Category: ठाणे

Thane news

अद्वैत कचराजचे बळींचे सप्तक

गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धा ठाणे : लेग स्पिनर अद्वैत कचराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलने एस एम शेट्टी स्कुलचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत मुंबई शालेय क्रिडा संघटना आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. प्रतिस्पर्ध्यांना अवघ्या २३ धावांत गुंडाळल्यावर श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलने चार षटकात २४ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या एस एम शेट्टी स्कुलचा एकाही फलंदाजाला अद्वैत कचराजच्या माऱ्यासमोर वैयक्तिक पाच धावांचा पल्ला पार करता आला नाही. अद्वैतने चार निर्धाव षटकांसह १० धावांत सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. वीर धुमाळने दोन धावांत ३ बळी मिळवले. श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुलच्या मिहीर नाईक आणि निर्मित धुरीने  संघाचे कुठलेही नुकसान होऊ न देता २४ धावासह दुसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले. मिहिरने नाबाद १४ आणि निर्मितने नाबाद ३ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : एस.एम.शेट्टी स्कुल : १५ षटकात सर्वबाद २३ ( अंश हडवळे ५, अद्वैत कचराज ८-४-१०-७, वीर धुमाळ १-०-२-३) पराभूत विरुद्ध श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया स्कुल : ३.४ षटकात बिनबाद २४ (मिहीर नाईक नाबाद १४, निर्मित धुरी नाबाद ४). 0000

 १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा

आमदार संजय केळकर व प्रेरणा संस्थेच्या वतीने अनिल ठाणेकर ठाणे : आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील १२ वी कॉमर्स व सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबर महिन्यात १५, २२, २९ असे दर रविवारी विनामूल्य सराव परीक्षेचे आयोजन केले आहे. सराव २६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता पाच मिनिटांसाठी घरातील लाईट्स बंद ठेवून ईव्हीएमचा प्रतिकात्मक निषेध करा – राजन राजे हे १२ वे वर्ष आहे. ब्राम्हण शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम, व महाराष्ट्र विद्यालय या दोन परीक्षा केंद्रावर सकाळीं ११ ते दुपारी २ या वेळेत बोर्ड पध्दतीने सराव परीक्षा पार पडणार आहेत. 8 तारखेला सायन्स चा फिजिक्स तर कॉमर्स चा इको पेपर असेल.१५ तारखेला केमेस्ट्री व बी. के. पेपर २२ तारखेला सायन्स चा मॅथ्स व ओ. सी. २९ तारखेला सायन्स चा बायोलाॅजी व कॉमर्स चा मॅथ्स असे पेपर होणार आहेत. विध्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती निघून जावी, सहजरीत्या व सोप्या पद्धतीने पेपर लिहता यावा, त्याचा सराव व्हावा या करिता ही सराव परीक्षा आयोजित केली जाते. ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे, मुख्य बोर्ड परीक्षा आधी चांगला सराव मिळणार आहे. असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. यावेळी प्रेरणा संस्थेचे पंढरीनाथ पवार, संतोष साळुंखे उपस्थित होते. यासाठी प्रेरणा संस्थेचे पंढरीनाथ पवार व संतोष साळुंखे यांच्याशी संपर्क करावा. पत्ता :- ठाणे भारत सहकारी बँक समोर, बाजी प्रभू देशपांडे रोड विष्णूनगर नौपाडा ठाणे. मोबाईल : ८०८२३७७७११, ९०२२०५६०६० वरील पत्यावर सराव परीक्षा फॉर्म मिळतील, असे सांगण्यात आले आहे. 00000

२६ जानेवारीला रात्री ९ वाजता पाच मिनिटांसाठी घरातील लाईट्स बंद ठेवून ईव्हीएमचा प्रतिकात्मक निषेध करा – राजन राजे

अनिल ठाणेकर ठाणे : २६ जानेवारी-२०२५ रोजी, भारताच्या अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी, रात्री ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ईव्हीएमचा प्रतिकात्मक तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केले आहे.यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित, पक्षप्रवक्ते समीर चव्हाण, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष तसेच, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप व त्यांची ‘महायुती’ (एनडीए) सत्तेवर आल्यानंतर, भारतीय जनतेचा ईव्हीएम वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या ईव्हीएम हटाव… लोकतंत्र बचाव मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, १० डिसेंबरपासून ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने ईव्हीएम हवे की, बॅलेट पेपर अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, ठाणे शहराच्या काही भागात प्रायोगिकस्तरावर, ही ‘जनमत-चाचणी मोहीम’ यापुढेही राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी, वर्तकनगर नाका, येथे गुरुवारी, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे जनमत-चाचणी घेण्यात आली. दरम्यान, “नो बॅलेट पेपर… नो इलेक्शन” ही ‘धर्मराज्य पक्षा’ची घोषणा असून, मतपत्रिकेवरील मतदानाचा पारदर्शक लोकशाही-प्रजासत्ताकाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी. येत्या २६ जानेवारी – २०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहन राजन राजे यांनी केले आहे. ०००००

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील मुस्लिमांचा दावा कोर्टाने फेटाळला

ठाणे : कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील मुस्लिम संघटनांचा दावा कोर्टाने आज फेटाळून लावला… या संदर्भांत कल्याण न्यायालयाने आज निर्णय देत 48 वर्षांपासून सुरू असलेला खटाला मार्गी काढला आहे. यात मुस्लिम पक्षाचा दावा कल्याण न्यायालयाने फेटाळला आहे. मुस्लिम पक्षाच्या वतीने सर्फउद्दिन कर्ते यांनी दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात द्या, अशी मागाणी केली होती. 1976 पासून  कल्याण न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती. दरम्यान 48 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोर्टाने शासनाच्या बाजूने निकाल दिला आहे. परिणामी कल्याणमध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरती करत उत्साह साजरा केला आहे. मात्र 1976 पासून सुरू असलेले हे प्रकरण नेमकं काय याबाबत माहिती सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे. नेमकं प्रकरण काय? 1976 साली  माजलीसे मुशावरा ट्रस्ट या  मुस्लिम संघटनेने दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. तसेच सरकारकडून मालकी मिळावी यासाठी कोर्टात पुरावा दाखल करण्यात आला होता. 1994 साली निशाणी 130 आणि 137 वर कोर्टाने हुकूम केला आहे. महाराष्ट्र शासनाने दुर्गाडी किल्ल्याची दुरुस्ती पीडब्ल्यूडी मार्फत करावी. तसेच त्याचा अहवाल सादर करावा, त्या अनुषंगाने ही जागा शासनाच्या मालकीची आहे. त्या जागेवर कोणालाही हक्क सांगता येणार नाही, असे शासनाच्या…

दिव्यातील अनधिकृत शाळा बंद करा मेस्टा संघटनेची मागणी

ठाणे : दिव्यातील अनधिकृत शाळेमध्ये झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी करून कारवाई व्हावी तसेच दिवा भागात असलेल्या अनधिकृत शाळा बंद कराव्यात, अशी मागणी मेस्टा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार यांनी…

१ कोटी ८४ लाख ८० हजार एवढे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट – हरिश्चंद्र पाटील

अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय लष्करातील सैनिक हे अहोरात्र आपल्या सीमेवर रक्षण करत असतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता दाखविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीची संकल्पना अंमलात आणली आहे. या निधीच्या माध्यमातून सैनिक/माजी…

माजिवड्यातील अनधिकृत फेरिवाले व कचऱ्याच्या समस्‍येने नागरिक हैराण

आमदार निरंजन डावखरे व भाजपा उपाध्‍यक्षा अनुराधा रोडे यांची समस्‍या समाधानासाठी आयुक्‍तांची घेतली भेट ठाणे : वाढत्‍या नागरिकरणामुळे शहराचा मध्‍यवर्ती भाग म्‍हणून ओळखला जात असलेला माजिवडा परिसर सध्‍या कचरा व…

शास्त्रीनगर येथील आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण

माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांचे प्रभाग समितीमध्ये ठिय्या आंदोलन   अनिल ठाणेकर ठाणे : शास्त्रीनगर नंबर १ मधील आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर…

भारतातील बंदर व गोदी कामगार वेतनकराराची अंमलबजावणी न झाल्यास १७ डिसेंबर नंतर बेमुदत संप !

अनिल ठाणेकर ठाणे : भारतातील बंदर व गोदी कामगारांसाठी कायद्यानुसार झालेल्या वेतन कराराची त्वरित अंमलबजावणी न केल्यास १७ डिसेंबर २०२४ नंतर बंदर व गोदी कामगार केव्हाही बेमुदत संपावर जातील,असा स्पष्ट…

ईव्हीएम’विरोधात मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी धर्मराज्य पक्षाची जनजागृत्ती मोहिम – राजन राजे

अनिल ठाणेकर ठाणे : व्हीएमविरोधी आंदोलनासंदर्भात, मंगळवारपासून, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जनजागृत्ती मोहिम सुरु करण्यात आली असून ठाणे शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी, ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते “ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा” या घोषणेखाली…