Category: ठाणे

Thane news

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांकरिता केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

ठाणे : विधानसभा मतदारसंघ 134 भिवंडी (ग्रामीण), 135 शहापूर, 136 भिवंडी (पश्चिम), 137 भिवंडी (पूर्व) व 138 कल्याण (पश्चिम) या मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.रविंदर सिंधू (IRS) हे जिल्ह्यात…

अमलीपदार्थ विक्री, व्यवसाय, वितरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा !

  मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कालिंघम यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : अमलीपदार्थ विक्री आणि त्याचा व्यवसाय अथवा वितरण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी…

१३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत प्रसारमाध्यमांना निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारित करण्यास प्रतिबंध- अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : सर्वत्र विधानसभा सार्वत्रिक २०२४ च्या  निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणूक शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) १३ नोव्हेंबर सकाळी…

26 व 27 ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकृती व वाटप असणार बंद

ठाणे : विधानसभा निवडणूक 2024 साठी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात दि.22 ऑक्टोबर 2024 पासून नामनिर्देशन अर्जाचे वाटप व नामनिर्देशन पत्र स्विकारणे ही प्रक्रिया सुरू झाली असून नामनिर्देशनपत्र स्व‍िकारण्याची…

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून 17 उमेदवारांनी केले अर्ज दाखल

तर एकूण 241 नामनिर्देशन पत्रांचे वाटप   ठाणे,दि.24(जिमाका):- ठाणे विधानसभा निवडणूक 2024 साठी नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यास सुरूवात झाली असून आज ठाणे विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षांच्या एकूण 17 उमेदवारांनी नामनिर्देशन…

पनवेल येथे बुध्दिष्ट वधु-वर परिचय महामेळावे

  ठाणे.भव्य बुध्दिष्ट वधू-वर परिचय महामेळावे रविवारी २७ ऑक्टोबर रोजी ठाणे,पनवेल येथे होणार आहेत. हे महामेळावे ठाणे जिल्हा परिषदेसमोर मराठी ग्रंथ संग्रहालय येथे स.१० ते दु.२ पर्यत तर जुने पनवेल…

बडोदा-मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण

पनवेल – बडोदा-मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतचा पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी पुर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. १६…

 त्या अपघातांनंतर रेमंड रियॅलिटी आक्रमक भूमिकेत

 लिफ्ट अपघातास कारणीभूत ठरलेल्या थायसन कृप एलिव्हेटर कंपनीवर गुन्हा दाखल करणार   ठाणे : ठाण्यातील टेन एक्स या गृहप्रकल्पात मंगळवारी सदोष जोडणीमुळे घडलेल्या लिफ्टच्या अपघातानंतर या प्रकल्पाचे विकासक रेमंड रियॅलिटी कंपनीने आक्रमक भूमिका घेतली आहे. एका बालकाच्या दुखापतीला कारणीभूत ठरलेल्या या लिफ्टची उभारणी आणि त्याच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या थायसेन कृप एलिव्हेटर या आंतरराष्ट्रीय कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. या अपघातानंतर रेमंड रियॅलिटी कंपनीने  स्वतःहून या दुर्घटनेची सखोल चौकशी केली. या चौकशी दरम्यान सदर दुर्घटनेस थायसन ग्रुप एलिव्हेटर कंपनी जबाबदार असल्याचा निष्कर्ष कंपनीने काढला. सदर लिफ्ट कंपनीने लिफ्टची जोडणी आणि तिच्या देखभाल – दुरुस्तीचे पाच वर्षाचे कंत्राट घेतले आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारनाम्याप्रमाणे, लिफ्ट मधील क्लिप तुटून चैन खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेची  जबाबदारी हि  थायसन कृप  एलिव्हेटर कंपनीची असल्याचे  रेमंड रियॅलिटीचे अधिकारी प्रशांत राठोड यांनी सांगितले. राठोड म्हणाले,आम्ही अत्युच्च दर्जाची उपकरणे, साधने वापरत हा प्रकल्प बनवलेला आहे. त्यासाठी आवश्यक त्या  सर्व बाबी पडताळत,करारनामे करत वस्तू विकत घेतलेल्या आहेत. असे असतानाही कोणाच्या तरी हलगर्जीपणामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर प्रामाणिक प्रयत्न करून देखील आमची बदनामी होत असल्याचे लेखी पत्र देत वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी रेमंड रियालिटी कडून करण्यात आली आहे . गत मंगळवारी संध्याकाळी रेमंड रियॅलिटीच्या गृहसंकुलातील टेन एक्स या प्रकल्पात इमारत क्रमांक ए (विस्ता) या ४२ मजल्याच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये तांत्रिक दोष झाल्यामुळे या लिफ्टची साखळी लिफ्ट वर कोसळली त्यामुळे लिफ्ट बंद पडून ती सेफ्टी लॉक झाली. साखळी कोसळल्यामुळे या लिफ्टच्या काचा फुटल्याने त्यात अडकलेल्या चौघा जणांपैकी एक बालक काच लागून दुखापतग्रस्त झाला. या अपघातांनंतर त्या इमारतीतील सुरक्षा रक्षकांनी लगेंचच त्याठिकाणी धाव घेत लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून जखमी झालेल्या त्या लहान मुलावर प्रथमोपचार केले. एवढ्या मोठ्या प्रकल्पातील या दुर्घटनेनंतर त्या इमारतीतील नागरिकांनी सुरक्षेतेतेबाबत हेळसांड केल्याबद्दल थायसेन कृप एलीव्हेटर कंपनीच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या दुर्घटनेमुळे गगनचुंबी इमारतींच्या लिफ्ट उभारणी, दुरुस्ती आणि त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक ते धोरण शासनाने ठरवायला पाहिजे असल्याचे प्रतिक्रिया बांधकाम क्षेत्रात उमटत आहे.

निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

ठाणे : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजन विचारे यांनी आज निष्ठावंत शिवसैनिकाच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी ११:०० वा. चरई येथील  शिवसेना शाखेतून राजन विचारे…

 आरपीआय नेते जगदीश गायकवाड ॲक्शन मोडवर

 अलिबागमध्ये महेंद्र दळवी तर बेलापूरमध्ये संदीप नाईक यांना देणार दमदार समर्थन   राज भंडारी पनवेल : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू असतानाच नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये मात्र सर्वच विधानसभा क्षेत्रात तिहेरी किंवा चौरंगी लढतीच्या तयारीत उमेदवार आहेत. यामध्ये आरपीआय १९५६ पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष जगदीश गायकवाड हे मात्र या सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांना नक्कीच मदत करेन मात्र ज्या उमेदवारांना निवडून यायचे आहे त्या त्या उमेदवारांनी प्रथम माझ्याकडे जगदीश्वर मठात यावं, असं उमेदवारांना सूचित करताना त्यांनी भाजपच्यावतीने कशा पद्धतीने पनवेल महानगरपालिकेत भ्रष्टाचार करण्यात आला, दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाच्या विमानांच्या चाचण्या घेण्याचे भासवून किती भ्रष्टाचार केला जात आहे, यासह अनेक विषयांवर त्यांनी पनवेल – उरणमधील भाजपच्या नेत्यांवर आसूड उगवत आक्रमकता दाखविली. तसेच काही दिवसांपूर्वी जगदीश गायकवाड यांची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पनवेलसाठी जाहीर केली होती. अर्ज दाखल करण्याची तारीख २९ असल्यामुळे २८ तारखेला यावर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आपल्या स्फोटक मुलाखतीमध्ये त्यांनी नवी मुंबई येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईक यांनी तुतारी हातात घेत उमेदवारी मिळविली आहे त्यांच्यासह अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगून इतर उमेदवारांनी जगदीश गायकवाड यांच्या घरातील जगदीश्वर मठात यावे, जो येऊन भेटेल तो निवडून येईल, असेही त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये मिश्कीलपणे सांगितले. जगदीश गायकवाड पुढे म्हणाले, भविष्यात पनवेल महानगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करावी लागेल. पनवेल महानगरपालिकेची ओळख भ्रष्टाचारी महापालिका म्हणून मलिन झाली आहे. पनवेल मधील सर्व कामे निकृष्ट दर्जाची आहेत. रस्त्यांच्या कामात तर प्रचंड भ्रष्टाचार आहे. केवळ ठराविक कंत्राटदारांनाच कामे दिली जातात. आगरी-कराडी समाजातील २८८  कंत्राटदार देशोधडीला लागले आहेत. घरातील दागदागिने विकण्याची त्यांच्यावर वेळ आली. तरीही पनवेल महानगरपालिकेकडून त्यांना कामे दिली जात नाहीत. पनवेल महानगरपालिकेतील कामे केवळ चार ठराविक कंत्राटदारांनाच दिली जातात. त्यामुळे ही चौकडी नष्ट करणारी ही निवडणूक असेल असे माझे ठाम मत आहे. पनवेलकरांना मालमत्ता कराचा प्रश्न भेडसावत आहे. सत्तेत असतानाही टॅक्सच्या विरोधात मी स्वतः आवाज उठवला होता. नागरिकांना पाच वर्षे टॅक्स नको याबाबत मी व माजी नगरसेविका विद्याताई गायकवाड यांनीही ठाम भूमिका मांडली होती. चार महापालिकेंचे संदर्भ देऊन मालमत्ता कराला विरोध दर्शवला होता. त्यावेळी माझी एक व्हिडिओ क्लिप देखील चर्चेत आली होती. त्याचबरोबर टॅक्स भरणे का गरजेचे आहे याचे महत्त्व देखील पटवून दिले होते. मात्र त्याचे प्रमाण किती असावे  याबाबतही अभ्यासपूर्वक भूमिका  स्पष्ट केली होती. शहरी भागातील नागरिकांनी सिडकोला सेवा कर दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शहरी भागातील नागरिकांनी किती कर द्यावा याबाबत बाजू उचलून धरली होती, असेही जगदीश गायकवाड म्हणाले. कोविड काळानंतर नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. नोटबंदीचा जबरदस्त फटका सर्वांनाच बसला. राज्यात व देशात हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. ईडी सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भाजपविरोधात प्रचंड रोष आहे. भाजपच्या या जाचाला कंटाळून नवी मुंबईत संदीप नाईक यांनी देखील पक्ष सोडला. ते वैयक्तिकरित्या देखील आमदार होऊ शकतात. मात्र त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावण्याला भाजप जबाबदार असल्याचे मत जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केले. पनवेलमधील लेडीज बारचा प्रश्न गहन असून सर्व लेडीज बार बंद झाले पाहिजेत. पनवेलमध्ये रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची संख्या लेडीज बारमुळेच बळावली आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकही त्रस्त आहेत. विधानभवनात लेडीज बारविरोधात अनेकदा आवाज उठवण्यात आला. मात्र आजपर्यंत पनवेलमधील लेडीज बार का बंद झाले नाहीत? बार चालकांना कोणाचा आशीर्वाद  आहे? या धंद्यात कोण पार्टनर आहे का?  असे विविध प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. यावेळी पनवेल – उरणच्या भाजप नेत्यांवर आसूड उगवताना जगदीश गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, ज्या पद्धतीने विमानतळाला दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्यायला पाहिजे ते दिले गेले नाही तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून त्याचा सातत्याने उल्लेख हा पनवेल – उरणच्या आमदारांकडून केला जात आहे. आणि आता जनतेच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची वेळ आल्यानंतर विमानतळावर चाचण्या घेण्याची नौटंकी करून त्या माध्यमातून देखील पैसे लाटण्याचा जो प्रकार सुरू आहे तो जनतेच्याही लक्षात येतोय. विमानाची चाचणी घेण्यासाठी ७ लाख रुपयांचा खर्च आणि यांची ७० लाखांची बिले, हा भ्रष्टाचार सुद्धा बाहेर आलाच पाहिजे. यासाठी माझ्या दलित, मुस्लिम, आगरी, कोळी, कराडी यांच्यासह बारा बलुत जनतेने यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र केलं, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी सुरक्षित संविधान बनवून त्यांना त्यांचे हक्क दिले आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी दिवंगत दी.बा.पाटील साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रक्तरंजित आहुती दिल्या, जेलमध्ये गेले, गोळीबार झेलले आणि आता दिबांच्या नावाचे राजकारण करून जनतेला वेडे बनविण्याचा धंदा या निवडणुकीत बंद झाला पाहिजे, असे जनतेला आवाहन करून त्यांनी भाजपच्या नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्याचबरोबर विमानतळाच्या आंदोलनामध्ये सर्वाधिक गुन्हे माझ्यावर दाखल झालेले असतानाही माझ्या नावाचा वापर न करता भाजपने श्रेय लाटण्याचा प्रकार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.