दिव्यातील म्हात्रे गेट येथील रस्त्याचे कोंक्रीटीकरण पूर्ण
ठाणे : दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट मधील भगवान म्हात्रे चाळ क्र तीन ते सहा येथे पावसाळ्यात रहिवासी यांना येण्याजण्यासाठी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते याचीच दखल घेत दिवा शिवसेनेचे…
Thane news
ठाणे : दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट मधील भगवान म्हात्रे चाळ क्र तीन ते सहा येथे पावसाळ्यात रहिवासी यांना येण्याजण्यासाठी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते याचीच दखल घेत दिवा शिवसेनेचे…
मुंब्राः दूध डेअरी मध्ये लागलेल्या आगीत डेअरी मधील विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दिव्यात घडली. दिवा शहरातील साबे रोड जवळ असलेल्या १० बाय १५ फूट आकाराच्या गाळ्यामध्ये कैलास चंद्रकुमार यांची दूध डेअरी आहे. या डेअरी मध्ये मंगळवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. याबाबतची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्यातील कर्मचारी, वीज वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी १ फायर ,१ रेस्क्यू वाहन आणि १ वॉटर टँकरच्या मदतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नानी मध्यरात्री पावणेचार वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु डेअरी मधील दुध ठेवण्याचे दोन मोठे आणि एक लहान फ्रिज तसेच इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.
कल्याण : शिधापत्रिकाधारकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा भविष्यात धान्य बंद होईल, असे आवाहन ३८ फ कल्याण प्रभारी शिधावाटप अधिकारी धरमसिंग बहुरे यांनी केले आहे. तसेच,…
ठाणे : राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला रस्ते, विविध प्रकल्पांसह इतर विकासकामांसाठी तब्बल ४२०० कोंटीचा निधी आतापर्यंत मंजूर झाला असून, त्यापैकी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्राप्त होऊनही महापालिकेची आर्थिक…
श्री मावळी मंडळ यांस तिहेरी मुकुट ठाणे : दिनांक ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान झालेल्या श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित शतक वर्ष निमित्त जिल्हास्तरीय आंतर शालेय स्पर्धेमध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूल च्या खो खो संघाने तिहेरी मुकुट संपादन केले आहे. शतक वर्षामध्ये संघाने घवघवीत यश मिळवले म्हणजे त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम समन्यामध्ये सहकार विद्या मंदिर कळवा विरुद्ध हा सामना १ डाव ३ गुण राखून विजेतेपद मिळवले. ह्या समन्यामध्ये कु आयुष सोनवणे ह्याने 3 मिनिटे संरक्षण केले. स्वरां जाधव ह्याने १ मिनिटे संरक्षण केले, सोहम ठाकूर ह्याने नाबाद 1 मिनिटे संरक्षण कारून संघास विजयी करण्यात योगदान दिले. तसेच १७ वर्षाखालील मुलिंच्या संघाने अंतिम समन्यामध्ये न्यु कळवा हायस्कुल विरुद्ध हा सामना १ डाव २ गुण राखून विजेतेपद मिळवले. ह्या समन्यामध्ये संस्कृती जाधव, अद्विका चव्हाण आणि अंतरा कदम ह्यांनी अष्टपैलू खेळी करून संघास विजयी केले. तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम समन्यामध्ये सहकार विद्या मंदिर विरुद्ध हा सामना १ डाव ५ गुण राखून एकतर्फी विजेतेपद मिळवले. स्पर्धे मध्ये ह्या संघाने सर्व सामने एकतर्फी विजयी होऊन स्पर्धेत दबदबा कायम ठेवला. अंतिम समन्यामध्ये अभिराज वाळंज ह्याने नाबाद 2 मिनिटे संरक्षण करून समन्यामध्ये 3 गडी बाद करून अष्टपैलू खेळी केली, पार्थ मायनांक ह्याने 2 मिनिटे संरक्षण केले तर भार्गव शिंदे ह्याने १ मिनिटे संरक्षण करून १ गडी बाद करत आपल्या संघास विजय संपादन करून दिला. राज्यस्तरीय प्रशिक्षक प्रणय कमले हे त्यांचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली श्री मावळी मंडळ संघाने बरेच विजय संपादन केले आहे. 0000
ठाणे : उत्तेजक द्रव्ये आणि नको असलेल्या प्रोटीनच्या सेवनामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची वाढत्या वयात जाणीव करून देण्यासाठी ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स संघटनेतर्फे पाचव्या ठाणे जिल्हास्तरीय नॅचरल श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन…
महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश ठाणे : पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा ठाणेकरांनी सकारात्मकपणे स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक मूर्तींसाठीही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आतापासूनच तयारीला लागावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. कृत्रिम तलाव, टाकी विसर्जन व्यवस्थेप्रमाणेचे सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था यंदा ठाणे महापालिकेने भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांना ठाणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. फिरत्या विसर्जन व्यवस्थेचे आणखी काटेकोर नियोजन करून त्यांची संख्या वाढवावी. त्याबद्दल जनजागृती करावी. आपल्या सोसायटीच्या दारातच मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्याची सोय उपलब्ध झाली तर नागरिक त्याचा निश्चितपणे स्वीकार करतील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. सोमवारी, माजिवड्याच्या नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आयुक्त राव यांनी यंदाच्या विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख या बैठकीस उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी या बैठकीत सादरीकरण केले. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याची संवेदनशीलता मूर्तीकार, भाविक यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवी संघटना, मूर्तीकारांची संघटना यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे महापालिकेने आयोजन करावे, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी केली. यंदाच्या संपूर्ण विसर्जन व्यवस्थेची माहिती देणारा अहवाल सादर करण्यात यावा. त्यात, शाडू माती, पिओपी यांच्या मूर्तींचा संख्या किती होती, याचे विवरण असावे. त्या संख्येचा अभ्यास करून पर्यावरणपूरक मूर्तींच्या जागृतीसाठी धोरणाची आखणी करता येईल. त्याचबरोबर, टाकी विसर्जन व्यवस्थेसह पुढील वर्षी फिरत्या विसर्जन व्यवस्थांमध्ये वाढ करावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. येत्या काळात दसऱ्याला देवींच्या मूर्तीचे विसर्जन होईल. तसेच, छट पूजेसाठीही दोन-तीन दिवस रायलादेवी, कोलशेत, मासुंदा येथे भाविक येतील त्यांचीही चांगली व्यवस्था केली जावी, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना मिळाली नवी ओळख ठाणे : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे यशस्वी नामकरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. याबाबत मंत्री लोढा म्हणाले की, “औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्य विकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.” नामकरण केलेल्या संस्थांची माहिती पुढीलप्रमाणे, १. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे, जि. ठाणे- धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे, जि. ठाणे २. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, जि. ठाणे- दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, जि. ठाणे ३. शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था, (महिला) ठाणे, जि. ठाणे- राजमाता जिजाऊ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) ठाणे, जि. ठाणे
पनवेल : पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व लोकप्रिय आमदार प्रशांत…
कल्याण : प्राचीन मंदिरांपैकी एक आणि पेशवेकालीन मंदिर अशी ओळख असलेल्या टिळक चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीचा पाचवा दिवस काहीसा खास ठरला. आजच्या ललित पंचमीचे औचित्य साधून कल्याणातील सकल हिंदू…