आदिवासी मुलांनी कंदील बनवून केली दिवाळी साजरी
ठाणे : ठाण्यातील पाचवड गावांमधील आदिवासी मुलांनी दिवाळी एका अनोख्या पद्धतीने साजरी केली. गेली पाच वर्ष दिवाळीच्या सुट्टीमध्ये आकाश कंदील बनवून आणि त्याची विक्री करून या गावांमध्ये दिवाळी साजरी होते.…
Thane news
ठाणे : ठाण्यातील पाचवड गावांमधील आदिवासी मुलांनी दिवाळी एका अनोख्या पद्धतीने साजरी केली. गेली पाच वर्ष दिवाळीच्या सुट्टीमध्ये आकाश कंदील बनवून आणि त्याची विक्री करून या गावांमध्ये दिवाळी साजरी होते.…
पनवेल – महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येक कुटूंबांपर्यंत पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने अनेक पाऊले उचलली आहेत. यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक साजरी प्रत्येक कुटूंबांमध्ये साजरी करावी यासाठी महापालिकेने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा ५.० या योजनेअंतर्गत पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम विद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांनी काय करावे असे विविध पर्याय मुलांना सूचविण्यात आले. तसेच पर्यावरण विषयावर विद्यार्थ्यांमध्ये रांगोळी स्पर्धा व पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आली. यावेळी रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या दरम्यान फटाके उडवल्याने मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण वाढते. त्यामुळे श्वसनदाह आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनेनूसार हरित सण अंतर्गत फटाकेमुक्त दिवाळी, प्रदूषण मुक्त दिवाळी विद्यार्थ्यांनी साजरी करावी यादृष्टीने ही जनजागृती पालिकेने केली आहे. विद्यार्थ्यांनी पुनर्वापर करण्यात येणाऱ्या वस्तू पासून पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनवून दाखवले.
डिजेच्या तालावर तरूणाई थिरकली ठाणे : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळपासून शहरातील राम मारूती रोड परिसर, मासुंदा तलाव परिसर, गडकरी चौक तरूणाईच्या उत्साहाने फुलुन गेला होता. डिजेच्या तालावर तरूणाईने ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली. पारंपारिक पोशाखात तरूण, तरूणी मासुंदा तलाव परिसरात छायाचित्र काढत दिवाळीच्या शुभेच्छा देत असल्याचे चित्र दिसून आले. तसेच अनेक गायकांनी, ब्रास बँड पथकांच्या गाण्यांनी आजची दिवाळी पहाट रंगली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले. थोड्यावेळाने तरूण तरूणींचे समूह मासुंदा तलाव, गडकरी चौक, राम मारूती रोड परिसरात दाखल होण्यास सुरूवात झाली. तरूण- तरुणी पारंपारिक साडी, कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित होते. अनेकजण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते. डिजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली. चिंतामणी चौकात राॅकस्टार क्विन पल्लवी दाभोळकर, गायक स्वप्निल गोडबोले, तसेच राम मारूती रोड परिसरात बाळकुम येथील राष्ट्रीय ब्रास बॅंडची पथकांचे वादन आयोजित केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटसाठी कपड्यांमध्ये वैविध्य दिसून आले. यंदा महिलांमध्ये घरारा ड्रेस, भरजरी ओढण्यांचा ड्रेस तसेच दक्षिण भारतीय पद्धतीच्या घागरा साडीचा प्रकाराला महिलांची सर्वाधिक पसंती होती. यंदाच्या दिवाळी पहाटला पुरुष विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये दिसून आले. डिजेवर महाराष्ट्र माझा, जय श्रीराम अशी गाणी वाजत होती. तसेच अनेक ठिकाणी राजकीय गामी देखिल वाजत असल्याचे चित्र ठाण्यात दिसून आले. या गाण्यांवर तरूणाईने ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली. रतन टाटांना श्रद्धांजली भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्याकरिता सतत कार्यरत असणारे, या क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारे टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले होते.
ठाणे : 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच स्थानिक संस्था कर कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडला. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. या विधानसभा निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजवायला हवा, असे आवाहान स्वीप टीम कडून करण्यात आले. या वेळी स्थानिक संस्था कार्यालयात 50 हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.या कर्मचारी वर्गाला लोकशाहीत मतदानाला किती महत्व आहे व मतदान का करावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना “मी मतदान करणारंच… आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा” या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान 20 नोव्हेंबर 2024 असे दर्शविणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता 20 नोव्हेंबर 2024 रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहान सर्व कर्मचारी वर्गाला करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाची सामूहिक शपथ घेऊन मतदान जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमाची सांगता केली.
ठाण्यातील “दिवाळी पहाट” कार्यक्रमात ठाणे : दिवाळीत जसे प्रत्येक घरात दीपप्रज्वलन केले जाते, तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या मताचा दीप लोकशाहीच्या निवडणूकरुपी उत्सवात लावावा. त्यातून देशाचे भवितव्य अधिक उज्ज्वल, पारदर्शक आणि न्याय होईल, असा संदेश देत तलावपाळी येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात मतदारांनी मतदान करण्याचा संकल्प केला आणि शपथ घेतली. तलावपाळी परिसर येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. भारतीय राज्यघटनेने मला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्याचा कोणत्याही परिस्थिती वापर करेन. मतदान करून उमेदवार निवडणे माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. देशहिताकरिता जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी माझ्या कुटुंबातील सदस्यांना, परिचितांना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहीत करीन. कोणतीही भीती वा लालसोपोटी मतदान करणार नाही, असा संकल्प उपस्थित सर्व मतदारांनी केला. युवा वर्गाने वेशभूषाच्या माध्यमातून “राष्ट्राच्या हितासाठी करायचं मतदान.., एकतेने एकजुटीने गाजवूया मैदान.., लोकशाहीचा करूया सन्मान.., 100 टक्के करायचं मतदान…” अशी आगळीवेगळी वेशभूषा मतदार जागृती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. नवमतदार तरुणाईला, मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून मतदार जागृती केली जात होती. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. याचा वापर योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी प्रत्येक मतदाराची आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता योग्य उमेदवारास मत देऊन आपले शहर, राज्य आणि देशाच्या विकासात हातभार लावावा आणि दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असे आवाहन स्वीप टीमकडून मतदारांना केले जात आहे. 00000
306 तक्रारींचे निराकरण शंभर मिनिटांच्या आत ठाणे : निवडणुकीच्या दरम्यान काही अनियमितता किँवा आचारसंहिता भंगाविषयी काही बाबी आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल” या ॲप्लिकेशनच्या माध्मातून संदेश, फोटो, व्हिडिओ व्दारे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतात. या ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत तक्रारीचे निवारण केले जाते. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात दि.31 ऑक्टोबर 2024 दुपारी 3:30 वाजेपर्यंत 348 तक्रारी प्राप्त झाल्या. या 348 तक्रारींमध्ये एकूण 324 तक्रारी दखलपात्र असून उर्वरित 24 तक्रारी अदखलपात्र आहेत. या 324 दखलपात्र तक्रारींमधून 306 तक्रारींचे 100 मिनिटाच्या आत निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींचेही निराकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सी-व्हिजिल कक्षाचे जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी श्री.विजयसिंह देशमुख व सहाय्यक समन्वय अधिकारी श्रीमती सुकेशिनी पगारे यांनी दिली आहे. 00000
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा २२ ऑक्टोबरला घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ट्रेडिशनल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी विजय प्राप्त केला. जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडू…
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत महायुती अथवा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध त्याच पक्षाच्या किंवा मित्रपक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. ठाणे शहर, ओवळा-माजिवडा, मुंब्रा-कळवा, डोंबिवली व शहापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत ठळक बंडखोरी दिसत नाही. महायुती व महाविकास आघाडीमधील प्रत्येकी तीन पक्षांतील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने व पक्षांमध्ये समन्वय नसल्याने घाऊक बंड झाले आहे. आता येत्या ४ नोव्हेंबरपूर्वी बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे आहे. ४ नोव्हेंबरनंतर नेमक्या किती मतदारसंघांत किती बंडखोर राहतात, हे स्पष्ट होईल. पाचपाखाडीमध्ये… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडीतून स्व.आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धवसेनेतर्फे रिंगणात उतरले आहेत. येथे काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मविआच्या मतविभाजनाचा शिंदे यांना फायदा होऊ शकतो. ऐरोली, बेलापुरात… ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक (भाजप) विरुद्ध उद्धवसेनेचे एम.के. मढवी अशी लढत असताना शिंदेसेनेच्या विजय चौगुले यांनी रिंगणात उडी मारली आहे. बेलापूरमध्ये गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांनी अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश करून भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बंड केले. शिंदेसेनेचे विजय नहाटा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपला भीती? मीरा-भाईंदरमध्ये गेल्या वेळी अपक्ष निवडणूक लढवून विजयी झालेल्या गीता जैन यांनी आणि भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपने ऐनवेळी गीता जैन यांना डावलून मेहता यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे जैन यावेळीही पुन्हा अपक्ष रिंगणात आहेत. याखेरीज भाजपमधील सुरेश खंडेलवाल (अपक्ष), अजित पवार गटाचे अरुण कदम (अपक्ष) यांनीही बंडाचे निशाण फडकवले आहे. कल्याण ग्रामीणचा तिढा कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजयी झाले होते. मनसेने लोकसभेत दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्याकरिता पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल न करण्याकरिता भाजपचा दबाव असतानाही शिंदेसेनेचे राजेश मोरे यांनी रिंगणात उडी घेतली आहे. कदाचित मुंबईतील माहीम व कल्याण ग्रामीणचा तिढा एकाच वेळी सुटेल. कल्याण पूर्व आणि पश्चिम कल्याण पूर्वेत भाजपने सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत उद्धवसेनेच्या धनंजय बोडारी यांच्याशी असतानाही शिंदेसेनेचे महेश गायकवाड (अपक्ष) यांनी, तर काँग्रेसच्या सचिन पोटे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल करून दोन्ही अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. कल्याण पश्चिममध्ये शिंदेसेनेच्या विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात नरेंद्र पवार व वरुण पाटील या भाजपच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे राकेश मुथा व राजाभाऊ पातकर यांनी बंडखोरी करून उद्धवसेनेचे सचिन बासरे यांची चिंता वाढविली आहे. उल्हासनगरात काय? उल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी व शरद पवार गटाचे ओमी कलानी, असा सामना असताना अजित पवार गटाचे भरत गंगोत्री यांनी रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन होण्याची भीती आहे. अंबरनाथ, मुरबाडमध्ये चिंता कुणाला? अंबरनाथमध्ये सुमेध भवार या काँग्रेस पदाधिकाऱ्याने बंड केले आहे. मुरबाडमध्ये किसन कथोरे विरुद्ध सुभाष पवार या लढतीत शरद पवार गटाचेच शैलेश वडनेरे यांच्या बंडामुळे पक्षाची चिंता वाढली. भिवंडी पूर्व, पश्चिम वादात भिवंडी पूर्वेत सपाच्या रईस शेख यांच्या विरुद्ध उद्धवसेनेच्या रूपेश म्हात्रे यांनी शड्डू ठोकला, तर भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपच्या स्नेहा पाटील यांनी शिंदेसेनेचे शांताराम मोरे यांच्या विरोधात मैदानात उडी घेतली. भिवंडी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या दयानंद चोरघे यांच्या विरोधात काँग्रेसचे विलास पाटील यांनी बंड केले आहे. एमआयएमकडून तुरुंगात असलेले खालिद गुड्डू व वारीस पठाण यांचेही अर्ज आहेत. 0000
ठाणे : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात केवळ हरित फटाके वाजवण्याची परवानगी आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचे पालन करून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. सर्व ठाणेकरांना सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतानाच आरोग्याची खबरदारी घेण्याचेही आवाहन राव यांनी केले आहे. सणांच्या काळात ६ ते ८ आणि रात्री ८ ते १० या काळात हरित फटाके फोडण्याची परवानगी आहे. प्रदूषणमुक्त सण साजरा करून नागरिकांनी स्वत:सोबतच प्राणी, पक्षी, झाडे यांचाही फटाक्यांच्या दुष्परिणामांपासून बचाव करावा, असे आयुक्त राव यांनी म्हटले आहे. या संदर्भातील आवाहन करणारे जनजागृती फलकही महापालिका क्षेत्रात प्रर्दशित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी हरित फटाके फोडताना काळजी घ्यावी. फटाके फोडताना, सिंथेटीक कपड्यांएवजी सूती कपडे परिधान करावेत. मोकळ्या जागेत फटाके फोडावेत. फटाके फोडताना पाणी आणि वाळू यांचा साठा जवळपास ठेवावा. फटाके फोडताना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी जबाबदारीने फटाके फोडावेत, असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले आहे. त्याचबरोबर, दिवाळीची सुटी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. ००००००
६००० रुपयांची दिवाळी भेट आशा सेविकांच्या बॅंक खात्यात जमा ठाणे : दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे वर्ग २ ते ४ मधील सर्व कर्मचारी यांचे सानुग्रह अनुदान, ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच, आशा सेविकांना देण्यात येणारी ६००० रुपयांची दिवाळी भेट दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने नियोजनाबद्ध व्यवस्था केल्याने सानुग्रह अनुदान, वेतन आणि दिवाळी भेट ही दिवाळीच्या आधीच जमा करण्यात आली. त्याबद्दल आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानले आहेत. ठाणे महापालिकेचे २ ते ४ या संवर्गातील ६३०० कर्मचारी, शिक्षण विभागातील ७३६ कर्मचारी, ठाणे परिवहन सेवेचे १४९३ कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ३६५ कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान २४००० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. तर, ४९२ आशा सेविकांना गतवर्षीप्रमाणेच ६००० रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, सानुग्रह अनुदान, दिवाळी भेट तसेच, कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आले. ही सर्व एकत्रित रक्कम सुमारे २२ कोटी रुपये आहे. ठाणे महापालिकेच्या विविध विभागांसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवणाऱ्यात येते. या कामगारांनाही देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचे वितरण तसेच ऑक्टोबरचे वेतन संबंधित कंत्राटदारामार्फत दिवाळीपूर्वीच करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्याची अमलबजावणी करण्यात आल्याची खात्री विभागप्रमुखांमार्फत करण्यात आली आहे.