Category: ठाणे

Thane news

ठाणे शहरातील मतदार याद्यांचा घोळ कायम 

घराजवळील मतदान केंद्राऐवजी दूरच्या मतदान केंद्रावर नावे ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ समोर आला होता, तोच घोळ विधानसभा निवडणुकीत दिसून आला. ठाणे शहर मतदार संघातील अनेक मतदारांची नावे घराजवळील मतदान केंद्राऐवजी दूरच्या मतदान केंद्रावर नावे आल्याचे दिसून आले. घोडबंदर भागात सोसायटीत केंद्र असतानाही त्यांची नावे झोपडपट्टी भागातील केंद्रावर आल्याने मतदारांमधून नाराजीचा सूर उमटत होता. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ दिसून आला होता. अनेकांची नावे घराजवळील केंद्राऐवजी किंवा सोसायटीतल्या केंद्रा ऐवजी दूरवरच्या केंद्रावर होती. यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला होता यासंबंधीच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. निवडणूक विभागाच्या कारभारावर मतदारांनी टीकाही केली होती. या टिकेनंतर विधानसभा निवडणुकीत ही चूक सुधारली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र ती फोल ठरल्याचे दिसून आले. घोडबंदर भागातील गृहसंकुलांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. परंतु येथील रहिवाशांना सुमारे ३ किमी लांब जावे लागत होते. हिरानंदानी इस्टेटमध्येही असा प्रकार समोर आला, येथील काही मतदारांची नावे ढोकळी भागातील केंद्रावर होती. कोलशेत येथील काही संकुलात मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत, परंतु येथील रहिवाशांची नावे या केंद्राऐवजी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर होती.  गेल्यावेळी असाच घोळ होता, तो यंदाही कायम असल्याचे दिसून आले.  झोपडपट्टी भागातल्या मतदारांना सोसायटी मध्ये मतदानासाठी जावे लागत असल्याचे चित्र ठाणे विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी दिसून आले.

मतदारांकडून बोटावरील शाई पुसट झाल्याच्या तक्रारी

ठाणे : विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर लावण्यात येणारी ओळख शाई पाण्याने धुतली असता, पुसट होत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून करण्यात आल्या. ठाणे जिल्हा विधानसभा मतदारसंघातील कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर, अंबरनाथ, नवी मुंबई आणि मुरबाड मतदारसंघातील अनेक मतदारांच्या बोटावरील शाई पुसट झाल्याची बाब मतदारांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधुम बुधवारी सर्वत्र पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीच्यावेळी मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब होणे, मतदानकेंद्र बदलणे, तसेच काही तांत्रिक अडचणी, अशा अनेक समस्यांना मतदारांना सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीतही असाच काहीसा प्रकार झाला. अशातच मतदान केल्यावर ओळख म्हणुन लावण्यात येणारी बोटावरील शाई पाणी लागल्यास पुसट होत असल्याची बाब मतदार प्रदीप गुजर यांनी लोकसत्ताला सांगितली. गुजर हे सकाळी त्यांच्या मतदरसंघातील मतदान केंद्रावर मतदान करण्यास गेले होते. मतदान करून घरी आल्यावर त्यांनी आपले हात पाण्याने धुतले. बोटावरील शाईला पाणी लागल्याने ती पुसट होत असल्याचे त्यांना आढळले. शाई पुसली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ही बाब लोकसत्ता प्रतिनिधींना सांगितली. या प्रकाराबाबत इतर मतदारसंघात पाहणी केली असता, असाच प्रकार ठाणे शहर मतदारसंघाबरोबरच कोपरी पाचपाखाडी, अंबनाथ, मुरबाड, नवी मुंबई मतदारसंघातील मतदारांना असाच अनुभव आल्याचे चित्र होते. याप्रकरणी मतदारांना विचारणा केली असता नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी ही बाब सांगितली.तर याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मतदान केल्यावर अनेक आठवडे बोटावरील शाई असते. विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर लावण्यात आलेली शाई काही वेळातच पुसट झाली.- सरिता मांडावकर, मतदार बोटावर लावण्यात येणार शाई ही पक्की असते. अशा प्रकारे शाई जाणे शक्य नाही. आम्ही जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता मतदारांच्या बोटांवरील शाई पुसट होणे अथवा निघून जाणे असे कोणतेही प्रकार आढळून आलेले नाही.- उर्मिला पाटील, उपविभागीय अधिकारी, ठाणे

उबाठा गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पैसे आणि दारू वाटपाचा आरोप ठाणे : शिवसेना उबाठा गटाचे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे यांच्यासह 7 जणांवर ठाण्यातील कोपरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे आणि दारू वाटप करताना…

शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक  पार पडत आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. ओवळा माजिवडा विधानसभेचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपल्या कुटूंबियांसमवेत सकाळी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर “लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे.” असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी उपस्थित नागरिकांना केले. मतदानासाठी घरा बाहेर पडण्याचे देखील त्यांनी नागरिकांना आवाहन केले.सरनाईक यांनी मतदान केंद्रावर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. ठाण्यातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांमध्येही मतदानासाठी उत्साह जाणवत आहे. शांततेत आणि सुरळीतरीत्या मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था देखील केली आहे. विधानसभा निवडणुकीत नागरिकांचा मोठा सहभाग असल्याने या निवडणुकीचे निकाल महत्वाचे ठरणार आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त (मुख्यालय) जी. जी.…

जितेंद्र आव्हाडांच्या पाठीमागे मुंब्र्यातील माथाडींच कणखर युवा नेतृत्व म्हणजेच सद्दाम शेख

राज भंडारी ठाणे : जीवनातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, प्रसंगी मिळेल ते काम करत जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर माथाडी कामगारांचे नेतृत्व करीत युवा वर्गाचे नेतृत्व करणारे सद्दाम शेख यांनी वेगळे विश्व निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची मुंब्रा शहरात मोठी प्रशंसा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून सद्दाम शेख यांची ख्याती असली तरी मुंब्रा परिसरात त्यांनी अनेक योजना अंमलात आणून आपले स्थान निर्माण केले आहे. उत्तम वक्तृत्व असलेला हसतमुख चेहरा सदा हसतमुख, उत्तम वक्तृत्व, शिकण्याची वृत्ती, भविष्याची नवी दृष्टी असणारा, क्रिएटिव्ह माईंड आणि कवीमनाचा माणूस म्हणून हे युवा नेतृत्व सध्या चर्चेत आहे, त्यांचा स्वभाव शांत असा आहे. कोणत्याही पाठबळाविना सद्दाम शेख यांनी घेतलेली भरारी नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांनी तरुणांना कष्टाने पुढे जाण्याचा एक मार्गच दाखविला आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट अवघड नाही, याचे हे जिवंत उदाहरण म्हणजे सद्दाम शेख हे आहेत. स्वतःच्या क्षमतांवर त्यांना मोठा विश्वास आहे. आपल्या साऱ्या यशाचे श्रेय ते आई-वडिलांचे संस्कार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या व्यक्तीची साथ यांनाच असल्याचे ते सांगतात. यावेळी ते सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाला राजकारणात मुस्लिमांचा पक्ष असे संबोधले जात असले तरी मी एक मुस्लिम म्हणून एव्हढेच सांगेन, की जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत राहताना मी ना हिंदू, ना मुस्लिम, ना बौध्द, ना शीख आहे, त्यांच्या शिकवणीनुसार मी एक भारतीय आहे म्हणून आम्ही देशातील, सर्व प्रांतातील नागरिक हे एक भारतीय म्हणून त्यांच्यासोबत राहत आहोत. आज मुंब्रासारख्या भागात अनेक हिंदूंची, मुस्लिम बांधवांनी तसेच अनेक धर्मांच्या स्नेहबांधवांची प्रार्थनास्थळे उभी राहिली आहेत ती आमच्यासाठी आदरस्थान असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच आहेत. गेले अनेक वर्षे आम्ही याठिकाणी राहतोय तेही सर्व धर्म समभाव या वृत्तीने राहतोय याचे खरे श्रेय हे आम्ही जितेंद्र आव्हाड यांनाच देत असल्याचे त्यांनी सांगितले. खरं तर मुंब्र्यासारख्या विभागाला बदनाम करण्याचे कारस्थान करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे काम सद्दाम शेख यांच्या माध्यमातून दिसत आहे. ज्या ठिकाणी सर्व धर्म, प्रांत एकत्र नांदत असतात, त्याठिकाणी जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम जरी राजकीय पक्ष करीत असले तरी स्थानिक नेतृत्व करणारे युवा नेता सद्दाम शेख यांच्यासारखे कार्यकर्ते हे कदापी होवू न देता, आपला परिसर सुरक्षित कसा राहील याकडे लक्ष देत असतात. ऐन निवडणुकीच्या काळात अनेक प्रकारे दंगलीचे प्रकार घडविले जातात, त्यातच मुंब्रा हा भाग अती संवेदनशील म्हणून मानला जात असला तरी सद्दाम शेख यांच्यासारख्या युवा नेतृत्वाने या महाभयंकर घटना घडू नये, म्हणून “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्था हमारा” चा नारा दिला असल्याचे आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे सद्दाम शेख या युवा नेतृत्वाला सलाम !!! ००००

वाल्मिकी आणि बुध्द समाजाचा मतदानावर बहिष्कार !

ठाणे : विधानसभा  निवडणुकीच्या  दरम्यान बौद्ध आणि वाल्मिकी समाजाचे प्रश्न मर्गिस लावू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं असल तरी समाजाच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला आहे. मग तो घराचा प्रश्न असो किंवा…

निवडणूकीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार- जत्रा बंद ठेवा – संदीप माने

अनिल ठाणेकर ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी,.२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ चे नियम ५ ग अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी, मतदानाचा दिवस असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता ठाणे जिल्ह्यातील, ठाणे: करावे गाव, गावदेवी मैदान, से.36, नवी मुंबई आणि मुंब्रा बाजारपेठ व कौसा बाजारपेठ, कल्याण: मांडा, भिवंडी: दुगाड, खारबाव, कोपर, वडवली तर्फे राहूर, राहणाळ, घोलगाव, शहापूर: पिवळी, शेणवे, मळेगाव, टेंभूर्ली (खराडे, चांग्याचा पाडा) या ठिकाणांवर भरणारा आठवडा बाजार किंवा जत्रा बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी डॉ.संदीप माने दृकश्राव्य माध्यमांनी (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया) अशा बातम्या प्रदर्शित करु नयेत. तसेच राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निर्भयपणे, मुक्त वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस यंत्रणा व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान सज्ज आहेत. मतदानादिवशी मतदान केंद्रांवर कोणतीही गर्दी होणार नाही व सर्व मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी सर्व केंद्रीय सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक पोलीस यंत्रणांनी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना मतदान केंद्रात मार्गदर्शन करून त्यांचे मतदान जलदगतीने होईल, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणावरील विषयाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडली. या बैठकीस संबंधित सर्व केंद्रीय निवडणूक निरीक्षक, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांच्यासह सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, गुजरात पोलीस, गोवा पोलीस, छत्तीसगड पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.स्थानिक पोलीस दलाबरोबरच मतमोजणी केंद्रांवर तसेच मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या जवानांनी मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. सर्व नागरिकांना तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदान खोलीमधील व्यवस्थापन सुरळीत होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी रांगेचे व्यवस्थापन तसेच गर्दीचे व्यवस्थापन करताना स्थानिक पोलीस यंत्रणांबरोबरच केंद्रीय सुरक्षा यंत्रणाची मदत होईल. तसेच संवेदनशील व गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आले असल्याचे श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.ईव्हीएमची वाहतूक तसेच स्ट्रॉंगरुमची सुरक्षा व्यवस्थाही चोखपणे ठेवण्यात आली असून केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना अर्लट मोडवर राहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत.मतदान केंद्राच्या परिसरात अपुरी जागा असेल तेथे विशेष काळजी घेण्याचे निर्देश यावेळी केंद्रीय निरीक्षकांनी दिले. तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी, जेथे मतदारांची जास्त रांगा लागतात अशा परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात यावेत. मतदान प्रक्रियेसंदर्भात अथवा मतदानास उशीर होत असल्यासंदर्भात कोणतीही अफवा पसरवू नये, यासाठी सोशल माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी दिले. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुढील तास महत्त्वाचे असून अवैध मद्य वाहतूक, अवैध रोकड वाहतूक आदींवर भरारी पथकाने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी दिल्या. ठाणे शहर व जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा यंत्रणांची तैनात करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील तसेच गर्दीच्या ठिकाणीही योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर तसेच मतदानाच्या रांगेत गर्दी होऊ नये, मतदारांना लवकरात लवकर मत देता यावे, यासाठी मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस यंत्रणाही सर्वतोपरी मदत करणार आहे. संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे तसेच अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी ड्रोन, सीसीटीव्ही, विशेष पथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त डुंबरे यांनी यावेळी सांगितले. चौकट ठाणे जिल्ह्यात २८ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येते. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून एकूण २८ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १६ कोटी ५९ लाख ४ हजार रोख रक्कम, ३ कोटी ३२ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा,१ कोटी ८० लाख ३२ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, २३ लाख २६ हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू – दागिने आणि ७ कोटी १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे मोफत वाटपाचे / इतर साहित्य ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमधून प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी टीएमटीची बसव्यवस्था

ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने (टीएमटी) बस व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या…

प्रीतम जे एम म्हात्रे यांचा विजय निश्चित राज भंडारी

उरण :  उरण तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येणार असल्याचा दावा शेकापच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे. 20 नोव्हेंबर रोजी उरण विधानसभेची मतदान प्रक्रिया पडणार आहे. त्यांच्या प्रचाराला, रॅलीला सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकापने तालुक्यातील गावागावात केलेल्या विकास कामांच्या जोरावर प्रीतम जे एम म्हात्रे हे प्रचंड मतांनी निवडून येतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. विकासाचे काम करणारे दमदार आमदार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या रूपाने पाहिले जाते. प्रीतम म्हात्रे हे सामान्य जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. उरण मतदार संघात तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात, नौदलाच्या सेफ्टी झोन, जेएनपीए विस्थापित हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन आदी प्रश्न स्थानिक व भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी शेकापचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवारांपेक्षा प्रीतम जे म्हात्रे यांचे सामाजिक काम मोठे असून ते प्रचंड मतांनी निवडून येतील असे शेकापचे ज्येष्ठ नेते अनिल शिंदे यांनी सांगितले. ते उमेदवार म्हणून नव्हे तर गेली काही वर्षे या परिसरात सामाजिक काम करत असल्याने त्यांचा विजय नक्की असल्याचे गिरीश माळी यांनी सांगितले. धार्मिक कार्य ते सामाजिक, शैक्षणिक कार्यात प्रीतम जे एम म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रीतम म्हात्रे यांचे सामाजिक कार्य उरण, पनवेल, खालापूर, रायगड परिसरातील नागरिकांना माहिती आहे. कोरोना काळात केलेली मदत तसेच इरसाळवाडी दुर्घटनाग्रस्त जनतेला दिलेला दिलासा हे येथील जनतेने पाहिलेले आहे. प्रीतम जे एम म्हात्रे यांची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसून आली. त्यांनी येथील बेरोजगारीचा प्रश्न हाती घेतला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शिट्टीचा आवाज जोरदार होईल आणि प्रीतम म्हात्रे प्रचंड मतांनी निवडून येतील असे जेष्ठ कार्यकर्ते तरुण वर्ग सांगत आहे. यानिमित्ताने शेकाप आपला बालेकिल्ला राखेल असे बोलले जात आहे. शांत, शिस्तप्रिय आणि नम्र स्वभावाचा सुशिक्षित उमेदवार म्हणून प्रीतम दादा म्हात्रे यांची छबी निर्माण होत आहे. आज पर्यंत त्यांनी अनेकांना आधार दिला आहे. 20 नोव्हेंबर रोजी प्रीतम दादा म्हात्रे यांना बहुमताने निवडून द्या असे तालुका सहचिटणीस सुरेश पाटील यांनी आवाहन केले आहे.…