात. त्यामुळे अपंग प्रवासी हैराण झाले आहेत. मागील तीन वर्षांत म्हणजेच, २०२२ ते २०२४ या कालावधीत नऊ हजार ३६२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांवर कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येते. त्यानंतर न्यायालय ठरवेल त्या प्रमाणे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये २०२२ या वर्षात २ हजार ५१५ प्रवाशांवर कारवाई झाली. तर २०२३ या वर्षी २ हजार ९७७ प्रवाशांवर कारवाई झाली आहे. सर्वाधिक कारवाई २०२४ या वर्षामध्ये झाली आहे. १ जानेवारी ते १३ डिसेंबर २०२४ या कालवधीत ३ हजार ८७० प्रवाशांवर कारवाई झाली आहे. यावर्षी १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत २ हजार ६१ प्रवाशांवर कारवाई झाली. तर १ जुलै ते १३ डिसेंबर या कालावधीत १ हजार ८०९ प्रवाशांवर कारवाई झाली आहे. कोट प्रवाशांनी अपंगांच्या डब्यात प्रवेश करून प्रवास करू नये. अन्यथा त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. अपंगांच्या डब्यात घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही अभियानही सुरू केले आहे. – सुरेंद्र कुमार कोस्टा, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, ठाणे स्थानक. ०००००
ठाणे पत्रकार भवन गैरव्यवहार प्रकरण अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्हा पत्रकार भवन गैरव्यवहार प्रकरणात ठेकेदारासह संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन ठेकेदार राजन शर्मा आणि संबधितांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे जिल्हा पत्रकार संघाला राज्य शासनाने गावदेवी येथील भूखंड पत्रकार भवन बांधण्यासाठी दिला होता. पत्रकार संघाच्या तत्कालीन कार्यकारीणी सदस्यांनी ठेकेदार राजन शर्मा सोबत बेकायदेशीर करारनामा करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता पत्रकार भवन उभारले होते. ठेकेदार राजन शर्मा यांनी पत्रकार भवना व्यतिरिक्त लगतच्या जागेत आणखी एक बेकायदा तीन मजली इमारत उभारली होती. याप्रकरणी शासनाने शर्तभंगाची कारवाई सुरू केली असता ठेकेदार शर्मा याने न्यायालयातुन स्थगिती मिळवली होती. तत्कालीन संघाची कार्यकारीणी, जिल्हा प्रशासन यांनी सदरची स्थगिती उठवण्याबाबत कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे गेली पंचवीस वर्षे या दोन्ही इमारतींचा ताबा ठेकेदार शर्मा याच्याकडेच होता. तो या दोन्ही इमारतींचा गैरवापर करून यातील काही गाळे भाड्याने तर काही गाळे विक्री करून शासनासह पत्रकारांची फसवणूक केली होती. पत्रकारांसाठी राखीव असलेल्या या भूखंडावरील भवनाचा उपयोग पत्रकारांना झालाच नव्हता. ही बाब ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष संजय पितळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा भूखंड शासनाच्या ताब्यात घेण्याचा आदेश ३ ऑगस्ट २०२२ रोजी दिला होता. तसेच, तहसिलदारांच्या आदेशान्वये या जागेवरील इमारती निष्काषित करून रिकाम्या भूखंडाला तारेचे कंपाउंड उभारून शासनाचा बोर्ड लावला आहे. ठेकेदार शर्मा याने तत्कालीन महसुल मंत्र्याकरवी या गैरव्यवहार प्रकरणाला स्थगिती मिळवली होती. यावर जिल्हाध्यक्ष संजय पितळे यांनी,ठाणे उपविभागीय अधिकाऱ्याकडे वारंवार पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यानुसार सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, यांच्या १३ जाने. २०२२ रोजीच्या पत्रात नमूद केल्यानुसार या गैरव्यवहार प्रकरणात ठेकेदार शर्मा व संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ०००००
ठाणे : ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी संचलित, ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मनोरमा नगर , ठाणे (पश्चिम) या विद्यालयातील प्राथमिक विभागाचा विज्ञान प्रकल्पाला ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ मध्ये…