Category: ठाणे

Thane news

महाराष्ट्र कुनीति आणि कुकर्माचे मॉडेल बनत आहे –  योगेंद्र यादव

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्राने नेहमीच देशाच्या राजकरणाला दिशा दाखवली आहे. इथे सुरु केलेल्या रोजगार हमी, महिला आरक्षण सारख्या योजना केंद्र सरकारने देशभरात चालवल्या. बळाने नाही तर नीतीने सरकार चालवण्याचा वस्तुपाठ महाराष्ट्राने देशाला घालून दिला याबद्दल देशभरात महाराष्ट्राचे नाव आदराने घेतलं जायचं पण गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा राजकारणाने अशी काय पलटी मारली की आज महाराष्ट्र कुनीति आणि कुकर्माचे मॉडेल बनत आहे हे फार चिंताजनक आणि दुःखदायी आहे, असे घणाघाती आरोप भारत जोडो अभियान चे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी ठाण्यात भारत जोडो अभियानातर्फे आयोजित केलेल्या लोकशाही, संविधान आणि मताधिकार संमेलनात बोलताना केले. खोट्या राष्ट्रवादाचा आव आणणारे आणि धर्माच्या, जातीच्या नावावर दंगली घडवून आणणारे खरे देशद्रोही आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाला चपराक लगावून त्यांना कुबड्यांचा आधार घेऊन सत्तेवर येण्यास भाग पाडण्यात महाराष्ट्राने मोठी भूमिका बजावली होती. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुजाण मतदारांनी या देशद्रोही आणि सत्तेचा गैरवापर करुन आलेल्या सरकारला धडा शिकवावा आणि त्यांना सत्तेतून पायउतार व्हायला भाग पाडावे, असे आवाहन योगेंद्र यादव यांनी केले. भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्र राज्य संयोजक उल्का महाजन यांनी आपल्या भाषणात सरकारच्या लाडकी बहीण या योजनेवर जोरदार टीका करत म्हटलं की महिलांना पैशाचं आमिष निवडणुकीसाठी दाखवणारे सरकार महिलांच्या सुरक्षितते बाबत निकामी ठरले आहे हे राज्यात सतत घडणाऱ्या महिलावरील अत्याचार आणि त्यात सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा हात आणि त्यांना आरोप मुक्त करण्यात सरकारचा पुढाकार यावरुन स्पष्ट दिसून येतं. शिवाजी महाराजांचा पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारे हे सरकार सामाजिक, आर्थिक बाबतीत संपूर्णपणे पराभूत झाले आहे. भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय सचिव डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी सरकारच्या सर्रास खोटेपणावर झोड उठवताना म्हटले की सरकारवर टीका करणाऱ्या आणि भारत जोडो अभियानात सामील असलेल्यांना अर्बन नक्षल, अराजक माजवणारे असे ठरवून संविधानाने दिलेल्या विचार आणि भाषण स्वातंत्र्याचा अपमान करण्याचे काम फडणवीस करत आहेत. सर्रास खोटे आरोप दाबून करा हीच शिकवण भाजप आणि संघातून मिळते आणि त्याच्याच आधारे हे बेईमानी सरकार चालवले जात आहे. या निवडणुकीत त्यांना पाडून लोकशाहीचा सन्मान करण्याचा पण मतदारांनी केला आहे. या संमेलनात शाहीर संभाजी भगत आणि सहकाऱ्यांनी संविधानाचा जलसा जोशात सादर केला. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास ठाणेकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संसोजक राजेंद्र चव्हाण, मुक्ता श्रीवास्तव, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, विशाल जाधव, रवि घुले, अजय भोसले आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

 फोटो सर्कल सोसायटीचे १० नोव्हेंबर  ते १७ नोव्हेंबरपर्यंत २५ वे राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन

भारतातील छायाचित्रकारांनी काढलेली निवडक २६४ छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार ! अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील नामवंत फोटो सर्कल सोसायटीच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त १० नोव्हेंबर  ते १७ नोव्हेंबर  दरम्यान राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन…

 मतदारांच्या संख्येत वाढ

 २० दिवसांत ७३ हजार मतदारांची भर ठाणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मागील २० दिवसांत जिल्ह्यात ७३ हजार ६११ मतदारांची नवीन नोंद झाली आहे. तर लोकसभा निवडणूकीपासून आतापर्यंत ४ लाख २८…

काँग्रेसचा उमेदवार असतानाही बाळ्या मामा समाजवादीच्या व्यासपीठावर

ठाणे : भिवंडी पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे दयानंत चोरघे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. असे असतानाही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज आझमी यांनी उमेदवारी अर्ज…

‘मुंब्र्याला बदनाम करू नका, तुम्ही जागा अन् परवानगी द्या, मी पुतळा उभारतो’

डॉ..जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना दिले प्रति आव्हान अनिल ठाणेकर ठाणे : देवेंद्र फडणवीस यांना कदाचित कुणी सांगितले नसेल पण जिथून मुंब्र्याचा रस्ता सुरू होतो. तिथेच राजमाता जिजाऊ,  संत तुकाराम महाराज,…

भूमिपुत्रांना  उद्ध्वस्त करणारा, स्वातंत्र्यसैनिकांच्या घरांवर बुलडोझर फिरविणारा डीपी रोड तात्काळ रद्द करा, अन्यथा आंदोलन करू

ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांचा इशारा ठाणे : खारीगाव येथील प्रस्तावित डीपी रोड भूमिपुत्रांना उद्ध्वस्त  करणारा आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या घरावर, १७ रहिवासी इमारतींवर आणि जरीमरी ग्रामदेवतेच्या मंदिरावर बुलडोजर फिरविण्याचा घाट या…

विहंग प्रतिष्ठानतर्फे दिवाळी अंकाचे प्रदर्शन

विहंग प्रतिष्ठान आणि नेहरूनगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या आठ ते दहा नोव्हेंबर दरम्यान नेहरूनगर नागरिक मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, नेहरूनगर, कुर्ला (पूर्व) येथील सभागृहात दिवाळी अंकांचे भव्य…

बेलापूरपेक्षा ऐरोलीत महिला मतदार अधिक

वाशी : नवी मुंबईत बेलापूर आणि ऐरोली हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांत नऊ लाख तीन हजार ८२८ मतदार आहेत. त्यापैकी ऐरोलीत सर्वाधिक म्हणजे चार लाख ८४ हजार २३५; तर बेलापूरमध्ये चार लाख १९ हजार ५९३ मतदार आहेत. ऐरोलीमध्ये बेलापूरपेक्षा जवळपास साठ हजार मतदार अधिक आहेत. ऐरोली क्षेत्रात महिला मतदारांची संख्यासुद्धा बेलापूरच्या तुलनेत अधिक आहे. ऐरोलीत दोन लाख १३ हजार ९००; तर बेलापुरात एक लाख ९६ हजार १२७ महिला मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महिलांचा कौल महत्त्वाचा मानला जात आहे. ऐरोली मतदारसंघात गाव, गावठाणे तसेच झोपडपट्ट्यांची मोठी वसाहत आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीचा विस्तीर्ण पट्टा आहे. त्यामुळे मतदार नोंदणीतसुद्धा हा मतदारसंघ आघाडीवर राहिला आहे. ऐरोली आणि बेलापूरमधील एकूण मतदारसंख्येपैकी पुरुष मतदारांची संख्या चार लाख ९३ हजार ८०१ इतकी आहे. पुरुष मतदारांचे हे प्रमाणसुद्धा बेलापूरच्या तुलनेत ऐरोलीमध्ये अधिक आहे. ऐरोलीत पुरुष मतदारांची संख्या दोन लाख ७० हजार ३३५ इतकी आहे; तर बेलापूरमध्ये दोन लाख २३ हजार ४६६ पुरुष मतदार आहेत. लोकसभेतील सर्वाधिक मतदान बेलापुरात लोकसभा निवडणुकीत ऐरोली विधानसभा मतदारसंघातील एकूण ४,५७,४५६ पैकी २,२१,७४० मतदारांनी मतदान केले होते. टक्केवारीत ते ४८.४७ इतके होते. बेलापूरमधील ३,९७,७३१ मतदारांपैकी २,०४,९६९ मतदारांनी मतदान केले होते. टक्केवारीत हे प्रमाण ५१.५३ इतके आहे. यावरून लोकसभेत सर्वाधिक मतदान बेलापूर मतदारसंघात झाले होते. दोन्ही मतदारसंघांतील मतदार संख्या १. ऐरोली पुरुष    – २,७०,३३५ महिला  – २,१३,९०० एकूण   – ४,८४,२३५ २. बेलापूर पुरुष    – २,२३,४६६ महिला – १,९६,१२७ एकूण  – ४,१९,५९३

कल्याण-डोंबिवलीत वाहन तपासणी मोहीम तीव्र

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील चार विधानसभा क्षेत्रांमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी आणि सर्वेक्षण विभागाने वाहन तपासणी मोहीम तीव्र केली आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून…

नवी मुंबईत विविध समाज घटकांमध्ये मतदार जनजागृती

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असून 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त्‍ तथा दोन्ही मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक पातळीवर विविध समाज घटकांपर्यंत पोहचविणे जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत आज विविध ठिकाणी नाका कामगारांशी संवाद साधून त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये 150 ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वीपचे अधिकारी, कर्मचारी यांनी रबाळे आणि तळवली नाका तसेच सेक्टर 4 ऐरोली येथील नाक्यांवरील नाका कामगारांची भेट घेत त्यांच्यामध्ये मतदान करण्याविषयी जागरुकता निर्माण केली. अशाच प्रकारे ऐरोली विभागात चिंचपाडा व गणेशनगर येथील रहिवाशांना मतदानाचा भारतीय संविधानाने दिलेला अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी नमुंमपा शाळा क्रमांक 53 चिंचपाडा येथे नागरिकांना एकत्र करुन सामुहिकरित्या मतदार प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त स्वीप नोडल अधिकारी उपआयुक्त श्री. संतोष वारुळे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नवी मुंबईतील विविध समाज घटकांशी संपर्क साधून 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे व या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.