Category: ठाणे

Thane news

 पीवायसीतर्फे राज्यभरातील खेळाडूंसाठी 19 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेट निवड चाचणी

 निवड झालेल्या खेळाडूंना वर्षभर मोफत प्रशिक्षण देणार पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने राज्यभरातील खेळाडूंसाठी पीवायसी क्रिकेट अकादमीची येत्या 15 व 16 ऑक्टोबर रोजी 19 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेटची निवड…

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसची आज ‘माता की चौकी’ – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी, कळव्यातील मफतलाल मैदानात यंदा प्रथमच माता की चौकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

ठाणे DSO खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेस तिहेरी मुकुट

ठाणे : ठाणे DSO खो-खो स्पर्धेचे आयोजन दिनांक ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत  श्री मावळी मंडळ संस्था, क्रीडा व युवक संचालनालय  महाराष्ट्र राज्य  व  ठाणे महानगर पालिका ठाणे…

स्पोर्टिंग क्लब कमिटीतर्फे मुलासाठी निवड चाचणी

ठाणे : मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या ठाण्यातील स्पोर्टिंग क्लब कमिटीतर्फे १२ आणि १४ वर्षे वयोगटाच्या मुलांसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. हि निवड चाचणी सेंट्रल मैदानातील इनडोअर अकादमी…

आनंद विश्व गुरुकुलमध्ये पोट्रेट मेकिंग कार्यशाळा संपन्न

ठाणे – शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात `पोट्रेट कसे बनवावे’ याविषयी प्रख्यात पोट्रेट आर्टिस्ट अद्वैत नांदवडेकर यांची कार्यशाळा संपन्न झाली.  कार्यशाळेत पोट्रेट बनवताना कशी काळजी घ्यावी,…

ठाणे जिल्ह्यातील ३ संस्थांचे नामकरण

मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख ठाणे : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे यशस्वी नामकरण करण्यात आले…

घरकामगार महीलांच्या मानवी साखळीस प्रचंड प्रतिसाद !

ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या १८ फेब्रुवारी, २०२१ च्या आदेशानुसार तात्काळ मंडळाच्या त्रिपक्षीय बोर्ड ची स्थापना करावी.घरेलु कामगार कल्याण मंडळ आर्थिक दृष्टी ने सक्षम व निरंतर रहावे या हेतूने शासनाकडे…

न्यू हॉरीझॉन महाविद्यालयात मतदार नोंदणी व जनजागृती अभियान

00000   ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या…

कामावरुन काढून टाकलेल्या १४८ कंत्राटी कामगारांना पुन्हा नोकरी

भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांचा पुढाकार ठाणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून तडकाफडकी कामावरुन काढून टाकलेल्या १४८ कंत्राटी कामगारांना पुन्हा नोकरी मिळाली आहे. भाजपाचे…

 दिवा विकास प्रतिष्ठान आयोजित नवरात्री उत्सवाचा उत्साह शिगेला

श्रीकांत शिंदे मिञ मंडळ नेतृत्वाखाली दिव्यात सहा ठिकाणी रास गरबा   ठाणे : शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्त दिवा शहरात नऊ रंगात न्हाऊन निघण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दिव्यात देखील अनेक सार्वजनिक मंडळाचे व कार्यकर्त्यांनी मंडप सजावट, साउंड सिस्टिम, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि डीजेच्या आवाजात गरबा नृत्य आयोजित करून तरुणाई मंत्रमुग्ध होत आहे. तसेच दिवा शिवसेनेचे गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे उपशहर प्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिवा शहरात एकूण पाच ते सहा  ठिकाणी रास दांडियाचे भव्य आयोजन केले आहे. साबेगाव येथील डिजे कंपाऊंड, तर दिवा पश्चिमेस क्रिश कॉलनी, दिवा-आगासन रोड येथील सदगुरू नगर, दत्तनगर व एन आर नगर,  या ठिकाणी आयोजन केले आहे. तसेच यावर्षी महिला व तरुणींना उत्कृष्ट बक्षिसे व भेट वस्तू व तसेच दररोज पैठणी जिकंण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यंदा महिला वर्गामध्ये बक्षिसांची लयलूट करण्यासाठी व नृत्य करताना सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळून राहाव्यात यासाठी ड्रेस, हेअर स्टाईल, दागिने, टॅट्यू काढण्याला विशेष पसंती दिली जात आहे. नवरात्री उत्सवात मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे. यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत व या नियमांचे तंतोतंत पालन करून दिव्यातील यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव मोठया उत्साहात सुरू आहे असे मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.