Category: ठाणे

Thane news

वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

वाशी : मागील काही दिवसांपासून हवामानात होणाऱ्या बदलामुळे शहरात ताप व सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. दुपारी कडक ऊन; तर रात्री हवेतील गारवा, पुन्हा पहाटेच्या सुमारास थंडी असे वातावरण अनेकांच्या…

‘न भूतो, न भविष्यती…!’ जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती

ठाणे : एकनाथ शिंदेंचे काय होणार, देवेंद्र फडणवीसांचे काय होणार याच्याशी मला काही घेणे देणे नाही. आमचा मुख्यमंत्री होतोय हे म्हटल्यावर आम्ही कशाला त्यांचे बघायला जाऊ असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क शिंदेंची स्तुती केली आहे. परिवर्तन होणार महाविकास आघाडी सत्तेत येणार असेही ते म्हणाले आहेत. मतांची वाढलेली टक्केवारी ही नेहमीच सत्तेच्या विरोधात असते. सत्तेवर राग असतो म्हणून लोक बाहेर पडून भरभरून मतदान करतात. तुमची लाडकी बहीण योजना चांगली आहे, वाढलेले भाव आणि महागाई हे देखील बहिणींच्या लक्षात आलेले आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात की लाडकी बहीण माझीच योजना त्यात बिघाड झाला. म्हणजे प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये वाटून घेतले. आता पैसे वाढवून देणार कारण त्यांच्या बहिणी वाढल्या होत्या. बहिणींवरून आता त्यांच्यात स्पर्धा लागली आहे, असा टोला आव्हाड यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला. आतापर्यंत निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे. आता पैसे वाटप, पोलिसांवर प्रचंड दबाव आणणे हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय थोडीच झाले असेल असा सवाल करत शिंदेंनी युतीधर्म पाळला त्यांचे अभिनंदन करतो, असे आव्हाड म्हणाले. शिंदेंनी अजित पवारांच्या उमेदवाराला जोरदार समर्थन दिले. भले त्यांनी मला मदत नाही केली. त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला तरी आपला मुख्यमंत्री आपल्या बाजूलाच राहतो हे बरे वाटते. त्यांना महायुतीतून काढून टाकले तर मला वाईट वाटेल असे आव्हाड म्हणाले. बाकीचे वैर सोडून द्या, मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो ही सन्मानाची आणि मानाची बाजू आहे, असे संजय शिरसाट यांनी केलेल्या शिंदे शरद पवारांसोबत जाऊ शकतात या दाव्यावर आव्हाड म्हणाले. संजय शिरसाट हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना माझ्यापेक्षा पत्रकारांना हिंट देण्याबाबत जास्त समजते, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. तसेच भाजपा उघडपणे म्हणत असेल की मुख्यमंत्री होऊच देणार नाही याचा अर्थ भाजपचा कुठेतरी प्लान झालेला आहे, असा संशयही आव्हाड यांनी व्यक्त केला.

डोंबिवली विभागीय कार्यालय कचऱ्याचे आगार

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय हे कचऱ्याचे आगार बनले आहे. कार्यालयाच्या आवारात निवडणूक काळात जप्त केलेले बेकायदा साहित्य टाकले आहे. या साहित्याचा ढीगच येथे तयार झाला…

शास्त्रीनगर आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण

ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची जागाही बळकावली ठाणे :शास्त्रीनगर  नंबर १ मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. तशी वर्कऑर्डरही निघाली आहे. या संदर्भात उपायुक्त, वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करुनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने शास्त्रीनगरवासिंयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर मा. नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन भूखंड मोकळा करण्याची विनंती केली आहे. शास्त्रीनगर  हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे. येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केले आहे. मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतला आहे. तर हत्तीपूल कडून शास्त्रीनगर  नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वन विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे. या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे. मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरु करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकाविल्या आहेत. आरोग्य केंद्रांच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत. तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त, वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या कडे तक्रारी करुनही अद्याप कारवाई केलेली नाही. माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.

मतमोजणी निरीक्षक म्हणून अम्रिता सिंह यांची नियुक्ती

 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी ठाणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 साठी केंद्रिय निवडणूक निर्वाचन आयोगाने 143 डोंबिवली या विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून अम्रिता सिंह (एस.सी.एस) यांची नियुक्ती केलेली आहे. 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या/नागरिकांच्या मतमोजणी विषयक काही तक्रारी असल्यास तक्रारदार हे 22 नोव्हेंबर 2024 पासून conobserver143@gmail.com या ई मेल आयडीवर तक्रार करु शकतात अथवा 9137335604 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करु शकतात. अम्रिता सिंह (एस.सी.एस) यांचे संपर्क ठिकाण: बंगलो नंबर 5, सेंच्युरी रेयॉन कॉलनी, ए-टाईप, कल्याण मुरबाड रोड, शहाड, जिल्हा ठाणे या ठिकाणी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत प्रत्यक्ष भेटून तक्रार करु शकतात, याची नोंद घ्यावी, असे आवाहन 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी केले आहे.

मतमोजणी निरीक्षक म्हणून कमलेश कुमार भादू यांची नियुक्ती

 149 मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघासाठी ठाणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 साठी केंद्रीय निवडणूक निर्वाचन आयोगाने 149 मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून कमलेश कुमार भादू (एस.सी.एस) यांची नियुक्ती केलेली…

मुस्लीम दाम्पत्यास मतदान करण्यास अनिता गौरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला विरोध – डॉ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : मुस्लीम दाम्पत्यास मतदान करण्यास माजी नगरसेविका अनिता गौरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केला विरोध केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. खारीगांवमधील गणेश विद्यालयात एका मुस्लीम दाम्पत्याचे मतदान आले होते. ते राहणारे मुंब्रा येथील आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे त्यांचे मतदान खारीगांवातील गणेश विद्यालयात आले होते. हे दोघेही पती…

 “काल भिजलेल्या कोंबडीप्रमाणे, आज कंठ फुटला”

विनोद तावडे यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल   वसई: मंगळवारच्या नोटा वाटप नाट्य प्रकरणानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘काल विनोद तावडे भिजलेल्या कोंबडीप्रमाणे बसले होते आणि मुंबईला गेल्यावर त्यांना कंठफूटला असे ठाकूर म्हणाले.  मतदारसंघात कोणी दिसलं तर त्यांना पुन्हा फटकवणार असा इशारा त्यांनी ‘दिखेंगे तो पिटिंगे’ अशा शब्दात दिला. मंगळवारी संध्याकाळी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये नोटा वाटप नाट्य घडले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले होते. तब्बल साडेचार तास त्यांनी भाजप नेत्यांची कोंडी केली होती. या प्रकरणात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या ३६ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पैशांचे वाटप करून मतदारांना लाज दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विनोद तावडे यांनी मात्र आता बविआवर आरोप केले आहेत. हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपचे नव्हते तसेच हॉटेल ठाकुरांच्या मालकीचे होते असाही आरोप तावडे यांनी केला आहे. बुधवारी हितेंद्र ठाकूर यांनी तावडे यांचा आरोपाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणामुळे भाजपाला फायदा होईल असे भाजप नेते सांगत आहेत. याचा अर्थ हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपने मतदारांपर्यंत वाटले असा होतो. पैसे तुमचे, वाटले तुम्ही आणि फायदा देखील तुम्हाला होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. विवांता हॉटेल हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीचे होते असा आरोप विनोद तावडे यांनी केला आहे. त्याला ठाकूर यांनी जोरदार उत्तर दिले. जर हॉटेल माझ्या मालकीचे होते तर भाजपने का बुक केले? विनोद तावडे यांनी ते हॉटेल माझ्या नावावर करून द्यावे असेही ते म्हणाले. विनोद विनोद तावडे काल विरार मध्ये असताना भिजलेला कोंबडीप्रमाणे बसले होते. मला सारखे फोन करता होते. आता मुंबईत गेल्यावर त्यांना कंठ फुटला असून ते आरोप करत आहेत. खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपाची प्रवृत्ती आहे असे ते म्हणाले. ‘आज दिखेंगे तो पिटेंगे’ आज सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. मतदारसंघामध्ये बाहेरची लोकं आल्याने हा वाद निर्माण झाला होता. आज जर पुन्हा कोणी बाहेरून आलेले दिसले तर त्याला पुन्हा फटकावणार असा इशाराही ठाकूर यांनी ‘दिखेंगे तो पिटेंगे’ या धर्तीवर दिला. 00000

भिवंडीत तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा अधिकार

शासकीय यंत्रणांबरोबरच उमेदवारांचेही आमच्याकडे दुर्लक्ष भिवंडी : भिवंडी शहरा व ग्रामीण भागात सर्वत्र मतदान शांततेत पार पडत असून  शहरातील दांडेकर विद्यालय येथील मतदान केंद्रावर तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात एकूण 179 तृतीयपंथी मतदार नोंदवण्यात आले असून त्यापैकी 119 तृतीयपंथीयांनी मतदान केलं आहे. तृतीय पंथीयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.मात्र आजपर्यंत शासकीय यंत्रणेतील अधिकारी आमच्या घरापर्यंत पोहोचले नसून आम्हाला ओळखपत्र मिळाले नसल्याने अनेक तृतीयपंथीय मतदानापासून वंचित राहिले आहेत.विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी देखील आपल्या घोषणा पत्रात तृतीयपंथी समाजाबाबत आश्वासक भूमिका कोणी मांडली नसल्या बद्दल ची खंत तृतीयपंथीय समाजासाठी काम करणाऱ्या ख्वाईश फाउंडेशनच्या तमन्ना मंसूरी यांनी बोलून दाखवली आहे.  

कल्याण-डोंबिवलीत स्वयंस्फूर्तीने नागरिक मतदानासाठी रांगेत

 बाचाबाचीच्या घटना, पोलिसांच्या तात्काळ मध्यस्थीने वादावर पडदा कल्याण: कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीसाठी या चारही मतदारसंघातील नागरिकांनी बुधवारी सकाळपासून मतदान केंद्रांबाहेर स्वयंस्फूर्तीने रांगा लावल्या होत्या. या रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिक, वृध्द, कामावर जाणाऱ्या नोकरदारांचा सर्वाधिक सहभाग होता. महिला वर्गाची रांगेतील हजेरी लक्षणीय होती. मतदान केंद्र परिसर, उमेदवारांचे मतचिठ्ठी देण्याचे मंच याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदारांना आपल्या बाजुने वळविण्यासाठीच्या प्रकारांना आळा बसला होता. कल्याण पश्चिमेत उंबर्डे भागातील पुण्योदय पार्क परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मतचिठ्ठी देण्यासाठी मंच लावला होता. या भागात महायुतीचा वरचष्मा आहे. आपल्या भागात आघाडीच्या उमेदवाराचा मंच कसा लागला, असा प्रश्न महायुतीच्या एका कार्यकर्त्याने करून आघाडीच्या कार्यकर्त्याला मंच लावण्यास विरोध करून त्याला शिवीगाळ केली. यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थीने हा विषय तात्काळ मिटविण्यात आला. आघाडीच्या उमेदवाराला तेथे मंच लावण्यास परवानगी देण्यात आली. डोंबिवली पश्चिमेत राजूनगर परिसरात एक माजी नगरसेवक आणि एक स्थानिक कार्यकर्ता यांच्यात बाचाबाची झाली. भाजपच्या वरिष्ठाने या प्रकरणात मध्यस्थी करून या प्रकरणावर पडदा टाकला. ग्रामीणमधील दातिवली भागात दोन गटात बाचाबाची झाल्याची चर्चा होती. राजकीय चढाओढीतील हे किरकोळ प्रकार वगळता कल्याण, डोंबिवली परिसरात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्र परिसरात मतदारांना कोणी कसलेही आमिष दाखविणार नाही याची विशेष काळजी पोलिसांनी घेतली होती. ज्येष्ठांचे सकाळीच मतदान मतदानाच्या पाच दिवस अगोदर भारतीय निवडणूक आयोग, पक्षीय उमेदवारांकडून मतदारांना घरपोच आपल्या मतदान केंद्राचे ठिकाणाची माहिती व्हाॅटसप, मतचिठ्यांमधून दिली होती. त्यामुळे मतदार स्वयंस्फूर्तीने घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावर येत होते. सकाळी सात वाजल्यापासून वृध्द, ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे नोकरदार मतदानासाठी रांगेत होते. मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मतदान केल्यानंतर मतदार केंद्राजवळील सेल्फी केंद्रात सेल्फी काढत होते. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती तरी अनेक जण मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रांबाहेर वृध्द, ज्येष्ठ नागरिक यांना पाणी, आसन व्यवस्थेची सोय करण्यात आली होती. अमेरिकन कॉर्पोरेट  मतदान नोकरीनिमित्त अमेरिकेत राहत असलेल्या काॅर्पोरेट अपूर्वा पांडे दोन दिवसापूर्वी डोंबिवलीत दाखल झाल्या आहेत. डोंबिवली पूर्वेतील मतदार यादीत नाव असल्याने अपूर्वा यांनी सावरकर रस्त्यावरील संगीता विद्यामंदिरात मतदान केले. गस्तीमुळे शांतता मतदानासाठी सुट्टी असल्याने बहुतांशी नोकरदार रांगेत तिष्ठत राहून मतदान करण्यास लागू नये म्हणून सकाळीच मतदानासाठी कुटुंबीयांसह बाहेर पडला होता. काही मतदार कौतुकाने आपली लहान मुले, पाळीव श्वान घेऊन मतदान केंद्र परिसरात आले होते. दुपारनंतर मतदान केंद्रावरील मतदान यंत्र संथगतीने काम करत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून वाढल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्रांबाहेरील रांगाचे प्रमाण वाढले होते. मतदान केंद्रांवर महिला, वृध्द, ज्येष्ठ यांना प्रथम प्राधान्य देऊन मतदान करून दिले जात होते. कल्याण ग्रामीणमधील लोकग्राम भागात रस्त्यावर एका उमेदवाराचा चार आकडा लिहून प्रचार करण्यात येत होता. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तो क्रमांक पुसून काढला.मतदान केंद्रात येणाऱ्या मतदाराकडील मतचिठ्ठीवर कोणत्याही पक्षाचे चिन्हे नाही याची खात्री करून मगच पोलीस त्यांना मतदानासाठी केंद्रात प्रवेश देत होते. उमेदवार मतदारसंघात कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण, डोंबिवलीतील उमेदवार मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे ना. मतदार कार्यकर्त्यांकडून मतदानासाठी घराबाहेर काढले जात आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी आपल्या मतदारसंघात समर्थकांसह फिरत होते. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे भोजन, त्यांच्या पाण्यासाठी यावेळी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. लोकसभेसारखी परिस्थिती यावेळी निर्माण होऊ नये याची विशेष काळजी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली होती.