Category: ठाणे

Thane news

डेरवलीतील रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन

पनवेल : उरण मतदार संघात आणि पनवेल तालुक्यात येणाऱ्या डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यत्तच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम आमदार महेश बालदी यांच्या सातत्यापुर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांतून मंजूर झाले आहे.…

 प्राध्यापक प्रकाश सुर्वे चमकले

 शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांसाठी झालेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम तर राज्यपातळीवर मिळवला तिसरा क्रमांक   ठाणे : शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती…

 माहिती अधिकार कायद्यात सामान्य माणसाला दक्ष नागरिक घडविण्याची ताकद

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त ठामपातर्फे व्याख्यानाचे आयोजन   ठाणे : शासन व प्रशासन पारदर्शक, जबाबदारीने चालावे हा उद्देश माहिती अधिकार या कायद्याचा आहे. हा कायदा लागू होवून 19 वर्षे झाली असून या कायद्यामुळे गैरप्रकार उघड होण्यास मदत होत आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अभ्यासामुळे व वापरामुळे व्यक्तीचे माहितीगार नागरिकांमध्ये रुपांतर होते. स्वाभिमानी, जबाबदार, प्रामाणिक व सार्वजनिक हितासाठी कटिबद्ध असणारा दक्ष नागरिक घडविण्यांची अंगभूत शक्ती माहिती अधिकारामध्ये असल्याचे माहिती अधिकारी कार्यकर्ता फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी नमूद केले. 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सोमवारी (30 सप्टेंबर) कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात माहिती अधिकार कायदा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते. सामान्य माणसाला त्याच्या नागरिक म्हणून असणाऱ्या शक्तीची जाणीव करुन देणारा व सामान्य माणसाला न्याय देणारा हा कायदा आहे. माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमान्वये मिळवता येण्याजोगी माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. यामध्ये एखादे काम, दस्तऐवज, अभिलेख यांची पाहणी करणे, दस्तऐवजांच्या किंवा अभिलेखांच्या टिप्पण्या, उतारे किंवा प्रमाणित प्रती घेणे, सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे आदींचा समावेश या अधिकारात असल्याचे . सुभाष बसवेकर यांनी सांगितले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि शासन लोकाभिमुख करण्यासाठी हा कायदा पारित करण्यात आला आहे. मात्र जनमाहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी यांनी हा कायदा गंभीरपणे समजून घेतलेला नाही, त्याची लोकाभिमुखता समजून घेतली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांनी हा कायदा गंभीरपणे लक्षात घेतला पाहिजे असे . सुभाष बसवेकर यांनी नमूद केले. माहितीचा अधिकाराचा वापर हा गंभीरपणे वापरल्यास पारदर्शक शासन निर्माण होण्यास मदत होईल. एखाद्या नागरिकाने विचारलेली माहिती देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात अभिलेख व्यवस्थापन व्यवस्थित करणे गरजेचे आहे, जेणेकरुन कोणत्याही वर्षातील माहिती देणे सोपे होईल असेही . बसवेकर यांनी सांगितले. 000

डेरवलीतील रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन

पनवेल : उरण मतदार संघात आणि पनवेल तालुक्यात येणाऱ्या डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यत्तच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम आमदार महेश बालदी यांच्या सातत्यापुर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांतून मंजूर झाले आहे.…

अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएसच्या 100 जागा मंजूर

ठाणे : केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता एमबीबीएसच्या  100 जागांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी खासदार डॉ.कांत शिंदे तसेच स्थानिक…

प्राध्यापक प्रकाश सुर्वे चमकले

 शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांसाठी झालेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम तर राज्यपातळीवर मिळवला तिसरा क्रमांक   ठाणे : शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रा. प्रकाश राजाराम सुर्वे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे .सेंट जॉन दि  बाप्टिस्ट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ,ठाणे या ठिकाणी कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक प्रा.सुर्वे प्रकाश राजाराम यांना हा पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला .रोख ३० हजार रुपये ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित करण्यात आले.यावेळी  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाइन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.आधुनिक तंत्रज्ञानामुळे डिजिटल शिक्षणाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांना प्रेरित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ही दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती.नवीन शैक्षणिक धोरणात आधुनिक तंत्रज्ञानाला महत्त्व देण्यात आले आहे.शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान अवगत केल्यास शिक्षणाचा दर्जा वृद्धिंगत होईल.  तंत्रस्नेही शिक्षकांमुळे भविष्यात दर्जेदार आणि गुणवंत विद्यार्थी घडतील ,असा आशावाद शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव आय ए कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, संपत सूर्यवंशी, महेश पालकर ,आयटी विभागाचे सोनावणे , मुळये आदि मान्यवर उपस्थित होते .यावेळी विविध गटातील विजेत्या ८४शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार रोख ५० हजार रुपये, द्वितीय ४० हजार रुपये तर तृतीय पुरस्कारासाठी ३० हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले. राज्यातील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ निर्माण व्हावी, शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक ,डीएड शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .अशा स्पर्धेतून दर्जेदार विद्यार्थी घडतील असा विश्वास राज्य शिक्षण सचिव कुंदन यांनी व्यक्त करून उपस्थित पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे कौतुक केले. 00000

नवीन पनवेलमध्ये नवरात्रौत्सव

पनवेल : अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथे सार्वजनिक नवरात्रौत्सव आयोजित करण्यात आला आहे. नवीन पनवेल मधील सीकेटी विद्यालयाच्या…

 राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या आंदोलनाचा दणका

 ठामपाकडून लवकरच पाणी अन् कचरा समस्येचा निपटारा होणार   ठाणे : मुंब्रा – कौसा भागातील पाणी टंचाई आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात डॉ..जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी ठाणे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाणी आणि कचऱ्याची समस्या मार्गी लावण्याबाबत लेखी आश्वासन दिले. मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जात आहे. मागणी करूनही पाणीपुरवठा वाढविण्यात येत नाही. तसेच, कचरादेखील उचलण्यात येत नाही. या निषेधार्थ ठामपाच्या मुंब्रा येथील पाणीपुरवठा विभागासमोर शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात बाबाजी पाटील, सुनिता सातपुते, हिरा पाटील, फरजाना शेख, रेहान पितलवाला, साकीब दाते, मैशर शेख, नाजीम बुबेरे,  शोएब खान,  शाकिर शेख, जाहीद राजपूत  कमरून हुदा  यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरूष आणि लहान मुले सहभागी झाले होते.  याप्रसंगी,  पठाण यांनी, गेल्या 15 दिवसांपासून 3-3 दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही. काही ठिकाणी पाणी माफियांकडून पंप लावून पाणी खेचले जात आहे. टँकर माफिया खुलेआम पाण्याची विक्री करीत आहेत. विकण्यासाठी पाणी आहे. मात्र, गोरगरीबांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यवधींचे ठेके दिले जात आहेत.   शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात येत नाही. अगदी मंदिराच्या आवारातील, मंदिर परिसरातील शाळेजवळील  कचराही उचलण्यात येत नाही, असा आरोप करीत पाणी माफियांवर मोक्का लावण्याची मागणी केली होती. या आंदोलनात सामान्य नागरिकांचा सहभाग वाढल्यानंतर आज (मंगळवारी) ठाणे पालिकेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळ गाठले. ठाणे महानगर पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता विनोद पवार , मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त बाळू पिचड,  मुंब्रा पाणीपुरवठा विभागाचे साळुंखे , घनकचरा विभागाचे एकनाथ मोतीलाल  यांनी शानू पठाण आणि आंदोलकांची भेट घेऊन पाणी, कचरा यासर्व सर्व समस्यांचा निपटारा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळेस विनोद पवार यांनी, पाणी चोरी रोखण्यासाठी मोहीम आखण्यात येईल; तसेच,  वाॅलमेन्स वाढविण्यात येणार आहेत. शिवाय, पाणीचोरांवरही कडक कारवाई करण्यात येईल,  असे जाहीर केले. तर बाळू पिचड यांनी कचर्याबाबत योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. मात्र, ठाणे पालिकेने मुंब्रा – कौसाबाबत अशीच सापत्न भावाची दृष्टी ठेवली तर अत्यंत उग्र आंदोलन छेडण्यात येईल,  असा इशारा शानू पठाण यांनी दिला. चौकट मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा एकीकडे पाणी आणि कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी आंदोलक धरणे आंदोलन करीत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण या शेकडो महिलांसह आंदोलनात सहभागी झाल्या. कौसा, अमृतनगर, रशीद कपाऊंड आदी भागातील महिला मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने येऊन आंदोलनात सहभागी झाल्या. 00000

ठाणे महानगरपालिकेचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेचा ४२वा वर्धापन दिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप…

वसई-विरारला क्षयरोगाचा विळखा

वसई : वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रात क्षयरोगमुक्तीसाठी प्रशासनाकडून शोधमोहीम राबवली जात आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत एकूण ६९२ रुग्ण समोर आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे महापालिका…