Category: ठाणे

Thane news

कांद्याच्या वाढत्या दराची मुख्यमंत्र्यांकडून दखल, साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश

कांद्यासाठी राज्य सरकारने ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय ठाणे : सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या दराचा फटका बसत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच पणन विभागाला दिले आहेत.कांद्यासाठी राज्य सरकारने ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून अनुदानाचे वाटप सुरू आहे. त्यासाठी या वर्षात ८५१ कोटी ६७ लाख रुपये तरतूद देखील करण्यात आली आहे मोठ्या आणि लहान व्यापाऱ्यांना त्यांनी किती कांदा साठवणूक करावी ती मर्यादा दिली निश्चित केली आहे.  मात्र सध्या काही व्यापारी बेकायदेशीरपणे कांद्याची साठवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले असून पर्यायाने कांद्याचे दर वाढत आहेत. अशा कांदा व्यापाऱ्यांवर ‘जीवनावश्‍यक वस्‍तू अधिनियम १९५५’ व ‘काळा बाजार प्रतिबंध आणि जीवनावश्‍यक वस्‍तूंचा सुरळीत पुरवठा अधिनियम १९८०’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पुरवठा विभागाला दिले आहेत. राज्यात नागरिकांना कोठेही बेकायदेशीर कांद्याची साठेबाजी निदर्शनास आल्‍यास त्यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात माहिती द्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

वृत्तपत्र जिल्हा विक्रेता सेनेचा महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांना पाठींबा

अनिल ठाणेकर ठाणे : आमदार संजय केळकर हे ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून युतीचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.  ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेने संजय केळकर यांना जाहीर पाठींबा दिला आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत केळकर यांचा घरोघरी जाऊन प्रचार करुन भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मदत करणार आहोत. असेही वृत्तपत्र विक्रेता सेनेने जाहीर केले आहे. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना अध्यक्ष विष्णू सावंत, सरचिटणीस संतोष विचारे, दीपक सोंडकर, चेतन चाळके, सचिन सावंत, दिनेश रौनक यांच्यसोबत ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. केळकरांचा प्रत्येक ठाणेकराला अभिमान आणि आत्मीयता आहे, ते आमदार असुन सुद्धा सर्वसामान्य माणसाला वेळ देणारे कुठलीही अडवणुक न करता त्याची समस्या मार्गी लावणारे आणि कुठलाही बडेजाव नसणारे असे आपले व्यक्तिमत्व आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही केळकरांनी अनेक वेळा सहकार्य केले आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ व्हावे, याबबत केळकरांनी अनेकवेळा विधानसभेत आवाज उठवत ती मागणी महायुती सरकारने मान्य करुन घेतली, असे मत ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना अध्यक्ष विष्णू सावंत यांनी व्यक्त केले.

 शमीम खान यांच्या बदनामीकारक, खोट्या आणि तथ्यहीन आरोपांची चौकशी करा !

मुंब्रा कळवा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांची पोलीस उपायुक्तांकडे मागणी अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुंब्रा कळवा परिसरातील पदाधिकारी शमीम खान यांनी केलेल्या बदनामीकारक, खोट्या आणि तथ्यहीन आरोपाची चौकशी करण्याची मागणी १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी परिमंडळ १ चे ठाणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे एक निवेदन देऊन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुंब्रा कळवा परिसरातील पदाधिकारी शमीम खान यांनी बुधवारी, १३ नोव्हेंबर २०२४ रोजी, १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत शमीम खान यांनी माझ्यावर अनेक बदनामीकारक, खोटे व तथ्यहीन आरोप केले. यात, ‘नजीब मुल्ला मुझे दुबईसे फोन करवाता है, मुझे ईडी की धमकी देता है, तसेच मेरे साथ कोई हादसा होता है या मुझे मार दिया जाता है तो इसका जिम्मेदार नजीब मुल्ला होगा’ अशाप्रकारचे जाहीर वक्तव्य शमीम खान यांनी माध्यमांसमोर बोलताना केले. शमीम खान यांनी मुंब्रा कळवा परिसरातील मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने माझ्यावर बदनामीकारक, खोटे व तथ्यहीन आरोप केले असल्याची माझी तक्रार आहे.सदरचे प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असून संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करावी आणि शमीम खान यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने शमीम खान यांना आलेले फोन काॅल्स तसेच त्यांचे सर्व काॅल डिटेल्स तपासून याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नजीब मुल्ला यांनी परिमंडळ १ चे ठाणे पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे. महत्वाचे म्हणजे पुरावा म्हणून नजीब मुल्ला यांनी निवेदनासोबत शमीम खान यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याची व्हिडिओ रेकॉर्डींग असलेला पेन ड्राईव्ह पोलीस उपायुक्त यांना सादर केला आहे.

नितीन गडकरी यांची ठाण्यात रविवारी सभा

ठाणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ठाण्यातील गावदेवी मैदानावर रविवारी (ता. १७) सायंकाळी ६ वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेनिमित्ताने ठाणेकरांना…

 आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ

सी-व्हिजील ॲपवर महिन्याभरात १ हजार २०१ तक्रारी प्राप्त   ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतू, गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसत…

 जिजाऊ संघटनेचा किसन कथोरेंना पाठिंबा

 किसन कथोरे आणि निलेश सांबरे यांची भेट   बदलापूरः भिवंडी लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ज्या जिजाऊ संघटनेच्या मतविभाजनामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्या जिजाऊ संघटनेने…

राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे दाखले बँकेत सादर करावेत

  ठाणे : महाराष्ट्र शासनाचे निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी दि.1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात बँकेत सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने निवृत्तीवेतनधारकांनी 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात…

ठाणे जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी कामगार, कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सवलत देऊन कर्तव्य बजावावे

 जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांचे आवाहन   ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानादिवशी ठाणे जिल्ह्यातील सर्व संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी यांना…

 ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदार केंद्रावर शनिवारपासून सर्वंकष स्वच्छता मोहीम

  मतदान केंद्र, परिसर, रस्ते, पदपथ यांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे हापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश     ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर…

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदार केंद्रावर शनिवारपासून सर्वंकष स्वच्छता मोहीम

  मतदान केंद्र, परिसर, रस्ते, पदपथ यांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे हापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश   ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठाणे…