Category: ठाणे

Thane news

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचे ११ दरवाजे पुन्हा उघडले!

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह उद्योग, कारखान्यांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण या आधी ९ ऑगस्टला भरले होते. तेव्हा उघडलेले स्वयंचलित दरवाजे पाणी कमी झाल्यामुळे बंद झाले होते. पण आज परतीच्या…

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कायदा व सुव्यवस्था प्रशिक्षण संपन्न

 विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे,दि.19(जिमाका):- प्रत्येक निवडणुकीत पोलीस दलाने नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे काम केलेले आहे. लोकसभा निवडणुकांप्रमाणे येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्येही सर्व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन नि:पक्षपातीपणे व जबाबदारीने काम करावे, असे मार्गदर्शन कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या निर्देशाप्रमाणे आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हास्तरीय पोलीस अधिकाऱ्यांचे “कायदा व सुव्यवस्था” या विषयाबाबतचे प्रशिक्षण पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नोडल अधिकारी, कायदा व सुव्यवस्था दीपक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षण वर्गास जिल्ह्यातील सर्व उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कोणत्याही निवडणुकांमध्ये पोलीस प्रशासनाची महत्वाची जबाबदारी असते. निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीसुद्धा तैनात असतात, त्यामुळे मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. निवडणुकीची ड्यूटी ही कायद्याचे पालन करुन डोळ्यात तेल घालून करणे आवश्यक आहे. मॉक ड्रिल्स कधी घ्यावेत याचेही नियोजन करणे गरजेचे आहे. निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर लागणाऱ्या मशीन्सची याची जबाबदारी देखील पोलीसांवर असते व ती आपण काटेकोरपण पार पाडत असतो, त्यामुळे या निवडणुकीतही आपण सर्वजण ती निश्चितपणे पार पडणार आहोत, असा विश्वासही कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याचीही दक्षता पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठांना कळवावी. तसेच मतदान केंद्रावर कोणतेही गैरव्यवहार होणार नाही, या दृष्टीने काम करावयाचे आहे, अशा सूचनाही यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. 00000

मुरबाडमध्ये किसन कथोरेच भाजपचे उमेदवार

पक्षाअंतर्गत विरोधकांची कोंडी, पक्षांतरांच्या चर्चांनाही पूर्णविराम   बदलापूर: मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत किसन कथोरे यांच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचाही समावेश असून भाजपने कथोरे यांना तिकीट दिल्याने त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांच्यासह कथोरे यांच्याविरुद्ध आघाडी उघडणाऱ्या अनेकांना धक्का दिला आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे भाजपाकडून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. भाजपने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात मुरबाड विधानसभा मतदारसंघातून किसन कथोरे यांचे नाव निश्चित झाले. दरम्यान यापूर्वी किसन कथोरे पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही कथोरे यांच्याविरुद्ध जुन्या जाणत्या भाजप पदाधिकाऱ्यांची आघाडी उभी केली होती. तसेच कथोरे यांना, हिम्मत असेल तर अपक्ष लढून आपली ताकद दाखवा असे आव्हानही पाटील यांनी उघडपणे दिले होते. त्याचवेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, मुरबाड ग्रामीण मधून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी कथोरे यांना आव्हान देत मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मागणी केली होती. या पक्षांतर्गत आणि महायुतीतील विरोधामुळे किसन कथोरे शरद पवारांच्या गटात जाणार असल्याची एक मांडणी केली जात होती. हीच मांडणी करत शिवसेनेतील काही इच्छुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मुरबाड विधानसभा मतदारसंघात तयारी करण्यासाठी आदेश द्या, अशी विनंती केली होती . मात्र रविवारी भाजपने पहिल्याच यादीत आमदार किसन कथोरे यांचे नाव जाहीर केल्याने भाजपने सर्वांना स्पष्ट उत्तर दिल्याचे बोलले जाते आहे. पहिल्या यादीतील किसन कठोर यांच्या नावामुळे पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच भाजपने कथोरे यांच्या पक्षातील विरोधकांना थेट उत्तर दिल्याचे बोलले जाते.

 मध्यवर्ती मतदान केंद्रातील नियंत्रण कक्षात लँडलाईन व टोल फ्री क्रमांक कार्यान्वित

 १४७ कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघाच्या ठाणे : भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचार संहिता जाहीर केलेली आहे. १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रासाठी मतदारांच्या तक्रारी नोंदविणे, त्यांना माहिती देणे या कामे करण्याकरिता १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती मतदान केंद्रात नियंत्रण कक्ष (२४४७) उभारण्यात आले असून या नियंत्रण कक्षात लँडलाईन दूरध्वनी क्रमांक ०२२- २०८१२८३६ व  १८००२२००२१ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे, असे १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद मुंढे यांनी कळविले आहे.

हर्षिता ठोंबरेची तिरंदाजीत चमकदार कामगिरी

ठाणे : आनंदीबाई केशव जोशी विद्यालयाच्या ८ वर्षीय हर्षिता विनायक ठोंबरेने तिरंदाजीत चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंगोली येथे नुकत्याच झालेल्या सातव्या महाराष्ट्र राज्य मिनी तिरंदाजी स्पर्धेत…

मामलेदार मिसळे ते प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी ! राज ठाकरेंची मनोसोक्त खाऊगिरी

अनिल ठाणेकर ठाणे : आपल्या तिखट आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याची जगप्रसिध्द तिखट मामलेदार मिसळवर आडवा हात मारला. इतकेच नव्हे तर आज ठाण्यात मनोसोक्त खाऊगिरी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडींग

 सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हेलिकॉप्टर भरकटले ० कोयनेच्या बॅकवॉटरवर १५ फुटापर्यंत खाली आले ० मुख्यमंत्री सुरक्षित, दिल्लीला रवाना   पुणे : देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती आज आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

– विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

शांतीनगर येथील ठाणे महानगरपालिका शाळेमध्ये ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 147-कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत शांतीनगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा…

अंधश्रद्धेसाठी पांढरीच्या लाकडांची तस्करी

शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रील बांधनपाडा गावातील फार्महाऊसवर वनविभागाची धडक कारवाई अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये डोळखांब वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बांधनपाडा गावाशेजारील फार्महाऊसवर वनविभागाने धडक कारवाई केली आहे.…

सामाजिक बांधिलकीचा अनोखा वाढदिवस !

नितीन दुधसागर ठाणे : वाढदिवस म्हंटला की एखाद्या मोठ्या हॉटेल मध्ये अथवा मोकळ्या प्रांगणात साजरा करायला अनेकांना आवडत असले तरी याला काहीसा छेद देण्याचा प्रयत्न पत्रकार नितीन दुधसागर यांनी केला…